पिंपरी चिंचवड शहरात चाललेल्या अनियमित बांधकामाबाबत सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळावा यासाठी शिवसेना, भाजप, आरपीआय, मनसे, नागरी हक्क सुरक्षा समिती यांच्या वतीने दि. २३ ऑगस्ट २०१२ रोजी मनपा कार्यालयावर मोर्चा काढला होता. मोर्चाच्या दरम्यान अनधिकृत बांधकामाच्या प्रश्नाकडे राज्यशासनाचे लक्ष वेधून अनधिकृत बांधकामाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर बंद करणार असल्याची घोषणा केली होती. या बंदमध्ये नागरिकांचा सहभाग असणे जरुरीचे आहे. म्हणून नागरिकांच्या प्रतिक्रिया मतदानाद्वारे जाणून घेण्यासाठी ५०००० पेक्षा जास्त नागरिकांचे विभागवार मतदान गुरुवार दि. १३ सप्टेंबर २०१२ रोजी सकाळी ९ ते सायं. ६ या वेळेत घेणार आहे. या मतदानाच्या निकालानंतर नागरिकांच्या मागणीनुसार पिंपरी चिंचवड शहर बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. * जर आपणास आपल्या जवळील मतदान केंद्रावर जाऊन मत देणे शक्य न झाल्यास, आपण ऑनलाईन पद्धतीने मत नोंदवू शकता.
आपले नम्र, शिवसेना, भाजप, आरपीआय, मनसे, नागरी हक्क सुरक्षा समिती
For online voting visit https://docs.google.com/spreadsheet/viewform?fromEmail=true&formkey=dFZNZDRyNHBya0hDNlU1VlBHV1pzTXc6MQ
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 13 September 2012
पुणे-लोणावळा १३ डब्यांची लोकल
पुणे-लोणावळा १३ डब्यांची लोकल: पुणे-लोणावळा मार्गावर तेरा डब्यांची लोकलसेवा चालू करण्याचे नियोजन सुरू असल्याचे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक विशाल आगरवाल यांनी सांगितले.
दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद
दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद: चिंचवड येथील चिंतामणी चौकातील सोनाराच्या दुकानावर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या सहा आरोपींच्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनीट तीनने अटक केली असून त्यातील एक आरोपी फरार झाला आहे. आरोपींकडील वाहने, मोबाइल आणि इतर असा सव्वा आठ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
३७ हजार मोलकरणींना विमा कवच
३७ हजार मोलकरणींना विमा कवच: ‘घरेलू कामगारां’च्या राज्य सरकारच्या नावनोंदणी मोहिमेला शहर आणि जिल्ह्यातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ‘घरेलू कामगार मंडळा’कडे नोंदणी झालेल्या शहर आणि जिल्ह्यातील ४६ हजार मोलकरणींपैकी आतापर्यंत सुमारे ३७ हजार मोलकरणींचा ‘जनश्री विमा योजने’अंतर्गत विमा उतरविण्यात आला आहे.
पार्किंगच्या लुटीला पोलिसांच्या बेड्या
पार्किंगच्या लुटीला पोलिसांच्या बेड्या: पार्किंगसाठी एफएसआय किंवा अन्य सवलती घेतलेल्या सर्व इमारतींमधील पार्किंग मोफतच असावे, असा प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी पुणे महापालिकेस पाठविला आहे. तो मान्य झाल्यास अव्वाच्या सव्वा दराने पैसे उकळणा-या मॉल-मल्टिप्लेक्ससह इतर अनेक ठिकाणचे पार्किंग मोफत होऊ शकते.
पिंपरीतही मेट्रोचा प्रस्ताव
पिंपरीतही मेट्रोचा प्रस्ताव: पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरिता संयुक्त मेट्रो प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार असून, त्यासाठी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) यांना ५३ लाख रुपये देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी मंजूर करण्यात आला. अहवाल तयार झाल्यानंतर स्थायी समितीची प्रशासकीय मान्यता घेऊन पुढील कार्यवाहीसाठी राज्य आणि केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
ढिसाळ कारभार : खेळाडू पदकांपासून वंचित
ढिसाळ कारभार : खेळाडू पदकांपासून वंचित: पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे जिल्हा क्रीडा परिषदेमार्फत घेण्यात येणा-या शालेय क्रीडा स्पर्धा फक्त उरकरण्यावर भर दिला जात आहे. या स्पर्धा घ्यायच्या म्हणून घेण्यात येत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. तसेच गेल्या चार वर्षांपासून विजेत्याखेळाडूंना देण्यात येणारे पदक बंद करून, फक्त प्रशस्तिपत्रक देऊन बोळवण केली जात असल्यामुळे खेळाडू व पालकांमधून नाराजीचा सुर आहे.
वादग्रस्त पुरवठादाराचे ‘सौजन्य’ अन् माजी सदस्यांचा सिंगापूर दौरा!
वादग्रस्त पुरवठादाराचे ‘सौजन्य’ ...:
पिंपरी / प्रतिनिधी
एका वादग्रस्त पुरवठादाराचे ‘सौजन्य’ घेऊन िपपरी शिक्षण मंडळाचे नऊ माजी सदस्य पुन्हा सिंगापूर दौऱ्यावर रवाना झाले आहेत. यापूर्वीचे हिशेब पूर्ण करण्याबरोबरच नव्या टीमशी जुळवून देऊ आणि प्रस्तावित दोन कोटींची कामे मिळवून देऊ, अशी हमी काहींनी घेतल्याने दौऱ्याचा संपूर्ण खर्च उचलण्याची तयारी त्याने दाखवली.
Read more...

पिंपरीत एकाच दिवशी जकात चुकविलेल्या १५ मोटारी पकडल्या ; १८ लाखांचा दंड
पिंपरीत एकाच दिवशी जकात ...:
पिंपरी/ प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरात जकातचोरांचा सुळसुळाट असताना पालिकेच्या भरारी पथकाने वातावरण ‘टाईट’ केल्याने एकाच दिवशी जकात चुकविलेल्या १५ मोटारी पकडण्यात त्यांना यश आले. सुमारे ५० लाखाच्या मालावरील जकात चुकवेगिरीप्रकरणी १८ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

सोलापुरातील टोळीला चिंचवडमध्ये अटक
सोलापुरातील टोळीला चिंचवडमध्ये अटक: पिंपरी । दि. ११ (प्रतिनिधी)
चिंचवड येथील अमित ज्वेलर्स या दुकानावर दरोडा टाकण्यासाठी मोटारीतून हत्यारे घेऊन चाललेल्या सोलापुरातील टोळीला गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून मोटारीसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास आहेरनगर येथील चिंतामणी चौकात ही कारवाई करण्यात आली. आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलीस उपनिरीक्षक जालिंदर तांदळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन राजू माने, लखन अशोक कुलकर्णी, किरण आनंद धोडमिसे (तिघांचेही वय २१, रा. अनिलनगर वसाहत, पंढरपूर, जि. सोलापूर), अनिल पुंडलिक घाडगे (२0), प्रवीण देविदास शिंदे (२२, रा. डोंबे गल्ली, पंढरपूर, जि. सोलापूर), लक्ष्मण शिवाजी आकळे (२३, रा. मंगळवेढा, जि. सोलापूर), सिद्धनाथ हरिभाऊ कडलस्कर (२३, रा. कडबे गल्ली, पंढरपूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर त्यांचा साथीदार प्रीतम दिलीप रायचुरकर (रा. डांबे गल्ली, पंढरपूर) हा पसार झाला आहे. ते दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार क्रुझर मोटारीमधून (एमएच १३ एझेड ३0८२) चाललेल्या तरुणांची हालचाल संशयास्पद वाटली. म्हणून पोलिसांनी त्यांना हटकले. त्यांच्या मोटारीची तपासणी केली असता त्यात सुरा, नायलॉन दोरी, मिरची पावडर, लोखंडी गज, पाईप, कटावणी अशी घातक हत्यारे आढळली. मोटारीसह ८ लाख २९ हजार ८३५ रुपयांचा
मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींवर कर्नाटक, महाराष्ट्रात मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बेळगावात घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली त्यांनी दिली आहे.

राजकीय हस्तक्षेपाला जुमानणार नाही
राजकीय हस्तक्षेपाला जुमानणार नाही: पिंपरी । दि. ११ (प्रतिनिधी)
गणेश मंडळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर खटले दाखल करण्यात पोलिसांना स्वारस्य नाही. यंदाच्या गणेशोत्सवात अदखलपात्र गुन्हा दाखल व्हावा, असे कृत्यदेखील आपल्या हातून घडणार नाही, असा संकल्प कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांनी करावा, असे आवाहन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी मंगळवारी केले. गुन्हा दाखल करण्याची वेळ आमच्यावर आलीच तर त्या वेळी राजकीय पदाधिकार्यांचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
पिंपरी महापालिका आणि पुणे पोलीस आयुक्तालय परिमंडल तीनच्या वतीने गणेश मंडळासाठी आयोजित शांतता बैठकीत ते बोलत होते. संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात झालेल्या बैठकीत पोळ म्हणाले, ‘‘गणेशोत्सवाच्या एक दिवस आधी जनरल वैद्य यांच्या मारेकर्यांना पिंपरीतच पकडण्यात आल्याचे मला आठवते. सध्या साखळी बॉम्बस्फोटांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. गणेशोत्सवाच्या आधीच बॉम्बस्फोटातील अतिरेकी पकडण्यात यश आले, तर आपणा सर्वांना गणपतीबाप्पा पावला असे म्हणता येईल. नागरिकांत जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची यादीच त्यांनी येथे सांगितली.

Activists 'beg' to scrap PMPML fair hike
Activists 'beg' to scrap PMPML fair hike: PUNE: Representatives of various NGOs launched a bhik (begging) andolan in front of the main building of the Pune Municipal Corporation (PMC).
विद्यार्थिनीला मारहाण करणा-या शिक्षकाला अटक

पिंपरी, 11 सप्टेंबर
वर्गातील बाकावर शिक्षकांबद्दल अपमानास्पद वाक्य लिहिल्याबद्दल एका शिक्षकाने सहावीतील विद्यार्थिनीला बेदम मारहाण केली. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी शिक्षकाला अटक केली. ही घटना थेरगावच्या खिंवसरा पाटील शाळेत काल, सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
पिंपरी, 11 सप्टेंबर
वर्गातील बाकावर शिक्षकांबद्दल अपमानास्पद वाक्य लिहिल्याबद्दल एका शिक्षकाने सहावीतील विद्यार्थिनीला बेदम मारहाण केली. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी शिक्षकाला अटक केली. ही घटना थेरगावच्या खिंवसरा पाटील शाळेत काल, सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
मेट्रो प्रकल्पाच्या अहवाल खर्चाला मंजुरी
मेट्रो प्रकल्पाच्या अहवाल खर्चाला मंजुरी
पिंपरी, 11 सप्टेंबर
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्या टप्प्यात राबविण्यात येणा-या मेट्रो प्रकल्पाच्या अहवालासाठी पिंपरी महापालिकेच्या वाट्याला येणा-या 53 लाख 56 हजार रुपयांच्या खर्चाला आज स्थायी समितीच्या सभेमध्ये मंजुरी देण्यात आली. www.mypimprichinchwad.com

साई संस्कारच्या विशेष मुलांना रोटरी क्लबचा मदतीचा हात

चिंचवड येथील साई संस्कार संस्थेतील विशेष मुलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने आकुर्डी व निगडी रोटरी क्लबने मदतीचा हात पुढे केला आहे. दोन्ही क्लबच्या वतीने संस्थेला पेपर प्लेट, द्रोण, फाईल आदी कागदी वस्तू तयार करणारे पेपर कन्व्हर्जन यंत्र आज भेट देण्यात आले. www.mypimprichinchwad.com

पाडापाडीमुळे आयुक्तांचे विकासकामांकडे दुर्लक्ष ; 61 टक्के दर्शकांचे मत

पिंपरी, 10 सप्टेंबर
अनधिकृत बांधकामांवरील कारवाईकडे लक्ष केंद्रीत करणा-या महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांचे विकासकामांकडे दुर्लक्ष झाल्याचे मत 'एमपीसी न्यूज'च्या 61 टक्के दर्शकांनी नोंदविले आहे. आयुक्तांनी 'पाडापाडी' कारवाईबरोबरच विकासकामांचाही समतोल साधल्याचे 37 टक्के दर्शकांचे म्हणणे आहे. तर दोन टक्के दर्शकांनी याबाबत काहीही न बोलणे पसंत केले आहे.

एका दिवसात जकात चोरीची 15 वाहने पकडली
एका दिवसात जकात चोरीची 15 वाहने पकडली
पिंपरी, 10 सप्टेंबर
महापालिकेच्या सुट्टीच्या दिवशी जकात चोरी होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जकात विभागाने विशेष मोहीम राबवून जकात चोरीची 15 वाहने पकडली. त्याव्दारे सुमारे 50 लाख रुपयांची जकात चोरी उघडकीस आली असून सुमारे पावणे अठरा लाख रुपयांच्या दंड वसुलीची नोटीस संबंधित आयातकांना बजाविण्यात आली आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
पिंपरी, 10 सप्टेंबर
महापालिकेच्या सुट्टीच्या दिवशी जकात चोरी होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जकात विभागाने विशेष मोहीम राबवून जकात चोरीची 15 वाहने पकडली. त्याव्दारे सुमारे 50 लाख रुपयांची जकात चोरी उघडकीस आली असून सुमारे पावणे अठरा लाख रुपयांच्या दंड वसुलीची नोटीस संबंधित आयातकांना बजाविण्यात आली आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
एक होतं तळं... संपादकीय
एक होतं तळं... संपादकीय
अंतराळातील एक-एक ग्रह जिंकत तो 'सुपरहिरो' पृथ्वीवर आला. मात्र, पृथ्वीवर राज्य करायचं नाही, असं तो म्हणू लागला. कारण काय तर, पृथ्वीवर दोन तृतीयांश पाणीच आहे. एक तृतीयांश जमिनीवर मी काय राज्य करणार ? त्यावेळी आजच्या सारखे विद्वान पाहिजे होते, त्यांनी समुद्र बुजवून जमीन वाढविण्याची भन्नाट कल्पना त्याच्या डोक्यात घुसवली असती. जमिनीची कोट्यवधी रुपयांची किंमत कळल्यानंतर लक्ष्मी घरी पाणी भरू लागते, त्यामुळे मग बाहेरच्या पाण्याच्या स्रोतांना, जलाशयांना त्यांच्या लेखी काय किंमत उरणार ? नदीचं पात्र बुजविणारी ही जमात छोट्या-मोठ्या तळ्याचा तो काय विचार करणार ? तळं राहिलं तर फायदा कोणाला ? मात्र तळं बुजवलं तर कोट्यवधींचा फायदा, काहीजणांची तरी 'गरिबी' नक्कीच दूर होणार !

स्पर्धेत टिकण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज - प्रतापराव पवार
स्पर्धेत टिकण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज - प्रतापराव पवार: पिंपरी - जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन "सकाळ'चे अध्यक्ष आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केले.
पिंपरी महापालिकेतर्फे गणेशोत्सव स्पर्धा
पिंपरी महापालिकेतर्फे गणेशोत्सव स्पर्धा: पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध विषयांवर आधारित गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे प्रवेश अर्ज 10 ते 13 सप्टेंबर या कालावधीत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या स्पर्धेत शहरातील गणेश मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर मोहिनी लांडे आणि आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी केले आहे.
"पीएमपी'ला संजीवनी देतील बाराशे खासगी गाड्या
"पीएमपी'ला संजीवनी देतील बाराशे खासगी गाड्या: पीएमपी ही सर्वसामान्य पुणेकरांची जीवनवाहिनी आहे. तिला मजबूत करण्याची जबाबदारी असणाऱ्यांनी तिच्याकडे पाठ फिरवल्याने ती क्षीण झाली आहे. किमान बाराशे खासगी बस गाड्या खरेदी केल्यास तिला संजीवनी मिळणे शक्य आहे.
Pimpri Chinchwad Municipal Corporation panel, admin spar over transfer issue
Pimpri Chinchwad Municipal Corporation panel, admin spar over transfer issue: Last month, the PMPML sent a letter to the PCMC stating that the employees be sent back to the transport body as it needs more manpower with an increase in services and bus operations.
अंतर्गत रिंगरोडवरही फ्लायओव्हर उभारावेत
अंतर्गत रिंगरोडवरही फ्लायओव्हर उभारावेत: शहराच्या अंतर्गत रिंगरोडसाठी (एचसीएमटीआर) ‘जेएनयूआरएम’अंतर्गत किंवा डेव्हलपमेंट टीडीआर वापरून निधीची उभारणी करावी, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक आबा बागुल यांनी केली आहे. दरम्यान, १९८२ मध्ये ‘सीओईपी’ने तयार केलेल्या आराखड्यानुसार ‘एचसीएमटीआर’वर फ्लायओव्हरचे नियोजन करण्याची मागणीही त्यांनी केली.
गृहमंत्र्यांनी साधला कैद्यांशी संवाद
गृहमंत्र्यांनी साधला कैद्यांशी संवाद: पिंपरी । दि. ९ (प्रतिनिधी)
साहब, मुझे छोडने को बोलो ना, इन पुलीस लोगों को. कब से बंद कर के रखा है. क्यूॅँ? बाहर निकल के तुम्हे चोरीयों की सेन्च्युरी पुरी करनी है क्या? हा संवाद आहे राज्याचे दस्तुरखुद्द गृहमंत्री आर. आर. पाटील आणि घरफोड्यांतला अट्टल आरोपी पापासिंह टाक दुधानी यांच्यातील.
ठिकाण आहे भोसरी पोलीस ठाणे. गृहमंत्री पाटील यांनी रविवारी दुपारी भोसरी पोलीस ठाण्याला धावती भेट दिली. कर्मचार्यांशी हितगूज साधतानाच त्यांनी पोलीस कोठडीतील आरोपीशी देखील संवाद साधला. पोलीस ठाण्यात होणार्या आधुनिकीकरणाचीही त्यांनी माहिती घेतली.

Controversies, scams hit civic terrain
Controversies, scams hit civic terrain: PCMC grapples with charges over EWS, SRA, water meter plans; activists say development getting hurt
गणपतीबाप्पांसाठी विविध प्रकारच्या आकर्षक मखरांनी बाजारपेठ सजली
गणपतीबाप्पांसाठी विविध प्रकारच्या आकर्षक मखरांनी बाजारपेठ सजली
पिंपरी, 10 सप्टेंबर
दहा दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी बाजारपेठ आता फुलू लागली आहे. बाप्पांच्या लहानमोठ्या सर्वांगसुंदर मूर्ती बरोबरच त्यांची प्रतिष्ठापना करण्यासाठी विविध प्रकारची आकर्षक रंगबिरंगी मखरांनी बाजारपेठ रंगून गेली आहे. उत्साही पिंपरी-चिंचवडकरांची अशा वेगवेगळ्या मखरांची खरेदी करण्यासाठी लगबग उडाली आहे. www.mypimprichinchwad.com

पिंपरी-चिंचवडकरांना घडले कोकणच्या गणेशोत्सवाचे दर्शन

पिंपरी, 9 ऑगस्ट
गणपतीचे धुमधडाक्यात स्वागत, झिम्मा फुगडी, गाण्यांची धमाल, संगीत भजनाचा डबलबारी सामना अशा अस्सल कोकणी वातावरणात कोकणच्या गणेशोत्सवाचे दर्शन पिंपरी-चिंचवडकरांना घडले. निमित्त होते, जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या कोकणचा गणेशोत्सव या कार्यक्रमाचे. या कार्यक्रमातून कोकणच्या पारंपरिक गणेशोत्सवाचे स्वरुप दाखविण्यात आले.

ढोल-ताशांच्या गजरात महिलांनी दिला मुलगी वाचविण्याचा संदेश

पिंपरी, 9 सप्टेंबर
सह्याद्री ढोल-ताशा पथकातर्फे काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीमध्ये महिलांनी 'स्त्री भ्रूण हत्या थांबवा अन् मुलगी वाचवा' असा संदेश दिला. भगवा फेटा, पांढरा शुभ्र पोशाख परिधान करून ढोल ताशांचा गजर करणा-या महिला सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होत्या. या पथकातर्फे मिरवणुकीवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमे-यांची व्यवस्था हे या मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले.

शासनाने उद्योगांसाठी पूरक धोरण आखावे - फिरोदिया
Subscribe to:
Posts (Atom)