Saturday, 4 August 2018

सहाआसनी रिक्षाचालक ते पिंपरीचा महापौर

राहुल जाधव यांचा खडतर प्रवास

पिंपरी : मूळचे शेतकरी असलेले राहुल जाधव यांचा सहाआसनी रिक्षाचालक ते राजकारण प्रवेश, मनसेचे कार्य, नगरसेवकपद आणि आमदार महेश लांडगे यांच्याशी आलेला संपर्क, त्यांच्या माध्यमातून झालेला भाजप प्रवेश ते पुन्हा नगरसेवक असा खडतर प्रवास पूर्ण झाला आहे. शनिवारी (४ ऑगस्ट) ते पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदावर विराजमान होणार आहेत.

पिंपरी-चिंचवड मनपाने सुधारित विकास आराखड्याची अंमलबजावणी करावी

राज्य शासनाने दिले कारवाईचे संकेत: नगरविकास विभागात बैठक 
पिंपरी-सुधारित विकास आराखडायाबाबत पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने आता गांभिर्याने घेणे आवश्यक आहे. आजतागायत पिंपरी-चिंचवड पालिकेस अनेक वेळा कारवाई करण्याचा सूचना राज्यशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. त्याकरिता औरंगाबाद नगररचना विभागाची १५ सदस्यीय समिती सुद्धा नेमण्यात आली आहे. स्थानिक पालिका प्रशासनाने त्याबाबत अंमलबजावणी तातडीने करणे आवश्यकच आहे. अन्यथा राज्य शासनाला स्वतः कडक कारवाई करावी लागेल”. असे स्पष्ट मत महाराष्ट्र शासनाचे नगरविकास विभागाचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी मंत्रालय येथे व्यक्त केले.

पाठ आणि मणक्याच्या आजारांनी तरुण रुग्णांना ग्रासले!

दीर्घ पल्ल्याचा प्रवास, रहदारीच्या प्रमाणामुळे होणारा वेळ, रस्ते दुरवस्थेचा परिणाम 
आज राष्ट्रीय अस्थिविकार जनजागृती दिन
पुणे : कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी करावा लागणारा शहरांतर्गत दीर्घपल्ल्याचा प्रवास, रहदारीच्या प्रमाणामुळे प्रवासात जाणारा वेळ आणि भर म्हणून रस्त्यांची बिकट अवस्था यांमुळे पाठीच्या आणि मणक्याच्या विकारांनी ग्रस्त असलेल्या पुण्यातील तरुण रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

PMRDA to start work on third Metro line by Oct

PUNE: The work on the elevated Hinjewadi-Shivajinagar Metro corridor will begin by October.

मेट्रोच्या कारशेडसाठी माणमधील ५० एकर जागा

पुणे - मेट्रोच्या कारशेडसाठी माण (ता. मुळशी) येथील पन्नास एकर जागेचे भूसंपादन करण्यात येणार आहे. भूसंपादनाच्या मोबदल्यात तेथील शेतकऱ्यांना आर्थिक भरपाईबरोबरच म्हाळुंगे येथे होणाऱ्या नगर रचना योजनेत दहा टक्के विकसित जमिनी देण्याचा निर्णय पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने घेतला आहे.

जेव्हा नगरसेविका रमतात मूर्ती घडवण्यात

सांगवी – पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्‍त (भा. प्र. से.) यांच्या सहमतीने एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन (इसीए) ने पिंपरी-चिंचवड मधील 635 शाळांच्या शिक्षकांना शाडू मातीच्या मूर्ती बनवण्याचे मोफत प्रशिक्षण दिले. दुसऱ्या टप्प्यात सांगवी परिसरातील 29 शिक्षकांनी भाग घेतला. प्रशिक्षणासाठी नगरसेविका शारदा सोनवणे उपस्थित होत्या. केवळ उद्‌घाटनासाठी आलेल्या नगरसेविका शारदा सोनवणे यांना हा उपक्रम इतका आवडला की त्या स्वतः शाडूची मूर्ती बनवण्यात रमल्या व त्यांनी संपूर्ण मूर्ती बनवली.

पाऊस उघडताच खड्डे बुजवण्याचे काम जोरात

पिंपळे-सौदागर – प्रभाग क्र. 28 मधील रहाटणी, पिंपळे-सौदगर मधील शिवार चौक ते साई अम्बियन्स सोसायटी, कुणाल आयकॉन रोड, महादेव मंदिर ते रहाटणी चौक दरम्यान पावसामुळे तसेच विविध खोदकामामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने त्यात पावसाचे पाणी साचत आहेत. त्यामुळे नागरिकांना, शाळेतील लहान मुलांना याचा त्रास सहन करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे व नगरसेविका शितल नाना काटे यांनी महापालिकेच्या संबंधित विभागाशी बोलून पावसाचे प्रमाण कमी आहे, खबरदारी म्हणून जेट प्याचर कोल्ड इमल्शन या आधुनिक मशीनद्वारे त्वरित रहाटणी पिंपळे सौदागर या प्रभागातील सर्व खड्डे बुजवण्यास सांगितले. त्यानुसार महापालिकेतर्फे जेट पॅचर या आधुनिक मशीन द्वारे खड्डे बुजवण्यात आले. पावसाने उघडीप देताच खड्डे बुजवण्याचे काम जोरात सुरू असल्याने नागरिकांनी व विद्यार्थ्यानी समाधान व्यक्‍त केले आहे.

अ‍ॅथलिट पराग पाटील आर्थिक अडचणीत

पिंपरी : एशिया पॅसिफिक मास्टर गेम्स सप्टेंबरमध्ये मलेशिया येथे होणार आहेत. यासाठी पिंपरी-चिंचवडमधील आंतरराष्ट्रीय प्रौढ खेळाडू पराग पाटील यांची तयारी सुरु आहे. आजवर त्यांनी देशासाठी 11 आंतरराष्ट्रीय पदके मिळविली आहेत. मात्र देशाने त्यांची कसलीही दखल घेतली नाही. आर्थिक परिस्थिती बिकट असून देखील पाटील यांनी केवळ देशाची मान उंचावण्याचा ध्यास घेतला आहे. त्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. स्पर्धेत 57 देश सहभागी होणार आहेत. 30 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले खेळाडू सहभाग घेऊ शकतात. पाटील यांनी या स्पर्धेत 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, लांब उडी आणि तिहेरी उडी या चार मैदानी स्पर्धा प्रकारांमध्ये सहभाग घेतला आहे. भारतातून एकूण 30 खेळाडू या स्पर्धेसाठी जाणार आहेत.

महापालिका करणार ‘सेमी इंग्लिश’ सुरू

शिक्षण समितीचा निर्णय
पिंपरी-चिंचवड :  महापालिकेच्या शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी सेमी इंग्लिश सुरु करण्यात येणार आहे. तसेच स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी पालिका शाळेतील मुलींना कराटे प्रशिक्षण देण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या शिक्षण समितीच्या सभेत घेण्यात आला. समितीची पाक्षिक सभा पार पडली. सभापती सोनाली गव्हाणे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. उपसभापती शर्मिला बाबर, सदस्या विनया तापकीर, उषा काळे, सुवर्णा बुर्डे, शारदा सोनवणे यांनी यावेळी झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.

बीआरटी मार्गावर जुन्या बॅरीकेटस्चा वापर

देहू-आळंदी ते काळेवाडी मार्गावर निगडीतील बॅरीकेटस्
महापालिका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा आरोप

टाटा मोटर्समध्ये गुणवत्ता दिन म्हणून साजरा

जे. आर. डी. टाटा यांची 114 वी जयंती
गुणवत्तेत सुधारणा करणार्‍यांचा सन्मान

सायकल खरेदीच्या बोगस पावत्या जमा

पिंपरी : जनतेला पारदर्शक कारभाराची हमी देत पिंपरी-चिंचवड महापालिकेने थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रक्रियेवर भर दिला. त्यामुळे महापालिकेच्या कल्याणकारी योजनांचा लाभ लाभार्थींना वस्तू स्वरुपात नव्हे, तर रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानूसार महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाने लाभार्थ्यांना सायकल व शिलाई मशीन थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) अतंर्गत देण्यात आला. परंतू, त्यात सुमारे शंभर जीएसटीच्या पावत्या बोगस आढळून आल्या असून बोगस पावत्या देणा-या लाभार्थ्यांचे अनुदान रोखून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

टंकलेखनाच्या बोगस प्रमाणपत्राव्दारे पदोन्नती

पिंपरी : महापालिकेतील वर्ग 4 मधील सुमारे 117 कर्मचार्‍यांना वर्ग 3 मधील लिपिक पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने दोन महिन्यापुर्वी घेतला. त्याचा लाभ सुमारे 117 कर्मचा-यांना झाला. त्याच्या शैक्षणिक अर्हतेनूसार पदोन्नती देण्यात आली. परंतू, त्यातील काही कर्मचा-यांनी पदोन्नती मिळावी, याकरिता टंकलेखनाचे बोगस प्रमाणपत्र सादर करुन त्यांनी ही पदोन्नती मिळविल्याची तक्रार आयुक्तांकडे करण्यात आली होती. तसेच त्या प्रमाणपत्राची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून खातरजमा करुन संबंधितावर कडक करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वसंत रेगडे यांनी केली होती.

शिवण यंत्र खरेदी पावतीला मुदतवाढ

सभापती स्वीनल म्हेत्रे यांची माहिती
पिंपरी-चिंचवड : महिलांना स्वयंरोजगार निर्माण करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्या महिला व बालकल्याण योजनेंतर्गत शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी अर्थसहाय देण्यात येते. त्यासाठी पात्र लाभार्थ्यांना मशीन खरेदी केल्याची जीएसटीची पावती आणि बँक खात्याचा तपशील माहिती केंद्रात सादर करण्याची मुदत 15 ऑगस्ट पर्यंत वाढविली आहे. तरी, पात्र लाभार्थ्यांनी मुदतीत पावत्या सादर कराव्यात, असे आवाहन पक्षनेता एकनाथ पवार आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्वीनल म्हेत्रे यांनी केले आहे.

समाविष्ट गावांच्या विकासाचे रडगाणे थांबणार?

महापौर, विरोधी पक्षनेत्यासह महत्वाची पदे समाविष्ट गावात
चर्‍होलीचा झाल कायापालट; राहुल जाधव विकासासाठी सज्ज

महापौर निवडणूकीसाठी ‘भाजप’चा व्हिप

उमेदवारी देताना दोन गट नाराज झाल्याने घेतली जात आहे खबरदारी
पिंपरी-चिंचवड : भाजपचे पिंपरी-चिंचवड महापालिकेत बहुमत आहे. 128 सदस्य असलेल्या पालिकेत या पक्षाचे 77 सदस्य आहेत. तरीही 4 ऑगस्टला होऊ घातलेल्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी भाजपने गुरूवारी व्हिप (पक्ष आदेश) जारी केला. त्यामुळे तो चर्चेचा विषय झाला आहे. महापौर पदासाठी उमेदवारी देताना भाजपमधील दोन गट नाराज झाल्याने ही खबरदारी घेण्यात आल्याचे समजते. मात्र काही स्थानिक गाववाले नगरसेवक यांना मानाची पदे मिळाली नाहीत व खर्या ओबीसीवर अन्याय झाल्यामुळे काही नगरसेवक भाजपच्या धेयधोरणावर नाराज आहेत. कदाचित हे बंडोबा खवळले तर भाजपला सत्ता असूनही महापौर निवडणूकीत सत्तेवरुन पायउतर होण्याची नामुष्की ओढवेल या भितीने पिंपरी-चिंचवड शहर भाजपकडून व्हीप जारी केला असल्याची चर्चा शहरात आहे.

अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा, विचारांचा वारसा जोपासण्याची गरज- पक्षनेते एकनाथ पवार

निर्भीडसत्ता न्यूज –
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा जोपासण्याची गरज असल्याचे मत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी व्यक्त केले.

स्मृतिचिन्हावर महापालिका लोगोचा विनापरवाना वापर

महापालिकेतर्फे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रबोधन पर्व कार्यक्रम निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकात आयोजित केला आहे. कार्यक्रमात पालिकेचा लोगो विनापरवाना वापरून एका खासगी संस्थेतर्फे स्मृतिचिन्ह वाटप केले जात आहे. तसेच, कार्यक्रमात लोकशाहीर साठे यांनी लिहिलेल्या फकिरा ऐवजी  इतर पुस्तके भेट म्हणून दिली जात आहेत. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित खासगी संस्थेवर फौजदारी  कारवाईची मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. 

आकुर्डीत पीसीपीची जनजागृती मॅरेथॉन रॅली

सिंहासन न्यूज:
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड तंत्र निकेतनच्या (पीसीपी) वतीने पर्यावरणाच्या रक्षणासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने आकुर्डी प्राधिकरण परिसरातून तीन कि.मी.ची मिनी मॅरेथॉंन व प्रचार फेरी काढण्यात आली. पीसीपीच्या प्रवेशव्दारापासून प्राचार्या व्ही.एस.बॅकोड यांनी झेंडा दाखवून मॅरेथॉनला सुरुवात झाली. प्रा. मनोज वाखारे यांनी आयोजन केलेल्या फेरीमध्ये सर्व विभाग प्रमुख विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी सहभाग घेतला होता. रॅलीतील विद्यार्थ्यांनी बिग इंडिया चौक, मूक बधिर स्कूल, स्वप्नपूर्ती रोड येथे नदी प्रदूषण, प्लास्टिक कॅरीबॅग, वृक्षारोपण विषयी जनजागृती करणारे फलक दर्शविले.

पाणीटंचाईवरून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी अधिकार्‍यांना कार्यालयात कोंडले

पाणीटंचाईवरून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी अधिकार्‍यांना कार्यालयात कोंडले

जलवाहिन्यांची दुरुस्ती

पिंपरी - शहरातील तीन ठिकाणी एमआयडीसीच्या जलवाहिन्या फुटून गुरुवारी मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले होते. त्या जोडण्याचे काम शुक्रवारी (ता. 3) सायंकाळी पूर्ण झाले. त्यानंतर एमआयडीतील व त्यावर आधारित निवासी भागातील पाणीपुरवठा सुरळीत झाला. 

उद्योगांच्या वाढीव वीजबिलावर सवलत?

महावितरणचा प्रस्ताव : पण, 2 टक्‍क्‍यांपर्यंत दरवाढ
पुणे – राज्यातील महावितरणचे औद्योगिक वीजदर हे इतर राज्यांच्या समतूल्य असून कृषी ग्राहकांचे वीजदरसुद्घा सरासरी पुरवठा आकाराच्या 50 टक्केच आहे. वीजदर वाढीच्या प्रस्तावात औद्योगिक ग्राहकांसाठी फक्त 2 टक्‍क्‍यांपर्यंत दरवाढ तसेच औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांच्या वाढीव वीजवापरावर 1 रुपये प्रतियुनिट सवलत प्रस्तावित केली असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.

मोबाईलमध्ये ‘UIDAI’ नावाचा नंबर सेव्ह?

मुंबई – देशभरातल्या मोबाईल धारकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. देशातील अनेकांच्या मोबाईलमध्ये एक नंबर आपोआप सेव्ह झाल्याचे समोर येत आहे. युनिक आयडेन्टिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचा (UIDAI) मदत क्रमांक अनेकांच्या मोबाईलमध्ये आपोआप सेव्ह होत आहे. त्यामुळे अनेकजण आश्‍चर्यचकीत झाले आहेत.