Monday, 9 September 2013

PCMC removes TV cables covering 400-km stretch

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) recently removed unauthorized television cables covering a total length of around 400km in the municipal limits.

LPG subsidy in banks from November

The state government has postponed plans to roll out the Aadhaar-linked direct benefit transfer scheme for LPG subsidy in Pune.

चार दुकाने फोडून चार लाखांचा ऐवजाची चोरी

कासारवाडीमधील मोटारीचे साहित्य विक्री करणा-या चार दुकानांच्या शटरचे कुलूप तोडून दोन दुकानातून रोख रक्कम आणि साहित्य असा सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. ही घटना आज (रविवारी) पहाटे कासारवाडीतील सागर प्लाझा इमारतीत घडली.

शहरातील 1341 मंडळांच्या गणेशउत्सवासाठी पोलीस सज्ज


संवेदनशील मंडळाजवळ 24 तास खडा पहारा
लाडक्या गणेशाचे मोठ्या थाटात आगमन होत असून यंदा शहरात एकूण 1341 सार्वजनिक गणेश मंडळांची नोंद आहे.'गणेशोत्सवा'त शहरामध्ये गुन्हेगारी आणि दहशतवादी कारवायांवर करडी नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी

निगडीतील १४ चौकांमध्ये लोकवर्गणीतून ४२ सीसीटीव्ही

निगडीतील जागरूक नागरिकांनी पुढाकार घेऊन १४ चौकांमध्ये ४२ सीसीटीव्ही बसवण्याचा संकल्प केला व पहिल्या टप्प्यात सहा ठिकाणी कॅमेरे बसवले आहेत,

साहित्य खरेदीसाठी चाकणला झुंबड

चाकण : गणेशोत्सव एका दिवसावर येऊन ठेपल्याने तयारीसाठी, तसेच सजावटीच्या साहित्य खरेदीसाठी नागरिकांची परिसरातील बाजारात झुंबड उडत आहे. शहरात गणेशोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, शहरातील मोक्याच्या ठिकाणी ५0 ते ६0 गणेशमूर्तींचे स्टॉल्स लागले आहेत. सजावटीच्या साहित्यांनी दुकाने थाटली असून, साहित्य घेण्यासाठी बाजारपेठ गजबजली आहे. या बाजारात तीन कोटींची उलाढाल होण्याची शक्यता व्यापार्‍यांनी वर्तवली आहे.

उद्योगांना सरकारने बळकटी द्यावी

पिंपरी : सध्याच्या मंदीच्या काळात उद्योग व्यवसाय व्यापार क्षेत्रात निराशाजन्य वातावरण आहे. रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे उद्योग मोठय़ा अडचणीत आले आहेत. पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किमतीमुळे या क्षेत्राला फार मोठय़ा मंदीला तोंड द्यावे लागत आहे. मोठय़ा कंपन्यांनी मोठय़ा कालावधीचे ब्लॉक क्लोजर घोषित केल्यामुळे कामगार क्षेत्रावरही फार मोठा अनिष्ट परिणाम झालेला आहे. महागाईने सामान्य माणूस होरपळून निघालेला आहे. अशा अवस्थेत सरकारने उद्योग व्यवसाय व्यापाराला काहीतरी पॅकेज जाहीर करणे अपेक्षीत आहे, अशी मागणी फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.

पोलिसांची कारवाई अन्यायकारक : कवाडे


पिंपरी : भीमशक्तीनगर, मोरेवस्ती येथे माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते बोर्डाचे अनावरण झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रामदास ताटे होते. भीमशक्तीनगरमध्ये दलित महिला लताबाई शिंगारे या महिलेस कारण नसताना पोलिसांनी मारहाण केली. सर्वसामान्य नागरिकांना मात्र पोलीस दमदाटी करतात. कुठलाही गुन्हा नसताना त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात. 

फेरीवाला संरक्षण विधेयकांचे स्वागत

पिंपरी : केंद्र सरकारने हॉकर्सधारकांना संरक्षण देणारे (स्ट्रीट वेंडर्स प्रोटेक्शन ऑफ लाइव्हलीहूड अँन्ड रेग्युलेशन ऑफ स्ट्रीट वेंडिग बिल २0११) लोकसभेत मंजूर केले. याबद्दल पिंपरी-चिंचवड शहरातील टपरी, पथारी, हातगाडीधारकांनी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा केला. साखर आणि पेढे वाटप केले. केंद्र सरकारने तातडीने हा कायदा करावा, यासाठी मुंबई फेरीवाला युनियनचे या संदर्भात पाठपुरावा केला होता. काल सकाळी पिंपरी येथे एकत्र येऊन सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला.