अंघोळीची गोळी संस्था व शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शहरात खिळेमुक्त झाडे अभियान राबवण्यात येत आहे. गेल्या 15 आठवड्यांत 10 पोती खिळे, तारा, पोस्टर्स साठले होते. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कनेक्टींग एनजीओ पीसीएमसी व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या खिळ्यांंचे व इतर संकलित केलेल्या साहित्याचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. मंगळवारी (दि.5) चिंचवडमधील जिजाऊ पर्यटन केंद्रात हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 6 June 2018
Flood control cells to work 24x7 in 8 zones
PIMPRI CHINCHWAD: The disaster management cell and the fire brigade department are setting up 24x7 flood control cells in all eight zones of the civic limits in the run-up to this year’s monsoon.
Stray dog-bite cases increase in Pimpri Chinchwad
PIMPRI CHINCHWAD: There have been 3,000 more stray dog bite cases in Pimpri Chinchwad in 2017-18 than the previous year. Local residents have also complained of an increase in the number of stray dogs in the city.
सिग्नलच सोडविणार कोंडी
पिंपरी - शहरात ९५ वाहतूक सिग्नलवर नव्याने बसविण्यात येणाऱ्या ॲडॉप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिममुळे (एटीएमएस) वाहनचालकांची कोंडीतून सुटका होणार आहे. यामध्ये सिग्नलचे नियंत्रण सेन्सरच्या आधारे करण्यात येणार असून, वाहनांच्या गर्दीनुसार सिग्नलची वेळ आपोआप बदलणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येणार असून, येत्या सहा ते सात महिन्यांमध्ये ही यंत्रणा सुरू होईल.
वीजबिलांची दुरुस्ती ऑनलाइन
पिंपरी - ‘महावितरण’च्या ग्राहकांना वीजबिल दुरुस्ती करण्यास अडचण होऊ नये, यासाठी ग्राहकांच्या वीजबिलांची दुरुस्ती प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. या प्रक्रियेत ग्राहकांना राज्यातील ‘महावितरण’च्या कोणत्याही कार्यालयात तक्रार दाखल करता येणार असून, ती निश्चित कालमर्यादेत सोडविण्यात येणार आहे. याबाबतचा एसएमएसही ग्राहकांना मिळणार आहे.
आरटीओ कार्यालयात कामाशिवाय थांबू नका
पिंपरी - येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारतीची स्वच्छता ठेवण्याकडे लक्ष दिले जात आहे. तसेच, कामाशिवाय जास्त वेळ कोणी थांबणार नाही, इमारतीचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी सांगितले.
मोशीत पदपथावरच बिल्डरांकडून कार्यालये
मोशी - येथे चक्क पदपथावरच अनधिकृत बांधकाम सरू असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (ता. ४) निदर्शनास आला. मोशी-चिखली प्राधिकरणामधून जाणाऱ्या चिखली परिसरातील स्पाइन रस्त्याच्या सेवा रस्त्यालगतच्या पदपथावरच हे अनधिकृत बांधकाम सुरू आहे.
कामगारनगरीत पर्यावरण रक्षणाचा जागर
पिंपरी – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ओला व सुका कचरा वर्गीकरण, ओल्या कचऱ्यापासुन खत निर्मिती, जलपर्णी काढणे, प्रभात फेरी आदी उपक्रम घेण्यात आले. यानिमित्ताने प्लास्टिक मुक्त शहराचा संकल्प करण्यात आला.
खासदार श्रीरंग बारणे यांना सलग चौथ्या वर्षी ‘संसदरत्न’ पुरस्कार जाहिर
पिंपरी (Pclive7.com):- १६ व्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील तसेच देशातील विविध विषयांवर संसदेत उपस्थित केलेले प्रश्न, सर्वाधिक चर्चेतील सहभाग संसदेमधील उपस्थीती तसेच स्थानिक खासदार विकास निधीचा संपूर्ण वापर, या अष्टपैलू कामगिरीबद्दल श्रीरंग बारणे यांची चेन्नई येथील पंतप्रधान पाँईंट फौंडेशनच्या वतीने सलग चौथ्या वर्षी ‘संसदरत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
‘बीआरटी’चे 100 पैकी 45 कि.मी. नेटवर्क पूर्ण
पिंपरी-चिंचवड महापालिकेने बीआरटीसाठी 100 किलोमीटरच्या नेटवर्कचे नियोजन केले होते. यापैकी पहिल्या टप्प्यातील 45 कि.मी.चे काम पूर्ण होत आले आहे. उर्वरित 55 कि.मी. पैकी बोपखेल फाटा ते आळंदी हा 9 कि.मी. रस्ता 90 टक्के विकसित झाला आहे. बस थांबे करण्याचे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे पालिकेचे नियोजन आहे. त्यानंतर या मार्गावर बीआरटी बस धावणार आहे. ‘पीएमपीएमल’ला बसेसचा आराखडा तयार करण्याबाबत पालिकेने पत्र पाठविले आहे.
‘बीआरटी’ मार्गातील मेट्रोचे पिलर तोडणार
दापोडी-निगडी या बीआरटीएस मार्गावर पिंपरी चौकात पुणे मेट्रोने पिलर उभे केले आहे. हे पिलर काढून टाकून खड्डे बुजवून बीआरटी मार्ग पूर्ववत केला जाणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. महापालिकेच्या वतीने पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर दापोडी ते निगडी अशी दुहेरी बीआरटी विकसित केली जात आहे. या बीआरटीचा मार्ग तब्बल 25 किलोमीटर आहे. या मार्गावरील पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, मोरवाडीतील फिनोलेक्स चौक, महाराष्ट्र बँक व शॉपींग मॉलसमोर पुणे मेट्रोने बीआरटी मार्गातच मेट्रोचे पिलर उभारण्यास सुरुवात केली आहे.
BRTS lane obstruction poser on MahaMetro
PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has directed the Maharashtra Metro Rail Corporation Limited (MMRCL) or MahaMetro to check whether pillars being constructed on Swargate-Pimpri route are obstructing the bus rapid transit system (BRTS) lanes on Pune-Mumbai highway.
मेट्रो मार्गाच्या कामाला परवानगी देण्याची मागणी
पुणे - संरक्षण विभागाच्या खडकी येथील जागेवर मेट्रो मार्गाच्या कामाला परवानगी द्यावी, अशी मागणी खासदार अनिल शिरोळे यांनी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पर्यावरणपूरक सिटीचा ध्यास
पिंपरी - पर्यावरणपूरक स्मार्ट सिटी निर्मितीसाठी महापालिका विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. यामध्ये घनकचरा व सांडपाण्यावर प्रक्रिया, नदी सुधार प्रकल्प, मैलापाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर आणि हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा आदींचा समावेश आहे, अशी माहिती महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिली.
Social organizations rid Pavana of water hyacinth
PIMPRI CHINCHWAD: The Rotary club of Walhekarwadi, with help from social organizations and volunteers, has removed water hyacinth from Pavana river in a seven-month drive.
पर्यावरण दिनानिमित्त सकाळ व इंडो-सायकलिस्ट क्लबतर्फे सायकल रॅली
वाल्हेकरवाडी - सकाळची रम्य पहाट, मंद झुळझुळणारा वारा, पावसाची चाहूल आणि त्यात पर्यावरण प्रेमीचा उत्साह, नवतरुणांचा जल्लोष या सर्वाना निमित्त होते जागतिक पर्यावरण दिनाचे. पर्यावरण दिनानिमित्त रावेत येथे सकाळ माध्यम समूह व इंडो सायकलिस्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जनजागृती करण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली रावेत येथील संत तुकाराम पूल, भोंडवे चौक, डांगे चौक, काळेवाडी फाटा, जगताप डेअरी, औंध, विद्यापीठ गेट मार्गे सकाळच्या मुख्य कार्यालयापर्यंत काढण्यात आली.
पर्यावरण दिनानिमित्त जवानांनी काढली पवना, मुळातील जलपर्णी
जुनी सांगवी - जागतिक पर्यावरणदिनानिमित्त केंद्रिय राखीव पोलिस दल (सी.आर.एफ) यांच्या तळेगाव व पुणे ग्रुप केंद्राच्या वतीने सांगवी व परिसरातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. जुनी सांगवी, बोपोडी येथे यात सहभागी दोनशे जवानांनी पवना व मुळा नदीतील जलपर्णी काढुन नदी स्वच्छता कामास हातभार लावला. यात स्थानिक सामाजिक कार्यकर्ते संस्था व महापालिका प्रशासनाच्या अधिका-यांनी यात सहभाग घेत जवानांना सहकार्य केले. दोनशे जणांच्या या ग्रुपने पवना घाटापासुन जलपर्णी काढण्यास सुरूवात केली.
वाढदिवसाच्या वायफळ खर्चाऐवजी पाचशे झाडांची लागवड
जुनी सांगवी - जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने सामाजिक कार्यकर्ते श्री विजय जगताप यांच्या वाढदिवसनिमित्त व्यर्थ खर्च टाळुन त्यांच्या मित्र परिवाराने घोराडेश्वर व भंडारा डोंगर येथे ५०० झाडे लावण्यात आली. वाढदिवस असा साजरा केल्याने नवीन पिढीसमोर उदाहरण ठरेल. समाजासमोर असे प्रेरणादायी उपक्रम मार्गदर्शक ठरतील असे त्यांनी यावेळी सांगितले.
पिंपरीत पर्यावरणाच्या बाबींकडे अक्षम्य दुर्लक्ष
अधिकारी, लोकप्रतिनिधी, ठेकेदारांची संगनमताने लूट
पिंपरी महापालिकेचे पर्यावरणविषयक बाबींकडे अक्षम्य दुर्लक्ष्य झाल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाच्या नावाखाली कोटय़वधी रुपये खर्च केले जातात, मात्र त्यामध्ये टक्केवारीची दुकाने अधिक असल्याचे दिसून येते. शहरातील नद्यांची गटारे झाली असून, पालिकेकडूनच नदीपात्रात प्रक्रिया न करता सांडपाणी सोडले जाते. वारंवार भराव टाकण्याच्या उद्योगामुळे नद्यांची लांबी-रुंदी कमी झाली आहे. शहरात दरवर्षी होणारी वृक्षलागवड म्हणजे ‘पुढचे पाठ, मागचे सपाट’ असा प्रकार होऊन बसला आहे.

विघटन न होणाऱ्या प्लास्टिक, थर्माकोल उत्पादनांवर कारवाई होणार
प्रभारी विभागीय आयुक्त म्हैसेकर यांचे आदेश
राज्य शासनाकडून प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. त्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार पुणे विभागात विघटन न होणारे प्लास्टिक व थर्माकॉल बंदी झालेले उत्पादन आढळून आल्यास त्यावर कडक कारवाई करावी, असे आदेश प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी मंगळवारी दिले आहेत. प्लास्टिक आणि थर्माकोलचे उत्पादन २३ जूननंतर संबंधित उत्पादकाकडून होत नसल्याबाबतची दक्षता सर्व प्रशासकीय यंत्रणांनी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

प्लास्टिक साठा करणाऱ्यांना दंड
पिंपरी – प्लास्टिक पिशव्यांचा साठा करणाऱ्या चिंचवड परिसरातील दोन स्वीट मार्टवर कारवाई करत महापालिकेच्या ब क्षेत्रीय कार्यालयामार्फत 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर, तीन किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत.
कचरा मुक्तीसाठी “स्टार रेटींग’
पिंपरी – शहरांना कचरा मुक्त होण्याकरिता स्वच्छतेमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी शहरांना तारांकीत मानांकन (स्टार रेटींग) देण्यात येणार आहे. त्याबाबतची नियमावली केंद्र सरकारमार्फत तयार करण्यात आली आहे. हे मानांकन एक वर्षाच्या मुदतीसाठी असणार आहे.
वह्या-पुस्तकांसाठी दुकानांत गर्दी
पिंपरी - सीबीएसई पॅटर्नच्या शाळा सुरू झाल्या असल्या तरी, मराठी आणि इंग्रजी माध्यमातील बहुतांश शाळा १५ जूनपासून सुरू होत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्य खरेदीत टक्केवारीचे ‘धडे’ ?
महापाैर निधी वळवण्यासाठी अधिकारी-ठेकेदारांचा आटपिटा
निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी महापालिका शिक्षण मंडळातील पावसाळी साहित्य खरेदीसाठी सन 2018-19 अंदाजपत्रात शून्य तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे 15 जूनला शाळा सुरु होणार असल्याने विद्यार्थी पावसाळी साहित्यापासून वंचित राहू नयेत, याकरिता अधिकारी व ठेकेदारांच्या सांगण्यावरुन जनतेच्या आपत्कालीन व गरजेच्या विकास कामांसाठी असलेला महापाैर निधी वळवण्यात आला आहे. दरम्यान, पावसाळी साधने खरेदी करणा-या मुंबईतील ठेकेदाराच्या भल्यासाठी सुमारे 2 कोटी 65 लाख रुपयांचा निधी शालेय साहित्य खरेदीसाठी वळवण्यात आला. परंतु, त्या विद्यार्थ्यांच्या खरेदीत अंदाजे सात ते दहा टक्के अधिकारी व पदाधिका-यांसाठी रक्कम खर्ची घालण्यात आल्याने टक्केवारीचा वाद नव्याने उफाळणार अाहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना पावसाळी साहित्य दर्जेदार मिळणार का ? याबाबत शंका उपस्थित होवू लागली आहे.

State sets up SARTHI, an institute to work for social devpt of Marathas
At the height of the Maratha agitation in the state, the Maharashtra government had assured the community that steps will be taken to meet their demands and a research institute, dedicated to the community, will be set up.
अण्णासाहेब मगर सहकारी बँकेत अनियमितता व गैरव्यवहार; सखोल चौकशी करण्याचे सहकार आयुक्तांचे आदेश
पिंपरी (Pclive7.com):- अण्णासाहेब मगर सहकारी बँकेत कर्जवाटप, आर्थिक व्यवहार, जागा खरेदी, वाहन खरेदी, इमारत बांधकाम यांसाख्या बाबींमध्ये अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचे तक्रार बँकेचे सभासद राहुल गव्हाणे यांनी केली होती. त्या आधारे केलेल्या चाचणी लेखापरिक्षणात नियमबाह्य कारभार आढळून आल्याने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुण्याचे सहकार आयुक्त व सहकार निबंधक डॉ. विजय झाडे यांनी दिले असल्याची माहिती बँकेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब गव्हाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खासगी जागेमध्ये उभारता येणार आयटी टाऊनशीप
– आयटी कंपन्यांबरोबर राहण्यासाठी घरे बांधण्यास शासनमान्यता
– आयटी क्षेत्रास चालना देण्याच्या दृष्टीने एक पाऊल
– आयटी क्षेत्रास चालना देण्याच्या दृष्टीने एक पाऊल
गणेश आंग्रे
पुणे – राज्यात आयटी (माहिती व तंत्रज्ञान) उद्योग वाढविण्यासाठी शासनाने पाऊले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) विकास नियंत्रण नियमावलीमध्ये शासनाने बदल केला आहे. यानुसार एकात्मिक माहिती तंत्रज्ञान नगरे (इंटिग्रेटेट इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी टाऊनशीप ) ही पॉलिसी शासनाने आणली आहे.

Subscribe to:
Posts (Atom)