पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत हिंजवडी, माण, मारुंजी, सांगवडे, गहुंजे, नेरे आणि जांबे या सात गावांचा समावेश करण्यास राज्य शासनाने दीड वर्षापूर्वी नकार दिला होता. परंतु, ही गावे समाविष्ट करून घेण्यास महापालिका सर्वसाधारण सभेने आज (सोमवारी) मंजुरी दिली आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 6 February 2018
सात नगरसेवकांसोबत आठ जणांना शिक्षण समितीत स्थान
पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये शिक्षण समिती स्थापन करण्याचा निर्णय आज (सोमवारी) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने घेतला आहे. पंधरा सदस्यांच्या या समितीमध्ये सात नगरसेवक आणि आठ शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञांची समावेश असणार आहे.
युवा गायक महेश काळे यांच्या रंगतदार गायनाने स्वरसागर महोत्सवाचा समारोप
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकोणिसाव्या स्वरसागर महोत्सवाचा रविवारी (दि.४) सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या रंगतदार गायनाने समारोप झाला. पूर्णानगर येथील शनिमंदिराशेजारील पटांगणावर गुरुवारपासून चार दिवसीय स्वरसागर महोत्सवाला प्रारंभ झाला असून त्याअंतर्गत रविवारी(४ फेब्रुवारी) सध्याच्या पिढीचे लाडके गायक महेश काळे यांनी आपल्या रंगतदार गायनाने रसिकांना अक्षरश: खिळवून ठेवले. मोठ्या संख्येने जमलेल्या रसिकांच्या मनावर महेशने आपल्या सुरांचे गारुड घालून त्यांना मंत्रमुग्ध केले. केवळ महेश काळे यांचे गायन ऐकण्यासाठी जमलेल्या लहानथोर सर्वच रसिकांना महेश यांनी आपल्यासह गायनात सामिल करुन घेऊन एक वेगळाच समा बांधला.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी आणावी
पिंपरी – मागील काही वर्षांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या मूर्तींवर कायमस्वरुपी बंदी घालण्याची मागणी बजरंग दलाने केली आहे.
Nine shops burgled in Akurdi on Sunday night
PUNE: Unidentified people broke open nine shops at Akurdi during the night intervening Sunday and Monday and fled with the booty collectively worth Rs76,000. The suspects stole a gold coin, three cell phones, three laptops and other valuables from the shops.
[Video] पिंपरी चिंचवड शहरात वायफाय सुविधा सुरु होणार
पिंपरी चिंचवड शहरात वायफाय सुविधा लवकरच सुरु होणार अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी दिली
पिंपरी बालेकिल्ल्यात काँग्रेसपुढे अस्तित्वाचा प्रश्न
२००२च्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या बरोबरीने काँग्रेसने जागा जिंकल्या.
सर्व नगरसेवकांना न्याय देण्याचे भाजपचे धोरण
पिंपरी - भारतीय जनता पक्षाने येत्या चार वर्षांत महापौरपदासह स्थायी समिती, विषय समिती आणि आठ प्रभाग अध्यक्ष व सदस्यांपर्यंत आपल्या सर्व म्हणजे ७७ नगरसेवकांना संधी देण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यामुळे स्थायी समितीची नव्याने निवड करताना भाजपच्या विद्यमान सर्व दहा स्थायी सदस्यांचे राजीनामे घेऊन त्या ठिकाणी पक्षाच्या अन्य दहा सदस्यांना संधी दिली जाणार असल्याचे समजते.
“वाहतूककोंडी सोडवा ज्ञानोबा’
आळंदी – तीर्थक्षेत्र आळंदीत वाहतूककोंडी नित्याचीच झाली असल्याने “वाहतूककोंडी सोडवा ज्ञानोबा’ असे म्हणण्याची वेळ भाविकांसह स्थानिक नागरिकांवर आली आहे. तर कार्तिकी सोहळ्याच्या काही दिवस आगोरपासून आळंदी एकेरी वाहतुकीचे नियोजन तसेच दिवसा जड वाहनांना शहरातून बंदी घालण्याचे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, नियोजना अभावी त्यांच्या या आदेशाला त्याच दिवसापासून हरताळ फासल्याचे चित्र आहे.
Subscribe to:
Posts (Atom)