पिंपरी, (प्रतिनिधी) – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने येत्या शनिवारी (दि. 17) निगडीत मेट्रो संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. संवादात मेट्रोचा मार्ग, प्रत्येक स्टेशनची वैशिष्ट्ये, दोन स्टेशनमधील अंतर, मेट्रो सुरू करताना होणाऱ्या वृक्षतोडीच्या बदल्यात केले जाणारे वृक्षारोपण याची सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 15 June 2017
जनजागृतीसाठी “एजन्सी’चा घाट
स्वच्छ भारत अभियान : पिंपरी महापालिकेला सूचले शहाणपण
पिंपरी, (प्रतिनिधी) – हागणदारी मुक्त शहर योजना प्रभावीपणे राबविण्यात अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानात पिंपरी-चिंचवड महापालिका “सपशेल फेल’ ठरली. अपयशाचा डाग पुसून काढण्यासाठी आणि योजना प्रभावी करण्याकरिता आता नवीन एजन्सी नेमण्याचा घाट घातला जात आहे. एजन्सीद्वारे झोपडपट्टी व परिसरात टॉईलेट्स वापराचे महत्त्व पटवून देण्याबाबत जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. पालिकेची प्रशासकीय यंत्रणा दिमतीला असताना एका नवीन एजन्सीला काम देण्याची गरज काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
… पिंपरी-चिंचवडला दुय्यम वागणूक
स्थायी अध्यक्षांची भूमिका : प्रश्न सुटेपर्यंत पीएमपीएलचे विषय तहकूब
पिंपरी, (प्रतिनिधी) – पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी दोन प्रतिनिधींना आज (बुधवारी) झालेल्या स्थायीच्या बैठकीला पाठवून दिली. परंतू, ते दोघेही पिंपरी-चिंचवड शहराच्या समस्यांची प्रश्नावर अनुत्तरीत राहिले. त्यामुळे शहरांची संपुर्ण प्रश्नवली बनवून त्यांना देण्यात आली असून, आमचे प्रश्न सुटेपर्यंत पीएमपीएमएलचे विषय 28 जूनपर्यंत तहकुब ठेवण्यात येणार आहे. मात्र, पुण्याच्या बदल्यात आम्हाला दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोप स्थायी समिती अध्यक्षा सिमा सावळे यांनी केला आहे. स्थायी समितीची बैठक बुधवारी पार पडली. यावेळी त्या अध्यक्षस्थानी होत्या. या बैठकीत अवलोकर्नाथ 8 आणि अन्य 19 विषयांना मंजूरी दिली.
Civic body to facilitate Nashik highway widening work
The Pimpri Chinchwad municipal commissioner, Shravan Hardikar, said the Pune-Nashik highway (NH 60) passed through the Pimpri Chinchwad limits. So, the Pimpri ChinchwadMunicipal Corporation (PCMC) would take up the work of widening it.
पिंपरी-चिंचवड ते मुळशी “पीएमपी’ बस सेवेची गरज
हिंजवडी, (वार्ताहर) – सार्वजनिक दळण-वळणाची साधने उपलब्ध नसल्याने पिंपरी-चिंचवड शहर ते मुळशी तालुका प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हाल सहन करावे लागत आहे. आयटी पंढरी अर्थात माण-हिंजवडी एमआयडीसी जागतीक नकाशावर चमकलेली असताना ज्या तालुक्यात ही नगरी आहे, त्यांनाच येथे येण्यासाठी कोणतेही सार्वजनिक साधन आजपर्यंत उपलब्ध झाले नाही.
PCMC offers to buy land of pharma firm
Pimpri Chinchwad: Six months after the Centre took a decision to sell off 87 acres of land at the Hindustan Antibiotics Limited, the Pimpri Chinchwad Municipal Corporation has offered to buy 59 acres of land located in the central area of the city.
Fewer risky buildings in Pimpri-Chinchwad
Old, dilapidated structures have considerably reduced in Pimpri- Chinchwad, thanks to timely supervision, repair measures and demolition drives where necessary. The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has issued notices to only 90 such ...
Tukaram Mundhe stays away from PCMC panel meet, financial aid put on hold
THE Standing Committee meeting of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) sought on Wednesday certain clarification from PMPML before extending financial assistance of Rs 6 crore. PMPML Joint Managing Director D P More, who was ...
आयटी कर्मचाऱ्यांची कामगार आयुक्तांना साद
पिंपरी - राजीनाम्यासाठीचा दबाव, कंपनीकडून कामाची गुणवत्ता चांगली नसल्याचा अहवाल अशा कारणांमुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नोकरी जाण्याची टांगती तलवार आली आहे. या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी हिंजवडी आयटी पार्कमधल्या काही कंपन्यांतील सुमारे वीस कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन कामगार आयुक्त कार्यालयाचा दरवाजा ठोठावला आहे. कामगार आयुक्तांनी या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी गुरुवारी (ता. १५) संबंधित आयटी कंपन्यांना बोलावून त्यांना लेखी म्हणणे सादर करण्याचे पत्र दिले असल्याचे कामगार उपायुक्त निखिल वाळके यांनी सांगितले.
दिंडी प्रमुखांना भेट वस्तू देणार पण…
782 पैकी 650 दिंड्यांनाच ताडपत्री : वाद उद्भवण्याची शक्यता
पिंपरी, (प्रतिनिधी) – श्री विठ्ठल- रुक्मिणी मूर्तीच्या भ्रष्टाचारावरुन तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसला विद्यमान भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जेरीस आणले होते. यंदा आषाढी वारी सोहळ्यातील दोन्ही संस्थांच्या दिंड्यांना भेटवस्तू म्हणून ताडपत्री दिली जाणार आहे. परंतु, दोन्ही संस्थांच्या पालखी सोहळ्यात एकूण 782 दिंड्या सहभागी होणार असताना, महापालिकेकडून केवळ 650 दिंड्यांनाच ताडपत्री दिली जात आहे. त्यामुळे दोन्ही पालखीतील 132 दिंडेकरी वंचित राहणार आहेत.
वीज ग्राहकांवर ‘सिक्युरिटी डिपॉझिट’ चा ‘जिझिया कर’
* महावितरणचा मनमानी कारभार : आर्थिक ‘भार’ कमी करण्यासाठी अभिनव फंडा
* गेल्या काही दिवसांत ग्राहकांना दुप्पट वीजबीले
* पठाणी वसुली, वीजपुरवठा खंडित करण्याची धमकी
प्रभात विशेष
पुणे, दि. 14 (विशेष प्रतिनिधी) – गेल्या दहा ते बारा वर्षांच्या कालावधीत कर्जबाजारी झालेल्या महावितरण प्रशासनाने कर्जाचा हा डोंगर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र, त्यासाठी महावितरण प्रशासनाने नेहमीप्रमाणे चक्क राज्यभरातील सर्व प्रकारच्या ग्राहकांना वेठीस धरण्यास सुरुवात केली आहे. कर्जाचा हा ” भार’ कमी करण्यासाठी प्रशासनाने राज्यभरातील सर्व प्रकारच्या ग्राहकांवर ” सिक्युरिटी डिपॉझिट’ च्या माध्यमातून ” जिझिया कर ‘ लावण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे राज्यभरातील ग्राहकांना या महिन्यात दुप्पट वीजबीले आली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे प्रशासनाने पठाणी वसूली सुरू केली असून डिपॉझिटची ही रक्कम न भरल्यास वीजपुरवठा खंडित करू, अशी धमकी देण्यास सुरुवात केली आहे. महावितरण प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे शाळा आणि महाविद्यालयांच्या खर्चाने बेजार झालेले ग्राहक आणखीनच घायाळ झाले आहेत.
* गेल्या काही दिवसांत ग्राहकांना दुप्पट वीजबीले
* पठाणी वसुली, वीजपुरवठा खंडित करण्याची धमकी
प्रभात विशेष
पुणे, दि. 14 (विशेष प्रतिनिधी) – गेल्या दहा ते बारा वर्षांच्या कालावधीत कर्जबाजारी झालेल्या महावितरण प्रशासनाने कर्जाचा हा डोंगर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र, त्यासाठी महावितरण प्रशासनाने नेहमीप्रमाणे चक्क राज्यभरातील सर्व प्रकारच्या ग्राहकांना वेठीस धरण्यास सुरुवात केली आहे. कर्जाचा हा ” भार’ कमी करण्यासाठी प्रशासनाने राज्यभरातील सर्व प्रकारच्या ग्राहकांवर ” सिक्युरिटी डिपॉझिट’ च्या माध्यमातून ” जिझिया कर ‘ लावण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे राज्यभरातील ग्राहकांना या महिन्यात दुप्पट वीजबीले आली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे प्रशासनाने पठाणी वसूली सुरू केली असून डिपॉझिटची ही रक्कम न भरल्यास वीजपुरवठा खंडित करू, अशी धमकी देण्यास सुरुवात केली आहे. महावितरण प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे शाळा आणि महाविद्यालयांच्या खर्चाने बेजार झालेले ग्राहक आणखीनच घायाळ झाले आहेत.
[Video] पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेतील सात विद्यार्थी होणार लखपती
80 टक्यांहून अधिक गुण प्राप्त केलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे बक्षिस देण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या शाळेतील 31 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यामध्ये 90 टक्यांहून अधिक गुण घेणा-या विद्यार्थ्यांना एक लाख रुपयांचे बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यासाठी सात विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
काळेवाडीतील बीआरटी मार्ग आणि फुटपाथ बनले तळीरामांचे अड्डे
काळेवाडी : शहर परिसरातील अनेक दारूची दुकाने बंद झाली. त्यामुळे सैरभैर झालेल्या बेवड्यानी रात्रीच्या वेळी बंद असलेला बीआरटी मार्ग आणि फुटपाथचा आश्रय घेतला आहे. काळेवाडीतील एमएम स्कूल ते काळेवाडीफाटा या मार्गावरील बीआरटी मार्ग तसेच कुणाल हॉटेल शेजारील फुटपाथवर आणि वाहनांच्या आडोशाला तळीरामांची मैफिल नित्याचीच रंगलेली असते.
विनायक गायकवाड यांच्यामुळे व्यावसायिकांसाठी भाजी मंडई खुली
वाकड : वाकड येथे नव्याने उभारलेली १८४ गाळ्यांची भाजी मंडई भाजी व्यावसायिकांसाठी खुली करण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार करुनही त्याची दखल न घेतल्याने माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांनी मंगळवारी ती खुली केली.
Subscribe to:
Posts (Atom)