Friday, 21 March 2014

व्हॉट्स अ‍ॅपवर प्रकटले पोलीस निरीक्षकाचे राष्ट्रवादी प्रेम

वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या प्रोफाईल फोटोवर प्रफुल्ल पटेल
पोलीस अधिकारी आणि राजकारणी यांचे साटेलोटे हे आता उघड गुपित आहे. दोघंही एकमेकांना मदत करीत सत्ता गाजवत असतात. बरेच पोलीस अधिकारी कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी अथवा राजकीय नेत्याशी संबंधित असतात. पण हे वैयक्तिक संबंध उघड झाले की मग मात्र गडबड होते. असाच धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे. भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले यांनी आपल्या व्हॉट्स अ‍ॅपवर प्रोफाईल फोटो म्हणुन चक्क राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रफुल्ल पटेल यांचा फोटो ठेवला आहे. एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे हे राष्ट्रवादी प्रेम सध्या शहरात चर्चेचा विषय आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करून पोलीस निरीक्षक भोसले यांच्या बदलीची मागणी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी केली आहे.

महापालिका आवारात दुपारी खासगी वाहनांना प्रवेश बंद

पर्यायी व्यवस्थेअभावी नागरिकांची तारांबळ
मावळ लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्वीकारण्यात येणार असल्याने वाहनांची गर्दी टाळण्याच्या दृष्टीकोनातून खासगी वाहनांना महापालिका आवारात दुपारी 11 ते 3 या वेळेत प्रवेश बंद केला आहे. मात्र पर्यायी व्यवस्था नसल्याने वाहनचालकांची तारांबळ होत आहे. अधिका-यांकडून पर्यायी व्यवस्था असल्याचे सांगितले जात असतानाही सुरक्षारक्षक व पोलीस नागरिकांना ही माहिती देत नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.

वामन हरी पेठे सन्सची उद्या चिंचवडमध्ये सुरुवात

पिंपरी : सुवर्ण व रत्नजडीत अलंकाराच्या विश्‍वातले अग्रगण्य नाव असलेल्या आणि १0५ वर्षांची उज्वल परंपरा असलेल्या वामन हरी पेठे आणि सन्स या सराफी पेढीची १२ वी शाखा पिंपरी-चिंचवड शहरात सुरू होणार आहे.

सर्व चित्रपटगृहांमध्ये ऑनलाईन बुकिंग

पुणे : सर्व मल्टिप्लेक्स व सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांत ऑनलाईन तिकीट विक्री यंत्रणा सुरू करण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारू नये, असे आदेश शासनाने काढले असून रसिकांना घरबसल्या चित्रपट तिकीट आरक्षित करणे शक्य होणार आहे.

स्वतःची शाळा वाचविण्यासाठी 66 हजार बांधकामांचा बळी देणा-या आमदाराला धडा शिकवा बारणे

नदीपात्रात बांधलेली स्वतःची शाळा वाचविण्यासाठी शहरातील 66 हजार अनधिकृत बांधकामांचा बळी द्यायला निघालेल्या आमदाराला मतदारांनी चांगला धडा शिकवावा, असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-आरपीआय-रासप व स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीचे उमेदवार आप्पा ऊर्फ श्रीरंग बारणे यांनी आज केले.

लक्ष्मण जगताप यांचा आमदारकीचा राजीनामा

पिंपरी : अनधिकृत बांधकामप्रश्नावरून चिंचवडचे राष्ट्रवादीशी संलग्न अपक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी गुरूवारी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. शेतकरी कामगार पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठिंब्यावर ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांचा राजीनामा हा राष्ट्रवादीसाठी मोठा दणका असल्याचे राजकीय वतरुळात बोलले जात आहे. 

शिवसेनेच्या पदाधिका-यांसह 45 जणांचे राजीनामा

एक माजी नगरसेवक, दोन उपशहरप्रमुख व आठ विभागप्रमुखांसह एकूण पंचेचाळीस शिवसेना कार्यकर्त्यांनी पदाचा राजीनामा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे. काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या अनेक जणांना महत्त्वाची पदे बहाल करण्यात आली. तसेच श्रीरंग बारणे यांना मावळ मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आल्याचा निषेध म्हणून पदांचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.