Saturday, 25 November 2017

#MH14News Citizen Report | सल्लागार नेमणुका

Consultant means 'HELP' but why is this name being so dishonored in Pimpri-Chinchwad? Read our Citizen Report to know more सल्लागार म्हणजे 'मदत' परंतु हे नाव पिंपरी-चिंचवडमध्ये एवढे बदनाम का होत आहे? 




🤔 
जाणून घ्या आमचा स्पेशल 'सिटीझन रिपोर्ट'

Splitting water contract saves PCMC Rs 31 crore

Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has claimed to have saved Rs31 crore thanks to the decision to divide a single contract of the 24x7 water supply project into four parts. The project is to cover 60% of the municipal limits.

पिंपरी चिंचवडकर तुकाराम मुंढे यांच्या प्रतिक्षेत!

पिंपरी चिंचवड शहरातील पीएमपी वाहतूक प्रश्नांबाबत लोकप्रतिनिधींनी वारंवार बोलावूनही अध्यक्ष तुकाराम मुंढे हे महापालिकेत आलेले नाहीत. तसेच पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी शासनाने सोपवून एक महिना उलटला तरीही ते रुजू झालेले नाहीत. मुंढे यांच्या अनुपस्थितीमुळे शहराच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असून शहरवासीय त्यांच्या प्रतिक्षेत आहेत.

संपादकीय: ‘पीएमपी’मध्ये सुधारणा हवी ना?

वाहतूक व्यवस्थेची कायमस्वरूपी दुर्दशा संपुष्टात आणण्यासाठी अलीकडच्या काही वर्षांत राज्य सरकारने वेळोवेळी विशेष कर्तव्यदक्ष आणि शिस्तबद्ध अनुभवी ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांकडे वाहतूक व्यवस्थेची सूत्रे आवर्जून सोपविली होती; परंतु प्रशासकीय प्रमुख अधिकारी आणि पालिकेची वाहतूक समिती यांच्यामधील परस्पर सहकार्यातील बिघाडामुळे सक्षम सरकारी अधिकाऱ्याच्या वाट्याला “बदली’चे पारितोषिकच बहाल करण्यात आल्याचे पुणेकरांना प्रत्येकवेळी पाहावे लागत आहे.

‘बीआरटीएस’वरील सुरक्षेबाबत जनजागृती

पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी ते दापोडी बीआरटीएस मार्ग आणि काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्त्यावरील बीआरटीएस सेवा सुरू करण्यापूर्वी महापालिकेतर्फे नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती केली जाणार आहे. संबंधित रस्त्यालगत येणाऱ्या कंपन्या, शाळा आणि सार्वजनिक संस्था यांच्यासह वाहनचालकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. 

वल्लभनगर येथे मेट्रोतर्फे नागरिकांसाठी ‘सहयोग केंद्र’

पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मेट्रोच्या मार्गिकेबाबत नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी महामेट्रोतर्फे वल्लभनगर एस. टी स्थानकामागे सहयोग केंद्र सुरू करण्यात आले असून,या केंद्राला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

मेट्रो स्थानकासाठी ‘संरक्षण’कडे पाठपुरावा

पुणे - खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील खडकी रेल्वे स्थानक व रेंजहिल्स येथील मेट्रो स्थानकांसाठी आवश्‍यक जमीन देण्याचा प्रस्ताव कॅंटोन्मेंट बोर्डाने लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाकडे पाठविला आहे. याबाबत संरक्षण मंत्रालयच निर्णय देईल, अशी भूमिका लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाने घेतल्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत हा प्रश्‍न संरक्षण मंत्रालयासमोर मांडण्यात येणार आहे.

अभिनेत्री श्रध्दा कपूरच्या हस्ते डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठीत एलिगेंट डेंटोकेर विभागाचे उद्घाटन

पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात दंत विभागातील एलिगेंट डेंटोकेर विभागाचे उद्घाटन प्रसिध्द सिनेतारका श्रद्धा कपूर हिच्या हस्ते संपन्न झाले. या उद्घाटन सोहळ्यास डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील, व्हाईस चेअरमन भाग्यश्री पाटील, दैनिक पुढारीच्या संचालिका आणि कस्तुरी क्लबच्या अध्यक्ष डॉ. स्मितादेवी योगेश जाधव, सचिव सोमनाथ पाटील, खजिनदार डॉ. यशराज पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

Dharmendra Pradhan launches CNG-run bikes, BoM to finance 5000 kits

Pune: Dharmendra Pradhan, the Union Minister for Petroleum and Natural Gas, on Friday launched retro-fitted compressed natural gas (CNG) two-wheelers. He launched the vehicles at an event organised by the Maharashtra Natural Gas Limited (MNGL) at Savitribai Phule Pune University.

Union government to focus on green fuel to avoid Delhi-like smog elsewhere

Pimpri Chinchwad: Union road transport minister Nitin Gadkari on Friday said there is a pressing need for alternative, green sources of fuel to ensure the toxic smog that plagued Delhi doesn't spread to other major cities in India.

इथेनॉलच्या वापरामुळे प्रदुषण कमी होण्याबरोबरच ग्रामीण क्षेत्राच्या विकासात मदत – नितीन गडकरी

इथेनॉलचा इंधन म्हणून योग्य प्रमाणात वापर केल्याने ग्रामीण क्षेत्रातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल  तसेच  देशाची आर्थिक स्थिती सक्षम होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

महापालिकेतर्फे रविवारी अर्ध मॅरेथॉन स्पर्धा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने व पुणे डिस्ट्रीक अॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या सहकार्याने महापालिका कार्यक्षेत्रात माजी महापौर कै. सादबा उर्फ आप्पासाहेब काटे, महापौर चषक जिल्हास्तर अर्ध मॅरेथॉन स्पर्धा २०१७ रविवारी (दि.२६) शहरात होणार आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

क्रीडा समितीचे उपसभापती बाळासाहेब ओव्हाळ राजीनाम्याच्या तयारीत

क्रीडा समितीने मंजूर केलेला प्रस्ताव स्थायी समितीने नामंजूर केल्याने क्रीडा समितीचे उपसभापती बाळासाहेब ओव्हाळ यांनी सदस्यपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे.

विद्यार्थ्यांची स्वतंत्र बॅच कशासाठी?

पिंपरी - आरटीईच्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र बॅच तयार करणाऱ्या चिंचवड गावातील इंटरनॅशनल स्कूलविरोधात पालकांनी केलेल्या तक्रारीची दखल शिक्षण विभागाने घेतली आहे. कार्यवाहीचा अहवाल त्वरित कार्यालयास सादर करावा, अशी नोटीस शाळेला बजावली आहे.

पिंपळे सौदागरमध्ये ‘स्मार्ट सायकल शेरिंग’

पिंपळे सौदागर – आरोग्य आणि पर्यावरणासाठी सायकल चालविणे आवश्‍यक आहे, हे जाणून घेत पिंपळे सौदागर येथे एक आगळा-वेगळा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. स्मार्ट सायकल शेरींग सेवा सुरू करण्यात आली आहे.
दहा रुपयांमध्ये अर्धा तास भाड्याने नागरिकांना आसपासच्या परिसरात फिरण्यासाठी सायकल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आरोग्यदायी, पर्यावरणाला अनुकूल अशी या उपक्रमाचे उद्‌घाटन रोजलॅंड रेसिडेन्सी पिंपळे सौदागर, येथे विठ्ठल ऊर्फ नाना काटे व सोसायटीतील पदाधिकारी यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले.

खड्डे बुजवण्यासाठी एकाच ठेकेदारावर मेहरबानी

पिंपरी – पिंपरी-चिंचवडमधील झोपडपट्टी भागातील रस्त्यातील खड्ड्यांत खडी मुरूम टाकून सपाटीकरण करण्यात येणार आहे. पालिकेच्या सहा प्रभागांतर्गंत येणाऱ्या झोपडपट्ट्यांमध्ये ही कामे होणार आहेत. त्यासाठी पालिकेच्या तिजोरीतून तब्बल 58 लाख 41 हजार 699 एवढा खर्च केला जात आहे. खड्डे बुजवण्याबरोबरच डांबरीकरणासाठी महापालिका लाखो रुपयांचा खर्च करत आहे. त्यामुळे डांबरकरणासारखे खर्चीक काम सोडले तर नागरिकांनी कर रुपात भरलेले 58 लाख रुपये खड्ड्यात जाणार आहेत.

न्यायालय इमारतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करू!

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या दिवसें-दिवस वाढत आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात मोशी येथील सोळा एकर जागेत भव्य इमारत उभारण्यासाठी राज्य सरकारकडे प्राधान्याने पाठपुरावा करु, असे आश्‍वासन भाजप शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिले.

फिलिप्स इंडिया करणार जनजागृती

पुणे – भारतातील 93 टक्‍के लोकांना चांगली झोप मिळत नाही आणि यापैकी फक्‍त 2 टक्‍के लोक त्यांच्या झोपेच्या समस्यांसंदर्भात डॉक्‍टरांशी चर्चा करतात. फिलिप्स इंडियाने कनेक्‍टेड केअर सोल्यूशन दाखल करत झोपेसंदर्भातील विकारांबाबत जागरुकता निर्माण करण्याचे ठरविले आहे. जोरात घोरणे, योग्य वेळी चांगली झोप न मिळणे आणि सकाळच्या वेळी डोके दुखणे यांसारख्या लक्षणांबाबत फिलिप्स इंडिया लोकांमध्ये जागरुकता निर्माण करत आहे.