Saturday, 12 April 2014

PCMC hikes fee at sports centres

Sports enthusiasts will now have to shell out a lot more if they want to use the facilities made available by the Pimpri Chinchwad Municipal Corporation.

ट्रान्सपोर्ट हबसाठी प्रयत्न करणार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असणार्‍या पिंपरी-चिंचवड सिटिझन फोरमच्या (पीसीसीएफ) वतीने शहर विकासासाठी आवश्यक असा दहा कलमी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. निगडी येथील भक्ति-शक्ती शिल्पाजवळ ट्रान्सपोर्ट हब स्थापन करावा, असे सूचविण्यात आले आहे. 

बीट निरीक्षक निलंबित

पिंपरी : बीट निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपविल्यानंतर आपापल्या भागात अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे होणार नाहीत, याची दक्षता घेण्यास सांगितले असताना, त्याकडे दुर्लक्ष केले. फुगेवाडीजवळ आयुक्तांना पाहणी दौर्‍यावेळी अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास आले. विभागीय करसंकलन कार्यालयाच्या लिपिक व बीट निरीक्षक माया सूर्यकान्त गीते यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. 

पालिकेच्या प्रभाग कार्यालयांत शुकशुकाट

पिंपरी : निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याने याचा परिणाम शासकीय कार्यालयांतील कामकाजांवर झाला आहे. महापालिकेच्या प्रभाग कार्यालयांतही नेहमीची वर्दळ कमी झाल्याचे दिसून आले. 
प्राधिकरण निगडी येथील भेळ चौकात महापालिकेचे ‘अ’ प्रभागाचे कार्यालय आहे. यासमोरील पार्किंगमध्ये इतरवेळी जागा उपलब्ध नसते. समोरील रस्त्यावर नागरिकांना वाहने लावावी लागतात. मात्र, हे पार्किंग मोकळेच दिसून आले. तसेच मूलभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी येणार्‍या नागरिकांच्या संख्येवरही परिणाम झाला आहे. 

चर्‍होलीचे नगरसेवक अडचणीत

पिंपरी : अवैध बांधकामप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नितीन काळजे आणि नगरसेविका विनया तापकीर अडचणीत आले आहेत. अवैध बांधकामाबाबत न्यायालयात दाखल याचिकेवर त्यांनी सादर केलेल्या खुलाशावरून त्यांना पात्र की अपात्र ठरवायचे? याबाबत न्यायालयीन निर्णय घेण्यासंदर्भात महापालिका सभेची संमती घेतली जाणार आहे. महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी प्रशासनामार्फत सर्वसाधारण सभेची मान्यता घेण्याचा प्रस्ताव १९ एप्रिलला होणार्‍या सभेपुढे ठेवला आहे.

औंध रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रणा

सांगवी : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने औंध जिल्हा रुग्णालय हायटेक बनविले आहे. या रुग्णालयात अत्याधुनिक साधन सामग्रीही दाखल झाली आहे. यामुळे सर्वसामान्य रुग्णांची सोय होणार आहे. राज्यात ‘पीपीपी’ तत्त्वावर उभारण्यात येणार्‍या ३५ डायग्नोस्टिक सेंटरमधील पहिले सेंटर या रुग्णालयात सज्ज केले आहे.

मारुती भापकर यांनी घेतल्या मुस्लिम बांधवांच्या गाठीभेटी

आम आदमी पक्षाचे अधिकृत उमेदवार मारूती भापकर यांचा प्रचारदौरा वेगात सुरू असून पिंपरी-चिंचवड शहराचिया विविध भागात मतदारांच्या गाठीभेटी, पदयात्रा यांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यांनी आज, (शुक्रवारी) मुस्लिम बांधवांच्या गाठीभेटी घेतल्या.

चिंचवड भागात रविवारी मतदान विषयक जनजागृती

संस्कार प्रतिष्ठान आणि चिंचवड पोलीस स्टेशन शांतता कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने येणा-या लोकसभा निवडणुकीमध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे व आपला हक्क बजावावा म्हणून चिंचवड भागात रविवारी (दि. 13) जनजागृती अभियान राबविले जाणार आहे. 

मावळ झोपडपट्टी मुक्त करु - जगताप

पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी माझ्या महापौर पदाच्या कार्यकालात 20 हजार घराची योजना आणली. त्या पैकी 17 हजारांहून जास्त घरे बांधून झाली. भविष्यात संपूर्ण मावळ लोकसभा मतदार संघ झोपडपट्टी मुक्त करु, असा संकल्प आमदार लक्ष्मण जगताप यांनी लोणावळा येथील सभेत जाहीर केला.

ट्रान्सपोर्ट हबसाठी प्रयत्न करणार

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडकडून (पीएमपीएमएल) प्रत्येकी तीन लाख रुपये खर्चून स्टेलनेस स्टीलचे एक हजार बसथांबे उभारण्यात येत आहे. हे बसथांबे महागडे, गैरसोयीचे व सदोष असून त्यावर पैशांची अनावश्यक उधळपट्टी सुरु असल्याचा आरोप पीएमपी प्रवासी मंचचे अध्यक्ष जुगल राठी यांनी केला आहे.