पिंपरी – महापालिकेतर्फे टाळगाव चिखली येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ उभारण्यात येत आहे. त्याच्यासाठी महापालिकेने 40 कोटी रुपयांचा खर्च गृहित धरला असताना कंत्राटदारांनी जादा दराच्या निविदा भरल्या आहेत. त्यामुळे 40 कोटींच्या कामाला आता पंचेचाळीस कोटी रुपये मोजावे लागणार आहेत.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 19 December 2018
सांस्कृतिक सभागृहासाठी वास्तूविशारद
पिंपरी – सल्लागार, वास्तूविषारद नेमणुकीच्या नावाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेची खर्चाची उधळपट्टी सुरू आहे. महापालिकेच्या ह प्रभाग कार्यालयांतर्गत दापोडी गावठाणात सांस्कृतिक सभागृह बांधण्यात येणार असून त्यासाठी देखील महापालिकेतर्फे वास्तूविशारदची नेमणूक करण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील स्मशानभूमींसाठी लवकरच धोरण ठरविणार – महापौर
चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात असलेल्या स्मशानभूमींसाठी लवकरच धोरण ठरविले जाणार आहे. याअंतर्गत पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था, स्नानगृह, स्वच्छतागृह, दशक्रिया विधीसाठी चौथरे या सुविधा पुरविल्या जाणार आहेत. त्याकरिता लवकरच आयुक्त श्रावण हर्डीकर आणि संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन शहरातील स्माशानभूमींचे धोरण ठरविले जाणार आहे, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एच.ए.च्या प्रश्नांबाबत खासदार बारणेंनी घेतली केंद्रीय मंत्री गौडांची भेट
चौफेर न्यूज – पिंपरी येथील हिंदुस्थान अँटीबायोटीक्स कंपनीच्या प्रलंबित प्रश्नांबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी आज केंद्रीय केमिकल फर्टीलायझर मंत्री सदानंद गौडा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
पिंपरी येथील हिंदुस्थान अँटीबायोटीक्स ही भारत सरकारची कंपनी अनेक समस्यांनी ग्रासली आहे. कंपनीच्या कामगारांचा १९ महिन्याचा पगार प्रलंबित असून कंपनीकडे पुरेसे पैसे नसल्याने कंपनी चालू ठेवणे व्यवस्थापनाला कठीण जात आहे. कंपनीच्या जमीन विक्रीची परवानगी मिळूनही जमिनीची विक्री होऊ शकली नाही. यासाठी दोन वेळा जाहिरात प्रसिद्ध करूनही कोणी खरेदीदार पुढे आला नाही. या सर्व कारणाने कंपनी चालू ठेवणे अधिकच कठीण झाले आहे.
नरेंद्र मोदींच्या हस्ते हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे भूमीपूजन
पुणे – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे भूमीपूजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संपन्न झाले. ३ हजार ३१३ कोटी रूपये एवढा या प्रकल्पाला खर्च येणार आहे. २३.३ किलोमिटर लांबीचा हा मार्ग असणार आहे. हिंजवडी परिसरातील उद्योगांना या मेट्रोमुळे मोठी चालना मिळणार असून आयटी कर्मचाऱ्यांना मेट्रोचा मोठा फायदा होणार असल्याचे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादीतर्फे प्राधिकरणात 63 कर्मचार्यांचा सन्मान
पिंपरी चिंचवड ः प्राधिकरण येथे पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्त्य साधून आरोग्य अधिकारी तसेच 52 पालिका कर्मचारी, खाजगी संस्थेचे 63 कर्मचारी यांचा स्वेटर देवून सन्मान करण्यात आला. यावेळी, शहर उपाध्यक्षा पल्लवी पांढरे,शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महीला अध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.
दिव्यांग बांधव ऑर्केस्ट्रातून उभारणार सामाजिक प्रकल्पांसाठी निधी
पिंपरी चिंचवड ः वेदनेचा डोंगर घेऊन जाणार्या दिव्यांग आणि दृष्टिहीन विद्यार्थ्यांना संवेदनेचा हातभार लावण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईड आणि दीपस्तंभ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दृष्टिहीन व दिव्यांग विद्यार्थ्यांचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सामाजिक प्रकल्पांच्या निधी उभारणीसाठी या ऑर्केस्ट्राचे घेण्यात येत असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात येत आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शुक्रवारी (दि. 28) रोजी सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
पिंपळे सौदागरमध्ये पाण्यासाठी आयुक्तांना घेराव
पिंपळे सौदागर ः शहरात पाण्याची समस्या बिकट असताना महापालिका आयुक्त विकासाच्या बाता करीत असल्याचे पाहून परिसरातील नागरिकांना संतापून स्मार्ट सिटीचे राहू द्या. पिण्याच्या पाण्याचे काय ते सांगा, असा सवाल आयुक्त हर्डिकर यांना केला. स्मार्ट सिटीचा हेतू, विकासकामांचे नियोजन, भविष्यात होणारे शहरातील बदल आदी विविध मुद्दयांवर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी रविवारी सुमारे अडीच तास नागरिकांशी संवाद साधला. पिंपळे सौदागर येथील नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशनच्या वतीने स्मार्ट सिटीचे सादरीकरण व आयुक्तांशी संवाद या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार लक्ष्मण जगताप होते. सहशहर अभियंता राजन पाटील, संगणक विभागाचे प्रमुख नीलकंठ पोमण, नगरसेवक शत्रुघ्न काटे, निर्मला कुटे आदी उपस्थित होते.
पिंपरीत 150 वाहने चोरणार्याला अटक
पिंपरी चिंचवड ः दुचाकी आणि चारचाकी वाहने चोरून संसार आणि मुलांचे शिक्षणाचा खर्च भागविणार्या एक अट्टल चोरट्याला वाकड पोलीसांनी अटक केली आहे.
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील वाकड पोलिसांनी 150 चारचाकी वाहने चोरणार्या सराईत चोरट्याला ताब्यात घेतले आहे. राजू जावळकर (वय 50) आणि सोमनाथ चौधरी अशी या आरोपींची नावे असून दोघेही कार चोरी केल्यावर भंगारात विकायचे. यातून मिळणार्या पैशांमधून दोघेही संसार आणि मुलांच्या शिक्षणासाठी येणारा खर्च भागवायचे.
PCMC police commissionerate seeks more manpower, vehicles
Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Police Commissionerate has demanded more manpower and vehicles to carry out effective policing.
457th Moraya Gosavi festival from tomorrow
Pimpri Chinchwad: The 457th Moraya Gosavi Sanjeevan Samadhi ..
समाविष्ट भागातील नागरिकांसाठी ३०० एमएलडी पाणी उचलणार – आमदार महेश लांडगे
वीस वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या शहर विकासाच्या आराखड्यांवर आम्ही सर्वजण आत्ता काम करत आहोत. प्रत्येक काम वेळच्या वेळी झाले असते तर, ही दुर्भाग्यपूर्ण वेळ आज आलीच नसती. यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे. पण यापुढे असं होणार नसून प्रत्येक काम वेळच्या वेळी पूर्ण होईल. ज्या गोष्टींचा नागरिकांना त्रास होतो, त्या गोष्टी समूळ नष्ट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही आमदार महेश लांडगे यांनी दिली.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुविधा मिळवून देऊ – आमदार महेश लांडगे
एमपीसी न्यूज-पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मानधनावर काम करणारे आणि ठेकेदारांकडे काम करणा-या सर्व विभागातील कंत्राटी आणि कर्मचा-यांना समान काम,समान वेतन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. त्यासाठी आपण लवकरच कामगार मंत्री, मनपा आयुक्त, पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे प्रतिनिधी, कामगार आयुक्त यांच्यासमवेत बैठक घेऊन असे, आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने आयोजित कामगार मेळाव्यात सांगितले.
पिंपळेगुरवला रंगणार अनोखे कवीसंमेलन
शब्दधन काव्यमंचच्यावतीने थंडीत कवितेचे उब देणारे अनोखे कवीसंमेलन पिंपळे गुरव येथे होणार आहे, अशी माहिती शब्दधन काव्यमंचचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी दिली. मस्त थंडी वाफाळलेला चहा आणि सोबत कविता यांची सुरेल मैफल गुरुवार (दि. 20 डिसेंबरला) सकाळी साडेसहा वाजता पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालयाशेजारी होणार आहे.
महाराष्ट्र केसरीसाठी महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या 10 मल्लांची निवड
एमपीसी न्यूज – जालना येथे बुधवार (दि. 19) डिसेंबर रोजी होणा-या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा निवड चाचणी घेण्यात आली. या चाचणी स्पर्धेत महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन (भवानी तालीम)च्या दहा मल्लांची निवड झाली. ही निवड चाचणी काळेवाडी येथे शनिवारी (दि. 15) झाली. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 1961 साली सुरु झाली.
औंध-बाणेर-बालेवाडीत पार्किंग धोरण राबविण्यासाठी स्मार्ट सिटीचा ‘स्मार्ट’ पर्याय
पुणे : महापालिकेचे प्रस्तावित पार्किंग धोरण अद्यापही कागदावर असले तरी या पार्किंग धोरणाला पूरक ठरेल असे स्मार्ट पाऊल पुणे स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीएससीडीसीएल) उचलले आहे. औंध-बाणेर-बालेवाडी या भागात पे अॅण्ड पार्क योजना राबविताना मानवी हस्तक्षेप टाळून आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असेल असा पर्याय स्मार्ट सिटीकडून राबविण्यात येणार आहे. त्यासाठी स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव (एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट) मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी नाममात्र शुल्क प्रस्तावित करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहर परिसरात जमावबंदी लागू
पिंपरी चिंचवड : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियमानुसार पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दि. 20 डिसेंबर रात्री बारापर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला असून जमावबंदी लागू केली आहे.
20 वर्षांपूर्वीच्या आराखड्यांवर आत्ता काम सुरु, हे शहराचं दुर्भाग्य
20 वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या शहर विकासाच्या आराखड्यांवर सर्वजण आत्ता काम करत आहोत. प्रत्येक काम वेळच्या वेळी झाले असते तर ही दुर्भाग्यपूर्ण वेळ आज आलीच नसती. यासाठी प्रशासकीय अधिकार्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे. पण यापुढे असं होणार नसून प्रत्येक काम वेळच्या वेळी पूर्ण होईल. ज्या गोष्टींचा नागरिकांना त्रास होतो, त्या गोष्टी समूळ नष्ट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही आमदार महेश लांडगे यांनी दिली.
पुणे मेट्रोचा विस्तृत आराखडा सादर
पुणे – पुणे मेट्रोच्या कृषी महाविद्यालय ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. हे काम देण्यात आलेल्या टाटा-गुलेरमार्क या कंपनीने शुक्रवारी या कामाचा विस्तृत आराखडा महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना सादर केला. यावेळी या कामाच्या सुरक्षिततेसाठी सर्वोत्परी उपाययोजना केल्या जाणार असल्याचे यावेळी कंपनीकडून या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
मराठी भाषा संवर्धन समितीचे पुनर्गठन
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका मराठी भाषा संवर्धन समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे. शहरातील कला, शिक्षण व साहित्य क्षेत्रातील मंडळीची समिती गठीत करण्यास महापालिका क्रीडा समितीने शुक्रवारी (दि. 14) झालेल्या बैठकीत मान्यता दिली.
तळेगाव, चाकणच्या सांडपाण्यावर महापालिकेची प्रक्रिया
पिंपरी – शहरासह हिंजवडी, चाकण व तळेगाव दाभाडे एमआयडीसीत रोज निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचे पुनर्चक्रिकरण व पुनर्वापर प्रकल्प उभारण्याचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार कासारवाडी व चिखलीत प्रकल्प प्रस्तावित असून सहा ठिकाणी जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. त्यांच्या माध्यमातून रोज 312 दशलक्ष लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आहे.
भोसरीतील रूग्णालय खाजगी तत्वावर चालविण्यास देण्याचा आमदारांचा ‘डाव’ – दत्ता साने
चौफेर न्यूज – भोसरीत सध्या दादाची ‘दादागिरी’ सुरू आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर त्यांच्या दावणीला बांधले गेलेत. सत्ताधाऱ्यांचे ते घरगडी झालेत. यापूर्वीचा खाजगी तत्त्वावर रूग्णालय देण्याचा अनुभव क्लेशदायक असताना, भोसरीचे प्रस्तावित रुग्णालय खाजगी तत्वावर चालविणेस देण्याचा अट्टाहास केला जात आहे. स्थानिक आमदारांना या माध्यमातून त्यांचे नविन दुकान चालू करण्याचा ‘डाव’ आहे. हे रूग्णालय महापालिकेमार्फतच चालवले जावे. खाजगी तत्वावर रूग्णालय चालविण्यास देण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. याप्रकरणी साने यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देखील दिले आहे.
‘स्मार्ट वॉच’ नको.. ‘स्मार्ट साहित्य’ पुरवा – सचिन चिखले
चौफेर न्यूज – कोट्यावधी रुपये खर्चून स्मार्ट वॉच घेण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने तहकूब केला. सफाई कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ नको तर ‘स्मार्ट साहित्य’ पुरवावे. तसेच हा प्रस्ताव तहकूब न करता तो रद्द करावा, अशी मागणी मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
Government nod to PMRDA land plan for proposed roads
PUNE: The Pune Metropolitan Region Development Authority (PM ..
Platform size of 9 stations to increase
Pune: Platforms of nine railway stations in the Pune divisio ..
Subscribe to:
Posts (Atom)