Tuesday, 13 February 2018

पिंपरी-चिंचवडकर अडकलाय दुष्टचक्रात!

पिंपरी-चिंचवडकर अडकलाय एका मोठया दुष्टचक्रात! एकीकडे ‘बीआरटी’चे भिजत घोंगडे, पादचाऱ्यांचा-चालकांचा जीव मुठीत... दुसरीकडे ‘मेट्रो’ शहरात येणार पण अर्ध्या रस्त्यावर (निगडी ऐवजी पिंपरी पर्यंत) सोडणार. 
पिचला जातोय तो सामान्य पिंपरी-चिंचवडकर! त्याची रोजच्या गर्दीतून, ट्राफिक कोंडीतून सुटका कधी होणार?

👉 Sign Online Petition http://goo.gl/kDKV9I
👉 Give Missed Call 08030636448

[Video] पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी सामाजिक संघटनांचे पिंपरीत उपोषण

पुणे मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 'कनेक्टिंग एनजीओ'अंतर्गत रविवारी (दि.11) लोकशाही मार्गाने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणात शहरातील विविध सामाजिक संघटनांसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.

Hinjawadi makes room for the IT professionals

Pune: Brand new buildings, each promising to offer “comfortable” hostel accommodation to young IT professionals coming to the city from across India, have become a sort of a hallmark for Hinjewadi, the city’s IT hub.

‘आयटी’ला बुस्ट

पुणे - माहिती तंत्रज्ञान (आयटी) उद्योगातील कंपन्यांकडून खासगी माहिती तंत्रज्ञान उद्योग संकुलाच्या (आयटी टॉवर) मागणीत वाढत होत आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाबरोबरच (एमआयडीसी) महापालिकेच्या हद्दीत ही संकुले उभारण्याकडे व्यावसायिकांचा कल आहे. महापालिकेने गेल्या वर्षभरात अशा प्रकारच्या आठ संकुलांना परवानगी दिली असून, त्यात ‘आयटी’तील सव्वाशेहून छोट्या कंपन्यांना सामावून घेण्याचे नियोजन मांडण्यात आले आहे.

[Video] मेट्रोचा निगडी प्रवास.. उपोषण.. आश्वासन..आणि प्रतिक्षा…!


हॉटेल सर्वेक्षण अहवालास दप्तर दिरंगाईचा फटका

पिंपरी – मुंबईतील कमला मील कंपाऊंडला आग लागून झालेल्या दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने शहरातील बेकायदेशीर हॉटेलवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. आग नियंत्रण उपकरणांच्या नियमावलीकडे दुर्लक्ष करून राजरोसपणे सुरू असलेल्या हॉटेलचे सर्वेक्षण सुरू केले. याला तब्बल दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला. तरी देखील आयुक्तांसमोर हॉटेलांचा सर्वेक्षण अहवाल सादर केला नाही. त्यामुळे आगीच्या घटनांसंदर्भात अधिकाऱ्यांना गंभीर्य नसल्याचे स्पष्ट होत आहे.

शहरात ११ ‘ब्लॅकस्पॉट’

पिंपरी - रस्त्यावर एखाद्या ठिकाणी वारंवार अपघात होत असतील, तर त्या ठिकाणी निश्‍चितपणे काहीतरी दोष असतो. मात्र, महापालिका प्रशासनाकडून उपाययोजना होत नसल्याने त्या ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात अशी ११ अपघात प्रवण (ब्लॅकस्पॉट) क्षेत्र आढळले आहेत. चार वर्षांत त्या ठिकाणी १०१ गंभीर अपघात घडले आहेत. त्यापैकी सर्वाधिक ३१ अपघात वाकड पुलानजीक झाले आहेत. या संदर्भातील सविस्तर अहवाल वाहतूक पोलिसांनी महापालिका प्रशासनाला सादर केला असून, तातडीने उपाययोजना करण्यास सांगितले आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने ‘ब्लॅकस्पॉट’ नागरिकांच्या जिवावर बेतत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

बहुउद्देशीय इमारतीसाठी सल्लागार

पिंपरी – पिंपरीगाव येथे नव्याने बहुउद्देशीय इमारत बांधण्यात येणार आहे. याबाबत नव्याने इमारत आराखडा बनविणे आणि अंदाजपत्रक तयार करण्यास सल्लागार नियुक्‍ती करण्यात येणार आहे.

‘क’ क्षेत्रिय कार्यालयाचे अंदाजपत्रक 51 कोटींचे

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाचे 2017-2018 चे सुधारित व 2018-2019 चे सुमारे 51 कोटी 16 लाख 93 हजार खर्चाचे मुळ अंदाजपत्रक क्षेत्रिय अधिकारी अण्णा बोदडे यांनी प्रभाग समिती अध्यक्षा अश्विनी जाधव यांच्याकडे सादर केले.

"रिंगरोड'ला दोन हजार 468 कोटी


पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी "पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा'तर्फे (पीएमआरडीए) विकसित करण्यात येणाऱ्या "रिंगरोड'ला केंद्र सरकारने दोन हजार 468 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील 32 किलोमीटरच्या रिंगरोडचे काम सुरू होण्यातील आर्थिक अडचण दूर झाली आहे.


एकात्मिक वाहतूक विकास प्राधिकरण स्थापणार

शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये "महामेट्रो'कडून वनाज-रामवाडी आणि पिंपरी-स्वारगेट मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. तसेच या दोन्ही प्रकल्पांच्या विस्तारीकरणाची मागणी जोर धरू लागली आहे. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे काम लवकरच सुरू होण्याची शक्‍यता आहे.

पीएमपीची बससेवा सुधारण्यास प्राधान्य - गुंडे

पुणे - ‘‘महिला, युवती आणि ज्येष्ठ नागरिक आदी समाज घटकांसाठी पीएमपी बससेवा सुधारण्यासाठी प्राधान्य असेल,’’ असे पीएमपीच्या नवनियुक्त अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी सोमवारी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या बदल्या, निलंबन आदींबाबत प्रत्येक प्रकरणाचा आढावा घेऊन निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

क्रीडानगरीचे स्वप्न हवेतच

पिंपरी - शहराच्या क्रीडा क्षेत्राला दिशा देणाऱ्या महापालिकेच्या क्रीडा विभागाची पुरती दुर्दशा झाली आहे. वाढत्या क्रीडा सेवा-सुविधांच्या तुलनेत मनुष्यबळ अपुरे आहे. खेळाडू घडविण्याचे काम जवळपास ठप्प झाले असून चांगल्या प्रशिक्षकांचीही उणीव जाणवत आहे. प्रत्येक मैदानासाठी जादा ग्राउंडस्‌मन, सुरक्षा कर्मचारी, जलतरण तलावांसाठी जादा जीवरक्षकांचीही गरज आहे. आजही क्रीडा शिक्षक निवडणूक विभाग कार्यालयात वर्षानुवर्षे नियुक्तीस आहेत. त्यामुळे, साधन संपत्ती असूनही या विभागाचे कामकाज विस्कळित असून शहराची क्रीडानगरी करण्याचे स्वप्न हवेतच आहे.

पिंपरी महापालिकेचे सहायक आयुक्त डॉ. डोईफोडे यांची बदली

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहायक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची लातूर जिल्ह्यातील उदगीर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी उदगीर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नितीन कापडणीस यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत वर्णी लागली आहे.

नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर पोलिस कारवाई सुरू


पुणे - राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातलेला चिनी नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर पोलिसांनी छापे घालण्यास सुरवात केली आहे. गुन्हे शाखेची सात पथके विक्रेत्यांवर कारवाई करत आहेत.

वृध्दाच्या पोटातून काढला आठ इंचाचा “वॉल्वुलस’

पिंपरी – पोटातील मोठ्या आतड्याला पिळ पडून होणाऱ्या “वॉल्वुलस’वर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे एका 70 वर्षीय वृध्दाला जीवदान मिळाले आहे. दहा लाखात एखाद्याला होणाऱ्या या आजारामुळे आतडे फुटून रुग्ण दगावण्याचा धोका असतो. त्यावरील शस्त्रक्रियाही तितकीच गुंतागुंतीची असते. मात्र, वायसीएमच्या डॉक्‍टरांनी ही दुर्मिळ शस्त्रक्रिया “फत्ते’ केली.

ज्ञान प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची देशपातळीवर निवड

निगडी – भारत सरकारच्या नीती आयोगामार्फत ‘अटल टिंकरिंग मेरेथोन’ ही राष्ट्रीय संशोधन प्रकल्प स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत निवडण्यात आलेल्या तीस प्रकल्पांमध्ये चार प्रकल्प महाराष्ट्र राज्यातून निवडण्यात आले. या चार प्रकल्पांपैकी निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाच्या दोन प्रकल्पांची निवड झाली.

“आरटीई’ अंतर्गत प्रवेशास सुरुवात

पिंपरी – शिक्षण हक्‍क कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकांसाठी 25 टक्के प्रवेशाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेचे अर्ज भरण्यास शनिवारी सुरूवात झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 28 फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे, अशी माहिती प्रशासन अधिकारी बी.एस.आवारी यांनी दिली.

[Video] पिंपरी चिंचवड मध्ये ऑक्सिजन पार्क ...!


पिंपरी चिंचवड हे निव्वळ सिमेंटचे शहर बनू नये या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वामी समर्थनगर,लक्ष्मीनगर चिंचवड येथे २ एकर जागेत फक्त ऑक्सिजन देणारी झाडे लावण्यात येणार असून त्याद्वारे शहराला ऑक्सिजन मिळेल असा विश्वास पालिकेला वाटतो.या आगळ्या वेगळ्या उद्यानाचे भूमिपूजन नुकतेच पालिकेचे महापौर नितिन काळजे,स्थायी समिती सभापती सावळे आदींच्या हस्ते पार पडले.

लोकन्यायालयात एकाच दिवशी विक्रमी 700 दावे निकाली

पिंपरी – पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेटस्‌ बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या लोकन्यायालयात एकाच दिवशी 700 दावे निकाली काढण्यात आले. हे सर्व दावे 49 लाख, 90 हजार 196 एवढ्या रकमेचे होते.