त्यांचे नाव पालिकेच्या प्रत्येक पत्रिकेत छापलेले असते, मात्र ते कार्यक्रमांकडे पाठ फिरवतात. सांगवी पुलाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी हजेरी लावली. चिंचवड नाटय़गृहात झालेल्या 'गणेश फेस्टिव्हल'च्या कार्यक्रमासाठी ते आले होते.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 24 October 2017
सात हजाराहून अधिक घरे पिंपरी प्राधिकरण बांधणार
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून येत्या तीन वर्षांत विविध पेठांमध्ये सात हजारापेक्षा जास्त घरांची निर्मिती केली जाणार आहे. या गृहप्रकल्पातील पहिल्या टप्प्यामध्ये वाल्हेकरवाडी येथील पेठ क्रमांक ३० आणि ३२ मध्ये सध्या ७९२ ...
विकासातही नागरी सहभाग, दहा लाखांपर्यंतची कामे शहरातील नागरिकांना सुचविता येणार
पिंपरी - चिंचवड महापालिकेने २०१८ - १९ या पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यास सुरुवात केली आहे. या अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी १० लाखांपर्यंतच्या खर्चाची कामे सुचवावीत, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
पुणे स्टेशन, शिवाजीनगर रेल्वे स्थानकही मेट्रोशी जोडणार
पुणे - शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पात पुणे रेल्वे स्टेशन आणि शिवाजीनगर रेल्वे स्टेशनलाही सामावून घेण्याचा निर्णय सोमवारी झाला. त्यामुळे मेट्रो स्थानकांभोवतालच्या एकात्मिक वाहतूक आराखड्यात आता रेल्वेचाही समावेश झाला आहे. परिणामी लोणावळा किंवा दौंडवरून येणारे प्रवासीही दोन्ही शहरांतून धावणाऱ्या मेट्रोतून प्रवास करू शकतील.
खडीच खडी चोहीकडे; रस्ता गेला कुणीकडे?
पिंपरी - निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अवघ्या सहा महिन्यातच चिंचवड स्टेशन ते केएसबी चौक रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील डांबराचा थर पूर्णपणे निघून गेला असून त्याखालील खडी सर्वत्र पसरली आहे. परिणामी, दुचाकीस्वारांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. अपघातांच्या संख्येतही वाढ झाली आहे.
जागरूकता वाढली; प्रदूषण घटले
पिंपरी - शहरातील नागरिकांमध्ये ध्वनिप्रदूषणाबाबत जागरूकता आली असल्याचे चित्र दिवाळीदरम्यान पाहायला मिळाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शहरातील ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण दोन ठिकाणी तीन ते चार डेसिबलने कमी झाल्याचे चाचण्यांमधून समोर आल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे यांनी सांगितले.
पिंपरी शहरात आता पोर्टेबल टॉयलेट
पिंपरी - देशपातळीवर स्वच्छ शहर स्पर्धेत घसरलेला दर्जा सावरण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये ‘ऑटोमॅटिक टॉयलेट’नंतर पोर्टेबल टॉयलेटची मदत घेण्यात आली आहे. २२ लाख लोकसंख्येच्या शहरात अद्यापही उघड्यावर शौच केली जात असल्याने ‘ओडीएफ’च्या मार्गातील हा अडथळा दूर करण्यासाठी झोपडपट्ट्यांत ही पोर्टेबल टॉयलेट बसविण्यात आली आहेत.
सफाई कर्मचाऱ्यांनी दाखवली तत्परता
पिंपरी – विविध गृहसंस्थांच्या आवारात, तसेच रस्त्यांवर फटाके वाजविल्यानंतर पसरलेला कचरा महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने हटविला. गृह सोसायट्यांच्या लगतचा परिसर तसेच रस्त्यांच्या परिसराची साफसफाई करून कर्तव्य तत्परता दाखवून दिली.
'आरटीई'मधील प्रवेश नाकारले
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे 'आरटीई'चे प्रवेश नाकारल्याच्या २१ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विविध कारणांनी पंधरा शाळांनी 'आरटीई'अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले आहेत. या शाळांना शिक्षण मंडळाने नोटीस ...
पिंपरी-चिंचवड आरटीओ दलालमुक्त करणार, पूर्णानगर येथील कार्यालयातील कामकाजात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न
पिंपरी : पूर्णानगर येथील आरटीओमध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून रूजू झाल्यानंतर कामकाजात पारदर्शकता आणण्याचा कसोशीचा प्रयत्न सुरू केला आहे. हळूहळू बदल दिसून येत आहेत. दलालांचा सुळसुळाट झाल्याबद्दलचा मुद्दा उपस्थित ...
“त्या’ फेरीवाल्यांचे प्रमाणपत्र होणार रद्द
पिंपरी – राष्ट्रीय फेरीवाला धोरण कायद्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील पात्र फेरीवाल्यांची नोंदणी करण्यात आली आहे. मात्र, आजही पात्र शेकडो फेरीवाल्यांनी नोंदणी प्रमाणपत्र नेलेले नाही. येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत नोंदणी प्रमाणपत्र न घेऊन जाणाऱ्या पात्र फेरीवाल्यांचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द केले जाणार आहे.
वैद्यकीय अधिकारी पदे भरणार, वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्राध्यापकांची ५३ पदे
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पूर्णवेळ, नियमित आणि तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध व्हावेत, यासाठी रुग्णालयामध्येच स्वतंत्र पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याच्या निर्णयास ...
शहराला मंत्रिपद मिळणार का?
शहरातील कोणा एकालाही मंत्रिपद मिळाले तरी चालेल, असे उसने अवसान आणणारे भाजपचे दोन्ही आमदार वास्तवात मात्र मंत्रिमंडळ विस्तारात खुर्ची पक्की करण्यासाठी प्रदेश पातळीवर आपापले वजन वापरू लागले आहेत. तर दुसरीकडे, पक्षात आले आणि ...
माजी महापौर आर.एस.कुमार यांचा पुन्हा भाजप प्रवेश
पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर आर.एस.कुमार यांनी आज पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. चिंचवड येथे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत कुमार यांनी प्रवेश केला आहे. महापालिका निवडणुकीपूर्वीही त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत घरवापसी केली होती. परंतू त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. तेव्हापासून ते राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याच्या तयारीत होते.
दानवे पुन्हा घेणार झाडाझडती
पिंपरी - भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पंधरा दिवसांपूर्वी पिंपरी- चिंचवडच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहर भाजपच्या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्या वेळी पदाधिकाऱ्यांना उद्दिष्ट देऊन दिवाळीनंतर आढावा बैठक घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. ही मुदत संपल्याने लवकरच ते पुन्हा आढावा बैठक घेणार आहेत.
परवाना विभागातील अधिकाऱ्यांच्या हाताला “लकवा’
पिंपरी – महापालिकेच्या हद्दीत अनधिकृत फ्लेक्सचा सुळसुळाट वाढल्याने शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. अशा फ्लेक्सवर कारवाई करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय 10 ते 11 कर्मचाऱ्यांची स्वतंत्र पथके नेमली आहेत. तरीही, बेकायदेशीर फ्लेक्सची संख्या वाढतच चालली आहे. पूर्वीच्या एक हजार 849 फ्लेक्सपैकी एकाचीही नोंद नसल्याचे उघडकीस आले आहे. तरीही, हा विभाग कारवाई करण्याबाबत ढिम्म भूमिका घेत आहे. त्यामुळे आकाश चिन्ह परवाना विभागातील अधिकाऱ्यांच्या हाताला लकवा झाला की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
'एमआयडीसी'तही कचराकोंडी
परंतु, औद्योगिकनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील एमआयडीसी परिसर मात्र स्वच्छ भारत अभियानापासून वंचित ठेवण्यात येतो, असा आरोप पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने केला आहे. औद्योगिक परिसरातील कचरा वेळच्या वेळी ...
Subscribe to:
Posts (Atom)