Friday, 25 October 2013

Death in PCMC school: Panic as civic officials 'detain' 13 students

The officials of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) called 13 students of PCMC-run Pimpri Nahar high school to the civic headquarters to inquire about the infighting among the students which claimed the life of 15-year-old Hrishikesh Sarode on Monday.

निगडी उड्डाणपुलावर क्रॅश बॅरीअर

अपघातानंतर आली महापालिकेला जाग 
काही दिवसांपूर्वी  निगडीतील मधुकर पवळे उड्डाणपुलावर रस्ता दुभाजक ओलांडून कठड्याला धडकल्याने एका मोटारीने पेट घेतला होता. या अपघानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली असून आता अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी क्रॅश बॅरीअर बसवण्यात आले

सुमारे 400 अवैध बांधकामे झाली भुईसपाट

मोशीत दोन बांधकामे हटविली 
महापालिकेने मोशीतील दोन अनधिकृत बांधकामांवर आज (गुरुवारी) बुल्डोजर फिरविला.  गेल्या सोळा महिन्यात भुईसपाट झालेल्या अनधिकृत बांधकामांची संख्या 400 पर्यंत पोहचली आहे.

पाच दिवसांत 240 अवैध फलकांवर कारवाई

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चार प्रभागांतर्गत गेल्या पाच दिवसात बेकायदा उभारण्यात आलेल्या 240 जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात आली.
महापालिका हद्दीत 7 ते 11 ऑक्टोबर दरम्यान 121 विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात

'ऑटो अ‍ॅन्सीलियरी'चे उद्‌घाटन

इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायजेशनच्या (आयटीपीओ) वतीने 25 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत चिंचवडमध्ये 'ऑटो अ‍ॅन्सीलियरी' प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. वाहन उद्योगासाठी महत्त्वपूर्ण ठरणा-या या प्रदर्शनाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 25) सकाळी अकरा वाजता होणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिशाभूल करू नये

पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत लवकरच विधेयक करण्याचे खोटे आश्वासन न देता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वचनपूर्ती करावी, अशी मागणी शहरवासियांकडून होत आहे. याबाबत भारतीय जनता पक्ष, नागरी हक्क सुरक्षा समिती यांनी मागण्यांचे निवेदन दिले आहे.

अत्याधुनिक वीजमीटरची गुजरात वीजमंडळाकडून दखल

महावितरण’कडून राज्यभर लावण्यात येत असलेल्या अत्याधुनिक रेडिओ फ्रिक्वेंसी (आरएफ) व इन्फ्रा रेड (आरआय) या वीजमीटरची गुजरातच्या वीज मंडळानेही दखल घेतली आहे.

मुख्यमंत्री आज पिंपरीत

चिंचवड येथे २५ ते २८ ऑक्टोबर दरम्यान दुसऱ्या ‘ऑटो अॅन्सीलियरी शो’ चे आयोजन करण्यात आले असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी त्याचे उद्घाटन होणार आहे.

रिक्षाचालकांकडून परप्रांतीयांची अडवणूक

भोसरी : चिंचवड स्टेशन, भोसरी एमआयडीसीसह विविध थांब्यांवर रिक्षाचालकांकडून पोरसवदा परप्रांतीय कामगारांना रिक्षात बसण्यासाठी जबरदस्ती केली जात आहे. रस्त्याने निघालेल्या अशा कामगारांना दमदाटी करून अडवले जात असून, आपल्याच रिक्षातून प्रवास करण्यासाठी अडवणूक केली जात आहे. 

‘माहिती अधिकार कक्ष स्थापन करा’

पिंपरी : माहिती अधिकारासंदर्भात जनमाहिती अधिकारी नागरिकांशी बेजबाबदार पत्रव्यवहार करीत असल्याचा आरोप करीत महापालिकेत माहिती अधिकार कक्ष स्थापन करण्यात यावा अशी मागणी सामाजिक हित संवर्धन समितीने आयुक्त श्रीकर परदेशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी सरकारची कसरत

पिंपरी - राज्यातील सुमारे ऐंशी लाख अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी राज्य सरकारला मोठी कसरत करावी लागत असून, अनेक ठिकाणी वेगवेगळे प्राधिकारी असल्यामुळे सर्वांसाठी एकच कायदा करणे कठीण होत आहे.

कंत्राटी कामांच्या मुदतवाढीचे प्रस्ताव यापुढे पाठवू नका

पिंपरी - कंत्राटी कामांची मुदत संपण्यापूर्वीच संबंधित विभागाने निविदा प्रक्रिया करावी कंत्राटी कामांना मुदतवाढ देण्याबाबतचे प्रस्ताव पाठवू नयेत, असे आदेश महापालिका आयुक्‍त डॉ.

प्राधिकरणात महापालिकेने सुसज्ज रुग्णालय उभारावे

पिंपरी - "संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या (वायसीएम) धर्तीवर महापालिका अथवा राज्य शासनाने निगडी-प्राधिकरणात सुसज्ज रुग्णालय उभारावे तसेच प्रमुख पीएमपी बसस्थानकांजवळ महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारावीत,'' अशी मागणी "तनिष्का व्यासपीठा'च्या पेठ क्रमांक 26 च्या गटाने बुधवारी मासिक बैठकीत केली.