Monday, 17 July 2017

महापालिका रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लू लसीचा तुटवडा कायम

पिंपरी : राज्य सरकारकडून स्वाइन फ्लू लसीचा सध्या अपुरा पुरवठा होत आहे. त्यामुळे शहरातील महापालिका रुग्णालये व दवाखान्यांमध्ये त्याचा तुटवडा कायम आहे. त्याबाबत वेळीच दक्षता घेणे गरजेचे आहे. 

बचत गटांच्या वतीने वृक्षारोपण

भोसरी – इंद्रायणीनगर येथील स्वामिनी माहिला बचत गट व यशस्वी महिला बचत गट यांच्या वतीने सेक्‍टर नं 2 मधील महापालिकेच्या मोकळ्या जागेवर वृक्षारोपण करण्यात आले.

नगरसेवक मानधनवाढीचा नवीन सभागृहाला लाभ

पिंपरी – महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी-चिंचवड महापालिका नगरसेवकांचे मानधन सात हजार रुपयांवरुन थेट पन्नास हजार रुपये करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी सभागृहात मांडला होता. मात्र, यावर सभागृहात टीका झाल्याने हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात आला होता. मात्र, आता नगरविकास विभागानेच अध्यादेश काढत या मानधनात वाढ करुन ते पंधरा हजार रुपये केल्याने महापालिका नगरसेवकांना पन्नास हजारांऐवजी पंधरा हजारांवर समाधान मानावे लागले आहे.

पिंपरी पालिकेचा अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाईचा धडाका

पिंपरी-चिंचवड शहरात मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे आहेत. पालिकेच्या नोंदीनुसार हा आकडा ६५ हजाराच्या घरात आहे. चार वर्षांपूर्वी जेव्हा डॉ. श्रीकर परदेशी पिंपरीचे आयुक्त होते, तेव्हा अनधिकृत बांधकामांच्या विरोधात धडक कारवाई ...

FIRM COP FRIENDS EASE A MYRIAD OF TROUBLES NOW

This includes police stations from PimpriNigdiBhosari, Chaturshringi, Hinjewadi, Mundhwa, Hadapsar, Wanowrie, Vishrantwadi, Chandan Nagar and Viman Nagar to name a few. The first FIR was registered for this case at Hadapsar police station. A woman ...

‘आयटी’चा गिअर टाकल्याने पीएमपी होणार ‘गतिमान’

पुणे - बसला आणखी वेळ आहे का? चला तर मग चहा घेऊ... आणि हो चहा घेताना गप्पा रंगतील अन्‌ बसची वेळ झालेली कळणारच नाही, जरा थांबा ‘पीएमपी ई-कनेक्‍ट’वर ‘रिमाइंडर’ लावून ठेवतो. येत्या काही दिवसांमध्ये आपल्या पुण्यात बसथांब्यावरील संवादाचे स्वरूप असे बदललेले पाहायला मिळू शकेल. 

'रेल्वेच्या जमिनींवरील जलस्रोत पुनरुज्जीवित करणार'

पुणे  - ""आगामी काळात पाण्याचा प्रश्‍न अधिक भीषण रूप धारण करणार आहे. केवळ भावनेतून पाणीप्रश्‍न सुटणार नाही; तर त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शास्त्रशुद्ध उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. रेल्वेच्या मोकळ्या आणि वापरात नसलेल्या जमिनीवरील नैसर्गिक जलस्रोतांना पुनरुज्जीवित आणि काही ठिकाणी कृत्रिम जलस्रोत निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील,'' अशी घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली. 

जपानच्या धर्तीवर रेल्वेचा विकास करणार - सुरेश प्रभू

हिंजवडी - ‘‘येत्या काही वर्षांतच देशात रेल्वेचा पूर्णपणे कायापालट झालेला दिसेल. जपान आणि चीनच्या धर्तीवर भारतातही त्याच गतीने रेल्वेचा परिपूर्ण विकास करण्याचा सरकारचा मानस आहे,’’ असे मत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रविवारी (ता. १६) हिंजवडी येथे बोलताना व्यक्त केले. 

आरटीई प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कारवाई कधी?

पिंपरी - आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना कायद्याने मोफत शिक्षणाचा हक्क मिळाला आहे. मात्र, काही शाळांचे प्रशासन या बालकांचा हक्क डावलून कायद्याची पायमल्ली करीत आहेत. असाच प्रकार काळेवाडीतील नगरसेविकेच्या शाळेत घडला. शिक्षण मंडळ प्रशासन अधिकाऱ्याने कारवाईचे आदेश दिल्यावर हाकललेल्या मुलांना त्यांनी वर्गात घेतले. ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर शिक्षण विभाग कारवाई का करत नाही? अशा प्रश्‍न आता पालक विचारू लागले आहेत.

एक बस, हजार प्रवासी; उत्पन्न १५ हजार

शहराची 'आयटी हब' अशी ओळख निर्माण होण्यास कारणीभूत ठरलेल्या हिंजवडी आयटी पार्कमधील कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी भविष्यात पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) प्रवासी सेवा देण्यात येईल, असे सूतोवाच पीएमपी प्रशासनाकडून मिळाले आहेत. येत्या काळात पीएमपीच्या ...

विशेष व्यक्तींच्या आसनावर बसल्यास दंडात्मक कारवाई

पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसगाड्यांमध्ये विशेष व्यक्तींसाठी (अंध, अपंग) आरक्षित असलेली आसनव्यवस्था त्यांच्यासाठीच राहणार आहे. या संदर्भात चालक आणि वाहकांना पुन्हा सूचना करण्यात येणार आहे. त्यानुसार विशेष व्यक्तींच्या आसनांवर बसलेल्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई होण्याची शक्‍यता आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिकांबाबतच्या निर्णयाचीही काटेकोर अंमलबजावणी होणार आहे. 

उत्पन्न वाढवा; अन्यथा कठोर कारवाई - तुकाराम मुंढे

पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताब्यातील एका बसगाडीचे दिवसाकाठचे उत्पन्न १५ हजार रुपये, तर प्रवासी संख्या एक हजार इतकी असावी, हे उद्दिष्ट मांडत ते पूर्ण करण्याची जबाबदारी आगार व्यवस्थापकांवर सोपविण्यात आली आहे. उत्पन्न वाढीच्या या उद्दिष्टापासून हात झटकणाऱ्या व्यवस्थापकांवर कठोर कारवाईची सूचना वजा तंबी