Friday, 5 October 2018

रेडझोनमुळे रखडला कंपन्यांचा विस्तार

पिंपरी - रेडझोनचा प्रश्‍न सुटत नसल्यामुळे तळवडे परिसरातील आयटी कंपन्यांचा विस्तार रखडला आहे. येथील काही कंपन्यांनी विस्तारासाठी परवानगी मागितली होती. मात्र, हा परिसर रेडझोनमध्ये येत असल्यामुळे हा प्रश्‍न मार्गी लागू शकलेला नाही. या विस्तारासाठी संरक्षण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र एमआयडीसीने केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाच्या सचिवांना दिले होते. मात्र, त्यावर अद्याप कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. 

Charholi residents suffer without power for 2 days

“I could not work from home due to the power failure and had to go to the office in Kalyaninagar. Inverters gave us some relief in the beginning, but ...

रेड झोनच्या जागेत कचऱ्याचे ढीग

भोसरी - दिघीतील भारत मातानगरजवळील रेड झोनमधील मोकळ्या जागा म्हणजे कचराडेपो झाला आहे. परिसरातील नागरिक कचरा, राडारोडा टाकत आहेत. कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. ही समस्या सोडविण्याची नागरिकांची मागणी आहे. 

राजगुरुनगरला दोन किलोमीटरपर्यंत रांगा

राजगुरुनगर - राजगुरुनगर शहरामधून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावरील भीमा नदीच्या पुलाच्या कठड्याला टेम्पो धडकल्यामुळे वाहतूक अडकून आज गुरुवारी (ता. ४) दुपारपर्यंत वाहतूक कोंडी झाली. यामुळे दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक कोंडीने वाहनचालक, प्रवासी आणि वाहतूक पोलिसही वैतागून गेले.

निम्म्या कचऱ्याचे वर्गीकरण

पिंपरी - शहरात रोज निर्माण होणाऱ्या ९०० मेट्रिक टन कचऱ्यापैकी सुमारे ४८ टक्के कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया केली जाते. यात घरोघरच्या कचऱ्याचे आठ टक्के आणि मोशी कचरा डेपो येथे ४० टक्के कचऱ्याचे वर्गीकरण होते. स्मार्ट सिटी होण्यासाठी शहरातील प्रत्येक प्रभागात घरोघरी कचऱ्याचे शंभर टक्के वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया होणे आवश्‍यक आहे. 

दररोज उचलला जातो दोन टन कचरा

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागांत स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेत महापौर राहुल जाधव यांच्यासह स्थानिक नगरसेवक सहभागी होत असून, दररोज दोन टन कचरा उचलला जात असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

प्लॅस्टिक बंदी’ कारवाईत 20 हजारांचा दंड वसूल

पिंपरी – राज्यात प्लॅस्टीक बंदी असतानाही प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर महापालिका प्रशासन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने गुरुवारी (दि. 4) संयुक्त कारवाई केली. अजमेरा कॉलनी, मासुळकर कॉलनी, नेहरुनगर, देहू आळंदी रस्ता, चिखली व मोशी परिसरात सुमारे 70 व्यावसायिकांची तपासणी करत, त्यांच्याकडून सुमारे अठरा किलो प्लॅस्टिक जप्त करण्याबरोबरच वीस हजार रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

थेरगावात पोलिसांनी चोरट्याला रंगेहाथ पकडले

पिंपरी (पुणे) : 'पोलिस चौकीत नको, चौकात थांबा,' असे आदेश पोलिस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांनी पोलिसांना दिले. तो निर्णय किती सार्थ आहे, हे आता दिसून येऊ लागले आहे. मोबाईलवर बोलत चाललेल्या पादचाऱ्याचा मोबाईल पळवणाऱ्या दोन चोरट्यांना डांगे चौकातील पोलिसांनी जेरबंद केले. ही घटना थेरगावात बुधवारी सायंकाळी घडली. पोलिस आयुक्‍तांच्या टीमवर्कने चोरट्यांना दिलेला हा दुसरा दणका आहे. यापूर्वी निगडीत पोलिसांच्या टीमने दोन चोरट्यांना जागेवरच पकडले आहे. 

कुंदन गायकवाड यांचे नगरसेवक पद रद्द

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला वनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी पहिला झटका बसला आहे. प्रभाग क्रमांक 1 मधील नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे जात प्रमाणपत्र अखेर रद्द करण्यात आले. बुलडाणा जिल्हा जात पडताळणी समितीने हा निर्णय घेतला आहे.

सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम तातडीने मार्गी लावा

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी चौकात उभारलेले सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम तातडीने मार्गी लावण्याच्या सुचना महापौर राहुल जाधव यांनी दिल्या. पुर्णत्वाचा दाखल मिळाल्यानंतर, या इमारतीचे भूमी जिंदगी विभागाकडे हस्तांतर करुन ही कामे अभ्यासिका व ग्रंथालय पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचे आदेश दिले.

खुशखबर ! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी स्वस्त

पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल पाच रुपयांनी स्वस्त करण्यात आलं आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली आहे. केंद्रापाठोपाठ राज्य सरकारकडून कर कपातीची घोषणा करण्यात आली असून महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता ५ रुपयांनी स्वस्त झालं आहे. उद्यापासून नवे दर लागू होतील अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून इंधनाचे दर कमी करण्यात आल्याची घोषणा केली आहे.

‘डिपी’चे भिजत घोंगडे

पिंपरी-चिंचवड पालिकेकडून कामाला गती मिळण्याची मागणी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सुधारित विकास आराखड्याचे घोंगडे भिजत पडले आहे. प्रशासकीय उदासीनता आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव या बाबी दूर ठेवून नागरिकांच्या हितासाठी सुधारित विकास आराखड्याच्या कामाला गती मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Death sparks strict dengue blood sample surveillance

PIMPRI CHINCHWAD: The civic body’s health department on Wednesday directed private hospitals to send blood samples of dengue-positive patients to its Yashwantrao Chavan Memorial (YCM) hospital.

शाळा महाविद्यालयांसमोर छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांवर पिंपरी पोलिसांनी कारवाई

शहरातील काही शाळा महाविद्यालयांसमोर थांबून मुलींची छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांवर पिंपरी पोलिसांनी बुधवारी कारवाई केली. कारवाईवेळी महाविद्यालय परिसरामध्ये विनाकारण थांबणाऱ्या २८ टवाळखोरांना ताब्यात घेण्यात आले आणि कायद्यानुसार कारवाईकरुन नातेवाइकांसमोर समज देऊन नंतर त्यांना सोडून देण्यात आले.

अण्णाभाऊ साठे नगर ते मानकर चौक येथील बंदिस्त नाल्याच्या कामाचे भूमीपूजन

गेल्या कित्येक दिवसांपासून प्रस्तावित नाल्याचे काम मार्गी लागत नसल्यामुळे अणाभाऊ साठे नगर, मानकर वस्ती, कस्पटे वस्ती या भागातील नागरिकांना दुगर्धींचा सामना करावा लागला. मात्र, प्रभाग क्रमांक 26 मधील भाजपच्या नगरसेविका ममता गायकवाड या स्थायी समितीच्या सभापती झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा नाल्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. सभापती गायकवाड यांच्या हस्ते कस्पटे वस्ती येथील या बंदिस्त नाल्याच्या कामाचे नुकतेच भूमीपूजन झाले आहे.

औद्योगिकनगरी ‘व्हायरल’ने फणफणली!

नऊ महिन्यात ‘स्वाईन फ्लू’ने घेतला 28 जणांचा बळी
डेंगीचे 103 रुग्ण आढळले पॉझिटिव्ह
पिंपरी-चिंचवड : शहरात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. जानेवारीपासून स्वाईन फ्ल्यूने 28 जणांचा बळी घेतला आहे. तर, वर्षभरात 103 रुग्ण डेंगीचे पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर, बुधवारी डेंग्यूने महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्याचा मृत्यू झाला आहे. हवेतील गारवा आणि बदलत्या वातावरणाने ‘स्वाईन फ्लू’ने पिंपरी-चिंचवडमध्ये कहर माजविला आहे. मरण पावलेल्या 28 पैकी 9 रुग्ण शहराबाहेरचे होते. आजमितीला 23 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून त्यापैकी सात रुग्ण व्हेटिंलेटरवर आहेत. त्यातील एकाची प्रकृती नाजूक आहे. तर, स्वाईन फ्ल्यूच्या संशयाने 592 जण दवाखान्यात दाखल झाले होते. त्यापैकी 162 रुग्णांवर उपचार झाले असून ते बरे झाले आहेत.