Wednesday, 26 September 2018

‘अनधिकृत’वर गुन्हे नको, कारवाई हवी

अनधिकृत बांधकामांचे ग्रहण केव्हा सुटायचे ते सुटो. गेली दहा वर्षे तोच तो प्रश्‍न पुन्हा पुन्हा समोर येतोय. वारंवार त्याचे राजकारण होते. लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीलाही त्याच तापल्या तव्यावर भाजपने आपली पोळी भाजून घेतली. मूळ प्रश्‍न आहे तिथेच आहे. निवेदने, मोर्चे, आश्‍वासने, आदेश, अध्यादेश या चरख्यात पावणेदोन लाख अनधिकृत बांधकामे अडकली. राजकारण्यांचा खेळ सुरूच आहे. दुसरीकडे प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने आणि राज्यकर्त्यांचे अभय असल्याने आजही ही अनधिकृत बांधकामे थांबायचे नाव घेत नाहीत. महापालिकेने आजवर फक्त नोटिसा पाठविण्यातच तीन-चार कोटी खर्च केले असतील. शेकडोने फौजदारी गुन्हे दाखल केले, पण सारेच्या सारे अगदी सहीसलामत सुटले. नव्याने अनधिकृत करू नका, असा कंठशोष प्रशासन करते; पण तिकडे ढुंकून कोणीही पाहत नाही. परिणामी, शहर अधिकाधिक बकाल होत आहे. नदीच्या पूररेषेतील, आरक्षणातील आणि रस्त्यात येणारी अनधिकृत बांधकामे कदापी नियमित होणार नाहीत, असेही थेट मुख्यमंत्र्यांपासून सर्वांनी बजावून सांगितले. त्याचाही परिणाम शून्य आहे. 

‘आयटीयन्स’ची डोकेदुखी

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यात पोलिसांना यश आले असले तरी तळवडे आयटी पार्क परिसरातील वाहतुकीचा प्रश्‍न अद्याप ‘जैसे थे’ आहे. चाकण परिसरातून येणारी जड वाहनांची वाहतूक तळवडे आयटी पार्क भागातून होत असल्याने आयटी कर्मचाऱ्यांना ये-जा करणे डोकेदुखी ठरत आहे. 

PCMC: Police inaction preventing us from running BRTS smoothly

AFTER work on the Pune Metro and the dedicated Nigdi-Dapodi BRTS lane had started, the 13-km stretch of the Pune-Mumbai Highway under the jurisdiction of Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has been witnessing regular traffic jams. Compounding the problem are the encroachers, who have, for years, captured the portion of the highway.

Pune Metro, Nigdi-Dapodi BRTS, Pimpri-Chinchwad, Pimpri-Chinchwad Municipal corporation, PCMC, Pune news

Seal on tenement proposal for Borhadewadi, Akurdi & Pimpri

Pimpri Chinchwad: A state-level committee on Friday sanctioned the revised detailed project report on the affordable houses under the Pradhan Mantri Awas Yojana at Borhadewadi, Akurdi and Pimprigaon.

PCMC helpline hits snag as complaints are closed without being resolved

Probe reveals extreme negligence by staff, officials to conduct routine audit of each individual plaint

१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा; स्थायी समितीचा निर्णय

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या थकीत मिळकत करावर आकारण्यात आलेल्या मनपा कर शास्तीमध्ये थकबाकीसह मिळकत कराची संपूर्ण रक्कम एक रक्कमी ०१ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०१८ अखेर भरणा करणा-या मिळकतधारकांना मनपाकर शास्ती रकमेच्या ९०टक्के सवलत मिळणार आहे. तर दि.१६ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०१८ अखेर भरणा करणा-या मिळकतधारकांना मनपाकर शास्ती रकमेच्या ७५ टक्के सवलत देण्याच्या अभय योजनेस स्थायी समितीने मान्यता दिली. तसेच शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे ३४ कोटी २६ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

[Video] पोलीस, पोलीस ठाण्यात नाही तर समाजात दिसायला हवेत : पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन


[Video] “फोन ऑफ फ्रेण्ड” पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची नवीन संकल्पना

शहरात घडलेल्या अनुचित घटनेची शहानिशा करण्यासाठी पोलीस कर्मचा-यांच्या वेगवेगळी पथके तयार केली जाणार आहेत. एखाद्या भागात गुन्हेगारी घटना घडल्यास नागरिकांनी कंट्रोल रुमशी संपर्क साधावा. अवघ्या काही वेळातच त्याठिकाणी पोलिसांचे एक पथक हजर राहील. त्यामुळे गुन्हेगारी कृत्याला आळा बसून पोलिसांना माहिती कळविण्याचा अधिकार सर्वसामान्य नागरिकांना प्राप्त होईल. त्यामुळेच “फोन ऑफ फ्रेण्ड” पोलीस आपल्या दारी ही संकल्पना राबविली जाणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी मंगळवारी (दि. 25) पत्रकार परिषदेत दिली.

शहरातील डीपी रस्त्यातील अनधिकृत बांधकामावर पालिका थेट कारवाई करणार – महापौर राहूल जाधव

पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख रस्त्यांमुळेच पिंपरी-चिंचवडचा कायापालट झाला आहे. आता अंतर्गत डीपी रस्ते विकसित करण्याची गरज आहे. त्यासाठी आरक्षित जागा ताब्यात घेतल्या जाणार आहेत. डीपी रस्त्याच्या जागेत अतिक्रमण करून बांधलेली अनधिकृत बांधकामे पाडण्याचा निर्णय महापौर राहूल जाधव यांनी घेतला आहे. तशा सूचनाही त्यांनी बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाला दिल्या आहेत. काही दिवसांत डीपी रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे पाडण्याची कारवाई हाती घेण्यात येणार आहे, तसेच यात राजकीय हस्तक्षेप चालू देणार नाही अशी माहिती महापौर जाधव यांनी दिली.

महामेट्रोला लागणाऱ्या शासकीय जागांबाबत सहकार्य करण्याची ग्वाही

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून (महामेट्रो) वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी दरम्यान करण्यात येणाऱ्या दोन मेट्रो मार्गिकांसाठी एकूण ४२ हेक्टर जागेची आवश्यकता असून त्यापैकी ३८.३० हेक्टर जागा शासकीय आहे. मेट्रो प्रकल्पासाठी लागणाऱ्या शासकीय जागा मिळवून देण्याबाबत महामेट्रोला सहकार्य करू, अशी ग्वाही विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी मंगळवारी दिली.

भुयारी मेट्रोचे काम महिन्यात

पुणे  - पिंपरी-स्वारगेट मेट्रो मार्गातील कृषी महाविद्यालय ते फडके हौद आणि फडके हौद ते स्वारगेटदरम्यानच्या भुयारी मेट्रो मार्गाच्या निविदा एक महिन्यात मंजूर होणार असल्याचे महामेट्रोकडून मंगळवारी सांगण्यात आले. भुयारी मेट्रोसाठी सुमारे 250 कुटुंबांचे स्थलांतर करावे लागणार असून, त्यांच्या पुनर्वसनासाठी तीन पर्याय तयार केले आहेत. प्रत्येक कुटुंबाशी चर्चा करूनच या बाबतचा प्रश्‍न सोडविला जाणार असल्याची ग्वाही महामेट्रोतर्फे देण्यात आली. 

पिंपरी महापालिकेतील १०० कर्मचारी कामचुकार

कामाच्या वेळेत बाहेर फिरणारे, उपाहारगृहात तास न् तास गप्पांचे फड रंगवणारे, विनापरवाना गैरहजर राहणारे अशाप्रकारच्या सर्व कर्मचाऱ्यांची मंगळवारी एका मोहिमेद्वारे अचानक तपासणी घेण्यात आली. पालिका मुख्यालयातील या तपासणी मोहिमेत १०० हून अधिक कर्मचारी दोषी आढळून आले आहेत. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

नाट्यगृहांचा पडदा कधी उघडणार?

पिंपरी - चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आणि संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर सध्या दुरुस्तीसाठी बंद आहे. संबंधित नाट्यगृहांचे काम पूर्ण होण्यास विलंब लागत असल्याने नाट्य कलावंत आणि नाट्यरसिकांची गैरसोय होत आहे. प्रा. मोरे प्रेक्षागृहाचे काम पूर्ण होण्यासाठी ऑक्‍टोबर उजाडणार आहे, तर अत्रे रंगमंदिराचे काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे महापालिका प्रशासनाचे नियोजन आहे.  

अधिकृत शाळांना ठरविले अनधिकृत

पिंपरी - महापालिकेच्या शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार पुन्हा समोर आला आहे. सरकारची अधिकृत मान्यता मिळालेल्या शाळेला अनधिकृत ठरवण्याचा प्रताप शिक्षण विभागाने केला आहे. पिंपरी गावातील बालगोपाल विद्या निकेतन व आळंदीतील जयश्री इंग्लिश मीडियम स्कूल या दोन शाळांना सरकारची मान्यता असूनही शिक्षण विभागाने अनधिकृत ठरवीत नोटीस बजावल्या आहेत. संस्था चालकांनी यावर आक्षेप घेतल्यानंतर चुकीचा खुलासा करण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढवली आहे. 

Maha govt to procure 1,000 e-vehicles in 1 yr

Maharashtra government will be getting 1000 electric vehicl ..

ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांच्या विरोधात २८ सप्‍टेंबरला 'भारत बंद'

किरकोळ व्यापार अस्थिर व उध्वस्त करू शकणाऱ्या वॉलमार्ट- फ्लिपकार्ट करार तसेच किरकोळ व्यापारात विदेशी गुंतवणूक यास विरोध करण्यासाठी शुक्रवार दि. २८ सप्टेंबर रोजी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, नवी दिल्ली यांनी संपूर्ण भारत बंदचे आवाहन केले आहे. त्यास भारत भरातून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. पुण्यात देखील सर्व संस्थांनी या बंदला पाठींबा दर्शविला आहे.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलावंतांशी शनिवारी चिंचवडला मुक्त संवाद

पिंपरी (Pclive7.com):- दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने ‘झी’ दूरचित्रवाणीवरील लोकप्रिय ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ या मालिकेच्या प्रमुख कलावंतांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. चिंचवड वाल्हेकरवाडी येथील ‘आहेर गार्डन’या ठिकाणी शनिवारी दि.२९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता हा मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे.

महापालिकेतर्फे राज्यस्तरीय जिम्नॅस्टीक स्पर्धेतील कांस्य पदक विजेत्यांचा गौरव

महाराष्ट्र राज्य जिम्नॅस्टिक संघटने मार्फत घेतल्या जाणा-या स्पर्धेत सहभाग घेऊन कांस्य पदक मिळवल्याबद्दल प्रणित आढाव व रुजुला देव घरे यांचा तसेच त्यांना प्रशिक्षित करणा-या प्रशिक्षक हर्षद कुलकर्णी यांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर राहूल जाधव, स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर व दिलीप गावडे यांच्या हस्ते पुस्तक भेट देऊन गौरव करण्यात आला.

शहरबात : पाहणी दौऱ्याचा फार्स

पिंपरी महापालिकेच्या १८ माध्यमिक आणि १०५ प्राथमिक शाळांमध्ये ३८ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना ११५० शिक्षक ज्ञानदानाचे काम करतात. श्रीमंत म्हणवणाऱ्या महापालिकेच्या शाळांची सध्याची अवस्था सांगण्यापलीकडची आहे. वर्षांनुवर्षे कोटय़वधी रुपये खर्च केले जातात. त्याचा विद्यार्थ्यांना जराही उपयोग होत नाही. शाळांचा दर्जा खालावलेला असून सध्या विद्यार्थ्यांच्या गळतीचा प्रश्न गंभीर झाला आहे. अनेक पाहणी दौरे होतात. त्यातून काडीचीही सुधारणा होत नसल्याचे यापूर्वीचे अनुभव आहेत.

माजी महापौरांचा होणार सत्कार

पिंपरी– महापालिका स्थापनेपासून आजपर्यंत शहराचे प्रथम नागरिक हे महापौरपद भुषविणाऱ्या सर्व माजी महापौरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. बुधवारी (दि.26) दुपारी एक वाजता हा कार्यक्रम महापालिका मुख्यालयात होणार आहे, अशी माहिती महापौर राहूल जाधव यांनी दिली. माजी महापौरांच्या अनुभवाचा शहर विकासात हातभार लागावा, त्यांचे मार्गदर्शन लाभावे, याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत माजी महापौरांशी संवाद साधून, त्यांच्याकडून विविध सुचना व अपेक्षित बदलांविषयी चर्चा केली जाणार आहे. तसेच या सर्वांचा महापालिकेच्या वतीने पुस्तक भेट देऊन सत्कार केला जाणार आहे.

महापालिकेत वैद्यकीय कक्ष सुरु करण्याची मागणी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयात शेकडो कर्मचारी, अधिकारी काम करतात, तसेच विविध कारणांमुळे दिवसभरात शेकडो नागरिक मुख्यालयाला भेट देतात. मात्र, वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत कोणतीही वैद्यकीय मदत मिळत नसल्याने, मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरु करण्याची मागण व्विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पत्रकारांना वातानुकूलित शिवशाही बसमध्ये मोफत प्रवास

मुंबई: एसटी महामंडळामार्फत समाजातील विविध घटकांना प्रवास सवलत दिली जाते. या प्रवास सवलतींची व्याप्ती वाढविण्यासंदर्भात एसटी महामंडळाने सादर केलेल्या प्रस्तावास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यात पत्रकारांना वातानुकूलित शिवशाही बसमध्ये मोफत प्रवास सवलत योजना लागू करण्यात आली.

नाना काटे सोशल फाऊंडेशनच्या मूर्तीदान उपक्रमात १२ हजार ३०० मूर्तींचे संकलन

चौफेर न्यूज –  पवना नदी प्रदूषण टाळण्यासाठी नाना काटे सोशल फाउंडेशनच्या या वर्षीही पुढाकार घेण्यात आला. परिसरातील नागरिकांना मूर्ती व निर्माल्य विसर्जित न करता सर्व गणेश मूर्तीदान करण्याचे आव्हान नगरसेवक नाना काटे यांच्या वतीने करण्यात आले होते. मागील दोन वर्षापासून हा उपक्रम पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरातील महादेव मंदिर घाटावर राबविण्यात येत आहे. यात परिसरातील घरगुती व गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती नदीमध्ये विसर्जित न करता दान करण्याचे आवाहन नगरसेवक नाना काटे यांच्या वतीने करण्यात आले होते. या उपक्रमाला गणेशभक्तांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यात रहाटणी,.पिंपळे सौदागर व पिंपरी येथील घरगुती व सार्वजनिक असे एकूण १२ हजार ३०० मूर्ती दान करण्यात आल्या.

थकबाकीदारांना डिजिटल नोटीस

पुणे - थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी विद्युत अधिनियम मधील तरतुदीनुसार कायदेशीर लेखी नोटीस देणे बंधनकारक आहे. त्यानुसार थकबाकीदार वीजग्राहकांना व्हॉट्‌सॲप, एसएमएस, ई-मेलद्वारे नोटीस पाठविण्याचा आणि वीजपुरवठा खंडित करण्यास राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणला मान्यता दिली आहे.

ड्रोनने आता मालमत्तेचा नकाशा

देशात ड्रोन प्रणालीचा वापर करण्यासंदर्भात नवीन नियम डिसेंबरपासून लागू होत आहेत. अशा स्थितीत रिअल इस्टेट क्षेत्र देखील हे तंत्र वापरास तयार आहे. उद्योगजगतातील तज्ज्ञांच्या मते, मालमत्तेची थ्रीडी मॅपिंग ही मालमत्तेच्या व्यवहारात पारदर्शकतेला चालना देणारे ठरू शकते. नवीन तरतुदीनुसार ड्रोनचा व्यावसायिक वापर हा एक डिसेंबरपासून वैध ठरला जाणार आहे.