पिंपरी - पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्ये पार्किंग धोरण आणण्यात येत असून, त्यासाठी आता शहरातील गर्दीची चौदा ठिकाणे निवडण्यात आली आहेत. रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यांकडून शुल्क वसूल केले जाईल. महापालिकेच्या एप्रिलमधील सर्वसाधारण सभेत हे धोरण मांडण्यात येणार आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 10 April 2018
वीजेच्या लपंडावामुळे वाल्हेकरवाडीकर त्रस्त
चिंचवड – वाल्हेकरवाडीतील शेवंतीबन, चिंतामणी कॉलनी बी, स्वप्नाशिल्प, चिंचवडे फार्म या परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडीत होणे, कमी दाबामुळे घरातील उपकरणे जाळणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. तरी वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा. तसेच अंडरग्राऊंड केबल आणि धोकादायक डीपी बॉक्स त्वरीत बदलण्यात यावेत, अशी मागणी या परिसरातील महिलांनी केली आहे.
वाल्हेकरवाडीत रस्त्यावरच राडारोडा
पिंपरी – वाल्हेकरवाडी येथील रस्त्यावरच राडारोडा पडल्याने वाहन चालकांबरोबर पादचाऱ्यांनाही येथून कसरत करत जावे लागत आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हर्डीकर जिल्हाधिकारी तर राव मनपा आयुक्तपदी?
पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त असलेले श्रावण हर्डिकर यांची जिल्हाधिकारी तर सध्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांची पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे.
पिंपरी चिंचवडमधील पोलीस चौक्या हप्ते वसुलीचे केंद्र – खासदार श्रीरंग बारणे
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राजकीय वरदहस्तामुळेच खुलेआम अवैध धंदे सुरू आहेत. ज्या पोलीसांनी यावर वचक ठेवला पाहिजे तेच गुन्हेगारांचे पोशिंदे झालेत. शहरातील पोलीस चौक्या हप्ते वसूलीचे केंद्र बनल्या असल्याचा खळबळजनक आरोप मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकार परिषदेत केला.
शास्तीकराच्या विरोधात शिवसेना महामोर्चा काढणार..!
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांवर लावलेला शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेवर महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. तत्पूर्वी शहरात सर्वत्र नागरिकांच्या बैठका घेऊन जनजागृती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राहुल जाधव यांचा स्थायीचा राजीनामा मंजूर
पिंपरी चिंचवड महापालिकेतील स्थायी समिती सभापती पदावरुण राजीनामा नाट्य रंगले असताना समितीचे सदस्य राहुल जाधव यांचा राजीनामा हा महापौरांनी आज मंजूर केला.
तथापी, भोसरीतील नाराज गटाचे क्रीड़ा सभापती, शहर सुधारना सभापती यांनी मात्र आपले राजीनामे मागे घेतले. जाधव यांचा राजीनामा मंजूर झाल्याने भोसरीतील नाराज गटाला चांगलाच धक्का बसला आहे.
असुरक्षिततेचा “जोहार’
- पिंपरी-चिंचवड वर्तमान
मोगलाईच्या काळात मोगलांच्या अत्याचारापासून स्वत:ला वाचवण्यासाठी राजपूत स्त्रिया “जोहार’ करून स्वत:ला संपवायच्या. “पद्मावत’ चित्रपटामुळे या इतिहासाची उजळणी होत असतानाच पिंपरी-चिंचवडसह मुंबईत घडलेल्या घटनांमध्ये आपली अब्रु वाचवण्यासाठी तिघींनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. लागोपाठ घडलेल्या या तिन घटनांमुळे शिवछत्रपतींचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रातील महिला सुरक्षिततेचे अक्षरशः धिंदवडे निघाले आहेत. कुटुंबातही महिला सुरक्षित नाहीत. निरागस चिमुकलीपासून ते दोन-तिन पिढ्यांचे उन्हाळे-पावसाळे पाहणाऱ्या आजीबाई वासनेच्या बळी ठरत आहेत. घरी-दारी वसवसलेल्या नजरा, ढिसाळ सुरक्षा यंत्रणा, अत्याचारीत महिलांनाच कलंकीत ठरवण्याच्या वृत्तीमुळे असुरक्षिततेविरोधात “जोहार’ होवू लागलाय की काय, असा सवाल महिला वर्गातून उपस्थित होत आहे.
Subscribe to:
Posts (Atom)