पुणे । न्यायालयाच्या आदेशानसार शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या स्कूलबससेची फिटनेस तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. तरी देखील अनेक स्कू लबसचालकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. या पार्श्वभूमिवर आता शाळांनाच विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी येणार्या खासगी गाड्यांची संख्या, चालक यांची पूर्ण माहिती अपडेट करण्यास सांगण्यात आले आहे. याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने पोलीस, परिवहन आणि शालेय विभागाची संयुक्त बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 21 June 2018
हिंजवडी फ्लाय ओव्हर चौक
हिंजवडीकडे जाणाऱ्या चौकांमध्ये एसटीचा बस थांबा आहे, त्याचा फायदा घेऊन खाजगी बस, टॅक्सी आणि खाजगी गाड्याही थांबतात. वर्दळीच्या या रस्त्यावरील दोन लेन या गाड्या अडवतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. वाहतूक शाखेने याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी.
झोपडपट्यात बेकायदा नळ वारेमाप
महापालिका नगरसेवकांना आली पहिल्यांदाच जाग
पाणीपुरवठा अधिकार्यांनो कारवाई करा : स्थायी समितीचे आदेश
पाणीपुरवठा अधिकार्यांनो कारवाई करा : स्थायी समितीचे आदेश
पिंपरी-चिंचवड : शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळजोड आहेत. पत्राशेड, झोपडपट्यांमध्ये तर हे प्रमाण वारेमाप असून त्यावर जोरदार कारवाई करा, असा आदेश स्थायी समिती सदस्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांना दिला. तसेच ‘अभय’ योजनेअंतर्गत नळजोड अधिकृत करुन देण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या.
२६५ कोटी रुपयांच्या वर्गीकरणाचा प्रस्ताव
मलिदा लाटायचा प्रयत्न होत असल्याचा विरोधकांचा आरोप
पिंपरी-चिंचवड-पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१८-१९ या वर्षीच्या अंदाजपत्रकाला महासभेची मंजुरी मिळून अद्याप ८० दिवसही उलटले नाहीत. तोपर्यंतच यातून वर्गीकरणाच्या गळतीला सुरूवात करण्यात आली आहे. तब्बल २६५ कोटी रुपयांच्या वर्गीकरणाचे प्रस्ताव आयत्यावेळी महासभेत दाखल करण्यात आले आहेत.
धोकादायक जाळ्या काढा; पर्यावरणप्रेमींची मागणी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने दरवर्षी शहराच्या विविध भागांमध्ये तसेच मुख्य रस्ते, शहरातील अंतर्गत भागातील रस्त्यांवर वृक्षारोपण केले जाते. वृक्षांच्या सुरक्षिततेसाठी लोखंडी पिंजरेही लावले जातात. मात्र, एकदा पिंजरे लावले की त्यानंतर त्या वृक्षांकडे लक्ष दिले जात नाही. कालांतराने लावलेली झाडे जस-जशी मोठी होतात. तस-तशी लोखंडी पिंजऱ्याच्या जाळ्या झाडांच्या खोडात रुतलेल्या असतात. त्या जाळ्या झाडांच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहेत. तरी त्या काढण्यात याव्यात अशी पर्यावरण प्रेमींची मागणी आहे. (अरुण गायकवाड - सकाळ छायाचित्रसेवा)
लोखंडी जाळ्यात अडकलेली झाडे मुक्ततेसाठी निविदेच्या प्रतिक्षेत
जुनी सांगवी - जुनी सांगवी परिसर व प्रभागातील पर्यावरण संतुलन राखण्यासाठी विविध उपक्रमांतर्गत गेली तीन चार वर्षापासुन रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेली झाडे आता मोठी झाली असुन गेली कित्येक दिवसांपासुन झाडे लहान असताना लावलेल्या लोखंडी जाळ्यात अडकली आहेत.
मोबाईल टॉवर्सकडे साडे सोळा कोटींची थकबाकी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील विविध विभागीय कार्यालयांच्या हद्दीत एकूण 593 मोबाईल टॉवर्स आहे. गेली दोन वर्षांपासून या टॉवर्सकडून थकबाकी येणे बाकी असून, ही रक्कम 16 कोटी 63 लाख एवढी आहे. महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या वतीने ही कर आकारणी सुरु करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांकडून आयुक्तांच्या आदेशाला कोलदांडा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कारभार सध्या कायद्यानुसार नसून, प्रथा परंपरेनुसार सुरु असल्याचे दिसत आहे. महापालिकेच्या बीआरटीएस विभागातील कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे यांची अन्य विभागात बदली होऊनही, त्यांनी ही बदली रद्द करण्याची किमया दाखविली. त्यामुळे या परपरांना आणखी बळ मिळाले आहे. दस्तुरखुद्द आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रथा-परंपरेचे पालन केल्याचे यावरुन दिसून आले आहे.
रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे पुस्तकांचे वाटप
चिंचवड :- रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे पिंपरी-चिंचवड शहरातील विविध शाळांना क्रांतीकारकांची माहिती असलेली, विज्ञानाची माहिती असलेल्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना तब्बल दोन हजार पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले आहे.
महापालिकेने केले पुरनियंत्रण रेषा कायद्याचे उल्लंघन?
पिंपरीतील संजयनगर झोपडपट्टी शेजारील नदी पात्रात होतेय मैलाशुध्दीकरण केंद्र
रिपब्लिकन युवा मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकार्यांकडे तक्रार
रिपब्लिकन युवा मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकार्यांकडे तक्रार
पिंपरी-चिंचवड : पिंपरीतील संजयनगर झोपडपट्टी शेजारील पवना नदीच्या पात्रात महापालिकेच्या ड्रेनेज विभागाकडून मैलाशुध्दीकरण प्रकल्पाचे बांधकाम सुरु आहे. याविषयी महापालिकेच्या अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांनी जिल्हाधिका-याकडून कोणतीही परवानगी न घेता मैलाशुध्दीकरण प्रकल्पाचे बांधकाम करीत पुरनियंत्रण रेषेचे उल्लंघन करुन पर्यावरणाची हानी केली आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी, ठेकेदारांवर कारवाई करुन मैलाशुध्दीकरणाचे बांधकाम थांबवावे, अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.
जीएसटीबाबत अनभिज्ञता
पिंपरी - सभासदांकडून देखभाल खर्चापोटी दर महिना साडेसात हजार रुपये किंवा वार्षिक उलाढाल २० लाखांच्या पुढे असलेल्या सोसायट्यांना वस्तू आणि सेवाकर भरणे अनिवार्य आहे. मात्र, शहरातील सोसायट्यांनी जीएसटीची नोंदणीच केली नसल्याने त्या याबाबत अनभिज्ञ आहेत, तर सोसायट्या नफा कमविणाऱ्या संस्था नसल्याने त्यांना जीएसटीतून वगळण्याची मागणी पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाने केली आहे.
म्हाडाच्या घरांसाठी 38 हजार अर्ज
एकूण 3 हजार 139 घरे; तीस जून रोजी लॉटरी
पुणे - म्हाडाकडून विक्रीसाठी काढण्यात आलेल्या घरांसाठी अर्जांचा पाऊस पडला आहे. 3 हजार 139 घरांसाठी तब्बल 38 हजार अर्ज म्हणजे एका घरासाठी सरासरी 13 जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. येत्या तीस जून रोजी घरांसाठीची लॉटरी काढण्यात येणार आहे.
पुणे - म्हाडाकडून विक्रीसाठी काढण्यात आलेल्या घरांसाठी अर्जांचा पाऊस पडला आहे. 3 हजार 139 घरांसाठी तब्बल 38 हजार अर्ज म्हणजे एका घरासाठी सरासरी 13 जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. येत्या तीस जून रोजी घरांसाठीची लॉटरी काढण्यात येणार आहे.
इसिएतर्फे पिंपरी-चिंचवड शहरात ई कचरा संकलन
मोशी परिसरात राबविला उपक्रम
पिंपरी : एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशनतर्फे पिंपरी-चिंचवड शहरात ई कचरा संकलन उपक्रम सुरू आहे. प्रत्येक रविवारी नागरिकांच्या सहमतीने त्यांच्या परिसरात इ कचरा संकलन केले जात आहे. नुकताच असा प्रयत्न मोशी, वाकड आणि पिंपळे सौदागर परिसरात यशस्वीपणे पार पडला. नागरिकांनी आपल्या घरातील अथवा कार्यालयातील ई कचरा इसिएच्या स्वाधीन केला, असे इसिएचे संचालक विकास पाटील यांनी सांगितले.
भाजपने केला सभा तहकूब करण्याचा ‘लाजीरवाणा’ विक्रम
पिंपरी-चिंचवड-पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने सर्वसाधारण सभा तहकूब करण्याचा ‘लाजीरवाणा’ विक्रम केला आहे. सव्वा वर्षात तब्बल 20 वेळा महासभा तहकूब केली आहे. मे महिन्याची सभा तहकूब करण्याची तर ‘हॅटट्रीक’च केली आहे. यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका केली. सत्ताधा-यांच्या अशा बेजबाबदार वर्तणुकीमुळे शहराच्या विकासाला खीळ बसत असल्याचाही आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित गव्हाणे यांनी केला.
मलिदा दुसरे खातील, खापर तुमच्यावर फुटेल - योगेश बहल
पिंपरी - ‘‘महापौर साहेब, तुम्हाला बदलण्याबाबत आम्हाला वृत्तपत्रांमधून वाचायला मिळाले. पण आम्हाला तुम्ही हवे आहात. त्यामुळे वर्गीकरणाचे विषय सर्वसाधारण सभेत थेट दाखल करून घेऊ नका. कारण मलिदा दुसरे खातील आणि खापर तुमच्यावर फुटेल,’’ असा खोचक सल्ला राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश बहल यांनी महापौर नितीन काळजे यांना दिला.
…अन् विलास लांडेंनी मौन सोडले
पिंपरी – संतांची भूमी तसेच उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या भोसरी परिसराला गुन्हेगारीने ग्रासले आहे. भयमुक्त भोसरीची घोषणा देऊन सत्तेत आलेली मंडळीच गुंडांचे पाठीराखे झाले आहेत. सध्या संपूर्ण भोसरी परिसरातील रहिवासी दहशतीत असून कुठे गेलेत अच्छे दिन असा सवाल करत माजी आमदार विलास लांडे यांनी अखेर भोसरीतील गुन्हेगारीवर मौन सोडले आहे.
नव्या शैक्षणिक वर्षात पहिलीच समिती स्थापन
इसिएतर्फे पर्यावरण साहित्याचे वाटप
पिंपरी : 2004पासून पर्यावरण संवर्धन समितीतर्फे आजपर्यंत पिंपरी-चिंचवड शहरात 376 शाळांमध्ये विद्यार्थी पर्यावरण समिती स्थापन केली आहे.
या प्रत्येक समितीला पर्यावरण साहित्य इसिएतर्फे मोफत वाटप करण्यात आले आहे. प्रत्येक समितीला नोंद वह्या, बिल्ले, टोप्या, अभ्यास पुस्तिका, पर्यावरण कार्टून फिल्म सीडी, 10 इंची कुंड्या, ओळख पत्र आदी साहित्य देण्यात आले. वाटप केलेल्या साहित्याचा योग्य वापर केला जातोय की नाही याकडे लक्ष दिले जाते. यंदाच्या शैक्षणिक वर्ष 2018-19 मधील पहिली विद्यार्थी पर्यावरण समिती जिल्हा परिषद शाळा सांगवडे येथे स्थापन केली. ह्या शाळेत 113 नव्याने पर्यावरणा दूत निर्माण केले. आजपर्यंत इसिएच्या अविरत प्रयत्नातून पिंपरी-चिंचवड शहरात 12000 च्या पेक्षा जास्त पर्यावरण दूत तयार केले आहेत.
या प्रत्येक समितीला पर्यावरण साहित्य इसिएतर्फे मोफत वाटप करण्यात आले आहे. प्रत्येक समितीला नोंद वह्या, बिल्ले, टोप्या, अभ्यास पुस्तिका, पर्यावरण कार्टून फिल्म सीडी, 10 इंची कुंड्या, ओळख पत्र आदी साहित्य देण्यात आले. वाटप केलेल्या साहित्याचा योग्य वापर केला जातोय की नाही याकडे लक्ष दिले जाते. यंदाच्या शैक्षणिक वर्ष 2018-19 मधील पहिली विद्यार्थी पर्यावरण समिती जिल्हा परिषद शाळा सांगवडे येथे स्थापन केली. ह्या शाळेत 113 नव्याने पर्यावरणा दूत निर्माण केले. आजपर्यंत इसिएच्या अविरत प्रयत्नातून पिंपरी-चिंचवड शहरात 12000 च्या पेक्षा जास्त पर्यावरण दूत तयार केले आहेत.
पिंपळे गुरवमध्ये ‘तेजस्विनी’ बस सेवा सुरु करावी
नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची मागणी
सांगवी : पिंपळे सौदागरमध्ये महिलांसाठी असलेली तेजस्विनी बस सेवा सुरु करावी अशी मागणी नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे वाहतुक व्यवस्थापकांकडे लेखीनिवेदनांद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपळे सौदागरचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्यात आला आहे. 70 टक्के लोकसंख्या ही आयटी क्षेत्रातील नोकरदार वर्ग असून त्यामध्ये महिला वर्गाचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. महिलांच्या सुरक्षितेतेचा प्राधान्य देत जागतिक महिलादिनानिमित्त पुणे सल्लागर परिवहन महामंडळामार्फत फक्त महिलांसाठी तेजस्विनी ही बससेवा सुरु करण्यात यावी.
नगरसेविका शिलवंत “अहल्यारत्न’ने सन्मानित
पिंपरी – अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर जन्मोत्सव सोहळा समिती पुणे यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा अहल्यारत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
Subscribe to:
Posts (Atom)