Wednesday, 12 March 2014

आयुक्तांचा प्रभाग पाहणी दौरा विश्रांतीनंतर पुन्हा सुरु

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी सुरु केलेला प्रभाग पाहणी दौरा दीर्घ विश्रांतीनंतर आजपासून पुन्हा सुरु करण्यात आला. त्यांनी 'अ' प्रभागाची आज पाहणी केली. त्यात त्यांनी शहरातील वैशिष्ट्यात भर घालणा-या भक्ती-शक्ती शिल्प समूहाच्या लगतच्या परिसरातील फुटपाथ दुरुस्ती व सुशोभिकरण करण्याबरोबरच वाहतुकनगरी व इतर परिसरातील स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याच्या सूचना केल्या.

यशवंतराव चव्हाण यांचे प्राधिकरणात स्मारक

पिंपरी -&nbsp प्राधिकरणातील यशवंतराव चव्हाण स्मारक समितीतर्फे निगडी-प्राधिकरण, पेठ क्रमांक 27 अ येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक साकारणार आहे.

देहूरोड-सातारा ६ पदरी रस्त्याचे काम रखडणार

मुंबई ते बेंगळुरू हायवेवरील देहूरोड ते सातारा महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण होण्याची मुदत संपत असताना आणखीन अडीच वर्ष हे काम पूर्ण होणार नसल्याचे समोर आले आहे. आणखी काही वर्षे वाहनचालकांना अपघात, वाहतूक कोंडी यांचा सामना करावा लागणार आहे.

NCP helping Laxman Jagtap by trying to field weak candidate

Yogesh Behl, president of NCP PimpriChinchwad unit, said he wanted to contest since Jagtap had opted out. (Express archive). After sitting MLA Laxman Jagtap refused to contest as alliance candidate from Maval Lok Sabha constituency, the NCP is ...

भामा, आंद्रातील पाण्यासाठी रक्षण प्रस्तावास मान्यता

पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविण्यासाठी अतिरिक्त पाण्याची सोय व्हावी, यासाठी महापालिकेच्या वतीने खेड तालुक्यातील भामा-आसखेड धरणातून 60.79 दलघमी तर आंद्रा धरणातून 36.87 दलघमी पाणी शहरात आणण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाने घरगुती वापराच्या पाण्यासाठी पिंपरी महापालिकेच्या वाढीव पाणी आरक्षण प्रस्तावास मान्यता दिली असून 134 कोटी रुपये शासन तिजोरीत जमा करण्यास बजाविले आहे.

'आप'चे भापकर यांनी साधला कामगारांशी संवाद

आम आदमी पक्षाचे मावळ लोकसभा मतदार संघातील उमेदवार मारुती भापकर यांनी आज (मंगळवारी) कामगारांशी संवाद साधला.
टाटा मोटर्स कंपनीच्या चिंचवड येथील प्रवेशव्दारासमोर भापकर यांनी कामगारांची भेट घेतली. परिचय पत्रकाचे वाटप करीत त्यांच्याशी संवाद साधला. कामगारांनीही त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

अजित पवारांचा ‘समजूतदौरा’ रद्द

पिंपरी : मावळमध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांनी बंडखोरीचे रणशिंग फुंकल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आजच्या पिंपरीतील थेरगाव येथे होणार्‍या बैठकीकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. मात्र, जुन्नर तालुक्यातील गारपीटग्रस्त भागाच्या दौर्‍यानिमित्ताने पवार यांची ही बैठक रद्द झाली. मात्र, यामुळे जगताप यांच्या उमेदवारीचे वातावरण तापवित ठेवण्याची ही खेळी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांतही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

पिंपरी : लोकसभा निवडणुकीची सर्वत्र धामधूम सुरू असताना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनीही कंबर कसली 
आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बैठकांवर बैठका सुरू असून रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. 

खासदार बाबर यांचा शिवसेनेला "जय महाराष्ट्र'

पिंपरी - सध्याची शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची नसून, केवळ धनदांडग्यांची व पैसेवाल्यांची आहे.

शिरूरची लढत होणार तिरंगी

पिंपरी- नरेंद्र मोदींची लाट आणि स्थानिक उमेदवार नसणे, यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघात सोपी झालेली शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांची वाट मनसेच्या उमेदवारीमुळे आता बिकट झाली आहे.

पेट्रोल पंपांवर ना हवा ना पाणी

पुणे - पेट्रोल पंपांवर मोफत हवा, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रथमोपचाराची सुविधा व स्वच्छतागृह असणे बंधनकारक आहे.