दरमहा 25 हजारांचे मानधन देण्याची मागणी
खासदार, आमदारांपाठोपाठ पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांमध्येही मानधनवाढीच्या मागणीचे लोण पसरले आहे. महागाईची धग नगरसेवकांनाही बसत असल्याचे कारण पुढे करीत महापौर मोहिनी लांडे यांनी नगरसेवकांच्या मानधनात तिप्पट वाढीची मागणी केली आहे.