पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुढाकार घेतला असला, तरी या जुन्या दुखण्यासाठी शासकीय यंत्रणांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचा मतप्रवाह हिंजवडी वर्तुळात तयार झाला आहे. त्यामुळे वाकड ते मेगा पोलिस या मुख्य रस्त्यावरील ताण कमी करण्यासाठी "म्हाळुंगे-माण-हिंजवडी' (टप्पा एक व तीन) हा रस्ता प्राधान्याने विकसित करावा, असा सूर उमटत आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 14 September 2017
अल्प उत्पन्न गटासाठी १००० घरे
पिंपरी - मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या ठिकाणी काम सुरू करण्यास आणि इंद्रायणीनगरमध्ये (भोसरी) आर्थिक दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी एक हजार घरे बांधण्यासाठी आराखडा करण्यास पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत बुधवारी तत्त्वतः मान्यता देण्यात आली.
Bhosari MIDC road poses accident risks
The stretch near Color Bond in S Block under the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) limits has been in a terrible condition, dotted with potholes and bumps, causing both tremendous inconvenience and risk. Citizens claim that despite several ...
10K students to be displaced as 22 pvt schools face closure
Despite warnings from the Zilla Parishad, Pune Municipal Corporation (PMC) and Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC), which declared a list of 67 private schools that were derecognised in June this year, there are still 22 institutes that are ...
पिंपरी शहरातील २३४ शाळांत होणार फुटबॉलचे वाटप - विजय संतान
राज्य सरकारच्या 'महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन' या उपक्रमांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील २३४ शाळांसह पुणे शहर आणि जिल्ह्यातील एकूण १६८९ शाळांमध्ये ३४७८ फुटबॉलचे वाटप करणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी ...
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका वर्धापनदिनी जपणार सामाजिक भान
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ३५व्या वर्धापनदिनी सामाजिक भान जपावे, मनोरंजनासह गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्या, रक्तदान शिबिर उपक्रम राबवा, अशा सूचना करण्यात आल्या.
महापौर नितीन काळजे जाणार स्पेन दौ-यावर
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे स्पेन दौ-यावर जाणार आहेत. तर, महिला व बालकल्याण समितीचे पदाधिकारी केरळ दौ-यावर जाणार आहे. या दोन्ही प्रस्तावांना स्थायी समितीने आज (बुधवारी) मंजुरी दिली.
स्थायी समिती सदस्यांनी महापालिका प्रशासनावर ओढले ताशेरे
कचरा, साफसफाईच्या कामांसाठी स्थायी समितीची मुदतवाढ
महापालिकेच्या सहा प्रभागाअंतर्गंत कचरा संकलन, साफसफाईच्या कामांसाठी बीव्हीजी कंपनीसह आणखी काही ठेकेदारांना स्थायी समितीने मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, निविदा प्रक्रिया रखडल्याने मुदतवाढ द्यावी लागते, म्हणून स्थायी समिती सदस्यांनी महापालिका अधिका-यांवर ताशेरे ओढले आहेत.
लाल-पिवळ्या बस होणार आता निळ्या
पुणे - "पीएमपी'च्या बस म्हणजे लाल-पिवळा रंग, असे गेल्या 69 वर्षांपासून दृढ झालेले समीकरण बदलणार असून, यापुढे सर्व बस निळ्या रंगात पाहायला मिळणार आहेत. प्रवाशांच्या आग्रहास्तव बसचा रंग बदलण्याचा निर्णय पीएमपी प्रशानसाने घेतला आहे.
जमिनीच्या वाटपाची प्रक्रिया होणार सुलभ
कौटुंबिक मालकीच्या जमिनीची कुटुंबातील सदस्यांमध्ये वाटणी न झालेली लाखो कुटुंबे असून, त्यांना दिलासा देणारा निर्णय विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी घेतला आहे. आता या जमिनींची वाटणी करून सातबारावर वारसदारांची नावे नोंदविण्याबाबतच्या आदेशाची प्रक्रिया तहसीलदारांकडून केली जाणार आहे. जमिनीच्या वारसदारांनी एकत्र येऊन वाटणीसाठी सहमती असल्याचा एक अर्ज केला, तरी पिढ्यानपिढ्या रखडलेल्या कौटुंबिक मालकीच्या जमिनींचे विभाजन तहसीलदारांमार्फत होऊ शकणार आहे.
झीरो पेन्डन्सीमुळे 288 मेट्रिक टन रद्दी!
पुणे - नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये होणाऱ्या दफ्तरदिरंगाईमुळे हेलपाटे मारावे लागत होते. त्यासाठी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये "शून्य प्रलंबिता व निर्गमीकरण'(झीरो पेंडन्सी अँड डिस्पोजल) उपक्रम 1 जूनपासून राबविण्यात आला. या पाच जिल्ह्यांतील 217 कार्यालयांमधून 44 लाख 26 हजार अनावश्यक कालबाह्य अभिलेख नष्ट करण्यात आले. तसेच सुमारे 288 मेट्रिक टन रद्दी निघाल्यामुळे सर्व कार्यालये स्वच्छ झाली आहेत, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हवाई मालवाहतूक करणे झाले सोपे
पुणे - लोहगाव विमानतळावर उभारलेल्या हवाई मालवाहतूक केंद्राचे बुधवारी सीमा शुल्क विभागाचे मुख्य आयुक्त ए. के. पांडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. हे केंद्र सुरू झाल्यामुळे पुण्यातून मध्यपूर्व देशात शेतीमाल, तर युरोप देशात यंत्रसामग्रीची निर्यात करणे सोयीचे होणार आहे.
“जीएसटी’मुळे उत्पादन प्रक्रिया सुलभ – अनंत पद्मनाभन
चौफेर न्यूज – देशात नव्याने लागू केलेल्या वस्तु आणि सेवा करामुळे (जीएसटी) कंपनीची उत्पादन प्रक्रिया सुलभ झाली आहे. तसेच, उत्पादन खर्चही नियंत्रणात आला आहे. परिणामी, उत्पादनाच्या किंमती कमी झाल्या आहेत, असे मत अल्फा लावल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अनंत पद्मनाभन यांनी व्यक्त केले.
राजकीय दबावाखाली डॉक्टरांचा बळी
पिंपरी - खासगी रुग्णालयात तज्ज्ञांना दरमहा दीड लाख, तर वायसीएममध्ये अवघे 60 हजार रुपये वेतन मिळते. अनेकदा राजकीय व्यक्ती आणि वरिष्ठांकडून कामात हस्तक्षेप केला जातो. वारंवार दबाव आणला जातो. टर्मिनेट करण्याची धमकी दिली जाते. अपमानास्पद वागणूक मिळते. याचा डॉक्टरांना मानसिक त्रास होत असून, रुजू झाल्यानंतर अनेकांनी काही महिन्यांतच वायसीएमला "रामराम' ठोकला आहे.
चेंबर साफ करताना कर्मचाऱ्याचा मृत्यू
पिंपरी – सांगवी-किवळे रस्त्यावरील पतंजली मेगा स्टोअर्ससमोरील चेंबर साफ करताना मिथेन गॅसच्या दुर्गंधीमुळे श्वास गुदमरुन बुधवारी (दि. 13) सकाळी अकराच्या सुमारास महापालिकेच्या कंत्राटी साफसफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. मात्र, या घटनेची चौकशी करण्यासाठी आयुक्तांनी तत्काळ दोन सदस्यीय समिती नियुक्ती केली,
सप्टेंबरअखेर आर्युविज्ञान परिषदेकडून वायसीएम रुग्णालयाची तपासणी
चौफेर न्यूज – पिंपरी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) वैद्यकीय महाविद्यालय सुरु होण्यास गती प्राप्त झाली आहे. याबाबत केंद्र शासनाच्या भारतीय आर्युविज्ञान परिषदेकडे प्रस्ताव सादर केला असून, सप्टेंबरअखेर तपासणी पथक वायसीएम रुग्णालयाची पाहणी करणार आहे. याकरिता वैद्यकीय विभागाने तपासणी पुर्व तयारी सुरु करुन महाविद्यालयाची 53 पदे तातडीने भरली जाणार आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)