Saturday, 19 August 2017

बीआरटी मार्गाचे काम सप्टेंबरअखेर पूर्ण करा! आयुक्तांचे आदेश

पिंपरी पालिकेच्या नियोजनानुसार शहरात चार ठिकाणी बीआरटी मार्ग आहेत. त्यापैकी सांगवी ते किवळे आणि नाशिक फाटा ते वाकड हे दोन मार्ग सुरू झालेले आहेत. मुंबई-पुणे महामार्गावरील १२ किलोमीटर अंतराचा महत्त्वाचा निगडी ते दापोडी हा ...

Helmetless scooterist dies after hitting flyover parapet in Nigdi

Pune: A 39-year-old owner of a mess, Shankar Zende, was killed after his scooter brushed against the parapet of a flyover in Nigdi in the early hours of Friday. He was not wearing a helmet and died due to multiple head injuries, the assistant inspector ...

After positive response from residents PMRDA to go ahead with Mahalunge township first

Check on reckless driving by PMPML bus drivers: Fresh recruits to clear ITDR driving test

[Video] वाहनचोरी आणि घरफोडीतील सराईत गुन्हेगारांकडून 17 लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी तसेच पुणे ग्रामीणच्या हद्दीत घरफोड्या आणि वाहनचो-या करणा-या सराईत गुन्हेगाराला पिंपरी पोलिसांनी अटक केली. या सराईत गुन्हेगाराकडून 412 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 400 ग्रॅम चांदीचे दागिने, 4 लॅपटॉप, 2 कॅमेरे, मोत्याच्या व खड्याच्या माळा असा एकूण 13 लाख 91 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर अल्पवयीन वाहन चोराला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 3 लाख 80 रुपये किमतीच्या 12 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

[Video] यंदाचा गणेशोत्सव डॉल्बी मुक्त करा-रश्मि शुक्ला


ध्वनिप्रदूषण तक्रार करण्यासाठी क्रमांक

गणेशोत्सवाच्या काळात ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारी करण्यासाठी फोन आणि ई-मेलसह व्हॉट्सअॅपचीही सुविधा पोलिसांनी उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांनी या सेवेचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे मेट्रो प्रकल्पाचे ‘सोशल अॅसेसमेंट’

‘सीएमआरएसडी’ करणार अभ्यास

मेट्रो प्रकल्पामुळे नेमक्या बाधित होणाऱ्या मिळकतींची संख्या, त्याचा संबंधित कुटुंब किंवा संस्थेवर होणारा परिणाम, बाधित मिळकतींच्या पुनर्वसनाची प्रक्रिया किंवा त्यांच्यासाठी निश्चित केली जाणारी नुकसान भरपाई, अशा पुणे मेट्रोच्या विविध सामाजिक परिणामांचा अभ्यास नवी दिल्लीतील ‘सेंटर फॉर मार्केट रिसर्च अँड सोशल डेव्हलपमेंट’ (सीएमआरएसडी) यांच्यातर्फे केला जाणार आहे.

“अल्फा लावल’च्या कंत्राटी कामगारांचा प्रश्‍न जटील

कामगार संघटनेकडून दिशाभूल : कंपनी व्यवस्थापनाचा दावा
पिंपरी – अल्फा लावल कंपनीतील कंत्राटी कामगारांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन देऊनही कंपनीने ते पाळले नसल्याचा राष्ट्रीय श्रमिक आघाडीने केलेला आरोप खोटा व पूर्णतः दिशाभूल करणारा आहे. कंपनीतील कंत्राटी कामगारांसंबंधीचा वाद सध्या न्यायप्रविष्ट असल्याने, त्याबाबत आश्वासन देण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही, त्यामुळे कंपनीने असे कोणतेही आश्वासन दिलेले नाही, असे अल्फा लावल व्यवस्थापनाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. त्यामुळे कामगारांमध्ये संभ्रमावस्था असून हा प्रश्‍न जटील होत चालला आहे.

हिंजवडी-माण एसी बससाठी नऊ टप्प्यांत आकारणी

पुणे, दि. 18 – हिंजवडी परिसरातून विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यांच्या वातानुकुलीत सेवा दिल्यास प्रवाशी पीएमपीचा वापर करतील. यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने 15 जून 2017 पासून पुणे विमानतळ ते हिंजवडी माण फेज 3 ही वातानुकुलीत बससेवा सुरू केली. त्यासाठी पुणे विमानतळ ते सिमला ऑफीस या अंतरासाठी प्रवाशाला 120 रुपये तर पुणे विमानतळ ते हिंजवडी माण फेज 3 या अंतरासाठी प्रवाशाला 180 रूपये तिकिट आकारण्यात येत आहे. मात्र, हा दर अधिक असून तो टप्प्या-टप्प्यात घ्यावा, सलग घेऊन नये अशी मागणी प्रवाशांनी पीएमपी प्रशासनाकडे केली. त्यानुसार पीएमपी प्रशासनाने नऊ टप्प्यात हे दर आकारले आहेत.