Monday, 9 June 2014

Residents of PCMC on hunger strike

Pune: Residents of Spine road in Triveninagar, Talawade, are on a hunger strike demanding rehabilitation before their houses are demolished for the purpose of road widening. The PCMC has decided to widen a road to 65m to facilitate smooth flow of traffic.

Pimpri Chinchwad Municipal Corporation set to frame own green policy

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) plans to strengthen its environment department and frame an environment-friendly policy to make the city pollution free.

Expo useful for students: PCMC chief

PIMPRI: Pimpri Chinchwad Municipal Commissioner Rajiv Jadhav on Saturday said that the Sakal Vidya Education Expo is extremely useful for students as they get information about various career options.

डॉ. परदेशी यांचा बंद पाडलेला उपक्रम पुन्हा सुरू

आरोग्य अधिकारी ढेरे ठरले आठवड्याचे मानकरी
महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेत दोन हजार भुखंड स्वच्छ करण्यासाठी चांगले प्रयत्न करणारे आरोग्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांचा आठवड्याचे मानकरी म्हणून आज (शनिवारी) आयुक्तांनी सन्मान केला. दोन महिने बंद असलेला उपक्रम आयुक्तांनी पुन्हा सुरू केल्याने त्याच्या धरसोड वृत्तीची महापालिका वर्तुळात चर्चा आहे.

पर्यावरण धोरण तयार करणार - आयुक्त

पिंपरी चिंचवड शहर हे प्रदुषणमुक्त व पर्यावरणपुरक करण्यासाठी महानगरपालिका पर्यावरण धोरण तयार करणार असून पर्यावरण विभाग अधिक सक्षम करणार असल्याचे आयुक्त राजीव जाधव यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

नव्या गावांच्या समावेशावरून पिंपरीत ‘राजकारण’

पिंपरी पालिकेच्या हद्दीलगतची २० गावे समाविष्ट करण्याच्या प्रस्तावावरून ‘राजकारण’ सुरू झाल्याने तो विषय ‘अधांतरी’च राहिला आहे. सोमवारी महापालिका सभेत ताे प्रस्ताव चर्चेसाठी आणला जाणार आहे.

Pre-paid cards to rescue bus passengers from ‘circus’

Commuters trying not to lose their cool and their balance while fishing in their wallets for “exact change” in crowded city buses or ending up arguing with the conductor have relief coming their way. Pre-paid smart cards will render squabbles with reluctant conductors— during the “circus” to get tickets as one passenger put it— unnecessary.

"Pune, Pimpri-Chinchwad to face water scarcity in the coming years"

Pune: Well-known water conservation expert Rajendra Mahulkar has predicted that Pune and Pimpri-Chinchwad are likely to face water scarcity in the future.

पवना नदीचे ओटी भरून पूजन

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ त्र्यंबकेश्वर दिंडोरी प्रणित आकुर्डी शाखेच्यावतीने आज (रविवारी) पवना नदीच्या पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने नदी प्रदूषणात वाढ होत आहे. प्रदूषण्‍ा रोखण्यासाठी पवना नदीपात्रात निर्माल्य टाकण्यात येउ नये, यासाठी हा उपक्रम घेण्यात आला.

सोनसाखळी हिसकावण्याच्या तीन घटना

सव्वा लाखाचा ऐवज लांबविला
सोनसाखळी चोरीचे सत्र सध्या शहरात सुरूच असून, गेल्या दोन दिवसांत तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये सुमारे आठ तोळे सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेले आहेत. चिंचवड येथे दोन तर सांगवी परिसरात एक हे गुन्हे घडले आहेत. सोनसाखळी चोरीच्या विविध तीन घटनांमध्ये एकूण एक लाख 37 हजार पाचशे रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

शहरात पोलीस निरिक्षकांच्या अंतर्गत बदल्या

शहरात पोलीस निरिक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक पी.एन सुपेकर यांची चिंचवड येथे तर चिंचवडचे पोलीस निरिक्षक एस.एस कवडे यांची निगडी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

संग्रामनगर रहिवाश्यांच्या पुनर्वसनाची मागणी

महापालिकेने स्पाईन रस्ता बाधीत संग्रामनगर झोपडपट्टीवर कारवाई करून येथील रहिवाश्यांना बेघर केले. त्यांचे पुनर्वसन करून त्यांना घर मिळवून द्यावे, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाने केली आहे.

शहरात प्रथमच 'निला घोडा अ ग्रेट आर्ट' ऐतिहासिक महोत्सव

पिंपरी -चिंचवडमध्ये प्रथमच वृत्तपत्र लेखक असोसिएशन, शब्द साहित्य मंडळ, निल इव्हेंटस अ‍ॅण्ड बँक्वेटससह इतर संलग्न संस्थांच्यावतीने 'निला घोडा अ ग्रेट आर्ट फेस्टिव्हल' या ऐतिहासिक महोत्सवाचे आयोजन 15 ऑगस्ट दरम्यान करण्यात येत आहे, अशी माहिती फेस्टिवलचे संयोजक संजय सिंगलवार यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली.

थेरगावमधील 'ते' बालग्राम विनापरवाना

थेरगावमधील संघर्ष बालग्राम अनाथ आश्रमातील तेरा वर्षीय मुलीवर संस्था चालकाने लैगिक अत्याचार केल्याचा गुरूवारी (दि.5) उघडकीस आला होता. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संस्थाचालकाला न्यायालयाने बारा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संघर्ष बालग्राम हे विनापरवाना असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या बालग्रामची धर्मदाय आयुक्तांकडे नोंद आहे. परंतू जिल्हा महिला बालविकास आयुक्तालय मुंबईची परवानगी नसल्याने हे बालग्राम विनापरवाना असल्याचे पोलीस निरिक्षक ए.टी वाघमळे यांनी सांगितले.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या याद्यांमध्ये मोठा गोंधळ उमेदवार शरद पाटील यांची तक्रार

सध्या असलेल्या याद्यांमध्ये एक लाखांहून अधिक नावे दुबार आहेत. अनेकांच्या पत्त्यांमध्येही घोळ आहेत. यापूर्वी सुटीच्या दिवशी मतदान ठेवण्यात येत होते. मात्र, यंदा शुक्रवारी म्हणजेच कामाच्या दिवशी मतदान ठेवण्यात आले आहे.