Tuesday, 21 August 2018

PCMC approves hawker policy

A hawker management policy and software have been approved b ..

बिजलीनगर येथील अंडरपासच्या कामाला सुरुवात

चौफेर न्यूज – प्रभाग १७ मधील बिजलीनगर येथील अंडरपासच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या वर्षभराच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याची माहिती नगरसेवक नामदेव ढाके यांनी दिली.

कूपनलिकेत रसायनयुक्त पाणी

पिंपरी - चिखली-मोशीदरम्यानचा इंद्रायणी नदी परिसर... अनेक भंगाराची गोदामे... रात्री दहानंतरची वेळ... काही भागांत छोट्या रस्त्यांवरून टॅंकर नदी पात्राकडे जातात... भंगार गोदामाचे भले मोठे लोखंडी गेट उघडले जाते... टॅंकर आत आल्यानंतर गेट बंद केले जाते... टॅंकरचा पाइप कूपनलिकेच्या खड्ड्यात सोडला जातो... कॉक सुरू करून टॅंकरमधील द्रवपदार्थ कूपनलिकेत सोडले जाते... ते असते रसायनयुक्त पाणी... घातक... अतिघातक... त्यामुळे आमच्या सोसायट्यांमधील बोअरवेलचे पाणीही प्रदूषित होत आहे... त्यावर तेलकट तवंग असतो... भूगर्भातील पाणीच अशा पद्धतीने प्रदूषित केले जात आहे... ही वस्तुस्थिती परिसरातील रहिवाशांनी ‘सकाळ’शी बोलताना मांडली.

Pune: Much-delayed Nigdi-Dapodi BRTS likely to start soon

Residents of Pimpri-Chinchwad finally have something to cheer as the much-delayed Nigdi-Dapodi Bus Rapid Transit System (BRTS) is set to become operational in a week’s time. On Monday, both PCMC and PMPML officials said they were all set to launch the services on the highway stretch in the PCMC jurisdiction.
Pune: Much-delayed Nigdi-Dapodi BRTS likely to start soon

DCPs to head two zones under commissionerate

The Pimpri Chinchwad police commissioner, R K Padmanabhan, h ..

PCMC to stop taking wet waste from bulk producers

The civic body will not collect wet waste from bulk waste ge ..

PCMC set to finalize list of five 'model' civic schools

PIMPRI CHINCHWAD: The education committee of the Pimpri Chinchwad Municipal Corporation will soon select five municipal schools to be developed as model institutes.

रेल्वे प्लॅटफॉर्मची लांबी वाढणार

पिंपरी - वाढत्या प्रवासी संख्येमुळे रेल्वेकडून डब्यांच्या संख्येत वाढ करण्यात येत आहे. प्रवाशांना रेल्वेत चढ-उतार करणे सुलभ व्हावे, यासाठी रेल्वे प्रशासनाने शिवाजीनगर ते लोणावळादरम्यानच्या सर्व स्थानकांच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये या कामाला सुरवात होणार असून, पुढील दीड वर्षात ते पूर्ण करण्यात येणार आहे. 

नाशिक फाटा ते मोशी रस्त्याची नोव्हेंबरमध्ये निविदा

पिंपरी - नाशिक फाटा ते मोशीदरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम जलदगतीने करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. येत्या दोन महिन्यांत रस्त्याच्या कामाचा सविस्तर अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सादर करणार असून, नोव्हेंबरमध्ये रस्त्याच्या कामाची निविदा काढण्यात येणार असल्याचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले. 

मेट्रो विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

महामेट्रोचे संचालकांची माहिती
पुणे : स्वारगेट-कात्रज मेट्रो विस्तारीकरण मार्ग आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा मार्ग भुयारीपेक्षा उन्नत (एलिव्हेटेड) करण्यावर महामेट्रोचा भर आहे, अशी माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी शनिवारी पुण्यात दिली.

“त्याच्या’ संघर्षाला “आरबीपी’चा मदतीचा हात

पिंपरी – दिव्यांग असूनही कुटुंबाची जबाबदारी पेलणारा सचिन यादवले हा तरूण…, काबाड कष्ट करण्याची तयारी…, मात्र, आर्थिक संकटामुळे फुड पॅकेटस्‌ विक्रीच्या त्याच्या व्यवसायात अडथळा आला…, मात्र त्याची जगण्याची धडपड बघून रॉयल बुलेटीयर्सने मदतीचा हात पुढे करत वाहन भेट दिली. त्यामुळे सचिनच्या संघर्षमय जीवनाला सुखाची किनार लाभणार आहे.

गर्भवती महिलांना आदित्य बिर्ला रुग्णालयात मोफत उपचार

वायसीएमएचवरील रुग्णालयीन कामाचा ताण 
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरातील सर्व रुग्णालयातील गर्भवती महिलांना पुढील उपचारासाठी संत तुकारामनगर येथील ‘वायसीएमएच’ रुग्णालयात पाठविले जाते. त्यामुळे वायसीएमवरील रुग्णालयीन कामाचा ताण येतो. त्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयात रात्रीच्या वेळी दाखल होणार्‍या गर्भवती महिलांना आदित्य बिर्ला रुग्णालयात मोफत उपचार दिले जाणार आहेत, अशी माहिती मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.के.अनिल रॉय यांनी दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आहे. शहरातील आर्थिक परिस्थिती कमी असलेल्या नागरिकांना वायसीएममध्ये मोफत औषधोपचार केले जातात. मात्र वाढत्या नागरिकीकरणाचा परिणाम म्हणून शहरातील लोकसंख्या वाढते आहे. त्यामुळे सार्वजनिक सेवांवर परिणाम होतो आहे, असेही डॉ. रॉय यांनी सांगितले.

ऑनलाइन भाडेकरू नोंदणी बंद

भाडेकरूंच्या ऑनलाइन नोंदणीसाठी पुणे पोलिसांनी सुरू केलेले 'टेनन्ट' हे पोर्टल महिनाभरापासून बंद आहे. त्याचबरोबरीने पोलिस ठाण्यांकडून ऑफलाइन नोंदणी करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली असता, येत्या आठ दिवसांमध्ये सेवा सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

सीमेवरील सैनिकांकरिता पुणेकरांतर्फे २५ हजार राख्या रवाना

सैनिकांना आपला भाऊ  मानणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील बहिणींनी राख्या सीमेवर पाठविण्यासाठी पुढाकार घेतला.

राजीनाम्यांनंतर निवडणुकांची तयारी

पिंपरी-चिंचवड शहराचे कार्यक्षेत्र मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे.

अकरावी प्रवेशाची "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' फेरी

पुणे - अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' (एफसीएफएस) पहिली फेरी जाहीर झाली आहे. येत्या शनिवारपासून (ता. 25) ही फेरी सुरू होणार असून प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा तीन टप्प्यांत विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. या फेरीनंतरही विद्यार्थ्यांना "एफसीएफएस'च्या दुसऱ्या फेरीत संधी मिळणार आहे. 

जीएसटी मायग्रेशन प्रक्रियेसाठी स्वतंत्र कक्ष

पुणे - जीएसटी भरताना स्थलांतर (मायग्रेशन) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ज्या करदात्यांनी कायमस्वरूपी पत्ता दिला नाही. तात्पुरता पत्ता देत अस्थायी ओळख कागदपत्रे जमा केली आहे; परंतु मायग्रेशन प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांच्यासाठी केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाच्या वतीने प्रत्येक जीएसटी कार्यालयामध्ये स्वतंत्र मदत कक्ष स्थापन केल्याची माहिती केंद्रीय वस्तू व सेवाकर विभागाने कळविली आहे. जीएसटी भवन, पहिला मजला, अधीक्षक (जीएसटी एकक), ई विंग, ४१ ए, ससून रस्ता, पुणे स्टेशन या ठिकाणी हे मदत कक्ष उभारण्यात आले आहे. si-pune2gst@gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.

'Love-struck' bizman may not face criminal action for his banners

PCMC authorities pull down all 300 flexes in Pimple Saudagar but fail to lodge a police complaint against the 25-yr-old as promised

प्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले

प्रेमवीरावर कारवाई करण्याची पोलीस आणि पालिकेची भाषा एकाच दिवसात बदलली

स्वातंत्र्यदिनानिमित्त फुटबॉल स्पर्धेचे केले आयोजन

विझार्डस संघाने पटकाविले विजेतेपद
चिंचवड : स्वातंत्र्यदिनानिमित्त रस्टन कॉलनी मित्र मंडळ, चिंचवडगावच्यावतीने 11 व्या स्वातंत्र्यता चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये तीस संघांनी भाग घेतला. तीन दिवस चाललेल्या स्पर्धेमध्ये विझार्डस संघाने विजेतेपद पटकाविले. विजेत्या संघाला रोख पंधरा हजार रुपये व स्वातंत्र्यता चषक करंडक देण्यात आला. स्निगमय संघाने उपविजेतेपद पटकाविले. त्यांना रोख दहा हजार रुपये व करंडक देण्यात आला.

‘आधार’ व साक्षीदारांची गरज

पुणे - दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणी करताना आधार कार्ड असेल तर साक्षीदाराची आवश्‍यकता नाही, असा निर्णय राज्य सरकारने घेतला खरा; परंतु युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडियाकडून (यूआयडीएआय) अद्याप त्याबाबतची संगणक प्रणाली विकसित झालेली नाही. त्यामुळे दस्तनोंदणी करताना आधारबरोबरच साक्षीदारांची सध्या तरी गरज लागत असल्याचे समोर आले आहे.