Saturday, 17 June 2017

Authorities to start registry of trees planted by citizens

Pimpri Chinchwad: Civic authorities have decided to maintain a record of the trees planted by citizens in the Pimpri Chinchwad municipal limits.

Maha-Metro tells PCMC to shift 2 foot overbridges

A Maha-Metro official close to the project said, "We are also conducting a feasibility survey on how we can let the FOBs stay, and also construct the metro. We are trying not to cause any long-term discomfort to citizens. The PCMC limits will have an ...

'त्या' निविदांवर आज पुन्हा चर्चा

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट संचालक मंडळाचे (पीएससीडीसीएल) अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसाठी 'अॅडप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम' (एटीएमएस) बसवण्याच्या २६०.८७ कोटी रुपयांच्या निविदांवर उपस्थित ...

“ग्रेड सेपरेटर’ ची निविदा रद्द करा

– रमेश वाघेरे यांची मागणी
पिंपरी, (प्रतिनिधी) – जगताप डेअरी येथील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या ग्रेड सेपरेटरच्या निविदा प्रक्रियेत अपहार झाल्याचा संशय असून ही निविदा रद्द करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी केली आहे.

साई चौक ते रहाटणी दरम्यानच्या अतिक्रमणावर कारवाई

आयुक्‍तांचे कारवाईचे आदेश : दोन दिवसांत कारवाई
पिंपरी, (प्रतिनिधी) – रहाटणी येथील मंजूर विकास आराखड्यानुसार साई चौक ते रहाटणी येथे उड्डाण पूल व ग्रेड सेपरेटरचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी या मार्गावरील वाहतुकीसाठी कोकणे चौक ते काळेवाडी फाटा 30 मीटर द्रूतगती मार्गाचा पर्यायी रस्ता म्हणून वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गातील नागरिकांच्या अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश आयुक्‍त श्रावण हर्डिकर यांनी दिले आहेत.

पालखी सोहळ्यानिमित्त शहरातील वाहतुकीत बदल

पिंपरी, (प्रतिनिधी) – जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज हे दोन्ही पालखी सोहळे रविवारी (दि.18) पुण्यात मुक्कामी पोचणार आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातून मार्गस्थ होणाऱ्या या सोहळ्यांचे दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. या दिवशी वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन पुणे शहर वाहतूक शाखेच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.

पीएमपी हेल्पलाईन व अ‍ॅप संदर्भात प्रवासी मांडणार अडचणी


प्रवासी मेळाव्याचे आयोजन; महापौर मुक्ता टिळक यांची उपस्थिती एमपीसी न्यूज - नव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढवून प्रवाशांना चांगली सेवा देण्याकरिता पीएमपीने पुढाकार घेतला असला, तरी नुकत्याच बदललेल्या पीएमपी हेल्पलाईन व अ‍ॅप संदर्भातील अनेक अडचणी प्रवाशांना भेडसावत आहेत. या अडचणी मांडण्याकरिता व त्यासंबंधी चर्चा करण्याकरिता पीएमपी प्रवासी मंचातर्फे प्रवासी मेळाव्याचे आयोजन केले आहे. 

चिंचवड पोलिसांकडून सराईत गजाआड

पिंपरी, (प्रतिनिधी) – मौजमजेसाठी चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांकडून घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, 3 लाखांचा ऐवज जप्त केला आहे. चिंचवड पोलिसांच्या पथकाने नुकतीच ही कारवाई केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे 50 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

पुणे, दि. 16 (प्रतिनिधी) – वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे…पक्षीही सुस्वरें आळविती… या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगावर आजच्या काळात कृती करीत पर्यावरण रक्षणाकरीता संपूर्ण महाराष्ट्रात 50 लाख वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यासोबतच जय गणेश हरित वारीचा श्रीगणेशा देहूनगरीत झाला. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने इंद्रायणीच्या तीरावर वृक्षारोपण करुन वारकरी मंडळींनी एकच लक्ष, देशी वृक्ष असा नाराही दिला.