PIMPRI CHINCHWAD: The civic body on Monday agreed in principle to bear the labour cost of the water hyacinth removal drive conducted by the social organizations in Pavana river.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 13 December 2017
PCMC, anti-encroachment officials play blame game
PIMPRI CGINCHWAD: The anti-encroachment department and the civic officials in Pimpri Chinchwad are at loggerheads. The Pimpri Chinchwad civic panel has alleged that whenever the anti-encroachment department tries to clear encroachments and take action against hand-cart owners, the civic officials and employees try to evade the action by taking the names of local corporators. The officials, however, have denied the charge.
“स्वच्छता ऍप’द्वारे तक्रारी करा- महापौर
पिंपरी – केंद्र शासनाच्या स्वच्छता ऍपद्वारे स्वच्छता विषयक तक्रारी नोंदविता येणार आहेत. याकरिता शहरातील नागरिकांनी आपल्या मोबाईलवर “स्वच्छता ऍप’ डाऊनलोड करावे, असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले.
Humanising Hinjawadi: Capturing the pulse of residents and its 'smart' neighbourhood
Over the weekend, a group of architecture students from the Padmbhushan Dr Vasantdada Patil College Of Architecture were busy arranging exhibitions, meeting people and taking surveys in Hinjewadi as part of their final year project called Humanising Hinjewadi. The project aims to study if the working and living environment at Hinjewadi is culturally and socially rich and humane.
Special scheme of auto fare: RTO asks Pune police to register complaint against Ola ad
The Pune Regional Transport Officer (RTO) has written to the Pune police, asking it to take action against the taxi aggregator Ola for its advertisement. Ola has been advertising about its special scheme of auto fare, which saw auto-rickshaws on the platform charging Rs 29 for four kilometres.
नाशिकफाटा ते चांडोली रस्ता सहापदरी होणार; आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश
पिंपरी (Pclive7.com):- पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिकफाटा ते चांडोली(खेड) रस्ता सहापदरीकरण या २९.९३ कि.मी. लांबीच्या १०१३.७८ कोटी रकमेच्या कामास मान्यता मिळाली आहे. या कामाची निविदा प्रक्रिया येत्या दिड महिन्यात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून पूर्ण करण्यात येणार असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. सहापदरीकरण करण्यास मान्यता दिल्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि भाजप सरकारचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आभार मानले आहेत.
पवना नदी पात्रातील जलपर्णी मुक्तीचा महापालिकेचा निर्धार; ठेकेदारांऐवजी मजूर लावून कामे करणार?
पिंपरी, (nirbhidsatta.com) – पवना नदी स्वच्छतेसाठी आता महापालिकेने पुढाकार घेतला आहे. दरवर्षी नद्यांमधील जलपर्णी काढण्यासाठी ठेकेदारांवर सुमारे 15 लाख रुपये खर्च करण्यात येतो. तरीही पवना नदी अद्याप जलपर्णी मुक्त झालेली नाही. त्यामुळे प्रत्येक वर्षी जलपर्णी काढण्याकरिता ठेकेदारांवर खर्च करण्याऐवजी शहरातील 40 जणांच्या मजूर टीमकडून पवना नदीतील जलपर्णी काढण्यात यावी, अशी मागणी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली. त्यानूसार आयुक्तांनी जलपर्णी काढण्याबाबत ठेकेदारांकडील सध्यस्थिती जाणून घेवून त्यानंतर संबंधित व्यक्तींना मजूरी देण्यासह त्यांच्याकडून जलपर्णी काढण्यावर निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
उद्योगनगरीला एशियन डेव्हलमेंट बॅंकेची मदत
पिंपरी – “स्मार्ट सिटी’ची एशियन डेव्हलपमेंट बॅंकेकडे नोंद केली आहे. या बॅंकेच्या प्रतिनिधींचे पथक लवकरच पिंपरी-चिंचवड शहरास भेट देऊन जागतिक दर्जाच्या प्रकल्पासाठी आर्थिक मदत करणार आहे, अशी माहिती मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण यांनी दिली.
चित्रपटगृहात 50 रुपयाला पाण्याची बॉटल
पिंपरी – शहरातील मल्टिप्लेक्स चित्रपटगृह चालकांकडून प्रेक्षकांची आर्थिक लूट होत आहे. पाण्याची बाटली 20 रुपये असताना ती तब्बल 50 रुपयांना विकली जात आहे. त्याच पद्धतीने खाद्यपदार्थही अव्वाचा सव्वा दराने प्रेक्षकांच्या माथी मारले जात आहेत.
खासगी ठेकेदारांद्वारे डीपी सत्ताधाऱ्यांकडून टक्केवारीचा घाट?
पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेसह नवनगर विकास प्राधिकरण आणि एमआयडीसी क्षेत्रासाठी सुधारित विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. परंतु, सत्ताधारी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी खासगी ठेकेदारांकडून सुधारित विकास आराखडा तयार करण्याचा घाट घातला आहे. त्या आराखड्यात टक्केवारीचे गणित जुळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे सुधारित विकास आराखडा करण्याचे काम खासगी ठेकेदारांच्या घशात न घातला बृहन्मुंबई महापालिकेकडून करण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी
पिंपरी – वायसीएम रुग्णालयातील मेडिसीनच्या बाह्यरुग्ण विभागात वारंवार अनुपस्थित राहिल्याने रुग्णांच्या रांगा लागून त्यांना विनाकारण ताटकळत थांबावे लागत होते. याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. विनायक पाटील यांची तक्रार करण्यात आली. यावरुन त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.
सव्वा कोटींचा रस्ता चार महिन्यात खराब
पिंपरी – चिंचवड येथील हॉटेल सुरुची ते चापेकर चौक रस्ता अवघ्या चार महिन्यात खराब झाल्याने स्थापत्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने महापालिकेचे सुमारे सव्वा कोटीचे नुकसान झाले. कोणतेही प्लॅन, इस्टीमेट न करता, अंदाजपत्रकात तरतूद नसतानाही 62 लाखांचा जादा खर्च केल्याचा ठपका ठेवत स्थापत्य कनिष्ठ अभियंता राजेंद्र वसंतराव राणे यांना एक वेतनवाढ स्थगिती करण्याची कारवाई महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केली.
[Video] चाफेकर गुरुकुल शाळेत घाट चित्रपटाचे प्रमोशन
चिंचवड गावातील चाफेकर गुरुकुल शाळेला आज घाट चित्रपटाच्या कलाकारांनी चित्रपटाच्या प्रमोशन निमित्याने भेट दिली प्रत्येक चित्रपटांचे प्रमोशन साधारण मोठ्या पण पंचतारांकित हॉटेलात किंवा गर्दीच्या मॉल अश्या ठिकाणी होते परंतु प्रथम एखाद्या चित्रपटाचे प्रमोशन गुरुकुल शाळेत करण्यात आले आणि ह्यावेळी संपूर्ण चित्रपट हे कलाकार ह्यावेळी हनर होते चित्रपटाचे प्रमोशन अगदी साधेपणाने करण्यात आहे
पिंपरी-स्वारगेट मेट्रो कात्रजपर्यंत!
पुणे - नियोजित पिंपरी-स्वारगेट मेट्रो कात्रजपर्यंत नेण्याबाबतच्या हालचालींना वेग आला असून, याबाबत महापालिका आणि महामेट्रोच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट मार्गांचे काम सुरू असल्याने स्वारगेट-कात्रज मार्गाचे काम सोयीचे होईल, असे तज्ज्ञांचे मत असून, याची चाचपणी करण्यात येत आहे. मात्र, त्याचा खर्च महापालिकेला करावा लागणार आहे.
"जीवनवाहिनी'ला हवी ट्रॅकची नवसंजीवनी
वडगाव मावळ - पुणे ते लोणावळा रेल्वे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी प्रस्तावित तिसऱ्या व चौथ्या ट्रॅकच्या कामाला गती देण्याची आवश्यकता आहे.
लोकलच्या स्वतंत्र ट्रॅकला मार्चमध्ये ग्रीन सिग्नल
पिंपरी - पुणे-लोणावळा प्रस्तावित लोकल रेल्वे कॉरिडॉरसाठी स्वतंत्र ट्रॅक टाकण्याचे विचाराधीन आहे. त्यासाठीच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक निधी आणि अन्य अहवाल तयार करण्याचे काम मार्च 2018 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी "सकाळ'ला दिली.
‘लोकल’ लोकांसाठी लोकल हवीच
पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहराची सर्वांत गहन समस्या कोणती असेल तर ती म्हणजे सार्वजनिक वाहतूक. दोन्ही शहरांमध्ये मिळून सुमारे ६० लाखांवर लोकसंख्या आहे. केवळ सार्वजनिक वाहतूक कमकुवत असल्याने आज घरटी किमान दोन खासगी वाहने आहेत. दैनंदिन पुणे-पिंपरी प्रवास करणाऱ्यांची संख्या तब्बल पाच लाख आहे. त्यात पीएमपीचा वापर करणारे दोन लाख, पुणे-लोणावळा लोकलने एक लाख आणि उर्वरित प्रवासी स्वतःचे वाहन वापरतात. परिणामी, रस्ते गच्च भरून वाहतात, रोजचे अपघात आहेतच. प्रदूषणाने धोकादायक पातळी केव्हाच ओलांडली आहे. या सर्व समस्येवर उपाय म्हणजे पीएमपी अधिक मजबूत करणे. लोणावळा ते दौंड लोकलच्या फेऱ्या वाढविणे. त्याशिवाय सध्या बीआरटी आणि दोन वर्षांनी मेट्रो येतेच आहे. तुकाराम मुंढे यांच्यामुळे पीएमपी सेवा सुधारली. मात्र, दुसरीकडे लोकल सेवा खालावली. रात्रीच्या तीन लोकल कायमस्वरूपी रद्द केल्यात. त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसला. दुरुस्तीच्या नावाखाली लोकलच्या पाच फेऱ्या रद्द केल्याने परवा तळेगावच्या त्रस्त प्रवाशांनी जोरदार आंदोलन केले. एकीकडे भविष्याचा विचार करून लोकल सेवा वाढविण्याचे नियोजन सुरू आहे. फक्त लोकलसाठीची स्वतंत्र मार्गिका असावी, या दृष्टिकोनातून तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाची आखणी होत आहे. दुसरीकडे प्रवासी नाहीत, असे सांगत लोकलच्या फेऱ्या रद्द केल्या जातात. यात कुठेतरी विसंगती आहे. स्वस्त, मस्त आणि जलद प्रवासासाठी अर्ध्या तासाला एक लोकल कशी सुरू होईल, यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. रस्त्यावरची वाहतूक कोंडी, अपघात, प्रदूषणाचा ताण कमी करायचा असेल तर हाच एक रामबाण उपाय आहे. लोकांना जे खरोखर गरजेचे आहे ते द्या. लोकलच्या फेऱ्या कमी करून मुस्काटदाबी करू नका.
Rain trees find safe haven amid Metro work
More than 100 rain trees that stood into danger of being hacked in order to make way for the multi-crore Pimpri to Swargate Metro rail route will now be transplanted to safer locations.
प्लॅस्टिकमुक्त पिंपळे सौदागर फेरीला नागरीकांचा प्रतिसाद
नवी सांगवी : रोजलँड सोसायटी, नवचैतन्य ग्रुप आणि सिनियर सिटीझन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या प्लॅस्टिकमुक्त पिंपळे सौदागर' या मोहिमेला पिंपळे सौदागरवासीयांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने रविवारी (ता. १०) रोजी परिसरात भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, यशदा रियाल्टी ग्रुप व्हा. चेअरमन संजय भिसे, रोजलँड सोसायटी चेअरमन संतोष मस्कर, पिंपळे सौदागर मधील विविध सोसायटीचे कमिटी मेंबर्स, सिनियर सिटीझन असोसिएशन मेंबर्स, चैतन्य हास्य क्लब सदस्य, महिला आणि इतर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आधार दुरुस्ती फक्त पाच मिनिटांत
जिल्हा प्रशासनाला यूआयडीएआयकडून ५० यंत्रे
चौफेर न्यूज – पुढील आठवडय़ापासून केवळ आधारकार्डमधील दुरुस्तीच्या प्रक्रियेसाठी अपडेट क्लायंट लाइफ किट (यूसीएल) वापरण्याकरिता जिल्हा प्रशासनाला परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार ही ५० यंत्रे दोन-तीन दिवसांत भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून (यूआयडीएआय) जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात येणार आहेत. ही सर्व यंत्रे महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये बसवण्यात येणार आहेत. या यंत्रांद्वारे केवळ एका बोटांच्या ठशावरून पाच मिनिटांत आधारकार्डमधील दुरुस्ती करण्यात येणार आहे.
आता काही तासांतच चेक वटणार
चौफेर न्यूज – चेकने व्यवहार करणा-यांसाठी एक खूषखबर आहे. आता चेक वटण्यासाठी तीन दिवस वाट पाहण्याची गरज नाही. तो काही तासांतच चेक वटणार असल्याने तुमच्या खात्यात जमा झालेली रक्कम तुम्हाला काढता येणार आहे. चेक क्लिअरिंग हाऊस नावाची संकल्पना हद्दपार होणार असून यापुढे ऑनलाईन पद्धतीने बँकेतले तुमचे चेक खात्यात वळते केले जाणार आहेत. त्यामुळे बँकेत चेक वटण्याचा अवधी कमी होणार आहे.
मागण्यांचे होणार काय?
पिंपरी : राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन आज (सोमवार ११ डिसेंबर) सुरू होत आहे. यापूर्वी गेल्या तीन वर्षांत भाजप सरकारने पिंपरी-चिंचवडकरांना दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात तरी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय, १०० टक्के शास्तीकर माफी, अनियमित बांधकमांसाठी नव्याने आलेल्या जाचक कायद्यातील त्रुटी अशा अनेक प्रश्नांवर सकारात्मक निर्णय होतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Punekars and police join hands online to better traffic
Anyone visiting the city will admit that it takes a great deal of skill to be able to navigate through Pune's traffic. It can be a trying task and a great deal of the inconvenience can be attributed to a general lack of traffic sense on the streets. Though Pune's perpetual traffic woes have served as the butt of many a joke, the Pune Traffic Police have found a novel way to reduce traffic woes - they've taken to the vibrant, ever organic, online space.
मिळकतींप्रमाणे फ्लेक्सलाही कर आकारणीचे आदेश
पिंपरी – शहरात बेकायदेशीर फ्लेक्सचा मुद्दा गंभीर बनला असताना एकाही फ्लेक्सवर आकाश चिन्ह परवाना विभागाकडून आजपर्यंत कारवाई केली नसल्याचे निदर्शनास येताच आयुक्त श्रावण हर्डीकर संतापले आहेत. फ्लेक्स किती दिवस लावला जाणार याच्या नोंदी घ्या, बेकायदेशीर फ्लेक्सवर नियंत्रण ठेवा तसेच फ्लेक्सला मिळकत कराप्रमाणे कर लागू करा, असे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी परवाना विभागाचे सहायक आयुक्त योगेश कडुसकर यांना दिले आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)