Tuesday, 20 November 2018

खुषखबर.. पिंपरी चिंचवडमधील शिक्षकांनाही ‘धन्वंतरी’चा लाभ!

– आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश
– शिक्षण समिती सभापती सोनाली गव्‍हाणे यांची माहिती

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत शिक्षकांना अखेर धन्वंतरी योजनेचा लाभ देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंजूर केला आहे. गेल्या २५ वर्षांपासून शिक्षकांची ही मागणी मंजुरीच्या प्रतीक्षेत होती. विशेष म्हणजे, सेवानिवृत्त शिक्षकांनाही या विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे.

खुषखबर.. पिंपरी चिंचवडमधील शिक्षकांनाही ‘धन्वंतरी’चा लाभ!

आमदार महेश लांडगेंनी केले डॉ.दीपक सावंत यांना लक्ष्य

पिंपरीःसाथीच्या रोगाच्या वाढत्या प्रार्दूभावावर व्यवस्थापन समिती स्थापन करण्याच्या तीन वर्षापूर्वी दिलेले आश्‍वासन सरकारनेच पाळले नसल्याचा घरचा आहेर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी दिला आहे. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी त्यांनी ताराकिंत प्रश्‍नाव्दारे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली आहे. याव्दारे त्यांनी सार्वजनिक आरोग्यमंत्री शिवसेनेचे डॉ.दीपक सावंत यांना लक्ष्य केल्याची चर्चा आहे.

Mahesh_Landge.

KPMG helps set up two incubation centres

How is the startup community doing? Is it growing? Or has it peaked already? According to Juzer Miyajiwala office managing partner KPMG “there are indications that the startup community is growing.” The consulting firm is already in talks with Pimpri Chinchwad municipal corporation (PCMC) and an institute that works with the underprivileged to set up a business incubation centre for them. “This institute (we cannot give the name now) wants to promote entrepreneurship amongst the scheduled castes and scheduled tribes. We have been working with them for a few months now and in a year’s time the incubation centre should be ready.”

Pune,KPMG,incubation centers

Chapekar Chowk to get five subways

Pimpri Chinchwad: Five pedestrian subways would be construct ..

फटाके घटले, श्रेय जनतेला, पर्यावरण चळवळीलाही

जनचळवळीत, प्रबोधनात म्हणा की जनमताच्या दबावात आजही बऱ्यापैकी सामर्थ्य आहे. चांगले-वाईट यातील फरक लोकांना कळतो. व्यवस्थित पटवून दिले तर लोकही ऐकतात. आजवर जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणावर नेहमी चर्चा होत आली. कृती मात्र नाममात्र राहिली. पिंपरी चिंचवडकरांनी वाचाळपणा सोडून कृतीवर भर दिला. पर्यावरणाशी निगडित विषयांवर काही वर्षे सुरू असलेल्या प्रबोधनाचा उचित परिणाम या वेळी दिसला. ‘फटाके वाजवू नका’,‘हवेचे प्रदूषण टाळा’, ‘श्‍वसनविकाराचे शिकारी होऊ नका’,‘कानठळ्या बसणाऱ्या आवाजांनी बधिर होणार का?’ असा संदेश घरघरांत गेला. विविध संस्था संघटनांनी अगदी पोटतिडकीने प्रचार मोहीम राबविली. शाळा-महाविद्यालयांतून व्याख्याने झाली. ‘आम्ही फटाके वाजविणार नाही,’ अशा आणाभाका झाल्या. त्याचे फळ यंदाची दिवाळी एकदम सुखद गेली. फटाक्‍यांचा आवाज, धूर, कचरा अर्ध्याअधिक प्रमाणात घटला. जनतेनेही करून दाखवले. पिंपरी चिंचवडकरांची मान उंचावणारे चित्र पाहायला मिळाले. यावेळी शहरातील हवा आणि ध्वनिप्रदूषण मागच्या तुलनेत बऱ्यापैकी घटल्याचे खुद्द महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयाने फटाक्‍यांबाबत सुनावल्याने त्यात आणखी भर पडली. परिणाम चांगलाच झाला. नागरिकांनी फटाके खरेदी न केल्याने शेकडो कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचे व्यापाऱ्यांनीही मान्य केले. पर्यावरणविषयक अशाच अन्य काही उपक्रमांमधील शहरवासीयांचा वाढता सहभाग हा हुरूप वाढविणारा आहे.

कचरा जाळतोय कोण?

पिंपरी - आकुर्डी आणि चिंचवड रेल्वे स्टेशन जोडणाऱ्या नवीन रस्त्यालगतच्या कचरा संकलन केंद्राजवळ दररोज मोठ्या प्रमाणात कचरा जाळला जात आहे. त्याचा परिसरातील सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. महापालिकेचे कर्मचारी कचरा जाळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मात्र, आम्ही कचरा जाळत नसल्याचे महापालिका कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मग, कचरा जाळतोय कोण, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

प्राधिकरण १४ हजाराहून जास्त घरे बांधणार – सदाशिव खाडे

चौफेर न्यूज – देशातील सर्व कुटुंबांना 2022 पर्यंत घरे देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण आगामी काळात 14 हजार 656 सदनिका बांधणार आहे. यापैकी 5 हजाराहून जास्त घरांच्या प्रकल्पाचे भूमीपूजन डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करणार असल्याचे प्राधिकरणाचे सदाशिव खाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

‘रेडझोन’ची हद्द तत्काळ निश्‍चित करा


प्राधिकरणाचे ‘सीईओ’ खोटे बोलताहेत; घर बचाव संघर्ष समितीचा आरोप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीत सुमारे 65 हजारहून अधिक अनधिकृत घरे आहेत. तर, रिंगरोडमुळे हजारो कुटुंब बेघर होणार असताना प्राधिकरणाचे सीईओ सतीशकुमार खडके रिंगरोडमध्ये केवळ 500 ते 600 घरे जाणार असल्याचे खोटे सांगत आहेत, असा आरोप घर बचाव संघर्ष समितीने केला आहे. तसेच 65 हजारहून अनधिकृत घरे असताना केवळ 30 हजार अनधिकृत […]

पुण्यापाठोपाठ पिंपरी महापालिकेचीही थुंकीबहाद्दरांवर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेपाठोपाठ आता पिंपरी-चिंचवड महापालिकेने देखील सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांवर धडक कारवाईला सुरुवात केली आहे. अस्वच्छता पसरविणा-यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या 9 जणांवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून एक हजार 350 रुपये दंड वसूल केला आहे. याबाबतची माहिती अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली. सरकारने घनकचरा व्यवस्थापन नियम आणि 2016 […]

तळवडे अग्निशामक केंद्रातील विविध कामे सुरू

अद्ययावत केंद्र तयार करणार
 
तळवडे : तळवडे येथील अग्निशामक केंद्राला सीमाभींत, कार्यालय, कर्मचारी खोली आदी कामे सुरू करण्यात आली आहेत. तळवडे परिसरातील सॉफ्टवेअर पार्क चौकात जकात नाक्याचा शेडमध्ये दोन वर्षांपूर्वी अग्निशामक केंद्राची स्थापना करण्यात आली होती. पुरेशा सुविधांअभावी अग्निशमन केंद्र समस्यांच्या विळख्यात सापडले होते. या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार येथे सीमाभिंत उभारण्यात येत असून कर्मचार्‍यांसाठी अद्ययावत सुविधा असलेला कक्ष उभारण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न सुुटणार आहे.  यावेळी नगरसेवक पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, संगिता ताम्हाणे, पौर्णिमा सोनवणे, अग्निशामक विभागाचे अधिकारी ज्ञानेश्‍वर भालेकर, रविंद्र सोनवणे आदी उपस्थित होेते. अग्निशामक केंद्रालगत वनीकरण आहे. त्यामुळे या केंद्रात सरपटणारे प्राणी, भटकी कुत्री तसेच इतर प्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. लवकरच या समस्या सुटणार आहेत.

पिंपळे सौदागरमध्ये हौशी कलाकारांचे ‘उत्सव’ प्रदर्शन

पिंपरी : पिंपळे सौदागर येथे नवोदित व हौशी कलाकारांनी एकत्र येत ‘उत्सव’ हे चित्रांचे प्रदर्शन भरविले आहे. यामध्ये देशभरातील महत्त्वाचे सण व उत्सवांची चित्रे रेखाटण्यात आली आहेत. सणोत्सवाच्या विविध 40 चित्रांचा प्रदर्शनामध्ये समावेश आहे. तुलिका कला दालनात भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन शिल्पकार चंद्रशेखर जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. सतीश वर्तक, सत्यनारायण, कल्पना मोघे, स्नेहल बडगे, संगीता अगरवाल यांची चित्रे प्रदर्शनात आहेत.

दापोडी-पिंपरी मार्गावर कोंडी नित्याचीच

पिंपरी - जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला होणाऱ्या वाहनांच्या पार्किंगमुळे कोंडी नित्याची झाली आहे. महामार्गावर दापोडी ते पिंपरी दरम्यानच्या रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे ग्रेडसेपरेटरमधील रस्ता वाहतुकीसाठी बंद असतो. वाहनचालकांना सेवारस्त्याचा वापर करावा लागतो. सेवारस्त्यावर वाहने उभी करण्याचे प्रमाण वाढल्यामुळे कोंडीत भर पडते.

वॉकेथॉनला भरभरून प्रतिसाद (व्हिडिओ)

पिंपरी - सकाळच्या गारठ्यात रविवारी एरवी अनेकजण निवांत घरी आराम करीत असतात. मात्र, हा रविवार (ता. १८) याला अपवाद ठरला. जागतिक मधुमेह दिनानिमित्त ‘वॉकेथॉन २०१८’ या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अनेक नागरिक प्राधिकरणातील वीर सावरकर सदन येथे एकत्र जमा झाले.

6 लाख 18 हजार बालकांना रुबेला लस

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण 6 लाख 18 हजार बालकांना रुबेला व मिझेल्स लस दिली जाणार आहे. येत्या 27 नोव्हेंबरपासून पुढील पाच आठवडे ही मोहीम राबविण्यात येणार आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या वैद्यकीय विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल के. रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज जाधव आदी उपस्थित होते.

महापालिकेचे जैव विविधता धोरण

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका शहरात लवकरच जैवविविधतेचे सर्वेक्षण करणार असून त्यानुसार जानेवारी 2019 पर्यंत महापालिका शहरातील जैवविविधतेसाठी पॉलीसी व ऍक्‍शन प्लॅन तयार करणार आहे.

पोलीस आयुक्‍तांनी सुनावले खडेबोल!

पिंपरी – शहरात अपहरण, घरफोड्या अशा गंभीर घटना घडत असताना देखील सोसायटी व दुकानदार परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसवत नाहीत, नागरिकांनीही सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून काळजी घेताना हलगर्जीपणा करायला नको, अशा शब्दात पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी खडेबोल सुनावले.

मेट्रो स्टेशन एम्पायर पुलाकडे स्थलांतरीत करण्याची मागणी

चौफेर न्यूज – महापालिकेच्या समोरील कै. अण्णासाहेब मगर यांचा पुतळा आणि मनपा भवनाचे इलेव्हेशन अबाधित ठेवण्यासाठी मेट्रोचे मोरवाडीतील स्टेशन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या बाजुला स्थलांतरित केल्याचा आक्षेप धनगर समाज बांधवांनी घेतला आहे. येथील मेट्रोचे स्टेशन पुढे एम्पायर इस्टेट पुलाच्या बाजुला स्थलांतरीत करण्यात यावे, अशी मागणी समाजाच्या वतीने नगरसेविका आशा शेंडगे यांनी केली आहे.

पिंपरीत रेल्वे लाईनलगतच्या झोपड्यांवर कारवाई

चौफेर न्यूज – पिंपरीतील निराधारनगरच्या रेल्वे लाईनलगतच्या अनधिकृत झोपड्यांवर शनिवारी रेल्वे प्रशासनाने कारवाई केली. यावेळी स्थानिक नागरिकांनी घरांना आगी लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या प्रकारामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

सावित्रीबाई फुले स्मारकातील प्रश्न सोडवा

चौफेर न्यूज – पिंपरीतील सावित्रीबाई फुले स्मारकात भव्य वाचनालय, सांस्कृतीक हॉलचे नामकरण, महिलांसाठी प्रशिक्षण वर्ग तसेच विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करणे, अशा अनेक मागण्या तातडीने मार्गी लावाव्यात, अशी मागणी सावित्रीबाई फुले स्मारक समितीच्या वतीने केल्या आहेत. यावेळी मानव कांबळे, वैजीनाथ शिरसाट, बन्सी पारडे, नंदा करे, आनंदा कुदळे, अॅड. रविंद्र कुदळे, हनुमंत राऊत, विश्वास राऊत, गिरीश गायकवाड, निरज कडू, गुलाब पानपाटील, विठ्ठल झेंडें, सुरेश गायकवाड, निरज कडू आदी पदाधिकारी, तर प्रशासकीय अधिका-यांमध्ये आशादेवी दुरगुडे, लक्ष्मीकांत कोल्हे, प्रभावती गाडेकर, महादेव शिंदे, आर. एम. पवार हे देखील उपस्थित होते.