Pimpri Chinchwad: The civic body would not allow commercial establishments near the BRTS and Metro corridors to avoid congestions as well as accidents.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 21 April 2018
मिळकतधारकांना सामान्य करात सवलत
पिंपरी - करदात्यांना दिलासा मिळावा, यासाठी २०१८-१९ या आर्थिक वर्षातील मिळकतकराची थकबाकीसह दोन्ही सहामाहीच्या संपूर्ण बिलाची रक्कम ३० जून २०१८ पर्यंत एक रकमी भरल्यास मिळकतधारकांना सामान्य करात सवलत दिली जाणार आहे.
Two senior PCMC health officers get booked for stalling doc's promotion
Complainant alleges one of the doctors had sent out defamatory information along with his caste on the civic body’s site
HC windfall for PCMC contractual workers
Court orders civic body to pay Rs 65.8 crore arrears with interest for last 18 years
अनधिकृत बांधकामे जोमात
चिखली - सध्या शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. इमल्यावर इमले चढविले जात असताना महापालिका अधिकारी या प्रकाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. नोटिसा देऊन कारवाई होत असल्याचे पालिका अधिकारी सांगतात; परंतु दाखवण्यापुरतीच कारवाई केली जात असल्याने, नागरिक अशा कारवाईला भीक घालत नाहीत. शहराच्या बकालपणात मोठी वाढ झाली असून, ‘अनधिकृत बांधकामे जोमात, अधिकारी कोमात’ अशी परिस्थिती सध्या पाहावयास मिळत आहे.
‘चायनीज’ची धोकादायक पद्धतीने विक्री
पिंपरी - शहरातील चायनीज विक्रेत्यांपैकी बहुतांश धोकादायक पद्धतीने अन्नपदार्थांची विक्री करताना दिसतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका असूनही प्रशासनाचे संबंधितांवर कारवाई करताना दुर्लक्ष होताना दिसते. शहरात चायनीज पदार्थ विक्रेत्यांची संख्या सुमारे सातशे आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी फेरफटका मारल्यानंतर आढळून आलेली स्थिती प्रातिनिधीक स्वरूपात पुढीलप्रमाणे -
ऑनलाइन कामे अवघी 25 टक्के
पिंपरी - देशात डिजिटल इंडियाचा बोलबाला आहे. मात्र, शहरातील नागरिकांना भविष्य निर्वाह निधी (पीएफ) विभागातील कामे रांगेत उभी राहून करावी लागत आहेत. पीएफ कार्यालयात ऑनलाइन कामाचे प्रमाण अवघे २५ टक्के आहे.
जलतरण तलावाला समस्यांचा विळखा
कै. अण्णासाहेब मगर तलाव : अपुरे कर्मचारी, नागरिकांचा जीव धोक्यात
प्रशांत होनमाने
पिंपरी – उन्हाळ्याच्या सुट्ट्यामुळे सध्या पोहायला येणाऱ्या लोकांची कै. अण्णासाहेब मगर जलतरण तलावावर गर्दीच-गर्दी दिसून येते. मात्र, अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी येथील व्यवस्था कोलमडली आहे. या जलतरणासाठी केवळ एकच सुरक्षा रक्षक आणि दोन जीवरक्षक असल्याने येथील सुरक्षेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे येथे पोहायला येणाऱ्या नागरिकांची सुरक्षा आणि जीव धोक्यात असल्याचे दिसून आले.
पिंपरी – उन्हाळ्याच्या सुट्ट्यामुळे सध्या पोहायला येणाऱ्या लोकांची कै. अण्णासाहेब मगर जलतरण तलावावर गर्दीच-गर्दी दिसून येते. मात्र, अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी येथील व्यवस्था कोलमडली आहे. या जलतरणासाठी केवळ एकच सुरक्षा रक्षक आणि दोन जीवरक्षक असल्याने येथील सुरक्षेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे येथे पोहायला येणाऱ्या नागरिकांची सुरक्षा आणि जीव धोक्यात असल्याचे दिसून आले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाच समितींच्या सदस्यांची निवड
चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक या चार समित्यांवर नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. पक्षीय संख्याबळानुसार प्रत्येक समितीत सत्ताधारी भाजपच्या पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेच्या एका नगरसेवकाची सर्वसाधारण सभेत शुक्रवारी (दि.२०) वर्णी लावण्यात आली.
स्थायी समिती सदस्यपदी राजेंद्र गावडे, करूणा चिंचवडे
चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी राजेंद्र गावडे, करूणा चिंचवडे यांची निवड करण्यात आली. आज झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते.
दीड लाख महिलांना प्रशिक्षण, ४० कोटींचा खर्च
पिंपरी पालिका अधिकाऱ्यांचा दावा संशयास्पद; स्थायी समितीचे चौकशीचे आदेश
एका आर्थिक वर्षांत तब्बल दीड लाख महिलांना प्रशिक्षित करण्यात आल्याचा दावा पिंपरी महापालिकेतील अधिकाऱ्यांनी केला असून त्यासाठी तब्बल ४० कोटी रुपये खर्च केले आहेत. ही आकडेवारी समोर आल्यानंतर सत्तारूढ भाजपने संशय व्यक्त केला आहे. या दाव्यात फोलपणा असल्याचे सांगत प्रशिक्षण देणाऱ्या संबंधित संस्थेचे कामकाज रद्द करण्याची मागणी भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी केली आहे. तर, या संस्थेच्या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश स्थायी समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना बैठकीत दिले.
एका आर्थिक वर्षांत तब्बल दीड लाख महिलांना प्रशिक्षित करण्यात आल्याचा दावा पिंपरी महापालिकेतील अधिकाऱ्यांनी केला असून त्यासाठी तब्बल ४० कोटी रुपये खर्च केले आहेत. ही आकडेवारी समोर आल्यानंतर सत्तारूढ भाजपने संशय व्यक्त केला आहे. या दाव्यात फोलपणा असल्याचे सांगत प्रशिक्षण देणाऱ्या संबंधित संस्थेचे कामकाज रद्द करण्याची मागणी भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी केली आहे. तर, या संस्थेच्या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश स्थायी समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना बैठकीत दिले.
पुण्यात वर्षभरात लोहमार्गावर ५४० मृत्यू!
सात वर्षांत मृत्यूच्या संख्येत दुपटीने वाढ
रेल्वे स्थानकात पादचारी पुलाची सुविधा असतानाही केवळ वेळ वाचविण्यासाठी धोकादायकपणे थेट लोहमार्ग ओलांडणारे प्रवासी आणि लोहमार्गालगत वाढत्या वस्त्यांमुळे लोहमार्गावर अपघात होऊन मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे विभागात एका वर्षांत अशा प्रकारे ५४० जणांना प्राण गमवावा लागला. मागील सात वर्षांत मृत्यूची ही संख्या दुप्पट झाल्याचे वास्तव आहे. पुणे विभागात विशेषत: पुणे-लोणावळा या पट्टय़ामध्ये सर्वाधिक मृत्यू आहेत.
रेल्वे स्थानकात पादचारी पुलाची सुविधा असतानाही केवळ वेळ वाचविण्यासाठी धोकादायकपणे थेट लोहमार्ग ओलांडणारे प्रवासी आणि लोहमार्गालगत वाढत्या वस्त्यांमुळे लोहमार्गावर अपघात होऊन मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे विभागात एका वर्षांत अशा प्रकारे ५४० जणांना प्राण गमवावा लागला. मागील सात वर्षांत मृत्यूची ही संख्या दुप्पट झाल्याचे वास्तव आहे. पुणे विभागात विशेषत: पुणे-लोणावळा या पट्टय़ामध्ये सर्वाधिक मृत्यू आहेत.
बोपखेल पुलासाठी आमदार जगतापांच्या पाठपुराव्याला यश; लष्कराकडून जागा देण्याबाबत महानगरपालिकेला पत्र
निर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील बोपखेलसाठीच्या मुळा नदीवरील उड्डाणपुलासाठी आवश्यक जागा देण्यास संरक्षण खात्याने सहमती दर्शिवली आहे. त्यामुळे बोपखेल रस्त्याचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला असून भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. संरक्षण खात्याने या जागेची २५, ८१, ५१, २०० रुपये इतकी किंमत सांगितली असून या जागेच्या बदल्यात संरक्षण विभागाच्या जागेलगत पर्यायी जागा महानगरपालिकेने उपलब्ध करून द्यावी, असे पत्र पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना पाठविले. त्या संदर्भात महानगरपालिका पातळीवर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.
अखेर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला महापालिका सर्वसाधारण सभेची मान्यता
निर्भीडसत्ता न्यूज – बहुप्रतिक्षीत ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला अखेर सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाली आहे. आगामी १५ दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन होईल. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचा ‘ड्रिम प्रोजेक्ट’ असलेल्या प्रकल्पाचे काम निर्धारित वेळेत होईल. पिंपरी-चिंचवडच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला हा प्रकल्प राज्यातील ‘रोल मॉडेल’ राहील, असा विश्वास महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केला.
नगरसेविका अनुराधा गोरखे यांची प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती
निर्भीडसत्ता न्यूज – राज्य शासनाने प्लास्टिक बंदीबाबत घेतलेल्या निर्णयाची भाजपा नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी शुक्रवारी (दि.20) पिंपरी भाजी मंडईत विक्रेत्यांशी संवाद साधून जनजागृतीसाठी केली. प्लास्टिक व थर्माकोल जमा करून राज्य शासन आणि महापालिका प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सभागृहातच भाजप नगरसेविकेचा पक्षाला घरचा आहेर; अश्विनी बोबडे यांनी दिला क्रीडा समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजप नगरसेविका अश्विनी बोबडे यांनी क्रीडा समितीच्या सदस्य पदाचा राजीनामा देत पक्षाला घरचा आहेर दिला.
पैसे घेऊन बिट निरिक्षकाकडून अनधिकृत बांधकामांना अभय; बांधकाम विभागातील सर्वच अधिकारी निलंबीत करा – राहुल कलाटे
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरावर अनधिकृत बांधकामाची टांगती तलवार आहे. मात्र अधिकार्यांच्या वरदहस्तामुळे राजरोसपणे शहरात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. एखादे अनधिकृत बांधकाम सुरू असेल तर बिट निरिक्षक बांधकाम मालकाला पालिकेत बोलवतात, पैसे घेऊन कारवाई टाळतात. या सर्व धक्कादायक प्रकाराचे पुरावे माझ्याकडे आहेत. अधिकारी पैसे खातात मात्र नगरसेवक बदनाम होतात, त्यामुळे बांधकाम विभागातील सर्वच अधिकारी निलंबीत करा अशी मागणी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी महासभेत केली.
महाराष्ट्र दिनी महाश्रमदानात सहभाग घ्या : आमिर खान
पाणी फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त ’महाश्रमदान’ चे आयोजन करण्यात आले आहे. वॉटर कप स्पर्धेतील सहभागी गावात हे महाश्रमदान होणार आहे. यामाध्यातून महाविद्यालयीन तरूणांनी या महाश्रमादानात सहभाग नोंदवावा, जलमित्र बनून यात सहभागी होण्याची संधी शहरी युवकांना यातून मिळणार आहे. राज्यातील सर्वच तरूणांनी यामध्ये सहभाग घेऊन दुष्काळावर मात करण्याचे अवाहन अभिनेता आमिर खानने केले आहे.
मेट्रो स्टेशनांवर‘नॉइज बॅरियर’
पुणे : मेट्रोमुळे होणाऱ्या संभाव्य ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी महत्त्वाच्या मेट्रो स्टेशनांवर 'नॉइज बॅरियर' बसविण्यात येणार असल्याचे संकेत 'महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन'ने (महामेट्रो) शुक्रवारी दिले. प्रवाशांची सर्वाधिक वर्दळ आणि आजूबाजूला नागरीवस्ती असलेल्या ठिकाणी 'नॉइज बॅरियर' बसविण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे 'महामेट्रो'ने स्पष्ट केले.
पासपोर्टसाठी ‘चॅटबोल’
पुणे - पासपोर्टच्या अर्जात ‘स्पेलिंग मिस्टेक’ झाली तर काय करायचे? तत्काळ पासपोर्ट मिळविण्यासाठी काय करायचे? मुदतबाह्य पासपोर्ट ‘रिन्यू’ करण्यासाठी काय करावे लागते, अशा स्वरूपाचे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील... अशा वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना न थकता, न चिडता, शॉर्टकट न मारता उत्तरे देण्याचा निश्चय पासपोर्ट कार्यालयाने केला आहे.
यावर्षी पेट्रोल – डिझेल दरवाढीने केला उच्चांक
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असून, कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने पेट्रोलच्या दरात ५ वर्षांत प्रथमच मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी वाढ आहे. राजधानी दिल्लीत आज पेट्रोलची किंमत ७४ रुपये ८ पैसे प्रति लीटर आहे. सप्टेंबर २०१३ नंतर ही सर्वात मोठी वाढ आहे.तर डिझेलचे दर ६५ रुपये ३१ पैसे प्रति लीटरवर पोहचले आहेत. मुंबईमध्ये पेट्रोल ८१ रुपये ९३ पैसे झाले आहे.
चाफ्यांसोबत फुलली काव्य सुमने
चिंचवड –
जर खरेच संयम आहे, जगण्याचे दुसरे नाव,
तर भरून जावा सारा, चाफ्याने आपुला गाव
जर खरेच संयम आहे, जगण्याचे दुसरे नाव,
तर भरून जावा सारा, चाफ्याने आपुला गाव
अशी आशावादी काव्यसुमने फुलवित ज्येष्ठ कवी अशोक कोठारी यांनी कवी संमेलनाची रंगत वाढवली. निमित्त होते, शब्दधन काव्यमंच, समरसता काव्यमंच व स्वयंसिद्धा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चाफा बोलेना या कवी संमेलनाचे.
“पॅनकार्ड क्लब’ छोट्या गुंतवणुकदारांना परतावा?
“सेबी’चे मुख्य वसुली अधिकारी डी. व्ही. शेखर यांची माहिती
पुणे – पॅनकार्ड कल्ब कंपनीच्या गुंतवणुकदारांची माहिती तपासणी “सेबी’ अर्थात सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने पूर्ण केली आहे. देशभरातील सुमारे 51 लाख नागरिकांची यामध्ये फसवणूक झालेली आहे. यातील 25 लाख हे छोटे गुंतवणूकदार आहेत. त्यामुळे सुरूवातीच्या लिलाव प्रक्रियेतून फक्त 300 कोटी मिळाले, तरी त्यातून 25 लाख गुंतवणूकदारांचा परतावा मिळू शकतो, अशी माहिती सेबीचे मुख्य वसुली अधिकारी डी. व्ही. शेखर यांनी दिली.
पीसीसीओईच्या विद्यार्थ्यांची आता सांस्कृतिक क्षेत्रातही घौडदौड
चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकृर्डीतील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (पीसीसीओई) विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रातही यशस्वी घौडदौड सुरु आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने 19 वी राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात संपन्न झाली. यामध्ये राम गणेश गडकरी एकांकिका स्पर्धा करंडक मध्ये पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘एंट्री एक्झिट’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला आणि उत्कृष्ट अभिनय व दिग्दर्शक अथर्व ठाकरे, उत्कृष्ट संगीत विभाग व्दितीय क्रमांक वेदांत सेलमोकर, श्रध्दा टिल्लू, उत्कृष्ट नेपथ्य सुयश साळवेकर, अभिषेक बिल्दीकर यांनी चार वैयक्तिक बक्षिसे मिळवून पीसीसीओईचे नावात मानाचा तुरा रोवला.
Subscribe to:
Posts (Atom)