Tuesday, 27 March 2018

बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाचे रूप पालटणार

पिंपरी - चिंचवड-संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयामध्ये काळानुरूप विविध बदल केले जाणार आहेत. प्राणी आणि पक्ष्यांचा येथील वावर अनुकूल व्हावा, यासाठी नैसर्गिक वातावरण निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे हे प्राणिसंग्रहालय भविष्यात पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल. 

सांगवी रुग्णालयात सुविधांची वानवा

पिंपरी - सांगवी येथील रुग्णालयाला सध्या विविध वैद्यकीय सुविधांची प्रतीक्षा आहे. छोट्याशा जागेत असलेल्या या रुग्णालयात महिलांच्या प्रसूतिगृहाची प्रामुख्याने व्यवस्था आहे. मात्र, सोनोग्राफी आणि तातडीच्या प्रसूती शस्त्रक्रियेसाठी महिलांना सांगवी फाटा येथील पुणे जिल्हा रुग्णालय किंवा महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात जावे लागते. 

पिंपरी-चिंचवड प्राधिकरण ‘पीएमआरडीए’त होणार विलीन

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए) पुणे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) विलीन करण्याचा निर्णय मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी (दि.26) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे प्राधिकरणाची सर्व मालमत्ता व जागा पीएमआरडीएकडे हस्तांतरीत केली जाणार आहे. मुंबईत झालेल्या या बैठकीत पीएमआरडीएचे अध्यक्ष किरण गित्ते, महापौर नितीन काळजे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, आयुक्त श्रीकर परदेशी, मावळचे आमदार बाळा भेंगडे आदी उपस्थित होते. बैठकीत प्राधिकरणाचे पीएमआरडीएमध्ये विलिन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय झाला.

बोपोडीतील कोंडी सुटणार

पिंपरी - जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावरील बोपोडी येथील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महापालिकेने रस्ता रुंदीकरण सुरू केले आहे. मात्र, हा भाग सलग नाही. काही मिळकती संपादित कराव्या लागणार आहेत. त्याचे संपादन झाल्यास सुमारे एक किलोमीटरचा रुंद रस्ता वाहनचालकांना मिळेल. त्यातून ही कोंडी सुटण्यास मदत होऊ शकतो. याच भागात मेट्रो रेल्वेचे कामही एप्रिलमध्ये सुरू होईल. त्या वेळी रस्ता रुंदीकरण केलेला काही भाग वाहनांना पर्यायी रस्ता म्हणून उपलब्ध होऊ शकेल, अन्यथा येथील वाहतूक अन्य मार्गाने वळवावी लागेल.

लोहमार्गालगतच्या अनधिकृत घरांची डोकेदुखी

पुणे - शहर व परिसरातील लोहमार्गांजवळील रेल्वेच्या जागांवरील अनधिकृत घरांचा प्रश्‍न मध्य रेल्वेसाठी डोकेदुखी झाला आहे. तो सोडविण्यासाठी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. विधी मंडळाचे अधिवेशन झाल्यावर महापालिका, रेल्वे आणि गृहनिर्माण सचिवांसोबत बैठक घेऊन तो सोडविणार आहे, अशी माहिती खासदार अनिल शिरोळे यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी दिली. या घरांच्या पुनर्वसनासाठी धोरण ठरविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. 

खोदलेले रस्ते बुजविण्याच्या कामात धूळफेक

पिंपरी-चिंचवड शहरात रस्त्यांवर पावसाळ्यात पडलेले खड्डे बुजविण्यासाठी तब्बल 8 कोटी 32 लाख 41 हजार 772 रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मात्र, संबंधित निविदा प्रक्रिया ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने खासगी कंपन्या व पालिकेने भूमिगत वाहिन्यांसाठी खोदलेले रस्ते बुजविण्यासाठी काढण्यात आल्याचा उल्लेख स्थायी समितीच्या विषयपत्रिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात खोदून ठेवलेले रस्ते व पदपथ दुरुस्तीचे काम संबंधित ठेकेदार करणार नाही. स्थापत्य विभागाकडून धूळफेक करणारा हा विषय मंजुरीसाठी ‘स्थायी’च्या बुधवारच्या (दि.28) सभेपुढे ठेवण्यात आला आहे.  

मेट्रो प्रकल्प, रिंगरोडला सर्वाधिक निधी

शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित रिंगरोड आणि हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी भरीव तरतूद करण्यात आलेल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दोन हजार ५९१ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला सोमवारी मंजुरी देण्यात आली. वाहतूक प्रकल्पांसह 'पीएमआरडीए'च्या म्हाळुंगे येथील नियोजित नगररचना योजना (टीपी स्कीम) आणि पाणीपुरवठा, रस्ते-पूल बांधणी, अग्निशामक केंद्र या प्रकल्पांसाठी आवश्यक तरतुदी करण्यात आल्या आहेत.

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे जलपर्णीमुक्त पवनामाई अभियानाचे 141 दिवस पूर्ण

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आयोजित जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम या अभियानाचा 141 वा दिवस केजुबाई बंधारा थेरगाव बोट कल्ब येथे पार पडला.

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे जलपर्णीमुक्त पवनामाई अभियानाचे 141 दिवस पूर्ण

आतापर्यंत पिंपरी महापालिकेचे 22 कर्मचारी ‘लाच’प्रकरणी जाळ्यात

महापालिकेसंदर्भातील काम करण्यासाठी अधिकारी लाच मागतात. विशिष्ट रकम अदा केल्यानंतरच ‘फाईल’ पुढे सरकते. असे खाबूगिरी करणारे अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (एसीबी) कचाट्यात अडकत आहेत. भाजपच्या ‘पारदर्शक’ कारभार्‍यांच्या काळातच अशी प्रकरणे मोठ्या संख्येने उघड होत असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या 26 वर्षांत तब्बल 22 अधिकारी खाबूगिरीत सापडले आहेत.

बसचा ‘टाईम’ नाही ‘सेट’ नागरिकांना करावा लागतोय ‘वेट’

निगडी बसस्टॉप येथून येरवडा व कोरेगाव पार्क येथे जाण्यासाठी कमी बसची संख्या आहे. बसच्या येण्या-जाण्याचीही वेळ लावण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना दीड तास बसची वाट पाहावी लागत आहे. त्याबाबत संबंधितांशी संपर्क साधल्यास ते उद्धट बोलत आहेत. त्यामुळे बसचा ‘टाईम’ नाही ‘सेट’ नागरिकांना करावा लागतोय ‘वेट’ असे चित्र निगडी बसस्टॉपवर आहे. कामानिमित्‍त निगडीतून पुण्याला जाण्यासाठी भक्‍ती-शक्‍ती व निगडी पवळे उड्डाणपुलाखाली नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली असते.

शहरात अनधिकृत जाहिरात फलकांचे पेव

पिंपरी - शहरातील विविध भागांमध्ये अनधिकृत जाहिरात फलकांचे पेव फुटले असून, जागा मिळेल तिथे हे फलक लावण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागातर्फे गेल्या महिनाभरात ३० मोठी होर्डिंग्ज हटविली; तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडून कारवाई करण्यात आली.

शहरात ठिकठिकाणी बेवारस वाहने पडून

पिंपरी - शहरासह उपनगरात ठिकठिकाणी बेवारस वाहने धूळ खात पडून आहेत. या वाहनांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून, अन्य महापालिकांप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही बेवारस वाहने संकलित करून त्यांचा लिलाव केल्यास महसूल तर मिळेलच तसेच रस्त्यावर अडवलेली जागाही मोकळी होईल. ती वाहने चोरीची असल्यास संबंधितांना ती परत मिळू शकतात. 

‘बबन’च्या कलाकारांचे पिंपरीत भव्य स्वागत

चौफेर न्यूज –  राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक भाऊसाहेब क-हाडे यांचा बहुचर्चित मराठी चित्रपट‘बबन’चा शुक्रवारी पिंपरीतील विशाल ई-स्क्वेअर  दिग्दर्शक क-हाडे व चित्रपटातील सर्व कलाकारांच्या उपस्थितीत प्रिमियर शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी कलाकार भाऊसाहेब शिंदे, गायित्री जाधव, देवेंद्र गायकवाड, अभय चव्हाण, योगेश डिंबळे, पिंपरी चिंचवड मधील स्थानिक कलाकार जान्हवी कांबीकर, स्वप्निल पटेकर, नितीन वाघ या कलाकारांची शरदनगर चिखली येथून विशाल ई-स्क्वेअर पर्यंत वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. प्रिमियर शो ला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

Event: Pune Data Conference, 31 March

Pune Data Conference 2018 is a one-day conference on 31st March, at Westin Pune, from 8:30am to 6pm. It features 3 tracks of talks from topics in big-data, AI and ML, IoT, Cloud and Containerization.

अपंगांच्या स्वावलंबन आरोग्य विम्याचे अर्ज हाऊसफुल; लाभ बंद

अपंगांच्या स्वावलंबन आरोग्य विम्याचे अर्ज हाऊसफुल; लाभ बंद

कुत्र्यांच्या बंदोबस्ताला नियमांचा अडथळा

पिंपरी - निर्बीजीकरण शस्त्रक्रिया, उपचार किंवा पिसाळलेले असले, तरच भटक्‍या कुत्र्यांना नियमानुसार पकडता येते. अन्यथा इतर कोणत्याही कारणासाठी पकडून डांबून ठेवता येत नाही. एका भागातून पकडून दुसऱ्या भागात सोडता येत नाही. त्यामुळे भटक्‍या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणणे हाच पर्याय प्रशासनापुढे आहे. 

शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा; राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अमित बच्छाव यांची मागणी

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांना गेल्या कित्येक दिवसांपासून भटक्या,मोकाट कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसाआड कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत. शहरात विविध भागांत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव चालू असून, त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

रिक्षा चालकांसाठी लवकरच महामंडळ

पिंपरी – महाराष्ट्रातील 20 लाख रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आहे. लवकरच महामंडळाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. रिक्षा चालकांना कल्याणकारी मंडळाचा लाभ देण्यात येईल, असे आश्‍वासन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले आहेत, अशी माहिती ऑटो रिक्षा कृती समितीचे सरचिटणीस बाबा कांबळे यांनी दिली.