MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 16 July 2018
पिंपरी शहरात 100 ठिकाणी ‘ई-टॉयलेट’
स्मार्ट सिटी अधिक सुंदर ठेवण्यासाठी शहरातील रस्ते आणि उद्यानामध्ये तब्बल 100 ‘ई-टॉयलेट’ बांधण्यात येणार आहेत. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉसिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत ही योजना राबविण्यात येणार आहे. सदर टॉयलेट वापरासाठी नागरिकांना कोणतेही शुल्क अदा करावे लागणार नाही.
प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आयुक्तांचे आदेश
पिंपरीतील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढणे; तसेच विकास आराखड्याची अंमलबजावणी आणि बहुचर्चित भाजी मंडई बांधण्याच्या कामी रस्ता व आरक्षणात बदल करणे याकामी तातडीने कार्यवाही करा, असे आदेश आयुक्त श्रवण हर्डीकर यांनी शनिवारी (१४ जुलै) दिले. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांसाठी शिवसेना आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांची आयुक्तांबरोबर बैठक झाली.
पवना जलवाहिनी ‘भिजत’च
नागपूर - पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पवना धरण ते निगडी जलशुद्धीकरण केंद्रा दरम्यानची जलवाहिनी हा महत्त्वाचा प्रकल्प लवकर पुन्हा सुरू करण्यासाठी शासकीय पातळीवर हालचाली होण्याची आवश्यकता आहे. या नियोजित प्रकल्पाचा खर्च सध्याच दुपटीने वाढला असून, प्रकल्प गुंडाळल्यास सुमारे दोनशे कोटी रुपये वाया जाणार आहेत. राजकीय पातळीवर हालचाली होण्याची आवश्यकता आहे.
बीआरटी बसथांबा काढल्याने सामान्यांमध्ये नाराजी
नवी सांगवी (पुणे) : रहाटणी साईचौक येथील बीआरटी बसथांबा महापालिका प्रशासनाकडून काढण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. विकास कामांच्या नावाखाली फोडतोड करून जनतेच्या पैशाची उधळपट्टी करीत असल्याचा आरोप पिंपळे सौदागर व रहाटणी परिसरातील नागरिकांनी ' सकाळ ' च्या माध्यमातून केला आहे. साई चौक स्पॉट 18 समोरील बीआरटी बस थांबा दोन तीन दिवसांपासून जेसीपी द्वारे काढत असल्याचे दृश्य येथील स्थानिकांना पहायला मिळत आहे.
‘रिंगरोड’मध्ये वाचणार अडीच हजार कोटी
पुण्याच्या रिंगरोडमध्ये तब्बल अडीच हजार कोटी रुपये वाचणार असून केंद्राने नवीन प्रकल्प खर्चाचा अहवाल मागविला आहे. पूर्वी पुणे महानगर प्राधिकरणाने प्रतिकिलो मीटरला 70 कोटी रुपये खर्च येईल असा अहवाल दिला होता. मात्र केंद्राने नव्याने अहवाल मागविला असून यामध्ये प्रतिकिलोमीटरला 40 कोटी रुपये खर्च करण्यास सूचविले आहे. यामुळे तब्बल अडीच हजार कोटी रुपये वाचणार असल्याची माहिती पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी ‘पुढारी’बरोबर बोलताना दिली.
Activist exposes hell at PCMC dog pound
Police complaint filed over failure of ABC programme in twin towns, as dogs die in droves at ‘shelter’; municipal chief admits to ‘problems’
Pockmarked roads in PCMC areas every commuter's daily nightmare
Pimpri Chinchwad: Several potholes have sprung up on roads i ..
Pune Mahanagar Parivahan Mahamandal limited distributes over 22000 student concession forms
The Pune Mahanagar Parivahan Mahamandal limited (PMPML) has distributed over 22,000 concession forms to students in the city to avail discounts while travelling on its buses.
हॅरिस पुलाची दुरुस्ती लवकरच
पिंपरी - जुन्या हॅरिस पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिटचे काम पूर्ण झाले असून, लवकरच त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. पुलाचे काम पूर्ण होण्यास सात ते आठ महिने लागणार आहेत. त्यामुळे या कालावधीत हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या कामासाठी दीड ते दोन कोटींचा खर्च येणार आहे.
‘प्रा. मोरे प्रेक्षागृहा’चे काम संथ गतीने
पिंपरी - चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाचे महापालिकेतर्फे गेल्या अडीच महिन्यांपासून नूतनीकरण सुरू आहे. मात्र, कामाचा वेग पाहता दिलेल्या मुदतीत ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.
अतिक्रमणातील जप्त वस्तुंसाठी हजारोंचा भुर्दंड
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात अतिक्रमण करुन तुम्ही व्यवसाय करत असाल, तर ते तुम्हाला भलतेच महागात पडणार आहे. कारण अतिक्रमण कारवाई अंतर्गत जप्त केलेल्या वस्तु परत मिळविण्यासाठी आता हजारो रूपये मोजावे लागणार आहेत. या वस्तु परत देण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या प्रशासकीय शुल्कात भरमसाठ वाढ करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेकरिता ठेवण्यात आला आहे.
खोदकामासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका राबविणार नवे धोरण
फोटो व व्हीडिओ शूटिंग देणे बंधनकारक
परवानगीसाठी जूननंतर स्वीकारले जाणार अर्ज
परवानगीसाठी जूननंतर स्वीकारले जाणार अर्ज
भाजप पदाधिकारी आणि प्रशासनकर्ते मस्त तर शहरवासीय झाले त्रस्त
15 दिवसात शहर खड्डे मुक्त करा, अन्यथा तीव्र आंदोलन
खड्यांवरुन विरोधी पक्षनेत्याने डागली तोफ
खड्यांवरुन विरोधी पक्षनेत्याने डागली तोफ
मिनी मॅरेथॉनमध्ये अधिकार्यांसह धावले 172 जण
जनजागृतीसाठी राबविला उपक्रम
पिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये मतदार नावनोंदणी उपक्रम होणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी, मतदारांना आपले नाव नोंदणी करावी याबाबत जनजागृती करण्यासाठी या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. मतदारांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने 305, चिंचवड विधानसभा मतदार संघाच्यावतीने आज (शनिवारी) मतदान नोंदणी अभियानांतर्गत पुनावळे ते थेरगाव दरम्यान आयोजित केलेल्या मिनी मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपजिल्हा निवडणूक अधिकार्यांसह 172 जण या मिनी मॅरेथॉनमध्ये धावले.
शहरातील वाहनतोडफीचे सत्र थांबेना
पिंपळेनिलखमध्ये वाहनांची तोडफोड
पिंपरीः पिंपरी-चिंचवड शहरातील वाहन तोडफोडीचे सत्र काही केल्या थांबेना झाले आहे. शुक्रवारी चिंचवड मोहननगर येथे अज्ञातांनी सात वाहनांची तोडफोड केली होती. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पिंपळे निलख येथे रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची अज्ञातांनी तोडफोड केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. पिंपळे निलख येथे रस्त्यांवर आणि घरांच्या पार्किंगमध्ये उभा केलेल्या वाहनांची अज्ञातांनी शुक्रवारी मध्यरात्री तोडफोड केली. टोळक्याने सात वाहनांच्या काचा फोडून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी मयूर दिलीप मदने (वय 30, रा. विनायकनगर, पिंपळे निलख, सांगवी) याने फिर्याद दिली आहे.
पदाधिकारी कार्यालयातील कर्मचार्यांमध्ये नाराजी
अतिकालिक भत्त्यांवर येणार संकट
पिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसचिव कार्यालयांतर्गत येणार्या पदाधिकार्यांच्या कार्यालयातील स्वीय सहाय्यक, शिपाई यांच्या कामकाज वेळात बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचा अतिकालिक भत्त्यांवर संकट येणार आहे. यामुळे कर्मचारी वर्गामध्ये नाराजी पसरली आहे. महापालिकेच्या तिसर्या मजल्यावर महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, विधी समिती, महिला व बालकल्याण समिती, शहर सुधारणा समिती, विविध पक्षांचे गटनेते यांची कार्यालये आहेत. तिसर्या मजल्यावर एकूण स्वीय सहाय्यक आणि शिपाई असे 51 कर्मचारी आहेत. या कर्मचार्यांना 1800 रुपये भत्ता दिला जातो. परंतु, प्रशासनाने अतिकालिक भत्त्यामध्ये बचत करण्याचे धोरण आखले आहे. त्यामुळे कर्मचार्यांच्या कामकाजाचा वेळा बदलण्यात येणार आहेत. त्यानुसार एका कर्मचार्याला सकाळी दहा ते पावणेसहा अशी जनरल शिफ्ट तर दुसर्या कर्मचार्याला दुपारी 12 ते रात्री पावणेआठ असे करण्याचे नियोजन आहे.
बिल्डरांची माहिती देत नसल्यामुळे लोकप्रतिनिधींकडून महिला कर्मचारी टार्गेट; प्रशासनाची बघ्याची भूमिका
कर्मचारी महिलेच्या बदलीसाठी सत्ताधारी-विरोधकांनी लावला जोर; ‘ई’ प्रभागात एका महिलेविरुध्द पुढारी मंडळी एकवटले
सव्वादोनशे जणांनी केली सायकलवर पंढरीची वारी!
पिंपरी (Pclive7.com):- इंडो सायकलिस्ट क्लब (आयसीसी) तर्फे आयोजित यंदाच्या तिसऱ्या ‘पुणे-पंढरपूर-पुणे’ सायकलवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे सव्वादोनशे सायकलपटूंनी दोन दिवसांत ४७० किलोमीटरचे अंतर पूर्ण केले. तसेच, विठ्ठलाचे मनोभावे दर्शनही घेतले.
पिंपरीत धनगर महासंघाच्यावतीने ‘आरक्षण स्मरण’ आंदोलन
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर धनगर समाज महासंघाच्या वतीने आज पिंपरीतील अहिल्यादेवी होळकर पुतळ्यासमोर सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आरक्षण स्मरण आंदोलन घेण्यात आले. धनगर आरक्षणाच्या मुद्यावरुन बारामती येथे झालेल्या धनगर समाजाच्या आरक्षण आंदोलनास आज १५ जुलै रोजी ४ वर्षे पुर्ण झाली. या ऐतिहासीक आंदोलनाचे स्मरण शहरातील सर्व धनगर समाजास व्हावे या हेतुने हे आंदोलन करण्यात आले.
Twitterati helps cops nab traffic violators
PUNE: At a time when social media is receiving flak for spre ..
असंवेदनशील रुग्णालय अन् हतबल नातेवाईक
पिंपरी : ह्रदयविकाराचा झटका आलेल्या मजुरास खासगी रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. मात्र आम्ही रुग्णावर उपचार केले असून त्याचे बिल भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात देणार नसल्याचे सांगितले. मृतदेह ताब्यात द्यावा यासाठी रुग्णालय प्रशासनाशी गयावया करताना त्याची पत्नी बेशुद्ध पडली. तरीही रुग्णालयास आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. अखेर त्याच्या मित्र मजुरांनी पैसे जमा करीत दीड हजार रुपये जमविल्यावर रुग्णालयाने मृतदेह ताब्यात दिला. या घटनेतून रुग्णालयाची असंवेदनशीलता पुन्हा एकदा समोर आली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)