महापालिकेकडून सुविधा देण्याकरिता नागरी सुविधेचे नियोजन केले जाते. मात्र वाढती लोकसंख्या व अनाधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणामुळे महापालिकड़ून नागरीकांना सुविधा पुरविताना अडचणी येतात. अशा वेळी नाईलाजाने बांधकामे पाडावी लागतात, अशी स्पष्टोक्ती महापालिकेचे माजी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिली.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 13 February 2014
'घरकुल' विकू नका ; महापौरांचे आवाहन
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'घरकुल' प्रकल्पातील लाभार्थ्यांनी परिसरात स्वच्छता ठेवावी. घरकुल भाड्याने देऊ नये अथवा विकू नये, असे आवाहन महापौर मोहिनी लांडे यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या घरकुल प्रकल्पातीलa
महापालिका राबविणार शहरी आरोग्य अभियान
केंद्र सरकारचे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आराखड्यास मान्यता मिळविण्यापासून मुलभूत सुविधा, वैद्यकीय उपकरणे, औषधे, संगणक आदी सर्व सुविधांसाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होणार आहे. या निधीतुनच महापालिकेतर्फे अभियानाचा खर्च करण्यात येणार आहे.
पिंपरी पालिकेचे करवाढ नसलेले ३४०० कोटींचे अंदाजपत्रक
कोणतीही करवाढ नसलेले पिंपरी महापालिकेचे २०१४-२०१५ या आर्थिक वर्षांसाठीचे ‘जेएनएनयूआरएम’च्या २१०६ कोटींसह एकूण ३४०० कोटी खर्चाचे अंदाजपत्रक आयुक्त राजीव जाधव यांनी सादर केले.
‘भारतरत्न’ जेआरडी टाटा उड्डाणपूल! - पिंपरी पालिकेकडून नावात दुरुस्ती
पिंपरी पालिकेच्या कासारवाडी-नाशिकफाटा दुमजली उड्डाणपुलाला ‘भारतरत्न जेआरडी टाटा’ असे नाव देण्यात आले असताना त्यात ‘भारतरत्न’ हा शब्द लिहायचे राहून गेल्याची चूक पालिकेने बुधवारी सुधारली.
नाशिकफाट्यावरील प्रकाश व्यवस्थेचा ...
नाशिकफाटा उड्डाणपुलाखाली सेवा रस्त्यावर प्रकाश व्यवस्था करण्याचे काम रद्द झाल्याने या कामाच्या खर्चातून च-होली येथील मुख्य रस्त्यावर प्रकाश व्यवस्था करण्यात येणार आहे. या सुधारीत कामासाठी 40 लाख रूपये खर्च अपेक्षित आहे.
'बीव्हीजी'ची बँक गॅरंटी जप्त ...
दापोडी ते निगडी बीआरटीएस रस्त्यावरील बसथांबे, स्वच्छतागृह उभारण्यासाठी करण्यात आलेल्या करारनाम्याचा बीव्हीजी इंडियाने भंग केल्याचा आरोप मनसेने केला आहे. त्यांची बँक गॅरंटी जप्त करुन त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
नेत्यांच्या वाढदिवसांनिमित्त पिंपरीत चौकाचौकात रंगले फलकयुद्ध
पिंपरी-चिंचवडच्या बडय़ा नेत्यांचे सलगपणे येणाऱ्या वाढदिवशी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची जोरदार चढाओढ दिसून येत आहे. शुभेच्छांच्या जाहिराती व फलकबाजीचे प्रमुख चौकांमध्ये अघोषित युद्ध रंगले आहे.
पिंपरीतील चहावाल्यांचा संपर्क ना संवाद!
पिंपरी : भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या ‘चाय पे चर्चा नमो के साथ’ या उपक्रमांतर्गत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद मोदी यांच्याशी देशातील चहावाल्यांशी संवाद साधला. या चर्चेचे चापेकर चौक, चिंचवड येथील सोनाली अमृततुल्यसमोर आयोजन केले होते. महाराष्ट्रातील दीडशे, तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील चार चहावाल्यांशी संवाद साधणार होते. मात्र, सॅटेलाईटद्वारे अहमदाबाद येथील केंद्राशी संपर्क साधू न शकल्याने शहरातील चहावाल्यांशी संवाद होऊ शकला नाही.
गोपीचंद बोरकर यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन
निगडीतील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाचे मराठीचे अध्यापक गोपीचंद बोरकर यांनी लिहिलेल्या 'प्रकाशयात्री' या कवितासंग्रहाचे प्रकाशन मंगळवारी (दि. 18) ज्येष्ठ कवी उद्धव कानडे व शिक्षणतज्ज्ञ वामनराव अभ्यंकर यांच्या हस्ते होणार आहे.
Subscribe to:
Posts (Atom)