Tuesday, 17 July 2018

कचऱ्यावर प्रक्रियाच, डंम्पिंग यार्डला यापुढे परवानगी नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नागपूर : राज्यातील एकाही शहरात पुढे कचरा साठवण्यासाठी डंपिंग यार्डला मंजुरी दिली जाणार नाही. कचऱ्याचा पुनर्वापर प्रक्रियेशी संबंधित उद्योगाची उभारणी सर्वच ठिकाणी बंधनकारक केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ग.दि. माडगूळकर नाट्यगृहाचे काम अद्याप अर्धवट

पिंपरी - प्राधिकरण, पेठ क्रमांक 26 येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाच्या कामासाठी मुदतवाढ दिल्यानंतरही हे काम अद्याप अर्धवट आहे. 37.5 कोटी रुपये खर्च करून उभारल्या जाणाऱ्या या नाट्यगृहाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी वर्षभराचा कालावधी लागणार आहे. शहरातील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह (चिंचवड), आचार्य अत्रे रंगमंदिर (संत तुकारामनगर) ही नाट्यगृहे सध्या नूतनीकरणासाठी बंद आहेत. त्यामुळे सध्या नाटकांसाठी नटसम्राट निळू फुले रंगमंदिर (पिंपळेगुरव) आणि अंकुशराव लांडगे नाट्यगृह (भोसरी) ही दोनच नाट्यगृहे उपलब्ध आहेत. पर्यायाने, नाट्य कलाकार आणि नाट्यप्रेमींचा हिरमोड होत आहे. 

‘पवना’ ७० टक्के भरले

मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवडची तहाण भागवणार्‍या पनवा धरण परिसरात गेल्या चोवीस तासांपासून  जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पवना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली असून, धरण 69.37 टक्के भरले आहे.  पवना धरण परिसरात बारा तासांत 135 मिलीमीटर पावासाची नोंद झाली आहे. तर परिसरात एक जूनपासून 1686 मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे. धरणाची पातळी 2007 फूट एवढी झाल्याची  माहिती धरणाचे शाखाधिकारी ए. एम. गदवाल यांनी दिली

Eminent citizens write to PM on road safety

Prominent among the 70 signatories to the letter are noted astrophysicist Jayant Narlikar, economist Vijay Kelkar, Thermax chairperson Meher Pudumjee, Rajya Sabha MP Anu Aga and actors Mohan Agashe and Naseeruddin Shah.

जिल्हाधिकार्‍यांचाही सहभाग

पिंपरी-चिंचवड शहरातील ‘हार्ट’ अशी ओळख असलेल्या पिंपरी कॅम्पातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मिलिटरी डेअरी फार्म उड्डाणपूला संदर्भात संरक्षण विभागाची रखडलेली मंजूरी शिवसेनेच्या दोन्ही खासदारांच्या प्रयत्नाने सोडविणे तसेच स्मशानभूमी ते सुभाषनगर हा विकास आराखडयातील रस्ता विकसित करावयास घेण्याच्या कामाला प्रारंभ करण्याचे आदेश आयुक्तांनी यावेळी दिले. पिंपरी येथील सिंधी बांधवांना निर्वासित क्षेत्र जाहीर केल्यानंतर सनद देण्याबाबत महसुलमंत्र्यांच्या सुचनेनुसार नगरभूमापन अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयांच्यावतीने संयुक्त सर्व्हे करण्याच्या कामास पुढील आठवडयात सुरूवात करण्याचा निर्णय झाला. या बैठकीत दूरध्वनीवरून पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीही सहभाग घेतला.

पाणी प्रश्नाबाबत आमदार लांडगे यांची मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक

पिंपरी-पिंपरी-चिंचवड शहरातील राज्य सरकारशी प्रलंबित प्रश्न आणि आंद्रा व भामा-आसखेड धरणातून शहरवासियांसाठी पाणी आणण्याची योजना तसेच रखडलेला बंद पवना जलवाहिनी प्रकल्प या महत्वाच्या विषयावर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी येत्या शुक्रवारी 20 आणि शनिवारी 21 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन व अधिका-यांसमवेत नागपूर येथील पावसाळी अधिवेशनात बैठक आयोजित केली आहे.

पिंपरी चिंचवडच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलवली गुरूवारी बैठक

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांसंदर्भात स्वतंत्र बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलवली आहे. ही बैठक गुरूवार दि.१९ व दि.२० जुलै रोजी नागपूर येथे मुख्यमंत्र्यांनी बोलवली आहे. शहरातील प्रश्नांवर चर्चा करणार आहेत. या बैठकीला चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना बोलविले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

फडणवीस , गडकरी २३ जुलैला पिंपरीत

 सिंहासन न्यूजः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय जल तसेच रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी येत्या २३ जुलै रोजी पिंपरी-चिंचवड शहराला भेट देत आहेत. दोन्ही नेते शहरात  प्रथमच एकत्रितपणे दौऱ्यावर येत आहेत. 

एमएसआरडीसीच्या रिंगरोडची आखणी अंतिम टप्प्यात - मुख्यमंत्री

पुणे - पुणे जिल्ह्यात दोन रिंगरोड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोडच्या फेरआखणीचे काम अंतिम टप्प्यात असून, ते झाल्यानंतर भूसंपादनाचा प्रस्ताव तयार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले. त्यामुळे पीएमआरडीएबरोबरच एमएसआरडीसीचा रिंगरोड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात केवळ ३४९ खड्डे

महापालिका प्रशासनाचा दावा; २०३० खड्डे बुजवल्याची माहिती

[Video] पिंपरी: आझादनगर, संग्रामनगरमध्ये घरांमध्ये फूटभर पाणी

निगडी : संततधार पावसाने पालिकेच्या कारभाराच्या मर्यादा उघड झाल्या. सेक्टर २२ मधील आझादनगर, संग्रामनगरमधील दीडशेच्या आसपास घरांमध्ये पाणी शिरले. हा परिसर जलमय झाला असून पालिकेच्या ढिसाळ कारभारविरोधात संग्रामनगरमधील नागरिकांनी भक्ती शक्ती चौक आज (१६ जुलै) अर्धा तास रोखून धरीत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. यावेळी वाहतूक कोंडी झाली होती.

देहू-आळंदी मार्ग खड्ड्यात

देहुरोड – तीर्थक्षेत्र देहू येथील देहू ते तळवडे दरम्यानचा देहू-आळंदी मार्ग खड्डेमय झाले असून, रस्त्यावरच पाणी साचल्याने वाहन चालकाला वाहन चालवणे आणि पादचाऱ्यांना चालणे धोकादायक बनले आहे.

मैदानावर चिखलातुन गाडी नेणे पडतेय महागात

सांगवी - येथील पी.डब्ल्यु.डी.मैदानावर गाडी शिकण्यासाठी नेहमी गर्दी असते. तर जुनी सांगवी नवी सांगवीकडे या मोकळ्या मैदानातुन जाण्यासाठी शॉर्टकट म्हणुन अनेकजण येथुन गाड्या घेवुन जातात. आनेक चारचाकी वाहनेही येथे नागरीक लावतांना दिसतात. संततधार पावसामुळे मैदानावर चिखल झाला आहे. परंतु काही अती उत्साही तरूण चिखलातुन गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. अशाच एका अती उत्साही तरूणाला येथुन गाडी घेवुन जाण्याचा प्रयास नडला. मैदानावरील लाल चिखलात गाडी रूतल्याने या तरूणासोबतच ईतर नागरीकांची गाडी बाहेर काढण्यासाठी तारांबळ उडाली. अखेर ईतर नागरिकांच्या प्रयत्नामुळे गाडी बाहेर काढण्यात यश आले. 

योग्य पाणीपुरवठा करावा अन्यथा आंदोलन; नगरसेविका अश्विनी गजानन चिंचवडे यांचा ईशारा

चिंचवड: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ब्रीद वाक्य म्हणजे ”कटिबद्धा जनहिताय” यास अनुसरुन सर्वांना समान, शुद्ध आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करणे हे महापालिकेचे आद्य कर्तव्य आहे. परंतु गेले आठ दिवस ऐन पावसाळ्यात चिंचवड परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत असून पाणीपुरवठा विभागाकडून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जात आहे.

[Video] सिंधी बांधवांचे चालीय उपास सुरू


पीसीएमसी इलेव्हन, अस्पात ऍकॅडमी यांची विजयी सलामी

अजितदादा चषक हॉकी स्पर्धा

पुणे:पीसीएमसी इलेव्हन आणि अस्पात ऍकॅडमी यांनी जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करताना आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर सहज विजय मिळवत अजितदादा चषक हॉकी स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडीयम, नेहरूनगर येथे ही राज्यस्तरीय स्पर्धा सुरु आहे.

पाचाणे मावळ येथील वनजमिनीवर ३ हजार झाडांची लागवड

पिंपरी (Pclive7.com):- निगडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाने आयोजित केलेल्या विशेष वृक्षारोपण मोहिमेमध्ये कासारसाईजवळील पाचाणे येथील वनजमिनीवर आज २१० निसर्ग मित्र व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे तीन हजारांपेक्षा जास्त बांबूची झाडे लावली.  

बनावट मृत्यू दाखला करण्याचा शिपायाचा प्रताप

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयातील शिपायाने बनावट मृत्यू दाखला तयार करण्याचा प्रताप उघडकीस आला आहे. याशिवाय विनापरवाना गैरहजर राहण्यामुळे त्याच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.