MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 25 October 2017
‘सारथी’कडे दुर्लक्ष
पिंपरी - नागरिकांना महापालिकेकडे तक्रार करता यावी आणि त्या समस्येचे निराकरण व्हावे, यासाठी महापालिकेने चार वर्षांपूर्वी ‘सारथी’ ही हेल्पलाइन सुरू केली. मात्र महापालिकेचे अधिकारी ‘सारथी’वरील तक्रारींकडे दुर्लक्ष करीत असून, त्या परस्पर बंद करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. अधिकाऱ्यांच्या या कृतीमुळे ‘सारथी’चा उद्देश पुरता फसला आहे.
पिंपरी पालिकेला कोटय़वधींचा चुना
पिंपरी-चिंचवडमध्ये जिकडे-तिकडे जाहिरात फलकांचा सुळसुळाट दिसत असला तरी, महापालिकेच्या नोंदीनुसार शहरात जेमतेम दोन हजार फलक आहेत. वर्षांकाठी ५५ कोटी रुपये उत्पन्न मिळू शकत असताना सद्य:स्थितीत अवघे आठ कोटी पालिकेच्या पदरात पडत ...
थकीत शास्तीकरमाफीसाठी सरकारकडे पाठपुरावा - हर्डीकर
|
'Regular' seal in sight for unauthorized constructions
Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) commissioner Shravan Hardikar on Tuesday said the civic body has prepared samples of the application forms and printed those. "We have finalized the terms and conditions that the applicants have to fulfil ...
विकासकामांमुळे वाहतुकीवर ताण
पिंपरी - जगताप डेअरीतील साई चौकात सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामामुळे येथील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीचा अतिरिक्त ताण येत आहे. तो कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने कस्पटे चौकात हाती घेतलेले रस्ता रुंदीकरणाचे कामही कूर्मगतीने सुरू आहे. येथील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र होत असून, महापालिकेच्या ढिसाळ कारभाराबाबत आयटीयन्स संतप्त झाले आहेत.
शहरबात पिंपरी-चिंचवड :'हप्तेगिरी'मुळे रस्त्यांवरील अतिक्रमणांकडे सर्वाचीच डोळेझाक
पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतही फारशी वेगळी परिस्थिती नाही. भले मोठे रस्ते आणि मर्यादित वाहतूक असतानाही वाहतुकीचे 'तीन तेरा' वाजले आहेत. वाहनस्वारांची बेशिस्ती, वाहतूक पोलीस व महापालिका प्रशासनाची निष्क्रियता, हप्तेगिरी, ...
बांधकामे नियमितीकरणास स्वतंत्र कक्ष, नियमावलीविषयी नागरिक-नगरसेवकांचे करणार प्रबोधन
पिंपरी : अवैध बांधकामे नियमितीकरणाची अधिसूचना जारी झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने या संदर्भातील कार्यवाही सुरू केली आहे. नागरिकांचे अर्ज स्वीकारण्यासाठी मुख्यालयात कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. अर्जाचा नमुना तयार ...
बैलगाडा मालकांचा खरा शत्रू ‘पेटा’च; भोसरीतून राज्यव्यापी जनआंदोलन उभारण्याचा निर्धार
पिंपरी (प्रतिनिधी):- राज्यातील शेतक-यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यात ‘पेटा’ या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी खोडा घातला आहे. सत्ताधारी भाजप सरकार शर्यतीबाबत सकारात्मक आहे. पण, बैलगाडा मालकांचा खरा शत्रू ‘पेटा’ आहे. या ‘पेटा’च्या विरोधात राज्यव्यापी जनआंदोलन उभारण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांनी केला आहे.
'टेस्टिंग ट्रॅक' पंधरा दिवसांत
वाहनांच्या फिटनेस टेस्टसाठी २५० मीटरचा टेस्टिंग ट्रॅक उभारण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सासवड भागातील दिवे आणि पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आपल्या नव्या ...
अतिरिक्त आयुक्तांची चार महिन्यांत बदली
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांची तडकाफडकी बदली झाली आहे. मुख्याधिकारी संवर्गातील हांगे यांची लातूर महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून अवघ्या साडेचार महिन्यांत त्यांची पिंपरीतून ...
उद्योगनगरीतील आरोग्याचा राज्य सरकारकडून पंचनामा, नगरविकास मंत्र्यांकडून दखल; उपाययोजना करण्याचा महापालिका आयुक्तांना आदेश
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील लोकसंख्या २२ लाखांवर पोहोचली आहे. महापालिकेतील आरोग्य आणि वैद्यकीय विभागाच्या अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे शहराचे आरोग्य बिघडले आहे. जानेवारी ते आॅक्टोबरपर्यंत १० महिन्यांच्या कालावधीत थंडी, ...
मंत्रिपदाची आवई सोशल मीडियावर, पक्षश्रेष्ठींनी शहरातील स्थानिक नेत्यांना ठेवले झुलवत
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता प्रथमच आली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शह देण्यासाठी पिंपरीला मंत्रिपद देण्यात येणार आहे, अशी चर्चा तीन वर्षांपासून सुरू आहे. मंत्रिपद मिळाले, अशी आवईही ...
Subscribe to:
Posts (Atom)