निगडीच्या भक्ती-शक्ती समुह शिल्प चौकापर्यंतचा 4.413 किलोमीटर अंतराच्या पुणे मेट्रोसाठी पालिका 155 कोटी रूपये खर्च करणार आहे. उर्वरित 1 हजार 150 कोटी रूपयांचा निधी केंद्र व राज्य शासनाने उपलब्ध करून द्यावा, या उपसूचनेसह या वाढीव मार्गाच्या विस्तृत प्रकल्प आराखडा अहवालास (डीपीआर) पालिका सर्वसाधारण सभेने गुरूवारी (दि.20) मंजुरी दिली.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 21 December 2018
गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी पंकजा मुंडे यांचा चिंचवड दौरा
एमपीसी न्यूज – लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या 69 व्या जयंतीनिमित्त रविवारी ( दि. 23 डिसेंबर ) ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘आठवणीतील मुंडेसाहेब’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे सायंकाळी 5 वाजता शिवव्याख्याते अशोक बांगर यांचे व्याख्यान होईल.
वाहतुकीचे नियम मोडताना सावधान
पिंपरी-चिंचवडमधील वाहनचालकांनो, तुम्ही वाहतुकीचे नियम मोडत असाल तर सावधान! कारण वाहतूक पोलिसांची तुमच्यावर करडी नजर आहे. नियम मोडल्यानंतर पोलीस तुमच्याशी वाद न घालता तुमच्या न कळत तुमच्या वाहनाच्या क्रमांकाचे छायाचित्र घेऊन तुम्हाला सोडून देतील. मात्र, नंतर दंडाची नोटीस घेऊन पोलीसच आपल्या दारात उभा राहील. गेल्या दहा महिन्यात नियम मोडणाऱ्या दोन लाख ७९ हजार वाहनांची माहिती वाहतूक पोलिसांनी अशाप्रकारे गोळा केली आहे आणि त्यातील ४६ हजार ७०० वाहन चालकांना देण्याच्या नोटीस तयार झाल्या आहेत. या नोटिसा वाहन चालकांपर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.
अध्यापक, कर्मचार्यांसाठी तक्रार निवारण समिती स्थापन
पुणे : उच्च शिक्षण संचालनालयाच्या शासकीय कार्यालये व महाविद्यालये, शिक्षण संस्थांमधील अध्यापक व इतर कर्मचार्यांच्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी राज्य शासनाने ‘तक्रार निवारण समिती’ स्थापन केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही समिती स्थापन केली असून यामुळे अध्यापक व इतर कर्मचार्यांना दिलासा मिळणार आहे.
उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीची उंची वाढविण्याचे काम सुरू
पिंपळे सौदागर : येथील साई चौकात असलेली उच्च दाबाच्या (हायटेंन्शन) विद्युत वाहिनीची उंची वाढविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. भाजपच्या नगरसेविका निर्मला कुटे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या कामाला चालना मिळाली आहे. पिंपळे सौदागर येथील साई चौक येथे उड्डाणपूल उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. या पूलाच्या शेजारीच उच्चदाबाची विद्युत वाहिनी असल्यामुळे त्याचा मोठा अडथळा निर्माण होत होता. भविष्यात निर्माण होणारे धोके टाळण्यासाठी नगरसेविका निर्मला कुटे यांनी तातडीने या वाहिनीची उंची वाढविण्याचे काम सुरु करण्याच्या सुचना संबंधित अधिकार्यांना केल्या. यावेळी विद्युत विभागाचे अधिकारी कावळे उपस्थित होते.
पर्यावरण संतुलित सोसायटीस कर सवलत
पिंपरी - कचरामुक्त शहरासाठी आखलेल्या आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी बक्षीस योजनेस महापालिका सर्वसाधारण सभेने बुधवारी मंजुरी दिली, त्यामुळे बक्षीसप्राप्त सोसायट्यांना गुणांकानुसार सामान्य करात पाच ते २५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.
चिंचवडगावात ‘हेरिटेज वॉक’
पिंपरी - महापालिकेतर्फे चिंचवडगावातील सुमारे पाच किलोमीटरच्या क्षेत्रात ‘हेरिटेज वॉक’ प्रकल्प साकारण्यात येणार आहे. त्यात मोरया गोसावी समाधी मंदिर, हनुमान, कालभैरवनाथ, धनेश्वर, श्रीराम या मंदिरांसह क्रांतिवीर चापेकर वाड्याचा समावेश आहे. यामुळे चिंचवड गावठाणासह परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे.
‘काळेवाडी-औंध पूल खुला करा’
पिंपरी - काळेवाडी-औंध मार्गावर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येत असलेल्या दोन समांतर उड्डाण पुलांपैकी एकाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे तो वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दुसऱ्या पुलाचेही काम प्रगतिपथावर आहे.
कचरा वेचक कामगारांची आरोग्य तपासणीच नाही
चौफेर न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ’अ’ व ’फ’ क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीतील कचरा वेचक कर्मचारी व कामगारांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्यात आलेली नाही. तसेच त्यांना सुरक्षा साधनेही पुरविण्यात येत नाहीत. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे कचरा वेचक कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्तांना तक्रार अर्ज देण्यात आला आहे.
केबल नेटवर्कच्या रस्ते खोदकामात गैरव्यवहार
चौफेर न्यूज ः पिंपरी-चिंचवड महापालिकेने एका खासगी कंपनीस शहरातील सुमारे 355 किलोमीटर अंतर भूमिगत फायबर केबल नेटवर्कसाठी रस्ते खोदकामास परवानगी दिली आहे. शासनाच्या अटी व शर्तीचे सर्रासपणे उल्लंघन करून त्यापेक्षा अधिक अंतराचे काम या कंपनीने केले आहे. हे काम कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करण्यासाठी स्थानिक नगरसेवकांवर दबाव टाकण्यात आला. त्यात आमदारांसह आयुक्त सामील झाले आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला आहे. महापालिकेच्या विरोधी पक्षनेते दालनात झालेल्या पत्रकार परिषदेस विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक नाना काटे, नगरसेवक मयुर कलाटे उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने गाडगे महाराजांना अभिवादन
चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
अग्निशामक केंद्राचे स्थळ दर्शवणारे फलक त्वरित लावा – दिनेश यादव
एमपीसी न्यूज – चिखली-कुदळवाडी परिसरात अलीकडेच उभारण्यात आलेल्या अग्निशमन केंद्राचे स्थळ नागरिकांना माहित व्हावे यासाठी दिशादर्शक फलक लावण्यात यावे, अशी मागणी स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी लेखी निवेदनांद्वारे केली आहे. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, चिखली येथे अग्निशमन केंद्राचे काही दिवसांपूर्वी उद्घाटन करण्यात आले आहे.
ग्रेड सेपरेटरच्या निविदेत चूक
पिंपळे गुरव येथील सुदर्शननगर भागात उभारण्यात येत असलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामाचे भूमिपूजन होऊन तीन महिने उलटल्यानंतर या कामाच्या निविदेला मान्यता देताना त्यामध्ये तांत्रिक चूक झाल्याचा साक्षात्कार प्रशासनाला झाला आहे. या कामाची निविदा भरणाऱ्या ठेकेदाराबरोबर करारनामा करताना तांत्रिक चूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे संबधित ठेकेदाराला ५७ लाख रुपये जास्त द्यावे लागणार असल्याची कबुली पालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली. काम करताना अशा पद्धतीने तांत्रिक चुका होत असल्याचे समर्थन करून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी यावर पडदा टाकण्याचा प्रसत्न केला.
पीएमपीचा ‘जीएसटी’ देण्यास नकार
पुणे : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) या कंपनीकडून पुरविल्या जाणार्या सीएनजीच्या बिलावर जीएसटी देण्यास पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) नकार दिला आहे. आगारांपर्यंत गॅस पाइपलाइन असल्याने आम्हाला जीएसटी लागू होत नसल्याचा दावा पीएमपी प्रशासनाने केला आहे. ही रक्कम जवळपास दहा कोटी रुपयांची आहे. पीएमपीच्या ताफ्यात जवळपास 1100 बस सीएनजीवर धावणार्या आहेत. या गाड्यांना एमएनजीएलकडून गॅसपुरवठा केला जातो. त्यासाठी पीएमपीच्या आगारांपर्यंत पाइपलाइनद्वारे गॅस पोहचविण्यात आलेला आहे.
पीएफ देणे सर्व कंपन्याना बंधनकारक
पुणे : वंचित घटकांमधील कामगार आणि मजुरांना शासकीय सेवेचा लाभ आणि सेवानिवृत्तीनंतर आर्थिक लाभ व्हावा, यासाठी केंद्र शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून यासाठी सर्व कामगारांना पीएफच्या अखत्यारित आणण्याचा निर्णय पीएफ कार्यालयाने घेतला आहे. त्याबाबतच्या सूचना सर्व कार्यालयांना देण्यात येणार आहेत. त्यानुसार सर्व कंपन्या आणि त्यांच्या कामगारांची संख्या पीएफ कार्यालयाला देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. येत्या महिनाभरापासून त्याची अंमलबाजवणी करण्यात येणार आहे.
नाना-नानी पार्कचे कुंपण जागोजागी तुटले
पिंपरी : पिंपरी परिसरातील मासुळकर कॉलनी परिसरातील नाना-नानी पार्कचे जागोजागी कुंपण तुटले आहे. त्यामुळे उद्यानात गैरप्रकार होत असून याचा त्रास उद्यानात येणार्या लहान मुलांना व वृद्धांना होत आहे. त्यातच या उद्यानाच्या पाठीमागच्या बाजूने तारकुंपण तोडून लालटोपीनगर येथील रहिवाशांनी पाया वाटा तयार केल्या आहेत. यामुळे उद्यानात मध्यपी, गर्दुले, व टपोरींनी थैमान घातले आहे. उद्यानात लहान मुलांची खेळणे असल्याने मोठ्या संख्येने येथे मुलांची गर्दी असते. तर उद्यानातील एका सभागृहात ज्येष्ठ नागरिकांचे विविध कार्यक्रम होतात. यामुळे रॉक गार्डन’ नेहमीच गजबजलेले असते.
Pipeline repairs to improve water supply in Pimpri Chinchwad
PIMPRI CHINCHWAD: Repairs to the water pipeline taken up by Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) will rectify the supply problems to .
नदीपत्रातील रस्त्याचे काम वेगात
पिंपरी - महापालिकेच्या वतीने काळेवाडी पुलापासून चिंचवड येथील यशोपुरम सोसायटीला जोडणाऱ्या व सुमारे नऊ कोटी ३३ लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे काम सुरू आहे. चिंचवड-लक्ष्मीनगर येथे कामाला वेग आला असून काम पूर्ण झाल्यावर लिंक रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
बससाठी पीएमपीला साडेचार एकर जागा
पुणे - बस उभ्या करणे आणि त्या दुरुस्त करण्यासाठी पीएमपी प्रशासनाला डुडुळगाव आणि चऱ्होली येथील एकूण साडेचार एकर जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे. त्यात एकूण १०० बस उभ्या राहू शकतात. त्यामुळे देहू, आळंदी येथून शहराच्या विविध भागांत जाण्यासाठी प्रवाशांना बससेवा उपलब्ध होणार आहे.
नगरसेवकांचा विमा काढण्यास कॉंग्रेसचा विरोध
पिंपरी – महापालिकेतील नगरसेवक व त्यांच्या कुटूंबियांसाठी करदात्या नागरिकांच्या पैशातून आरोग्य विमा काढण्याचा ठराव स्थायी समितीने मंजूर केला आहे.
लोणावळा-पुणे आणखी एक लोकल सेमीफास्ट
पुणे – लोणावळ्याहून पुण्याच्या दिशेने रात्री 10.35 वाजता येणारी लोकल नुकतीच सेमीफास्ट करण्यात आली. यानंतर आता रात्री 11.40 वाजता सुटणारी दुसरी लोकलही सेमीफास्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दि.22 पासून प्रायोगिक तत्त्वावर या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
Subscribe to:
Posts (Atom)