Sunday, 12 January 2014

निगडी प्राधिकरण सिटीझन फोरमतर्फे रविवारी 'सारथी' पुस्तक वाटप

निगडी प्राधिकरण सिटीझन फोरमच्या वतीने सारथी पुस्तक वाटपाचा कार्यक्रम निगडी येथे रविवारी (दि. 12)   आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त  'नागरिकांची सनद' या विषयावर विवेक वेलणकर यांचे व्याख्यान होणार आहे.

वाहतुकीच्या नियमांसाठी आता स्पेशल एसएमए

पुणे वाहतूक पोलिसांचा उपक्रम 
नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि सुरक्षित वाहन चालवावे  यासाठी  पुणे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम सांगणारे स्पेशल एसएमएस नागरिकांना देण्याची नवीन सुविधा दहा जानेवारीपासून सुरु केली आहे. बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी ही सुविधा सध्या

इस्कॉनतर्फे रविवारी श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाचे आयोजन

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ  (इस्कॉन), श्री गोविंद धाम यांच्या वतीने रविवारी (दि. 12) श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  या रथयात्रेला दुपारी अडीच वाजता निगडीतील मधुकर पवळे पुलापासून प्रारंभ होणार आहे. यानंतर महाराष्ट्र बँक, आकुर्डी, दत्तवाडी, विठ्ठलवाडी, म्हाळसाकांत चौक, संभाजी चौक, बिजलीनगर पूल,

पिंपरी-चिंचवडमध्ये फ्लेक्स, होर्डिंगबाजी महागणार!

एलबीटीमुळे होत असलेली उत्पन्नातील तूट काही अंशी भरुन काढण्यासाठी महापालिकेने जाहिरात शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे शहरात सार्वजनिक ठिकाणी करण्यात येणारी सर्व प्रकारची जहिरातबाजी महागणार आहे. पुणे महापालिकेच्या तुलनेत पिंपरीत जाहिरात शुल्क जवळपास निम्म्याने कमी आहे. त्यामुळे जाहिरात शुल्कात जवळपास

महापालिका व प्राधिकरणाचा बेकायदा बांधकामावर हातोडा

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरणाने स्वतंत्रपणे कारवाई करीत आपआपल्या भागातील अवैध बांधकामे आज (शुक्रवारी) कारवाई केली. महापालिकेने सुमारे साडेतीन हजार चौरस फुट जागेतील सहा तर प्राधिकरणाने एका बंगल्यासह 22 झोपड्या भुईसपाट केल्या. प्राधिकरणाच्या कारवाईला सुरुवातीला विरोध झाला मात्र पोलीस बंदोबस्तामुळे जमावाला माघार घ्यावी

बेशिस्त रिक्षा वाहतूक

(अमोल काकडे)
विना परवाना व अल्पवयीन चालक..., सर्रास प्रवाश्यांची दुप्पट वाहतूक.., रस्त्याच्या मध्येच ह्यांचा थांबा.., बसच्या समोरच थांबून अडथळा.., बंदीनंतरही सहाआसनी रिक्षांचा वावर.., प्रश्यांसाठीची चढाओढ... आणि त्यावरून होणारे वाद...! या सगळ्यातून सर्रासपणे वाहतूक नियमांना धुडकावणारे रिक्षाचालक आणि त्यांचा

मतदार याद्या प्रसिद्धीच्या तारखांना मुदतवाढ

लोकसभा निवडणुकीसाठीची आणि मराठवाडा, पुणे पदवीधर मतदारसंघांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या तारखांत निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे.

पालिकेने टीडीआरची प्रक्रिया पिंपरीप्रमाणे सुलभ, जलद करावी

महापालिकेत हस्तांतर विकास हक्क (ट्रान्स्फरेबल डेव्हलपमेंट राईट- टीडीआर) देण्याची प्रक्रिया सुलक्ष व जलद नसल्यामुळे विकास आराखडय़ाची अंमलबजावणी प्रभावीरीत्या होऊ शकत नाही.

चौक देताहेत अपघाताला निमंत्रण

हिंजवडी : सिग्नल, सूचना फलकांची वानवा असल्याने वाहनांच्या वेगाला ‘ब्रेक’ अशक्य 

वाकड : आयटीचा झगमगाट, अभियंत्यांना गलेलठ्ठ पगार त्यामुळे आयटीतील रस्त्यावर जिकडे-तिकडे सुसाट धावणार्‍या अलिशान कार दिसतात. मात्र, येथील बहुतेक चौकात अपघात रोखण्याच्या काहीच उपाय योजना अथवा दिशादर्शक सूचनांचे फलक दर्शविण्यात आले नसल्याने ते चौक धोकादायक असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे. 
वाकड पुलाकडून हिंजवडीकडे जाताना भुजबळ वस्ती चौकात रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात वाहने अपघातग्रस्त होतात.तर पुलाच्या खाली लावलेल्या बॅरिकेड्स वाकवून जीव धोक्यात घालून ऐन महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न अनेक दुचाकीस्वार करतात. इथून पुढे जावून शिवाजी चौकातून डाव्याबाजूच्या माण रोडला असणारे फेज १ विप्रो सर्कल सर्वात धोकादायक चौक म्हणून ओळखला जातो. या आयटी परिसरातील सर्वात जुन्या आणि मोठय़ा असलेल्या या चौकाजवळ तारांकित हॉटेल, पोलीस स्टेशन, अन् कंपन्या असल्याने प्रचंड वर्दळ असते. त्या मानाने येथे कुठल्याही प्रकारच्या सूचना यंत्रणा अथवा सिग्नल नसल्याने येथील अपघातांची संख्या मोठी आहे. आजवर येथे १0 जणांना प्राण गमवावे लागले आहेत

अनधिकृत बांधकामधारकांना दुप्पट दंड

पिंपरी -&nbsp शहरातील 4 जानेवारी 2008 नंतरच्या 43 हजार 392 अवैध बांधकाम मालकांना मिळकतकराच्या दुप्पट दंडाची नोटीस पाठविण्यास महापालिका प्रशासनाने सुरवात केल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

महापालिका सभा तहकुबीची 'बत्तिशी' !

मान्यवरांना श्रध्दांजली अर्पण करण्याच्या नावाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभा वारंवार तहकूब केल्या जात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदेश देवूनही ताथवडे विकास आराखड्यावरुन सत्तारुढ राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये 'पॅचअप' होत नसल्याने आज (शुक्रवारी) महापालिकेची सभा पुन्हा तहकूब करण्यात आली. गेल्या 21 महिन्यांच्या कालावधीत तब्बल

पिंपरी-चिंचवडकरांनाही द्या मोफत पाणी

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना मोफत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता रमेश वाघेरे यांनी केली आहे.
महापौर मोहीनी लांडे व आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना याबाबतचे निवेदन

महापौर, आयुक्तसाहेब... तुम्ही जिन्याने जाणार का?

महापालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये लिफ्ट कोसळून झालेल्या दुर्घटनेला आठ दिवस झाले आहे. या अपघाताचा अहवाल न आल्याने आरोग्य खात्याने हॉस्पिटलमधील सर्व लिफ्ट बंद ठेवल्या आहेत.