पिंपरी (पुणे): शहरातील नाट्यकलाकार आणि नाट्य रसिकांना चांगल्या सुविधा असलेली नाट्यगृहे हवी आहेत. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आणि भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात सध्या विविध सुविधांची वानवा आहे. संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिराच्या नूतनीकरणाची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे या नाट्यगृहाचे रूप पालटणार आहे. तर, नव्याने झालेल्या पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात देखील काही सुधारणा अपेक्षित आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 16 January 2018
हिंजवडी, माणसह सात गावे पिंपरी महापालकित येणार
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत हिंजवडी, माण, मारुंजी, सांगवडे, गहुंजे, नेरे आणि जांबे या सात गावांचा समावेश करण्यास राज्य शासनाने दीड वर्षापूर्वी नकार दिला होता. मात्र, ही गावे समाविष्ट करून घेण्यासाठी महापालिकेने पुन्हा खटाटोप सुरू केला आहे. तसा फेरप्रस्ताव महापालिका सर्वसाधारण सभेत मंजूर करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्याची तयारी सुरू आहे.
सायकल ट्रॅक गेले कुणीकडे?
– “स्मार्ट सिटी’च्या संकल्पनेला हरताळ
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत आहे. या संकल्पनेत पर्यावरण संवर्धनासाठी सायकल ट्रॅक बनविण्यास प्राधान्य आहे. मात्र, निगडी-दापोडी बीआरटी मार्गावरच्या नियोजन आराखड्यात स्वतंत्र सायकल ट्रॅक कागदोपत्री दाखविण्यात आला. प्रत्यक्षात सायकल ट्रॅक तयार न झाल्याने सायकलपटू नाराजी व्यक्त करत आहेत.
शिवसेना शहरप्रमुखपदी योगेश बाबर
पिंपरी-चिंचवड शिवसेना शहरप्रमुखपदी योगेश बाबर यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना सचिव व खासदार अनिल देसाई यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पाठवलेल्या पत्रकातून ही माहिती दिली आहे. त्यांच्या निवडीसाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी पक्षाकडे शिफारस केली होती.
नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरात बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट; राजेंद्र जगताप यांचा आरोप
राज्य सरकारने शहरी भागांत 2015 नंतर झालेली अनधिकृत बांधकामे नियमित न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील नवी सांगवी व पिंपळे गुरव भागात भाजपा नेत्यांच्या आशीर्वादाने राजरोसपणे बेकायदा व्यावसायिक बांधकामे सुरू आहेत. गेल्या आठ-दहा महिन्यांच्या काळात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे, असा आरोप माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी पत्रकार परिषदेत केला.
घरकूल प्रकल्पाला पोलीस उपायुक्तांची भेट: एकनाथ पवारांकडून चौकी उभारण्याची मागणी
चिखलीतील घरकुल प्रकल्प व परिसरामध्ये मागील अनेक दिवसांपासून अनेक गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना घडत आहेत. या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, पोलिस निरीक्षक पळसुले यांच्या समवेत या भागाची पाहणी केली.
भोसरीत विधानसभेचे बिगुल की; लोकसभेचा एल्गार?
सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि समर्थकांच्या जोरावर भोसरीचे आमदार आणि भाजपाचे सहयोगी सदस्य महेश लांडगे यांनी २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत ‘अपक्ष’ मैदान मारले. तेव्हापासून आजपर्यंत तीन वर्षांच्या कालावधीत कोणत्याही राजकीय प्रतिस्पर्ध्यावर जाहीर टीका न करणा-या आमदार लांडगे यांनी पहिल्यांदाच खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना जाहीरपणे ‘लक्ष्य’ केले आहे. त्यामुळे भोसरीत विधानसभेचे बिगुल वाजले की लोकसभेचा एल्गार? अशी राजकीय चर्चा जोर धरु लागली आहे.
तरुणांनी कौशल्य प्राप्त केल्यास रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील – खासदार अमर साबळे
बेरोजगार युवकांनी विविध रोजगारासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात केल्यास रोजगाराच्या अमर्याद संधी उपलब्ध होतील, असे प्रतिपादन राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी केले.
युवकांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिकतम वापर करावा – अमोल देशपांडे
चौफेर न्यूज – आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात युवकांनी केवळ सोशल मिडियापूरता मोबाईलचा उपयोग न करता विविध गोष्टींसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. आजच्या काळात तरुण मुले- मोबाईलच्या अतिवापर करतात. त्यातूनच या व्यसनाच्या आधीन होतात, असे न करता मोबाईलच्या माध्यमातून दैनंदिन वैयक्तिक तसेच सामाजिक जीवन कसे सुकर करता येईल, याकडे तरुणांनी लक्ष द्यावे, असे प्रतिपादन अमोल देशपांडे यांनी यावेळी केले.
शिक्षण समिती सदस्यांची नावे निश्चित?
पिंपरी – महापालिकेच्या शिक्षण समितीत पक्षाच्या सक्रीय कार्यकर्त्यांना सामावून घेण्यासाठी स्विकृत संख्या वाढविण्यात येणार होती. याकरिता मागील दोन महिने झाले हा विषय तहकूब ठेवण्यात आला. परंतु, शिक्षण समिती सदस्यांची नावे निश्चित केली असून येत्या (शनिवारी) सर्वसाधारण सभेत त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. शिक्षण समिती स्थापनेला अखेर मुहूर्त लागल्याची चर्चा आहे.
चिंचवड येथे बुधवारपासून शिशिर व्याख्यानमाला
पिंपरी – रोटरी क्लब ऑफ चिंचवड यांच्या वतीने आयोजित शिशिर व्याख्यानमालेला येत्या बुधवारपासून (दि. 17) चिंचवड येथे सुरुवात होणार आहे. या व्याख्यानमालेचे हे 21 वे वर्ष आहे.
पुनावळेतील पवना नदीकाठच्या घाटाचेच “विसर्जन’
पिंपरी – घाट बांधण्यात महापालिकेची झालेली दिरंगाई, वाढलेले गवत, परिसरातील अस्वच्छता यामुळे पुनावळेगावातील गणेश विसर्जन घाटाचेच “विसर्जन’ झाले आहे. पवना नदीकाठी असलेल्या या घाटाची मोठ्या प्रमाणावर दूरवस्था झाल्याने याठिकाणी विसर्जन घाटाचे अस्तित्वच दिसत नाही.
तुकाराम मुंढेंनी 158 बसचालकांना दाखवला घरचा रस्ता
पुणे : तुकाराम मुंढे हे कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. पुण्यात आल्यापासून वाहतूक व्यवस्थेत सुधारणेच्या दृष्टीने त्यांनी मोठी पावले उचलली. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी सतत गैरहजर राहणाऱ्या बसचालकांवर मोठी कारवाई केली आहे. एकूण 158 बसचालकांना बडतर्फ करत, घरचा रस्ता दाखवला आहे.
Subscribe to:
Posts (Atom)