The Pune metropolitan region development authority (PMRDA) has proposed 174.27 kilometres bicycle track for the Pimpri-Chinchwad industrial township in a comprehensive mobility plan (CMP) for the Pune metropolitan region.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 1 December 2018
One of two flyovers at Sai Chowk along Kiwale-Aundh BRTS to open next month
In less than 18 months since the construction work kickstarted, one of the two flyovers at Sai Chowk (Jagtap Dairy) along the Kiwale-Aundh BRTS ...
“एचआयव्ही’ बाधितांसाठी “एआरटी’ ठरतेय नवसंजीवनी
पिंपरी – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएमएच) ए.आर.टी सेंटर एचआयव्ही बाधित रुग्णांसाठी नव संजीवनी देणारे ठरत आहे. या आजाराने बाधित असणाऱ्या रुग्णांना प्रामुख्याने मानसिक आधाराची गरज असून या सेंटरमध्ये रुग्णांच्या आरोग्याची काळजी उत्तमरित्या घेतली जात आहे. यंदाच्या वर्षी “नो युव्हर एचआयव्ही स्टेटस्’ हे घोषवाक्य सेंटरचे आहे.
Illegal hoardings: PCMC to spend Rs 3.5Cr
CHINCHWAD: The Pimpri Municipal Corporation will spend Rs 3.5 crore to remove 600 unauthorized hoardings in the municipal limits in 2018-19.
अण्णासाहेब मगर स्टेडियमचा कायापालाट होणार !
एमपीसी न्यूज – पिंपरी, नेहरूनगर येथील कै. अण्णासाहेब मगर स्टेडियम सार्वजनिक- खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर विकसित करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत तेथील जलतरण तलाव तसाच ठेवून स्टेडियमच्या आवारात विविध खेळांची मैदाने आणि संकुले विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे स्टेडियमचा कायापालाट होणार आहे. साधारणतः दोन वर्षांपूर्वी स्टेडियमच्या आवारातील जलतरण तलावामधून पाणीगळती होत असल्याची समस्या निर्माण झाली होती. […]
शहरात धावणार दहा इलेक्ट्रिक बस
महापौरांनी दहा किलोमीटर चालवून घेतली चाचणी
पिंपरी-चिंचवड : पर्यावरणपूरक आणि वातानुकूलीत असलेल्या एकूण 25 एसी ‘इलेक्ट्रिक’ बस पीएमपीएमएलच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार आहेत. त्यासाठी या बसची शहराच्या विविध मार्गावर चाचणी सुरू आहे. गुरुवारी चिखलीत महापौर राहुल जाधव आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या बसची चाचणी घेण्यात आली. या दहा बस भाडेतत्वावर शहराच्या विविध मार्गांवर सोडल्या जाणार आहेत. दरम्यान, महापौरांनी ही बस दहा किलोमीटर चालवून चाचणी घेतली.
पिंपरी शहरात अनधिकृत ६४ नळजोड तोडले
पिंपरी - शहरात बारा हजारांहून अधिक अनधिकृत नळजोड असून, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास महापालिकेने सुरवात केली आहे. पाणीपुरवठा विभागाने गेल्या दोन दिवसांत ६४ अनधिकृत नळजोड तोडले. त्या लोकांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. ही मोहीम सुरूच ठेवणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अनाथांच्या सुरक्षेसाठी बायोमेट्रिक
पिंपरी -अनाथ, निराधार आणि निराश्रित मुलांच्या सुरक्षेसाठी अनुदानित-विनाअनुदानित बालगृहांमध्ये सीटीटीव्ही कॅमेरे, ‘बायोमेट्रिक’ हजेरी तसेच ‘ट्रॅक द चाइल्ड’ यांसारख्या उपाययोजना केल्या असून, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे.
थांब्यांवर पाणपोई अन् स्वच्छतागृह
पिंपरी - शहरातील सांगवी-किवळे आणि दापोडी-निगडी या दोन मार्गांवर बीआरटी बससेवा सुरू आहे. शिवाय, नाशिक फाटा-वाकड आणि काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता (चिखली) असे दोन बीआरटी मार्ग तयार आहेत. मात्र, त्यावर अद्याप बससेवा सुरू नाही. या मार्गांवरील प्रत्येक थांब्यांवर प्रवाशांच्या सोयीसाठी पाणपोई व स्वच्छतागृह उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या शहर सुधारणा समितीने मंजूर केला आहे.
Former Shiv sena corporator demands Pimpri Chinchwad municipal corporation ‘study tour’ reports to be made public
Maruti Bhapkar, former Shiv Sena corporator and Manav Kamble, social activist have objected to the 'study tours' undertaken by corporators and officials of the ...
EuroSchool Wakad denies books, academic web access to students
It has allegedly targeted children whose parents refused to pay hiked fee and have been protesting against it for a year now.
पिंपरीतील पेट्रोल पंपांवर नियमांची पायमल्ली
पेट्रोलसारखे अतिज्वलनशील पदार्थ वापरताना सावधानता बाळगणे आवश्यक असताना शहरातील पेट्रोल पंपांवर नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र नजरेस पडत आहे. शहरातील पेट्रोल पंपांवर बाटल्या व कॅनमध्ये पेट्रोल दिले जात असून इतरही नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसत आहे. पेट्रोल पंपांवरील दुर्घटना टाळण्यासाठी हे नियम घालण्यात आले आहेत
बांधकामाच्या ‘ध्वनी’ प्रदुषणाने नागरिक त्रस्त, नगरसेविका मिनल यादव यांचा आंदोलनाचा इशारा
पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड स्टेशन परिसरात बांधकाम व्यावसायिकांकडून रात्री-अपरात्री काम केले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदुषण होत आहे. त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महापालिकेकडे तीन वेळा तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप शिवसेना नगरसेविका मिनल यादव यांनी केला आहे. तसेच रात्रीच्या वेळी चालणारे बांधकामाचे काम त्वरित थांबवावे, अन्य तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
शहरातील अपंगांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली
शहरातील अपंग व्यक्तींच्या विकासासाठी महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागांतर्गत राबविल्या जाणा-या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी महाराष्ट्र शासन निर्णय 14 नोव्हेंबर 2017 नुसार महापालिकेने स्वतंत्र उपायुक्त नेमावा. अपंगांच्या सर्व मागण्या तत्काळ पूर्ण करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना सहायक आयुक्त स्मिता झगडे यांनी प्रशासनाला केल्या.
मोरेवस्ती, चिखलीत गुणवंत महिलांचा गौरव
मोरेवस्ती, चिखली येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले. त्यामध्ये गुणवंत महिला व ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करण्यात आला.
बार्सिलोना दौरा : नाविन्यपुर्ण प्रकल्पांची अंमलबजावणी करणे कठिण, पण अशक्य नाही – आयुक्त श्रावण हर्डीकर
बार्सिलोना येथे झालेल्या ‘स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ड काँग्रेस 2018’ या परिषदेत 20 देशातील स्मार्ट सिटीतील कामाची माहिती एका छताखाली मिळाली. नागरी विकास, तंत्रज्ञान, लोकसहभागातून शहरविकास कसा साधता येतो. स्मार्ट सिटीचा विकास करताना तंत्रज्ञानाचा वापर करुन या नाविन्यपुर्ण प्रकल्पांची अमंलबजावणी करु, असा दावा महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. तसेच नाविन्यपुर्ण प्रकल्पांची अंमलबजावणी करणे कठिण आहे, पण अशक्य नाही, असेही ते म्हणाले.
‘रिंगरोड’वरील सूचनांची दखल घेणार – पीएमआरडीए आयुक्त किरण गित्ते
पिंपरी-चिंचवड : ‘नियोजन आणि विकासासाठीच पुणे महानगर प्राधिकरणाची निर्मिती झाली आहे. 7 हजार 257 चौरस किलोमीटर परिसरात पीएमआरडीए विकासाचे नियोजन करणार आहे. ‘एचसीएमटीआर’बाबत नागरिकांच्या सूचनांची नक्कीच दखल घेतली जाईल आणि त्यानुसारच ‘बीआरटी’चे नियोजन केले जाईल’, अशी ग्वाही पीएमआरडीए आयुक्त किरण गित्ते यांनी दिली. प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती सोसायटीचे राज्य अध्यक्ष व घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी गित्ते यांची प्राधिकरण येथील मुख्य कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. गित्ते यांना समितीच्यावतीने निवेदन देण्यात आले.
Subscribe to:
Posts (Atom)