पिंपरी, (प्रतिनिधी) – शहरातील करोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता प्रभावी उपाययोजनांच्या दृष्टीने शहरातील ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी जीवनसत्व व कॅल्शियमयुक्त गोळ्यांचा मोफत पुरवठा करण्याबाबत महापौर माई ढोरे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनास सूचना दिल्या आहेत.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 6 May 2020
एवढीच दुकाने सुरू ठेवण्यास महापालिकेची परवानगी
पिंपरी चिंचवड शहरातील जीवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त इतर दैनंदिन व्यवहार सुरळीत चालू राहण्याच्या दृष्टीने मिठाईचे, बेकरीचे, हार्डवेअरचे, इलेक्ट्रीकचे, चष्म्याचे, लहान मुलांचे कपड्याचे, इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईलची दुकाने व गॅरेज चालू करण्यासाठी प्रभाग स्तरावर ऑनलाईन अर्ज करुन परवानगी प्राप्त करुन घेता येणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या वेबसाईटवर अर्जाचा नमुना उपलब्ध आहे. संबंधित व्यवसायिकांनी तो वेबसाईट द्वारे मिळवावा व संबंधित क्षेत्रिय कार्यालयात पुढील पुर्तता करावी. असे आवाहन शहाराच्या महापौर उषा ऊर्फ माई ढोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले.
विप्रो पुण्यात उभारणार ४५० बेडचं विशेष कोविड रुग्णालय; राज्य शासनासोबत सामंजस्य करार
४५० बेडचं हे विशेष कोविड रुग्णालय महिन्याच्या अखेरीस तयार होईल
आता “करोना’च्या समूह संसर्गाचा धोका
पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) – “लॉकडाऊन’चा तिसरा टप्पा जाहीर केल्यानंतर काही गोष्टींमध्ये शिथिलता आणण्यात आली. या शिथिलतेचा नागरिकांना प्रचंड गैरफायदा घेतल्याने “करोना’च्या समूह संसर्गाचा धोका वाढला आहे. सोमवारी एकाच दिवशी गावी जाऊ इच्छिणाऱ्या मजूरांसह हजारो तळीराम रस्त्यांवर उरतल्यामुळे लॉकडाऊन संपुष्टात आल्यासारखेच चित्र शहरात पहावयास मिळाले. अनेकजणांनी स्वत:चे वाहने काढून बाजारपेठेसह शहराचा फेरफटका मारल्यामुळे शहरातील रुग्णांची संख्या वाढण्याची भिती सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे. सलग दुसऱ्या दिवशीही एकीकडे मद्यप्रेमींनी दिवसभर दारुच्या दुकानांबाहेर रांगा लावल्या तर गावी जाऊ इच्छिणाऱ्यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दवाखान्यांजवळ सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवत गर्दी केली.
पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडून पोलीस महासंचालक पदक प्राप्त पोलिसांचा गौरव
एमपीसी न्यूज – कामगिरीचा आलेख सातत्याने चढता ठेवा .त्यातून राष्ट्रपती पदकापर्यंत गवसणी घाला , असे गौरवोद्गार पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी काढले. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस महासंचालक पदक मिळालेल्या पोलिसांचा गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. पोलीस आयुक्त कार्यालयात सोशल डिस्टन्स पाळून पार पडलेल्या गौरव सोहळ्यासाठी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त […]
लॉकडाऊन शिथिल होताच गुन्ह्यांचा पाऊस
पिंपरी – लॉकडाऊनच्या काळात अवघ्या एक किंवा दोन गुन्ह्यांची नोंद पोलीस ठाण्यात होत होती. मात्र लॉकडाऊन शिथिल होताच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्ह्यांचा अक्षरशः पाऊस पडला आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. ५) तब्बल १९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तर प्रशासनाच्या आदेश न पाळणाऱ्या ५१६ जणांवरही गुन्हे दाखल झाले आहेत.
45 दिवसांपासून ठप्प असलेले हिंजवडी आयटी पार्क उद्या पासून (दि.६) सुरु
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या महामारीमुळे सगळीकडे लॉक डाऊन करण्यात आले असून हळूहळू शिथिलता देण्यात येत आहे. गेले ४३ दिवस बंद असलेले हिंजवडी आयटी पार्क अटीशर्थींवर बुधवार (दि.६) पासून पुन्हा सुरू होते आहे. जिल्हा प्रशासनाने त्यासाठी रितसर परवानगी दिली असू ३० टक्के आयटीएन्स कंपनीमधून काम करणार आहेत. हिंजवडी आयटी पार्कमधील तीन फेजमध्ये सुमारे ६५० कंपन्यांतून तब्बल चार लाख आयटी कर्मचाऱ्यांची आवक जावक थंडावल्याने शुकशुकाट होता. रेडझोन नसल्याने कंपन्या सुरू करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी काही कंपन्यांच्या करण्यात आली होती.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये काही प्रमाणात विकासाचे चक्र सुरु होतेय
पुणे - उद्योग, बांधकामे, महापालिकेची साफईची कामे, मेट्रोची कामे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये काही प्रमाणात सुरू झाली आहेत. येत्या दोन दिवसांत सुरू होणाऱ्या उद्योगांची संख्या वाढेल, असा प्रशासनाचा अंदाज आहे. ही कामे सुरू झाल्यामुळे परप्रांतातील मजूर गावी जाण्याऐवजी येथेच थांबत आहेत. त्यामुळे उद्योग, बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार आदींना दिलासा मिळाला आहे. या घडामोडींमुळे थांबलेल्या अर्थक्षेत्राला आता काही प्रमाणात ‘बूस्ट’ मिळू शकेल.
राज्यात ‘मद्य’ विक्रीसाठी आता ‘टोकन’ पद्धत, गर्दी टाळण्यासाठी सरकरकडून नवी ‘नियमावली’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवल्यानंतर राज्य सरकारनं जीवनावश्यक नसलेल्या पण महसूलाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या मद्य विक्रीला सशर्त परवानगी दिली होती. मात्र, पहिल्याच दिवशी नागरिकांनी मद्य विक्रीच्या दुकानासमोर प्रचंड गर्दी केली. ही गर्दी टाळण्याचा सरकारपुढे प्रश्न निर्माण झाला होता. त्यावरही राज्य सरकारने मार्ग काढला आहे. आता मद्य खरेदी करणाऱ्यांना टोकन पद्धतीने मद्य खरेदी करावी लागणार आहे. तसेच मद्य विक्री करणाऱ्यांना टोकण पद्धतीनुसारच मद्य विक्री करावी लागणार आहे. त्यासाठीची नियमावली राज्य उत्पादन शुल्क विभागानं जारी केली आहे.
प्रतिबंधित क्षेत्रातील मद्यप्रेमींची अन्य भागात घुसखोरी
पिंपरी (प्रतिनिधी): प्रतिबंधित क्षेत्रात मद्य विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील मद्यप्रेमींनी अन्य भागात खरेदीसाठी घुसखोरी केली आहे. यामुळे करोना प्रसाराचा धोका वाढला आहे. त्यामुळे ही दारूची दुकाने बंद करावीत, अशी मागणी नगरसेवक समीर मासुळकर यांनी केली आहे.
पाच लाखांहून अधिक मजूरांमध्ये अस्वस्थता
पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहर हे मिनी इंडिया म्हणून ओळखले जाते. या शहरात संपूर्ण भारतातून कामासाठी आलेले लाखो मजूर आहेत. या मजूरांना आपआपल्या गावाकडे जाण्याची ओढ लागली असून सुमारे पाच लाखांहून अधिक मजूरांना नेमकी माहिती आणि परवाने उपलब्ध होत नसल्यामुळे या मजूरांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. तर पोलीस स्टेशन, रुग्णालयांच्या समोर या कामगारांची गर्दी वाढल्यामुळे शहरवासियांवरील धोकाही वाढू लागला आहे. तसेच संकटकाळात मजूर, कामगार हे शहर सोडून जात असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
EMI साठी आणखी तीन महिन्यांचा दिलासा मिळणार?
देशात सध्या करोनानं थैमान घातलं आहे. आर्थिक स्थितीवरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेनं ग्राहकांकडून तीन महिने ईएमआय न घेण्याच्या सुचना बँकांना केल्या होत्या. त्यानंतर बँकांनी ग्राहकांना तीन महिने ईएमआय स्थगित करून ईएमआयच्या कालावधीत तीन महिन्यांची वाढ करण्याची घोषणा केली होती. परंतु अद्यापही करोनाचं संकट सुरूच असल्यानं तसंच लॉकडाउनचा कालावधीही वाढल्यानं पुन्हा एकदा तीन महिन्यांसाठी हा दिलासा देता येईल का यावर रिझर्व्ह बँक विचार करत आहे. इंडियन बँक असोसिएशनकडून ईएमआय मोरेटोरिअमला पुढे वाढवण्यासाठी अनेक सुचना मिळाल्या असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. तसंच रिझर्व्ह बँक यावर विचारही करत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
आमदार लक्ष्मण जगताप व कुटुंबियांची पंतप्रधान सहाय्यता निधीला पाच लाखांची मदत
कोरोना व्हायरसमुळे आलेल्या महामारीविरोधात लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार लक्ष्मण जगताप आणि त्यांच्या कुटुंबियांनी पंतप्रधान सहाय्यता निधीला पाच लाख रुपयांची मदत केली आहे. मी माझ्या परीने मदत केली असून आज एक छोटीशी मदत देखील गरजेची आहे. ज्याला शक्य आहे त्याने पुढे येऊन पंतप्रधान सहाय्यता निधीला मदत करावे. लॉकडाऊन संपेपर्यंत आपण सर्वजण घरामध्येच सुरक्षित राहूया, असे आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे.
दत्ताकाकांच्या रुपाने चिखलीत अवतरला अन्नदाता, प्रभागातील हजारो नागरिकांची घेतली जबाबदारी
लॉकडाउनमुळे पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या वतीने प्रभागातील नागरिकांना धान्य वाटप केले जात आहे. मागील 15 दिवसांपासून रेशनकार्ड नसलेल्या चिखली परिसरातील नागरिकांना दररोज गहू आणि तांदळाचे वाटप केले जात आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यासाठी 700 पोती गहू आणि तांदूळ विकत आणल्याचे दत्ताकाकांनी सांगितले. एकही नागरिक भुकेला राहू नये, यासाठी यापुढेही धान्य वाटप सुरुच ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले
स्वत:हून मिटर रिडींग घेण्यात राज्यात पुणेकर ठरले स्मार्ट
पुणे : महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील तीन लाख 63 हजार वीजग्राहकांनी पोर्टल व मोबाईल ऍपद्वारे गेल्या महिन्याचे (एप्रिल) स्वतःहून मीटर रिडींग पाठविले आहे. त्यामध्ये पुणे परिमंडलातील सर्वाधिक 69 हजार 912 तर त्यापाठोपाठ कल्याण परिमंडलातील 58 हजार 210 वीजग्राहकांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यात स्वत:हून मिटर रिडींग घेण्यात पुणेकर स्मार्ट ठरले आहेत.
विद्यार्थ्यांनो, अभ्यासाला लागा ! नीट, जेईई मेनच्या तारखा जाहीर
पुणे : वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या 'नीट' आणि 'जेईई मेन' या दोन्ही परीक्षांच्या तारखा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी जाहीर केल्या. 'नीट'ची परीक्षा २६ जुलै रोजी तर 'जेईई मेन'ची परीक्षा १८ ते २३ जुलै या कालावधीत होणार आहे.
Subscribe to:
Posts (Atom)