Friday, 16 November 2018

Plans afoot to construct flyover to Hinjewadi

PIMPRI CHINCHWAD: The civic body plans to construct a flyove .. 

Bhosari stn to shape into commuter-friendly hub

PIMPRI CHINCHWAD: The Maharashtra Metro Rail Corporation would ensure that the Bhosari Metro station at Nashik Phata Chowk becomes a commuter-friendly hub.

‘वायसीएम’ रुग्णालयात मानधनावर 128 पदे भरणार

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) मध्ये रिक्‍त पदांची भरती केली जाणार आहे. सहा महिन्यांच्या कालावधीसाठी मानधनावर 128 विविध पदे भरली जाणार आहेत. त्याबाबतच्या मुलाखती 13 नोव्हेंबरपासून सुरू झाल्या असून 15 नोव्हेंबरपर्यंत मुलाखती चालूच राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

विलास लांडेंबाबत साहेबांच्या मनात चाललयं तरी काय…?

पिंपरी (Pclive7.com):- राजकीय दृष्ट्या बॅकफूटवर गेलेल्या विलास लांडे यांचे सध्या चालले आहे काय हा प्रश्न पिंपरी चिंचवड शहरातल्या सगळ्यांनाच पडलाय. पण आता त्याचे उत्तर सर्वांनाच मिळण्याची शक्यता आहे. खुद्द थोरल्या साहेबांनी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच विलास लांडे यांचा हात घट्ट पकडत माझे तुझ्याकडे लक्ष आहे असे सूचित तर केले नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारण आहे विलास लांडे यांचा आणि शरद पवार यांचा फोटो…!

आयुक्त श्रावण हर्डीकरांचा आमदार जगतापांसोबत ‘स्मार्ट सेल्फी’

पिंपरी (Pclive7.com):- तब्बल २२ लाख रुपये खर्चून स्पेनच्या बार्सिलोनामध्ये स्मार्ट सिटीच्या अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झालेल्या पिंपरी चिंचवड आयुक्तांसह इतर पदाधिकाऱ्यांवर सुरुवातीपासूनच टीका होत होती. आता ही टीका आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्याला कारण आहे आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह इतर अधिकारी पदाधिकाऱ्यांबरोबर काढलेला सेल्फी…! या सेल्फीत आयुक्त स्वतः मोबाईलवर सेल्फी काढताना दिसत आहेत. आधीच अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली सहल काढल्याची टीका होत असल्यामुळे त्यात हा फोटो व्हायरल झाल्याने या दौऱ्यावर अधिक टीका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

निगडी उड्डाणपुल, ग्रेडसेपरेटर काम प्रगतीपथावर

पिंपरी-चिंचवड शहराचे प्रवेशद्वार असलेल्या निगडीतील भक्ती-शक्ती समुह शिल्प चौकात उड्डाणपुल, ग्रेडसेपरेटर, वर्तुळाकार मार्ग (रोटरी) आदी काम वेगात सुरू असून, आतापर्यंत एकूण 45 टक्के काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प पुढील वर्षाअखेरीस पूर्ण करण्याचे नियोजन आहे. संपूर्ण काम झाल्यानंतर या चौकातून वाहतूक ‘सिग्नल फ्री’ होणार आहे.

पिंपरीत भरणार प्लांट, नर्सरीज, लँडस्केप आणि अलाइड इंडस्ट्रीज विषयावरील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन

एमपीसी न्यूज – प्लांट, नर्सरीज, लँडस्केप आणि अलाइड इंडस्ट्रीज विषयावरील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन पिंपरी मधील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एच ए) मैदानावर गुरुवार (दि. 15) ते रविवार (दि. 18) दरम्यान भरणार आहे. प्रदर्शन आणि चर्चासत्राच्या उदघाटन महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. 

कचरा संकलनासाठी 25 निविदा प्राप्त, स्पर्धा झाल्याने पालिकेचा होणार आर्थिक फायदा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने मागविलेल्या कचरा संकलन आणि वाहतूक कामाच्या निविदेस चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी प्रत्येकी दोन अशा चार निविदा मागविल्या होत्या. त्याला एकवेळा मुदतवाढ देखील देण्यात आली. त्यामुळे निकोप स्पर्धा झाल्याने तब्बल 25 निविदा प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे दर कमी येऊन महापालिकेचा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. 

पवना धरणातून दिवसाला 440 एमएलडी पाणी उचला; पाटबंधारे विभागाचे पालिकेला पत्र

एमपीसी न्यूज – पावसाळ्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊसाने दडी मारली. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना पाणीपुरवठा करणा-या पवना धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. धरणातील उर्वरित पाणीसाठा जुलै 2019 पर्यंत पुरविण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेने दिवसाला 440 एमएलडी मर्यादित पाणी उपसा ठेवण्याबाबत कालवा समितीच्या बैठकीत निर्णय झाला आहे. 

फूलविक्रेत्यांची घबाडषष्ठी

एमपीसी न्यूज –  दिवाळीनंतर फुलविक्रेत्यांनी घबाडषष्ठी  परंपरागत पध्दतीने साजरी केली. यानिमित्त पिंपरी उपबाजारात वजन काटा, हिशेब वही आदी साहित्याची पूजा करण्यात आली. त्यानंतर कामगारांना बोनस व मिठाईचे वाटप करण्यात आले.  

अतिक्रमण, अनधिकृत फलकांवर धडक कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पिंपरी, आकुर्डी आणि निगडीतील अतिक्रमणावर तसेच अनधिकृत फलकांवर धडक कारवाई केली. अतिक्रमणाचे साहित्य, 54 फलकांवर कारवाई करण्यात आली.  ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या परिसरात शगुन चौक, पिंपरी कॅम्प येथे विनापरवाना असलेल्या  अतिक्रमणावर धकड कारवाई केली. त्यामध्ये साहीत्य जप्त करुन कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करण्यात आले आहे.

देवानंद सदाबहार रंगणार नवी सांगवी येथील निळू फुले नाट्यगृहात !

देवानंद सदाबहार रंगणार नवी सांगवी येथील निळू फुले नाट्यगृहात !

देवानंद सदाबहार रंगणार नवी सांगवी येथील निळू फुले नाट्यगृहात !

देवानंद सदाबहार रंगणार नवी सांगवी येथील निळू फुले नाट्यगृहात !

नदी स्वच्छतेसाठी ‘रिव्हर सायक्लोथॉन’

'इंद्रायणी नदीची स्वच्छता करण्यासाठी 'रिव्हर सायक्लोथॉन २०१८' हे अभियान राबविले जाणार आहे. भोसरी परिसरात पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असणारी अविरत श्रमदान संस्था, सायकल मित्र पुणे, महेशदादा स्पोट्‌र्स फाउंडेशन आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने रविवारी २ डिसेंबरला हे अभियान राबविले जाणार असून, यामध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे,' असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले. या वेळी महापौर राहुल जाधव, सायकल मित्र पुणे संस्थेचे डॉ. नीलेश लोंढे, दिगंबर जोशी, रिव्हर सायक्लोथॉनचे निमंत्रक सचिन लांडगे, पिंपरी-चिंचवड मनपा इंजिनीअर असोशिएशन जयकुमार गुजर, सुनील बेळगावकर, श्रीनिवास दांगट, पिंपरी-चिंचवड बार असोशिएशनचे ॲड. सुनील कडूसकर, सोमनाथ मसगुडे, आतीष लांडगे आदी उपस्थित होते.

MNGL seeks vacant spaces for setting up CNG refilling stations

PUNE: The Maharashtra Natural Gas Limited (MNGL), which supplies compressed natural gas (CNG) to urban and rural areas in Pune, has approached the municipal corporations in Pune, Pimpri ChinchwadSavitribai Phule Pune Universityand also the cantonment boards (of Pune and Khadki) to provide vacant spaces to set up refilling stations.

विद्यार्थ्यांसाठी २३ पासून चित्रपट महोत्सव

पिंपरी - महापालिका आणि फोर्ब्ज मार्शल कंपनीतर्फे चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २३ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत बालचित्रपट महोत्सव आयोजित केला आहे, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

मेट्रोच्या कामामुळे कासारवाडीत कोंडी

पिंपरी - मेट्रोच्या कामासाठी अधूनमधून बंद असणारा ग्रेड सेपरेटर, चारचाकी वाहन विक्रेत्यांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण, सेवारस्त्यावर थांबणाऱ्या खासगी ट्रॅव्हलच्या बस, यामुळे कासारवाडी परिसरातील वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाहतूक पोलिस आणि महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे कोंडीत दररोज भर पडत आहे. 

तळेगावातील भूसंपादनाचा भाव फुटला

पिंपरी - तळेगाव औद्योगिक वसाहतीमधील टप्पा चारमध्ये प्रस्तावित असणाऱ्या भूसंपादनासाठी प्रतिहेक्‍टरी एक कोटी ६५ लाख ९१ हजार ३८० रुपयांचा दर ठरविला आहे. निश्‍चित करण्यात आलेल्या दराचा प्रस्ताव मान्यतेसाठी उद्योग विभागाच्या उच्चाधिकार समितीकडे पाठवण्यात येईल.मान्यतेनंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होईल.

"म्हाळुंगे-माण' योजना तीन वर्षांत पूर्ण करणार

पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ येत्या शुक्रवारी (ता. 16) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. सुमारे सातशे एकर परिसरामध्ये ही योजना राबविण्यात येणार असून, पुढील तीन वर्षांत ती पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्राधिकरणाकडून ठेवण्यात आले आहे. 

उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात

देहू - जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर देहूरोड येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या पुलावर डांबरीकरण आणि पथदिवे बसविण्याचे काम सुरू आहे.
पुणे- मुंबई महामार्गावर निगडी ते देहूरोडदरम्यान रुंदीकरण आणि नवीन उड्डाण पुलाचे काम गेल्या वर्षी सुरू करण्यात आले. यात दोन ठेकेदारांना कामे देण्यात आली. त्यातील उड्डाण पुलाचे काम टी ॲण्ड टी कंपनीतर्फे करण्यात येत आहे. 

सलग तीन महिने धान्य न घेतल्यास थेट शिधापत्रिका निलंबित होणार

पुणे – सलग तीन महिने स्वस्त धान्य दुकानातून शिधापत्रिकेवर धान्य खरेदी न केल्यास संबंधित व्यक्तीची शिधापत्रिका निलंबित करण्यात येणार आहे. रेशनच्या धान्यात होणार काळाबाजार रोखण्यासाठी पुरवठा विभागाने आधार लिकिंग आणि ई-पॉस यंत्रणा कार्यान्वित केली आहे. त्याद्वारे ही कारवाई केली जाणार आहे.

‘त्या’ ठेकेदारास पावणे दोन कोटींचा दंड

पिंपरी – चोविस तास पाणी पुरवठा या योजनेच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराला महापालिकेने तब्बल पावणे दोन कोटीचा दंड आकारला असून त्याच्याकडूनच उर्वरीत काम करवून घेतले जाणार आहे.

पोलीस-नागरिक संवाद आवश्‍यक!

पिंपरी – देशाच्या सीमेवर संरक्षण दलातील जवान तर देशांतर्गत पोलिसांचे कार्य अहोरात्र सुरू असते. ते चोविस तास आपले कर्तव्य बजावतात म्हणूनच सामान्य नागरिक सुरक्षित आहेत. कर्तव्य बजावताना जवान असोत की पोलीस त्यांना नागरीकांचे सहकार्य मिळाले पाहिजे. पोलीस – नागरीक संवाद गुन्हेगारी रोखण्यासाठी आवश्‍यक आहे, असे मत पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी व्यक्‍त केले.

गोशाळेस चारा खरेदीसाठी मदत

पिंपरी – चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम शैक्षणिक प्रकल्पातील गोशाळेस कांतीलाल नेनुरामजी ओझा यांच्या पुण्यस्मरणार्थ चारा खरेदीसाठी मदतीचा धनादेश देण्यात आला.

विशेष मुलांच्या आश्रमास मदतीचा हात

पिंपरी – चिंचवड येथील संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने सातारा येथील एहसास मतिमंद मुलांच्या आश्रमासाठी साखर, गहू, तांदूळ, मसुरडाळचे वाटप करण्यात आले.