Saturday, 20 October 2018

पालिकेत परिवहन कक्षाची स्थापना : पिंपरी-चिंचवड, पुणे शहराच्या सुसंगत वाहतुकीसाठी धोरण

पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या, वाढते भौगोलिक क्षेत्र तसेच, वाढणारी वाहनांची संख्या लक्षात घेता शहरावर वाहतुकीचा ताण वाढणार आहे. पिंपरी-चिंचवड व पुणे शहराची भौगोलिक संलग्नता विचारात घेऊन दिर्घकालीन सुसंगत धोरण तयार करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने परिवहन कक्षाची (ट्रॉन्सपोर्टशन सेल) स्थापना केली आहे.

पालिकेत परिवहन कक्षाची स्थापना : पिंपरी-चिंचवड, पुणे शहराच्या सुसंगत वाहतुकीसाठी धोरण

सोसायट्यांचे अध्यक्षहोणार ‘बीएलव्ही’

पुणे शहरात १६ हजार ३६० गृहनिर्माण संस्‍था असून, या संस्‍थांच्‍या अध्‍यक्ष आणि सचिवांना मतदान केंद्रस्‍तरीय स्‍वयंसेवक (बीएलव्ही) म्‍हणून नेमण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. त्यामुळे आता मतदार यादीतील मयत, दुबार आणि स्‍थलांतरित मतदारांची नावे कमी करून मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सोपे होणार आहे.

स्थापत्य व बीआरटी विभागाची जबाबदारी श्रीकांत सवणेंकडे

राजन पाटील यांच्याकडून काढून घेतले पदभार 
निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहशहर अभियंता राजन पाटील यांच्याकडे असलेला मुख्य कार्यालयाचा स्थापत्य विभाग आणि बीआरटीएस विभाग काढून घेण्यात आला आहे. सदर दोन्ही विभागाची जबाबदारी कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

Pimpri: बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयाचे कामकाज आता उद्यान विभागाकडे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयाचे कामकाज आता कर्मचा-यांच्या आस्थापनेसह उद्यान विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके यांच्याकडे विभाग प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याबाबतचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढला आहे. दरम्यान, यापूर्वी प्राणी संग्रहालयाची जबाबदारी पशुवैद्यकीय विभागाकडे होती. निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयाचे कामकाज पशुवैद्यकीय

शहर चकाचक करण्याची ’डेडलाईन’!

‘शहर स्वच्छ ठेवता येत नसेल तर राजीनामे देऊन घरी बसा’
आरोग्य विभागाला महापौरांनी घेतले फैलावर
पिंपरी-चिंचवड : शहरात सर्वत्र कचरा आहे. नियमितपणे कचरा उचलला जात नाही. कचरा कुंड्या खाली केल्या जात नाहीत. रस्ते, सार्वजनिक स्वच्छतागृहे साफ केली जात नाहीत, यावरुन महापौर राहुल जाधव यांनी बुधवारी आरोग्य विभाग आणि क्षेत्रीय अधिका-यांना फैलावर घेतले. तसेच जी मदत पाहिजे ती आम्ही द्यायला तयार असून येत्या गुरुवारपर्यंत शहर चकाचक करण्याची डेडलाईन त्यांनी अधिका-यांना दिली आहे. शहर स्वच्छ ठेवता येत नसेल तर राजीनामे देऊन घरी बसा असेही त्यांनी सुनाविले.  महापौर राहुल जाधव यांनी दालनात आरोग्य विभागाचे अधिकारी आणि क्षेत्रीय अधिका-यांची बैठक घेतली. आरोग्य अधिकारी मनोज लोणकर, क्षेत्रीय अधिकारी आशादेवी दुरगुडे, संदीप खोत, आण्णा बोदडे, विजय खोराटे, स्मिता झगडे, आशा राऊत उपस्थित होत्या.

कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती

पिंपरी - शहरात दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे 900 पैकी 450 टन कचऱ्यापासून मोशी कचरा डेपोत सेंद्रिय (कंपोस्ट) खतनिर्मिती केली जात आहे. त्यामुळे कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यास महापालिकेला काही प्रमाणात यश आले आहे. शहरातील संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मितीसाठी मोशी डेपोतील यंत्रणेची क्षमता वाढविण्याची गरज आहे. 

नळजोड नियमितीकरणासाठी मुदतवाढ

पिंपरी - शहरातील झोपडपट्ट्या व लगतच्या परिसरात अनधिकृत नळजोड घेऊन पाण्याची सर्रास चोरी होत आहे. त्यामुळे गळती होऊन मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. त्यामुळे महापालिकेने नळजोड नियमित करण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत दिली होती. त्याला आता आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

“नागरवस्ती’च्या योजनांचे विकेंद्रीकरण

पिंपरी – नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत शासनाच्या एकूण 30 महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जातात. मात्र या योजनांच्या अंमलबजावणीचा विलंब, पात्र-अपात्र यादीचा गोंधळ, नागरिकांची धवपळ या साऱ्यावर उपाय म्हणून महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी थेट आठही क्षेत्रीय कार्यालयात कामांची विभागणी करुन दिली आहे. त्यामुळे अंमलबजावणीत होणारा विलंब व अपात्रांच्या संख्येत होणारी घट टळणार आहे.

…अन्यथा मगर स्टेडीयमचा ताबा घेऊ!

पिंपरी – अण्णासाहेब मगर स्टेडियमला दिलेल्या जागेच्या मोबदल्यात कामगार कल्याण मंडळाला जागा देण्यास महापालिकेला विसर पडला आहे. महापालिकेने करारानुसार दोन भूखंड मंडळाला द्यावेत अन्यथा संतप्त कामगार मगर स्टेडीयमचा ताबा घेतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्या माजी सदस्या भारती चव्हाण यांनी पिंपरीत आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

“राईट टू पी’ धाब्यावर

– महापालिकेत 50 टक्‍के “महिलाराज’ तरीही प्रश्‍न कायम
पिंपरी – “राईट टू पी’ हा अधिकार कायद्याने सर्व महिलांना दिला असला तरी महापालिका प्रशासनाचे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मध्यंतरी सत्तधाऱ्यांनी महिलांसाठी प्रत्येक चौकात गुलाबी रंगाचे “स्मार्ट टॉयलेट’ बसविण्यात आली होती. मात्र त्यानंतर ही स्वच्छतागृहे दिसेनाशी झाली आहेत. महापालिका प्रशासनाच्या आकडेवारीनुसार शहरात 6 हजार 334 स्वच्छतागृह असून त्यापैकी महिला स्वच्छतागृहांची संख्या 2 हजार 853 आहे. 50 टक्‍के देखील स्वच्छतागृह महिलांच्या वाट्याला नसल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे.

उत्सवानंतर शहरातील नदीपात्र प्रदूषित

नुकताच गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्रोत्सवही उत्साहात पार पडला. परंतु या पार्श्‍वभूमीवर शहरातील अनेक ठिकाणी नदी घाटांवर व नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर निर्माल्याची घाण साचली आहे. यामुळे नदी प्रदूषणात भर पडत आहे. याठिकाणी महापालिका प्रशासनाच्या वतीने कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. यामुळे नवरात्रोत्सवानंतरही पुन्हा एकदा नदीपात्र अस्वच्छ झाले असून नदीप्रदूषणात भर पडली आहे. 

सुस्तावलेली संपूर्ण ‘डिबी’च बरखास्त

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – प्रत्येक पोलीस ठाण्याचे नाक म्हणजे गुन्हे प्रकटीकरण पथक (डिबी) असते. पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणारे गुन्ह्यांवर आळा बसवणे, गुन्ह्यातील आरोपी पकडणे, गुन्हे उघडकीस आणण्याचे काम या पथकावर असते. मात्र हे पथक बिनकामी झाले तर मग गुन्हेगारी वाढण्यास चालना मिळाली हे नक्की. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आयटी पार्कमधील हिंजवडी पोलीस ठाण्याच्या डीबीची हीच आवस्था झाली होती, मात्र वरिष्ठ अधिकारी त्याकडे कानाडोळा करत होते. मात्र पोलिस आयुक्तांनी केलेल्या फेरबद्दलामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक झालेल्या अधिकाऱ्याने ही परिस्थिती पहिली आणि तडकाफडकी संपर्ण ‘डिबी’च बरखास्त करुन टाकली.

Pimpri: महापालिका 27 नोव्हेंबरपासून गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम राबविणार

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारकडून गोवर व रुबेला लसीकरण मोहीम देशभर सुरू करण्यात आली असून पिंपरी-चिंचवड महापालिका देखील ही मोहीम राबविणार आहे. वैद्यकीय विभागाद्वारे 27 नोव्हेंबरपासून याची सुरूवात करण्यात येणार आहे. शहरातील 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील 6 लाख 16 हजार मुलांना ही लस देण्याचे उद्दिष्टे असल्याची माहिती वैद्यकीय विभागाने दिली. यावेळी अतिरिक्त आरोग्य

पिंपरीगाव : संधी मिळूनही विकासापासून वंचित

पिंपरी – गावा-गावांचे मिळून महानगर झालेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये विकासाचा असमतोल अद्यापही दिसून येत आहे. ज्या गावापासून या महानगराच्या उदयाला सुरवात झाली त्या पिंपरीगावातील रस्ते, चेंबर, उद्याने आणि पुलांची अवस्था पाहून या असमतोल विकासाचे चित्र स्पष्ट होते. ‘गाव तसे चांगले पण वेशीला टांगले’, अशी स्थिती येथे आहे. याला येथील स्थानिक राजकीय नेते आणि पदाधिकारी कारणीभूत असल्याचे दिसून येते. 

पिंपळे सौंदागरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार लक्ष्मण जगताप

नगरसेविका निर्मला कुटे यांच्या संपर्क कार्यालयाचे आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी (Pclive7.com):- निर्मला कुटे या पहिल्यांदाच नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. नवीन असूनही गेल्या दिड वर्षात त्यांचे काम कौतुकास्पद आहे. प्रभागातील कामांचा त्यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरू असतो. पुढील २० वर्षाचे नियोजन करूनच या परिसरात कामे केली जात आहेत. त्यामुळे पिंपळे सौंदागरच्या विकासासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केले.

वाकडच्या शाळेत मुलींना स्व-संरक्षणाचे धडे देणारा ‘निर्भया’ प्रकल्प सुरु

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण समितीच्या पुढाकाराने सीएसआर निधीच्या माध्यमातून वाकड येथील आबजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळेत मुलींना स्व-संरक्षणाचे धडे देणारा ‘निर्भया’ प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले.

Pimpri : शहरासाठी पाणी उचलत असलेल्या पवना नदीवर नवीन रावेत बंधारा बांधण्याची मागणी

एमपीसी  न्यूज – शहरासाठी  पाणी उचलत असलेल्या पवना नदीवरील  नवीन रावेत बंधारा बंधावा , अशी मागणी नगरसेवक मयुर कलाटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे लेखीनिवेदनांद्वारे केली आहे.  दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की,  नविन  बांधणेबाबत नुकताच पावसाळा संपलेला आहे. पवना धरण १०० टक्के भरलेले आहे. तरी सुध्दा शहरामध्ये काही भागामध्ये  पाण्याची तीव्र टंचाई आतापासूनच जाणवू

Chikhli : चिखलीत घंटागाडी सुरु, महापौरांच्या हस्ते उदघाटन

एमपीसी न्यूज – दस-याच्या शुभमुहूर्तावर प्रभाग क्रमांक 2 चिखली येथे घंटागाडी सुरु करण्यात आली. या घंटागाडीचे उदघाटन महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.  समाजसेविका सोनम रवी जांभुळकर व जागृती महिला प्रतिष्ठानच्यावचीने प्रभागात कच-याचा प्रश्न सोडविण्यासाठी ही घंटागाडी सुरु केली. यावेळी स्विकृत सदस्य दिनेश यादव, नगरसेविका सारीका बो-हाडे, नितीन बो-हाडे आदी उपस्थित होते. सोनम रवी

Chinchwad: झेंडू आणि शेवंतीची फुले रस्त्यावर फेकून फूल विक्रेत्यांकडून शहरात अस्वच्छता

एमपीसी न्यूज – फुलविक्रेत्यांनी शिल्लक राहिलेली झेंडू आणि शेवंतीची फुले रस्त्यावरच फेकून दिली. त्यामुळे चिंचवड परिसरात रस्त्यावर अस्वच्छता पसरली. यामुळे स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. दसरा सणामध्ये झेंडूच्या फुलांना विशेष महत्व आहे. दोन दिवसांपूर्वी झेंडूच्या फुलांना 100 रुपये किलोच्या पुढे भाव होता. फुलांची विक्रीही मोठ्या प्रमाणात झाली. पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रमुख चौकांमध्ये फुल विक्रेते मोठ्या प्रमाणात

पुणे - लोणावळा लोकल उद्यापासून पूर्ववत

पुणे - लोहमार्गाच्या देखभाल- दुरुस्तीचे काम वेळेपूर्वीच पूर्ण झाल्यामुळे पुणे- लोणावळा मार्गावरील लोकलची वाहतूक येत्या रविवारपासून (ता. 21) पूर्ववत होणार असल्याचे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने शुक्रवारी कळविले आहे. 

मॉडर्नच्या आकांक्षाने राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक

निगडी- यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात शिकणारी आकांक्षा धनावडे हिने 19 वर्षाखालील गटात स्केटिंग या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले. 13 ते 16 ऑक्‍टोबर रोजी नंदुरबार येथे राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत कोल्हापूर, पालघर, अमरावती, नंदूरबार, नगर, सातारा, अकोला अशा एकूण वीस जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी झाले होते.

भक्‍ती व सुरांनी सजली विजयादशमी

चिखली – सुर, ताल आणि भक्‍तीरसाने तृप्त करणारे अभंग अशा वातावरणात चिखली परिसरात विजयादशमी साजरी करण्यात आली. विजया दशमीच्या शुभमुहुर्तावर सर्वांगीन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, आखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे अधिकृत परीक्षा केंद्र असलेल्या अथर्व संगीत विद्यालयाचा द्वितीय वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.