Wednesday, 26 June 2013

डॉक्टर आयुक्तांचे 'मिशन आरोग्य'

डॉक्टर आयुक्तांचे 'मिशन आरोग्य': पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी शहर आरोग्य सेवेच्या दृष्टीने मिशन हाती घेतले असून, भोसरी आणि थेरगाव येथे नवीन हॉस्पिटल उभारण्याच्या कामाला गती देणार असल्याचे मंगळवारी (२५ जून) स्पष्ट केले.

महापालिकेच्या अधिका-यांना विशेष ...

महापालिकेच्या अधिका-यांना विशेष ...:
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वर्ग  एक आणि वर्ग दोनचे अधिकारी महापालिका सभा, स्थायी समिती सभेवेळी आणि विशिष्ट प्रसंगी एकसारख्याच गणवेशात दिसणार आहेत. गडद निळ्या रंगाची पँन्ट आणि फिकट आकाशी रंगाचा शर्ट असा हा गणवेश असेल.

आचारसंहितेमुळे लोकशाही दिन पुढे ...

आचारसंहितेमुळे लोकशाही दिन पुढे ...:
भोसरी गावठाणात होवू घातलेल्या पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महापालिकेकडून येत्या 1 जुलै रोजी आयोजित लोकशाही दिन पुढे ढकलण्यात आला आहे.

पालखी सोहळ्यात 'प्लॅस्टिक बंदी'ची ...

पालखी सोहळ्यात 'प्लॅस्टिक बंदी'ची ...:
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पालखी सोहळा काळात व इतर वेळीदेखील प्लॅस्टिक व थर्माकोलच्या वापरावर बंदी आणावी, अशी मागणी मनसेने आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे केली आहे.

भोसरीमध्ये गुरुवारी लिंगायत धर्म ...

भोसरीमध्ये गुरुवारी लिंगायत धर्म ...:
राष्ट्रीय बसव दल व लिंगायत धर्म महासभेच्या पुणे विभागातर्फे उद्या (गुरुवारी) भोसरी येथे लिंगायत धर्म संमेलन आयोजित केली आहे. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात सकाळी दहा वाजता हा मेळावा होईल. मेळाव्यात
Read more...

घरकुलाच्या सांडपाणी व्यवस्थापनाचा ...

घरकुलाच्या सांडपाणी व्यवस्थापनाचा ...:
पर्यावरणाचे कायदेकानून धाब्यावर बसविल्याचा फटका
पर्यावरण विभाग आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे कायदेकानून धाब्यावर बसविल्याने महापालिकेच्या स्वस्तात घरकुल प्रकल्पापुढील अडचणी वाढतच आहेत. चिखलीमध्ये सुमारे सहा हजार घरकुलांचा प्रकल्प राबविताना मलनि:सारण आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविणे बंधनकारक असताना

भोसरी गावठाण पोटनिवडणुकीसाठी 18 ...

भोसरी गावठाण पोटनिवडणुकीसाठी 18 ...:
भोसरी गावठाण प्रभागामध्ये येत्या 7 जुलैला होणा-या पोटनिवडणुकीसाठी 18 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. एकूण 17 हजार 101 मतदार या प्रभागात आहेत.  

पिंपरीतील धोकादायक ७६ इमारती पाडणार- आयुक्त

पिंपरीतील धोकादायक ७६ इमारती पाडणार- आयुक्त: पिंपरी-चिंचवड हद्दीत नदीकाठी असणारी बेकायदेशीर जवळपास ७६ बांधकामे प्राधान्याने पाडण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिली.

७३ धोकादायक इमारतींना नोटिसा

७३ धोकादायक इमारतींना नोटिसा: पिंपरी : पुरामुळे ज्या इमारतींना धोका आहे. नदी, नाल्यावर भराव टाकून केलेली बांधकामे, अल्पावधीत उभारण्यात आलेल्या इमारती अशा ७३ धोकादायक इमारती आणि बांधकामांना महापालिकेने नोटिसा पाठविल्या आहेत.

आकुर्डीत अशा प्रकारचे एक बांधकाम काही दिवसांपूर्वीच पाडून टाकले आहे. वाकड येथील निसर्ग सोसायटीच्या इमारतीची सीमाभिंत धोकादायक असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. स्थळ पहाणी करून कारवाई करण्याचे आदेश शहर अभियंता एम. टी. कांबळे यांना दिले आहेत. काळेवाडीतील चर्चची सीमाभिंत पडून दुर्घटना घडली असल्याने त्या चर्चचा वापर करू नये, अशी नोटीस त्याठिकाणी लावली आहे. पुण्यासारखे जुने धोकादायक वाडे या भागात कमी आहेत. परंतु, अल्पावधीत आणि भराव टाकून केलेली धोकादायक बांधकामे या परिसरात आहेत, त्यामुळे अशा बांधकामांना नोटीस दिल्या आहेत.

वाकड रस्त्यावरील सिग्नल बंदच

वाकड रस्त्यावरील सिग्नल बंदच: पिंपळे निलख : वाय जंक्शन ते वाकड या रस्त्यावरील मानकर चौकात वाहतूक नियंत्रक यंत्रणा उपलब्ध असून ती कार्यान्वित करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

रस्ता चौपदरी असल्यामुळे अनेक वाहने वेगाने ये-जा करत असतात. चौकात सिग्नल नसल्यामुळे छोट्या-मोठय़ा अपघातांना निमंत्रण मिळत आहे. हा रस्ता वाकड, हिंजवडी, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ या महत्त्त्वाच्या रस्त्यांना जोडत असल्यामुळे अनेज जड वाहने, ट्रॅव्हल्स कंपन्यांची वाहने, आयटी कंपनीच्या गाड्यांची, रिक्षांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात असते.

क्रीडाकुलमध्ये ऑलिम्पिक दिवस साजरा

क्रीडाकुलमध्ये ऑलिम्पिक दिवस साजरा: पिंपरी : देशात विविध ‘डे’ साजरे केले जातात. त्यापेक्षा अधिक महत्त्वाचा व वेगळा असलेला ‘ऑलिम्पिक दिवस’ मोठय़ा उत्साहात केला जावा, असे आवाहन निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी क्रीडाकुलाचे प्रमुख भगवान सोनवणे यांनी केले.

ऑलिम्पिक दिवसानिमित्त ज्ञान प्रबोधिनी विद्यालयात ऑलिम्पिक प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा लाभ घेतला. देशात ऑलिम्पिक दिवस पाहिजे त्या प्रमाणात साजरा केला जात नसल्याबद्दल सोनवणे यांनी खंत व्यक्त केली. या साठी जनजागृती करून ऑलिम्पिक चळवळ उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

सोनवणे हे गेल्या वर्षी लंडन ऑलिम्पिक स्पर्धेच्या दौर्‍यावर गेले होते. तेथील माहिती, स्पर्धा आयोजन, ऑलिम्पिकचे महत्त्व या विषयी त्यांनी सविस्तर माहिती देत अनुभव कथन केले. क्रीडा साहित्य, लोगो, शुंभकर, स्पर्धा व खेळाडूंची दुर्मिळ छायाचित्रे त्यांनी दाखविली. लंडन ऑलिम्पिकची झलक विद्यार्थ्यांना फिल्म दाखवून करून देण्यात आली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी त्यांनी उत्तरे दिली. या वेळी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

नदीकिनाऱ्यावरील बांधकामांवर प्राधान्याने कारवाई करा

नदीकिनाऱ्यावरील बांधकामांवर प्राधान्याने कारवाई करा

पिंपरी- नदीकिनारी भराव टाकून, नाल्याशेजारी, कमी कालावधीत बांधलेल्या शहरातील 76 बांधकामांवर प्राधान्याने कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती आयुक्‍त डॉ.

निगडी, सांगवीमध्ये चोरीत पाच लाखांचा ऐवज लंपास

निगडी, सांगवीमध्ये चोरीत पाच लाखांचा ऐवज लंपास

पिंपरी - भरदिवसा तीन वेगवेगळ्या ठिकाणच्या बंद सदनिकांच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून आतील कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.

शिक्षकाच्या नोकरीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक

शिक्षकाच्या नोकरीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक

पिंपरी - चिंचवडमधील फत्तेचंद जैन शाळेत शिक्षक म्हणून नोकरीस लावण्यासाठी एकाने सहा जणांकडून लाखो रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

"पुणे-मुंबई रस्त्यांचे रुंदीकरण करावे'

"पुणे-मुंबई रस्त्यांचे रुंदीकरण करावे'

पुणे - पुणे-मुंबई रस्त्याचे बोपोडी येथील रुंदीकरण उपसूचनेद्वारे रद्द करण्याच्या निर्णयास रिपब्लिकन पक्षाने तीव्र आक्षेप घेतला असून, मूळ आराखड्यानुसार हे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी पक्षाने केली आहे.

सिलिंडर चोरीच्या प्रकाराने आकुर्डीतील नागरिक हैराण

सिलिंडर चोरीच्या प्रकाराने आकुर्डीतील नागरिक हैराण

आकुर्डी - येथील पंचतारानगर, संभाजीनगर, गावठाण भागात घरगुती सिलिंडरच्या वाढत्या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Aundh-Ravet BRTS project cost escalates by Rs6 crore

Aundh-Ravet BRTS project cost escalates by Rs6 crore: Total cost of the project may reach Rs500 crore till its completion, feels PCMC

5610 illegal flexes, hoardings removed by PCMC

5610 illegal flexes, hoardings removed by PCMC - Daily News & Analysis:

5610 illegal flexes, hoardings removed by PCMC
Daily News & Analysis
The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has taken action against a whopping 5,610 unauthorised flex boards and hoardings in various parts of the twin township over the past eight months. The civic body had intensified its action following a ...

'सोशल मीडियाचा धोका मीडियापेक्षा जास्त'

'सोशल मीडियाचा धोका मीडियापेक्षा जास्त' - maharashtra times:

'सोशल मीडियाचा धोका मीडियापेक्षा जास्त'
maharashtra times
पिंपरी - चिंचवड क्राइम रिपोर्टर्स असोसिएशन आणि पुणे पोलिस परिमंडळ ३ च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ' प्रसारमाध्यमे आणि पोलिसांमध्ये वाढत असलेली दरी ' या परिसंवादाप्रसंगी ते बोलत होते . या वेळी पोलिस उपायुक्त शहाजी उमाप ...