Thursday, 9 April 2020

Coronavirus : करोनाची साथ नियंत्रणात पिंपरी महापालिकेला यश

शहरात करोनाचे एकदम १२ रुग्ण आढळून आले, त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिकेने वेगाने पावले टाकली.

करोना प्रतिबंधासाठी राबणाऱ्या कर्मचाऱ्यांना १ कोटीचे विमा कवच

महापालिकेचा निर्णय : वारसाला नोकरी देण्याचीही तरतूद

पिंपरी – करोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी नेमणूक केलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांना 1 कोटी रुपयांचे विमा सुरक्षा कवच देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज (बुधवारी) घेण्यात आला आहे. करोना संकटाच्या काळात जिवाची पर्वा न करता काम करणाऱ्या वैद्यकीय, आरोग्य आणि इतर कर्मचाऱ्यांना यामुळे आधार मिळणार आहे. तसेच, दुर्देवी घटना दुर्घटना घडल्यास एक कोटी रुपयांच्या रक्कमेसह त्यांच्या वारसाला पालिकेत नोकरीही दिली जाणार आहे.

शहर पोलिसांनी बनवली सॅनिटायझर व्हॅन; शहरातील 65 चेकपोस्टवरील सर्व कर्मचारी दररोज होणार सॅनिटाइज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एका दिवसात सॅनिटायझर व्हॅन तयार केली असून, गुरुवार (दि. 9) पासून ती सेवेत दाखल होणार आहे. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या हस्ते बुधवारी (दि. 8) या व्हॅनचे उदघाटन करण्यात आले. या व्हॅनमधून शहरातील  65 चेकपोस्टवरील सर्व कर्मचा-यांचे दररोज निर्जंतुकीकरण केले जाणार आहे.   कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली […]

Lockdown: PCMC provides shelter to 394 migrants


SKF गणेश मित्र मंडळातर्फे चिंचवडेनगर येथील गरजूंना मदतीचा हात

पिंपरी (Pclive7.com):- संपूर्ण जगासह भारत देशही कोरोनाच्या संकटात सापडला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात २१ दिवसांचा लाॅकडाऊन जाहिर केलायं. मात्र या लॉकडाऊनमुळे सर्वसमान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर हातावरचं पोट असणारे गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आलीयं. या परिस्थितीत एक हात मदतीचा या भावनेतून एसकेएफ गणेश मित्र मंडळातर्फे चिंचवडेनगर येथील परप्रांतीय तसेच गरजू नागरिकांना गृहउपयोगी वस्तू व धान्याचे वाटप करण्यात आले.

पिंपरी चिंचवडमधील 'हे' चार भाग आज रात्रीपासून होणार सील

पिंपरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील दिघी, घरकुल, खराळवाडी व थेरगाव अशा चार भागातील काही परिसर बुधवारी (ता. ८) मध्यरात्री १२ वाजेपासून सील करण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी शासनाशी समन्वय ठेवू - आयुक्त

पिंपरी - 'शहरातील अत्यावश्यक सेवा सुरळीत चालू ठेवण्यासाठी राज्य शासनाच्या विविध विभागांशी समन्वय साधला जाईल. त्याद्वारे, अडचणी सोडविल्या जातील, " असे आश्वासन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले.

दररोज कचरा संकलनात तब्बल 350 टनाची घट

पिंपरी चिंचवडमधील “लॉकडाऊन’ इफेक्‍ट
नागिरकांच्या कचऱ्याबाबत तक्रारीच नाहीत

पिंपरी – एकीकडे करोनामुळे मोठे संकट ओढवले आहे. तर दुसरीकडे प्रदूषण कमी होण्यासही हा व्हायरस कारणीभूत ठरत असल्याचे दिसत आहे. लॉकडाऊननंतरच्या काळात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कचरा डेपोवर नेहमीपेक्षा दररोज तब्ब्ल 350 मेट्रिक टन कचरा कमी जमा होत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय, आयुष मंत्रालयाच्या ‘या’ आहेत खास टिप्स

एमपीसी न्यूज – आयुष मंत्रालयाने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत. हे उपाय भारतातील 16 मोठ्या वैद्यांच्या मदतीने तयार करण्यात आले आहे. कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असताना, हे काही आयुर्वेदिक उपाय आहेत, जे मानवी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरु शकतात. हे उपाय म्हणजे कोरोनावरील इलाज नाही तर शरीर सुदृढ ठेवण्यासाठी घरगुती उपाय आहेत. सर्वसामान्य उपाय […]

पुणे महानगर क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालयात मास्क बंधनकारक

एमपीसी न्यूज – मुंबई महानगर प्रादेशिक विकास क्षेत्र (एमएमआर) तसेच पुणे महानगर प्रादेशिक विकास क्षेत्रातील (पीएमआर) सर्व शासकीय, निमशासकीय, महानगरपालिका, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम व इतर कार्यालयामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयीन प्रवेश ते कार्यालय सोडेपर्यंतच्या संपूर्ण कालावधीत चेहऱ्यावर मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंबंधीचे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अन्शु सिंन्हा यांनी काढले आहे. राज्यातील […]

महाराष्ट्र कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात नाही – आरोग्यमंत्री राजेश टोपे

एमपीसी न्यूज  : राज्यात तालुकास्तरावर ‘इंडियन मेडिकल असोशिएशन’च्यावतीने (आयएमए) ‘रक्षक’ क्लिनिक सुरू करण्यात येणार असून, मोठ्या शहरांमध्ये मोबाईल क्लिनिक देखील सुरू करण्याचे आश्वासन ‘आयएमए’च्या पदाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. महाराष्ट्र कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात नाही,  असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत माहिती देतांना आरोग्यमंत्री म्हणाले, राज्यात रुग्णांची संख्या वाढत […]

As infections rise Maha CM appeals ex-servicemen to join containment efforts


Coronavirus:लॉकडाउनमुळे आयटी कर्मचाऱ्यांच्या हक्‍काच्या सुट्यांवर गदा

पिंपरी - कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनचा परिणाम आयटी कंपन्यांच्या व्यवसायावर झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या रजा कमी करण्याचा निर्णय काही कंपन्यांनी घेतला आहे. हक्‍काच्या सुट्यांवर गदा येणार असल्याने यासंदर्भात कामगार आयुक्‍तांकडे तक्रार दाखल करणार असल्याचे फोरम फॉर आयटी एम्प्लॉइजचे अध्यक्ष पवनजीत माने यांनी सांगितले. 

Coronavirus : झोपडपट्ट्यांत दारापर्यंतचे धान्य वितरण असफल

पिंपरी - पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील झोपडपट्ट्यांमध्ये घरांच्या दारापर्यंत धान्य वाटप करण्याचा हेतू असफल झाला आहे. त्यामुळे, बहुतांश ठिकाणी दुकानांमधूनच लोकांना धान्य वाटप केले जात आहे. 

Coronavirus : लाँन्ड्री कामगारांवर उपासमारीची वेळ

नवी सांगवी (पुणे) - लॉकडाऊनच्या काळात सर्वात उपेक्षिला गेलेला वर्ग म्हणजे लॉन्ड्री कामगार हा होय. पतीपत्नी दोघेही नोकरी करीत असल्याने या चाकरमानी लोकांना कपडे धुणे व त्यांना इस्त्री करणे हे सर्वात जास्त कंटाळवाने वाटते. त्यामुळे सध्याच्या काळात या लॉन्ड्री कामगारांना चांगले दिवस येत असताना या लॉकडाऊन मध्ये उपासमारीची वेळ आली आहे. पिंपरी चिंचवड शहरात अनेक सेवाभावी संस्था, घरकुल सोसायट्या रस्त्यावरील मजुरांना किराणा व जेवन देत आहेत.

Coronavirus : मिळकतकरात सवलत; पिंपरी चिंचवड महापालिकेचा निर्णय

पिंपरी - कोरोनाचा प्रादुर्भाव व संचारबंदी यामुळे नागरिकांचे जीवनमान ठप्प झालेले आहे. उत्पन्नाचे स्त्रोत व आर्थिक व्यवहार बाधित झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने महापालिकेने मिळकतकरामध्ये काही प्रमाणात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. 

Coronavirus : ‘एनएसएस’ची फौज सरसावली

पुणे - ‘कोरोना’ लाॅकडाउन काळात नागरिकांना मदत पोचविण्यासाठी सरकारी यंत्रणांवर प्रचंड ताण पडत आहे. तो कमी करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठाच्या ‘राष्ट्रीय सेवा योजने’तील (एनएसएस) पुणे, नाशिक व नगर जिल्ह्यातील  60 हजार विद्यार्थी यंत्रणेला विविध माध्यमातून सहाय्य करणार आहेत, अशी माहिती कुलगुरू प्रा. नितीन करमळकर यांनी दिली.

“सोशल डिस्टंसिंग’चा फज्जा

वेगवेगळी कारणे शोधून नागरिक घराबाहेर
दिघीतील अंतर्गत रस्ते बंद करून शोधला उपाय
चऱ्होली – पोलीस प्रशासनाने घराबाहेर पडू नये अशा वारंवार सूचना देऊनही व राज्यात संचारबंदी कायदा लागू असताना सुद्धा दिघी परिसरात कायद्याची पायमल्ली करणाऱ्या मुजोर नागरिकांची रस्त्यावर कायमच वर्दळ दिसून येते. अत्यावश्‍यक सेवेसाठी दिलेल्या वेळेत काहीतरी कारणे शोधून बाहेर पडणाऱ्या नागरिकांमुळे “सोशल डिस्टसिंग’चा दिघीत फज्जा उडाला असल्याचे वास्तव आहे. यामुळे नागरिकांच्या बाहेर पडण्याला अटकाव करण्यासाठी परिसरातील अंतर्गत रस्ते बंद करण्याची शक्‍कल लढविली आहे.

पिंपरी भाजी मंडई फक्‍त पहाटेच खुली

गर्दी रोखण्याचे प्रयत्न ः चिंचवडमध्ये निम्मेच गाळे सुरु राहणार
पिंपरी – करोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गर्दीला अटकाव करण्यासाठी आता पिंपरी मंडई ही पहाटे 3 सकाळी 7 या वेळेतच खुली ठेवण्यात येत आहे. चिंचवड येथील भाजी मंडई मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळत दिवसभर सुरू आहे. परंतु दिवसाआड प्रमाणे निम्मेच गाळे सुरु राहणार आहेत.

बुधवारी 89 जणांवर गुन्हे दाख

पिंपरी  – संचारबंदीतही रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या 89 जणांवर बुधवारी (दि. 8) पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. पोलिसांनी गेल्या 21 दिवसामध्ये एक हजार 758 जणांवर जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.