Saturday, 11 August 2018

हिंजवडी मेट्रो ‘महत्त्वाकांक्षी नागरी परिवहन’ प्रकल्प घोषित

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (पीएमआरडीए) मार्फत राबविण्यात येत असलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाला राज्यशासनाने ‘महत्त्वाकांक्षी नागरी परिवहन’ प्रकल्प म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे या प्रकल्पाला मेट्रो मार्गालगत अंदाजे 30 ते 35 हेक्टर जमिनीची आवश्यकता भासणार आहे.

…यामुळे ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही

नवी दिल्ली – तुम्हाला आता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्ससची मूळ प्रत दाखविण्याची गरज राहणार नाही. केवळ मोबाईलमधील ई-कॉपी दाखवली तरी पुरेसे आहे. तसे निर्देशच केंद्र सरकारने राज्यांमधील ट्रॅफिक पोलिस व परिवहन विभागांना दिले आहेत.

निगडी-दापोडी बीआरटीला परवानगी

सुरक्षेच्या कारणास्तव रोखून धरण्यात आलेल्या बीआरटीएस प्रकल्प राबविण्यास हायकोर्टाने अखेर ग्रीन सिग्नल दिला आहे. निगडी ते हॅरिस ब्रीज या मार्गावरील बीआरटीएस विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी दरम्यान, कोर्टाने या मार्गावर बीआरटी सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे १२ वर्षानंतर आता या मार्गावर बीआरटी धावणार आहे.

अनधिकृत बांधकामावर‘वॉच’

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांची यादी तयार करण्यात येणार असून, ती यादी संबंधित दुय्यम निबंधकांकडे देण्यात येणार आहे. यादीत अनधिकृत म्हणून नाव असणार्‍या बांधकामांची आता नोंदच घेतली जाणार नसल्याने, राजरोसपणे अनधिकृत बांधकाम करणार्‍या माफियांचे धाबे दणाणले आहेत.

Maharashtra: State urges civic bodies to follow MPCB rules for dealing with slaughterhouse waste

The state government has directed all local civic bodies to strictly implement rules framed by the Maharashtra Pollution Control Board (MPCB) for handling and processing the waste generated by slaughterhouses run by them. It has also warned that strict action will be taken against “illegal” slaughterhouses, which were running without the permission of MPCB or the local civic body.

दापोडीत ड्रेनेज दुरूस्ती कामास सुरूवात

जुनी सांगवी : दापोडी येथील महात्मा फुले नगर, महादेव आळी, गावठाण येथील ड्रेनेज लाईन चेंबर दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. सखल भाग छोट्या व्यासाचे पाईप यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रकार येथे घडत होते. ड्रेनेज लाईन तुंबल्याने येथील गुलाबनगर, महात्मा फुले नगर आदी भागात मैलामिश्रित घाण पाणी नागरीकांच्या घरात येण्याचे प्रकार पावसाळ्यात नित्याचे घडत होते. पालिका प्रशासनाकडुन येथील चेंबर दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. याबाबत सोमवारी (ता.18 जून) 'सकाळ'मधुन 'दापोडीत मैलापाणी घरात', या शिर्षकाखाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती.

पुणे-लोणावळा मार्गावरील प्रवाशांच्या अडचणी कायम

लोकलची संख्या वाढविणे आणि वेळापत्रक पाळण्याबाबतची मागणी कायम
पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागामध्ये पुणे ते लोणावळा या मार्गावर एकमेव उपनगरीय लोकल सेवा उपलब्ध आहे. मात्र, लोकलच्या प्रवाशांचा प्राधान्याने विचार केला जात नसल्याने पुणे-लोणावळा लोकल नेहमीच दुर्लक्षित राहिली आहे. आवश्यकतेनुसार लोकलची संख्या वाढविणे आणि वेळापत्रक पाळण्याबाबतची मागणी पूर्ण होत नसल्याने प्रवाशांच्या अडचणी कायम आहेत.

दापोडीत ड्रेनेज दुरूस्ती कामास सुरूवात

जुनी सांगवी : दापोडी येथील महात्मा फुले नगर, महादेव आळी, गावठाण येथील ड्रेनेज लाईन चेंबर दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. सखल भाग छोट्या व्यासाचे पाईप यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रकार येथे घडत होते. ड्रेनेज लाईन तुंबल्याने येथील गुलाबनगर, महात्मा फुले नगर आदी भागात मैलामिश्रित घाण पाणी नागरीकांच्या घरात येण्याचे प्रकार पावसाळ्यात नित्याचे घडत होते. पालिका प्रशासनाकडुन येथील चेंबर दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. याबाबत सोमवारी (ता.18 जून) 'सकाळ'मधुन 'दापोडीत मैलापाणी घरात', या शिर्षकाखाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती.

राष्ट्रवादीवर आरोप करण्यापेक्षा पवना जलवाहिनी बद्दलची भूमिका स्पष्ट करा – दत्ता साने

चौफेर न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांना पवना जलवाहिनी होणार असे आश्‍वासन देणारे पालक मंत्री व भाजप आमदारांनी राष्ट्रवादीवर आरोप करण्याऐवजी पवना जलवाहिनी बद्दलची त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केले आहे.

‘जातवैधता प्रमाणपत्र १४ ऑगस्टपर्यंत द्या’

पुणे : इंजिनीअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी पदवी, एमबीए या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बंधनकारक केलेले जातवैधता प्रमाणपत्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांना १४ ऑगस्टपर्यंत सादर करण्याच्या सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने शुक्रवारी दिल्या. अन्य अभ्यासक्रमांना यापूर्वी दिलेल्या मुदतीत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. दरम्यान, मागसवर्गीय विद्यार्थ्यांनी हे प्रमाणपत्र १४ ऑगस्टपर्यंत सादर केले नाही. तर, त्यांचा प्रवेश हा खुल्या प्रवर्गातून केला जाणार असल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिली. राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशादरम्यान मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र १० ऑगस्टपर्यत सादर करणे बंधनकारक केले होते. नव्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना १४ ऑगस्टची अंतिम मुदत आहे. त्यासाठी संबंधित अभ्यासक्रमांना विविध तारखा देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कोणत्या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी जातवैधता प्रमाणपत्र कधी सादर करायचे याचे सुधारित वेळापत्रक उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जाहीर केले आहे.

उद्यानाच्या मुरमाड जागेत बहरली रानफुले

पिंपरी चिंचवड : गेल्या चार वर्षांपासून प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पर्यावरण विभागातील एक अभ्यास गट पिंपरी चिंचवड परिसरामध्ये आषाढ व श्रावण महिन्यात फुलणाऱ्या रानफुलांचा अभ्यास करीत आहेत.समिती पर्यावरण विभागाचे विजय मुनोत, संतोष चव्हाण, अर्चना घाळी, विभावरी इंगळे,गौरी सरोदे,विशाल शेवाळे, नितीन मांडवे, अजय घाडी,जयेंद्र मकवाना,जयप्रकाश शिंदे हे समिती अध्यक्ष विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रानफुलांचा अभ्यास करीत आहेत.

सांगवी परिसरात गणेशमुर्ती बनविण्याची लगबग

जुनी सांगवी (पुणे): एक महिन्यावर आलेल्या गणेश उत्सवामुळे जुनी सांगवी व परिसरातील गणेशमुर्ती तयार करण्याच्या कारखान्यांमधुन कारागीर मंडळींची लगबग सुरू आहे. जुनी सांगवीतील कुंभारवाड्यातील श्रीं च्या मुर्तीस सांगवीसह शहरात मोठी पसंती आहे. सांगवीत येथे सर्व प्रकारच्या मुर्त्या कलाकार तयार करतात.प्लँस्टर पँरीस मुर्त्यांना जास्त मागणी असली तरी शाडु मातीच्या मुर्त्यांनाही सध्या मागणी वाढत आहे.

रेल्वे सिग्नल केबलची चोरी

पिंपरी - तुम्ही जर पुणे ते लोणावळा मार्गावर रेल्वेने प्रवास करत असाल आणि गाडी अचानक बराच वेळ एखाद्या स्थानकावर थांबली तर या मार्गावरील सिग्नल यंत्रणा कदाचित बंद पडलेली असू शकते. सिग्नलची केबल तुटल्याने गाडीला बराच वेळ थांबावे लागते. याचे मूळ कारण ही केबल तोडून चोरी होणे आहे. गेल्या वर्षभरात या मार्गावर तब्बल बारा वेळा सिग्नलच्या केबल तोडण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या प्रकारामुळे रेल्वे प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून याबाबत कायदेशीर उपाय करण्यात येणार आहेत.

Pimpri footpath suffers due to dumping of blocks

Citizens decry inconvenience; question Pimpri-Chinchwad Municipal Corporation’s unplanned manner of work

PCMC penalises a YCM doc for private practice

In a first, the civic body has sought a refund of the NPA collected by the surgeon despite him continuing to perform surgeries at a private nursing home since 2005

PCMC starts campaign against illegal posters

Posters stuck on pillars of flyovers, illegal hoardings and a .. 

Ramp on Nashik Phata flyover may open soon

The Maharashtra Metro Rail Corporation (MahaMetro) has recei .. 

Slum dwellers to pay PCMC Rs 3.26 lakh

A total of 222 eligible slum dwellers have to pay Rs 3.26 la ..