Tuesday, 12 June 2018

मेट्रो स्थानकाचे काम वेगात

पुणे - मेट्रोच्या पहिल्या संत तुकारामनगर स्थानकाचे काम वेगाने सुरू झाले आहे. स्थानकाच्या खांबांना ‘पिलर आर्म’ बसविण्याचे काम महामेट्रोने हाती घेतले आहे. वल्लभनगर एसटी बसस्थानकाच्या बाहेरील बाजूला पुणे-मुंबई रस्त्यावर या मेट्रो स्थानकाची उभारणी सुरू आहे.

पिंपरीत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट!

पत्रकारिता, सामाजिक कार्याच्या माध्यमातून गैरप्रकार

एकजूट दाखवत तरुणांनी केली इंद्रायणी नदीची स्वच्छता

निगडी – पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत सांगुर्डी येथील युवकांनी आसपासचा परिसर नव्हे तर थेट इंद्रायणी नदीची स्वच्छता करण्याचा निश्‍चय केला. या निश्‍चयाने पुन्हा एकदा सांगुर्डीतील तरुणांनी एकजूट दाखवत इंद्रायणी नदीची स्वच्छता केली.

आमदार बच्चू कडूंकडून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे कौतुक

पिंपरीः पंतप्रधान आवास योजनेत अपंगासाठी डीपीआर करा आणि त्यांचा आरोग्य विमा उतरवा अशी मागणी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी आज पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे केली. त्याचवेळी पालिकेने अपंगासाठी पेन्शन योजना राबवून अपंग भवन उभारल्याबद्दल कडू यांनी पालिका प्रशासनाचे तोंडभरून कौतूक केले.

भाजपच्या योजना नागरिकांच्या दारात

पिंपरी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारचा 4 वर्षाच्या कालावधीमध्ये सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती संपर्क अभियानाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत “घर टू घर’ पोहचवण्याच्या सूचना पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवकांना करण्यात आल्या.

जुनी सांगवीत चेंबर तुंबल्याने मैलामिश्रित घाण पाणी रस्त्यावर

जुनी सांगवी -  येथील मुळानदी किनारा रस्त्यावर ढोरेनगर येथील ड्रेनेज लाईन चेंबर तुंबल्याने गेल्या पाच दिवसापासुन मैलामिश्रित पाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे येथील दोनशे मिटर परिसरात घाण पाणी साचत आहे. 

वहीदान उपक्रमासाठी शंभर डझन वह्यांचे संकलन

जुनी सांगवी - जुनी सांगवी व पिंपरी चिंचवड शहारातील सातारा मित्र मंडळाच्या वतीने सातारा जिल्ह्यातील दुष्काळी गावातील विद्यार्थ्यांसाठी वही संकलनाचा उपक्रम सुरू आहे. यात कै.तुकाराम तनपुरे फाऊंडेशनच्या वतीने मंडळास शंभर डझन वह्या देण्यात आल्या. 

महापालिका सभांची “तारीख पे तारीख’!

पिंपरी – मान्यवरांना श्रध्दांजली अर्पण करण्याच्या नावाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभा तहकूब करण्याचा सपाटा सत्ताधारी भाजपने लावला आहे. 16 महिन्यांच्या कालावधीत 18 वेळा सभा तहकूब करुन सत्ताधाऱ्यांनी कडी केली आहे. महासभेच्या या “तारीख पे तारीख’मुळे अनेक महत्त्वाचे प्रस्ताव लालफितीत अडकल्याने करदाते संताप व्यक्त करत आहेत.

उत्पादन शुल्क विभागाचे आदेश धाब्यावर

पिंपरी – उत्पादन शुल्क विभागाचे आदेश धाब्यावर बसवून शहरातील दारू दुकानांमध्ये सर्रास मिनरल वॉटर, सॉफ्ट ड्रिंक्‍स आणि खाद्यपदार्थांची अजूनही विक्री होत आहेत.

शहरात एकूण १९ अनधिकृत शाळा

पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृतपणे तब्बल 19 शाळा सुरू आहेत. त्या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाचा प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी सोेमवारी (दि. 11) केले आहे. अनधिकृत शाळेत प्रवेश घेतल्यास पाल्याच्या होणार्‍या शैक्षणिक नुकसानीस शिक्षण विभाग जबाबदार राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

तंबाखुमुक्‍त शालेय परिसराचे “तीन तेरा’

पिंपरी – राज्य सरकारने शैक्षणिक संस्था व शाळांचा परिसर तंबाखुमुक्त करण्याचे आदेश दिले असताना शहरातील बहुसंख्य शाळांच्या 100 यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री सुरु आहे. विशेष म्हणजे शहरातील शाळा सुरु होत असताना कारवाईकडे दुर्लक्ष झाल्याने पालक वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही – पक्षनेते एकनाथ पवार

चिंचवड प्रेमलोक पार्क येथील पोलीस आयुक्तालयासाठी शाळेची इमारत देण्यास विद्यार्थ्यांच्या पालकांचा विरोध आहे. मात्र, तात्पुरत्या स्वरुपात विद्यार्थ्यांची दळवीनगर येथील शाळेत व्यवस्था केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. याची काळजी घेतली जाईल, असा विश्वास महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिला.

पोलीस आयुक्‍तालयासाठी आम्हाला वाऱ्यावर सोडू नका!

पिंपरी – चिंचवड प्रेमलोक पार्क येथील महापालिकेच्या महात्मा फुले शाळेच्या इमारतीतीत पोलीस आयुक्तालय करण्यास पालकांनी विरोध दर्शविला आहे. शाळा स्थलांतर करण्याचा निर्णय त्वरीत रद्द करावा, या मागणीसाठी पालकांसह विद्यार्थ्यांनी आज (सोमवारी) महापालिका मुख्यालयासमोर निदर्शने केली. पोलीस आयुक्तालयासाठी महापालिकेने विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडू नये, अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलक पालकांनी दिली.

भोसरीत टोळक्याकडून १८ वाहनांची तोडफोड; ५ जण ताब्यात

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमधील भोसरी, गव्हाणे वस्ती येथे टोळक्याने वाहनांची तोडफोड केली आहे. तब्बल १६ जणांच्या टोळक्याने मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास १८ वाहनांची तोडफोड केली. या तोडफोडीत १६ कार गाड्यांचे नुकसान करण्यात आले आहे. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून १६ अज्ञातांवरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वृक्षलागवड आणि संवर्धन जनजागृतीसाठी “वर्षा मॅरेथॉन” आयोजित करावी – नगरसेवक तुषार हिंगे यांचे आयुक्तांना निवेदन

पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत करण्यात येणारी वृक्षलागवड व संवर्धनाबाबत प्रभावीपणे जनजागृती करण्यासाठी वर्षा मॅरेथॉन आयोजि करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक तुषार हिंगे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनच्या वतीने वाकडमध्ये पोलीस कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशन व शारंगधर फार्मा प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यामाने पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी वाकडमधील कावेरीनगर परिसरातील पोलीस लाईन येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.

शासकीय कार्यालयांना आता ” प्रिपेड’ वीजमीटर

पुणे – शासकीय कार्यालयांकडे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या थकबाकीवर महावितरण प्रशासनाने आता जालिम उपाय शोधला आहे. महावितरण प्रशासनाने यासाठी तीन महिन्यांपूर्वीच जाहीर केलेल्या निर्णयानुसार या कार्यालयांना आता ” प्रिपेड’ वीजमीटरची रसद पुरविण्यात येणार आहे, त्यासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांची यादी त्यांच्या थकबाकीनुसार तयार करण्याचे आदेश सर्व परिमंडलांना देण्यात आले आहेत. या थकबाकीच्या आकड्यानुसार संबधित कार्यालयांना या वीजमीटरचा पुरवठा करण्यात येणार आहे, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

कामगार व कुटुंबियांसाठी योग शिबीर

चिंचवड – संभाजीनगर येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने जागतिक योगदिनानिमित्त 14 ते 21 जून या कालावधीत कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.