मैलाशुद्धीकरण प्रकल्प, पंपिंग स्टेशनवरही 'स्काडा'
पावणे सहा कोटींचा खर्च
पिंपरी-चिंचवड महापालिकेने पाणीपुरवठ्याच्या नियोजनासाठी यापूर्वी कार्यान्वित केलेली 'स्काडा प्रणाली' आता दहा मैलाशुद्धीकरण प्रकल्प आणि सोळा पंपिंग स्टेशनच्या ठिकाणीही कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्वयंचलित संगणकीय प्रणालीसाठी महापालिका सुमारे पावणे सहा कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव येत्या मंगळवारी (दि. 10) होणा-या स्थायी समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.