Wednesday, 23 April 2014

तूट कमी करण्यास एलबीटीचा हातभार

पिंपरी : मार्चअखेर महापालिकेला एलबीटीचे ८६0 कोटींचे उत्पन्न मिळाले. परंतु जकात उत्पनाच्या तुलनेत ३00 कोटींची तूट होणार हे स्पष्ट झाले होते, परंतु मार्च ते २0 एप्रिलपर्यंतच्या एलबीटी उत्पन्नाची आकडेवारी पहाता, ६४ कोटींचे मिळालेले उत्पन्न तूट भरून काढण्यास काही अंशी पूरक ठरणारे आहे. 

"फेरीवाल्यांचे कारवाईत जप्त करण्यात आलेल्या टप-या, हातगाड्या परत कराव्यात

फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असताना त्यांच्यावर कारवाई करणे अन्यायकारक आहे. त्यामुळे महापालिकेने अतिक्रमण कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेल्या टप-या, हातगाड्या परत कराव्यात, अशी मागणी फेरीवाला संघटनेच्या प्रतिनिधींनी फेरीवाला शहर समितीच्या बैठकीत केली.

दापोडीच्या आई उद्यानाच्या देखभालीकडे दुर्लक्ष

दापोडी येथील नव्याने विकसित झालेल्या आई उद्यानाची दुरवस्था होत आहे. उद्यानाच्या देखभाल दुरूस्तीच्या कामात दुर्लक्ष तसेच दिरंगाई होत असल्यामुळे हे उद्यान भविष्यात चांगले राहण्याच्यादृष्टीने त्याची योग्य प्रकारे निगा राखली जावी अशी मागणी नगरसेवक राजेंद्र काटे यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे केली आहे. 

चार हजाराची लाच घेताना प्रकल्प ...

रुग्णाच्या नातेवाईकाकडून चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना चिंचवडच्या एका खासगी रुग्णालयातील राजीव गांधी आरोग्य योजनेच्या प्रकल्प समन्वयकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचा-यांनी रंगेहाथ पकडले. ही घटना आज (मंगळवार) दुपारी घडली.

पोलिसी पाठलाग ३ महिन्यांनी यशस्वी

पिंपरी : पिंपरीतील एच. ए. मैदानावर तीन महिन्यांपूर्वी राहुल दिनेश सपकाळ (वय २४, रा. गांधीनगर, झोपडपट्टी, पिंपरी) या तरुणाचा गोळी झाडून खून करणार्‍या दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यातील एक आरोपी फरार आहे. 
योगेश राजाराम कदम (वय २३, रा. शिंगटे चाळ, नेहरूनगर, पिंपरी) व अश्पाक नबीलाल मेवेगार (रा. कामतारा कॉलनी, सदगुरुनगर, भोसरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा साथीदार धमेंद्र सुबोध चौधरी हा फरार आहे. कदम व मेवेगार यांच्याकडून एका देशी बनावटीच्या पिस्तुलासह एक दुचाकी असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

तळेगाव दाभाडे, कात्रज मार्ग बंद

किवळे : तळेगाव दाभाडे - कात्रज (मार्ग क्रमांक २२८) या मार्गावरील बसच्या फेर्‍या गेल्या दोन महिन्यांपासून टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आल्यामुळे देहूरोड, विकासनगर, किवळे वडगाव व तळेगाव भागातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. पीएमपी प्रशासनाकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. तर नवीन बस आल्यानंतर बस मार्ग पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. 

पोलीस आणि रिक्षाचालकांमध्ये ‘हॉटलाईन’ यंत्रणा उभारण्याची गरज

पुणे : रिक्षाचालक शहरात सर्वत्र वावरत असतात. त्यांचा अनेक नागरिकांशी थेट संबंध येतो. तसेच, समाजात घडणार्‍या घडामोडींची माहिती त्यांच्याकडे असते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने उपयुक्त माहिती रिक्षाचालकांनी पोलिसांना पुरवावी. त्याकरिता पोलीस आणि रिक्षाचालकांमध्ये ‘हॉटलाईन’ यंत्रणा उभारणे गरजेचे आहे, असे मत पुण्याचे पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी व्यक्त केले.

पाणीकपातीला खासदार बाबर यांचा विरोध

पाटबंधारे खात्याच्या कुठल्याही सूचना नसताना महापालिकेने शहरातील ठराविक भागामध्ये पाणी कपात करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला खासदार गजानन बाबर यांनी आक्षेप घेतला असून पाणी कपातीला विरोध दर्शविला आहे.
यासंदर्भात खासदार बाबर यांनी महापालिका आयुक्त राजीव जाधव यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, गतवर्षीच्या तुलनेत यंदा खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे मिळून 2 टीएमसी जादा पाणीसाठी आहे. त्यामुळे पुणेकर आणि खडकवासला कालव्यावरील शेतीलाही यावेळी पाणीटंचाईची झळ बसणार नाही, असे पाटबंधारे खात्याचे म्हणणे आहे.

आयुक्तांची सलग दुस-या दिवशी स्वच्छता मोहिम

महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेमध्ये आयुक्त राजीव जाधव सलग दुस-या दिवशी सहभागी झाले. बिजलीनगरकडून वाल्हेकरवाडीकडे जाणा-या चिंचवडेनगर रस्त्याच्या कडेचा परिसर, प्लास्टिक व इतर कच-यामुळे व्यापून गेला होता. मात्र, स्वच्छता मोहिमेमध्ये या परिसराने मोकळा श्वास घेतला.