पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे देशातील लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊन वाढवताना सरकारने देशात तीन झोन तयार केले आहेत. ग्रीन झोन, ऑरेंज झोन आणि रेड झोन या तीन विभागात जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरात कोणताही झोन लागू होणार नाही. दोन्ही शहरात 17 मे पर्यंत लॉकडाऊनची अंमलबजावणी पूर्ववत लागू राहणार असून कोणतीही सवलत मिळणार नाही
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 3 May 2020
Coronavirus: गुड न्यूज! पिंपरी चिंचवडमध्ये 7 बालकांनी कोरोनावर केली मात
संपूर्ण देशात सध्या कोरोना संसर्गाचा हाहाकार सुरू आहे. देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहे.
आता भोसरीतील ‘नारी’तही कोरोनाची चाचणी
एमपीसी न्यूज ( गणेश यादव ) : भोसरी-एमआयडीसी परिसरातील एड्सबाबत स्वतंत्रपणे संशोधन करणा-या राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत (नारी) आता कोविड-19 म्हणजेच कोरोनाची चाचणी करण्यास परवानगी मिळाली आहे. ‘आयसीएमआर’ने दोन दिवसांपुर्वी चाचणी करण्यास परवानगी दिली आहे. याची पिंपरी-चिंचवड महापालिकेला मोठी मदत होणार आहे. वायसीएमपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘नारी’त कोरोनाची चाचणी केली जाणार असल्याने त्याचे रिपोर्ट लवकर […]b
पिंपरी चिंचवडमधील आजपर्यंतच्या ‘पॉझिटिव्ह’ रूग्णांची संख्या ११५ वर पोहचली; जुनी सांगवी, पिंपळे गुरवचा काही परिसर ‘सील’ होणार..!
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात शुक्रवारी दिवसभरात एकही कोरोनाचा ‘पॉझिटिव्ह’ रूग्ण आढळला नव्हता. मात्र काल रात्री उशिरा आलेल्या अहवालात पिंपळे गुरव आणि जुनी सांगवी परिसरातील २ जण कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंत कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रूग्णांची संख्या ११५ वर पोहचली असून ५२ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर शहराबाहेरील दोन रूग्णांसह ५ जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जुनी सांगवी, पिंपळे गुरवचा काही परिसर आज (दि.०२) रात्रीपासून सील करण्यात येणार आहे.
पिंपरीत कामगार दिनापासून असंघटित कामगारांसाठी अन्नछत्र सुरू
कोरोना या भयंकर महामारी आजारांमुळे लॉकडाऊन सुरू असून लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणारे रिक्षाचालक, धुणीभांडी, स्वयंपाक, साफ सफाई कामगार, कागद-काच-पत्रावेचक, बांधकाम मजूर फेरीवाले आदी कष्टकरी जनतेचे हाल सुरू आहेत. असंघटित कामगारांची उपासमार होऊ नये यासाठी कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मागे अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने गरजुंना भोजन वाटप
काळेवाडी ज्योतिबा नगर, नढे नगर, पवना नगर, कोकणे नगर परिसरातील निराधार निरागस ज्यांना रेशनिग कार्ड नाही अशा लोकांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने अन्न वाटप करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड : पोलिसांच्या कार्याला सलाम; रुटमार्च दरम्यान नागरिकांनी केला सन्मान
सध्याच्या संचारबंदीच्या काळात पोलीस आपलं कर्तव्य चोखपणे बजावताना दिसत आहेत.
ऑनलाईन अर्ज केल्यानंतर मिळणार घरी जाण्याचा 'पास'; नोडल अधिकारी तैनात!
पुणे : जिल्ह्यातून अन्य राज्यात अथवा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामध्ये जाणारे मजूर, विद्यार्थी, यात्रेकरू आणि अन्य व्यक्ती यांनी covid19.mhpolice.in या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
पिंपरी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी साहेबराव गायकवाड यांची नियुक्ती
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी साहेबराव गायकवाड यांची प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेत आता तीन अतिरिक्त आयुक्त काम करणार आहेत. महापालिकेतील पदोन्नतीने नियुक्त करावयाच्या अतिरिक्त आयुक्तांचे पद रिक्त होते. त्या पदावर गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ‘सॅनिटायझेशन’च्या नावाखाली लूट
भीती दाखवून मंदीत संधी ः प्रति चौरस फूटवर निर्जंतुकीकरण करुन देण्याचे प्रलोभन
माजी महापौर राहुल जाधव यांच्यावतीने चिखली, जाधववाडी परिसरातील ५ हजार नागरिकांना दररोज ‘अन्नदान’
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर राहुल जाधव यांच्यावतीने चिखली, जाधववाडी परिसरातील ५ हजार नागरिकांना दररोज अन्नदान करण्यात येत आहे. कोरोनाच्या या संकटामुळे निर्माण झालेल्या भयानक परिस्थीतीत राहुल जाधव यांच्या या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळत आहे.
थेरगावमधील युवा उद्योजकांकडून महाराष्ट्र दिनानिमित्त पोलिसांना मास्क वाटप..!
पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने थेरगाव परिसरातील युवा उद्योजक अक्षय ढमाले आणि अक्षय परदेशी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना ४०० मास्क व गुलाबपुष्पचे वाटप केले. निगडी, प्राधिकरण, बिजलीनगर, चिंचवडगाव, रावेत तसेच वाकड येथे बंदोबस्तास असलेल्या पोलिस बांधवांना मास्क व गुलाबांच्या फुलांचे वाटप करण्यात आले.
17 राज्यांत One Nation-One Ration Card लागू, पासवान म्हणाले – ‘आता तुम्ही कुठेही घेऊ शकता रेशन’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेश आणि बिहारसह पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना राष्ट्रीय स्तरावर राशन पोर्टेबिलिटी परवानगी मिळाल्यानंतर आता देशातील १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजना लागू झाली आहे. यासह, राष्ट्रीय व आंतरराज्यीय पोर्टेबिलिटीची सुविधा १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील सुमारे ६० कोटी एनएफएसए लाभार्थ्यांना उपलब्ध होईल आणि त्यांना वन नेशन, वन रेशन कार्ड योजनेंतर्गत या राज्यात कोठेही रास्त भाव दुकानातून रेशन मिळवू शकता. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय, रामविलास पासवान यांनी शुक्रवारी उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हिमाचल प्रदेश, दादर नगर हवेली आणि दमण आणि दीव या पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना वन नेशन, वन रेशन कार्ड अंतर्गत राष्ट्रीय क्लस्टरसह जोडण्यास मंजुरी दिली.
…अन् तहसीलदार कार्यालयाबाहेर पाससाठी गेलेल्या नागरिकांची झाली निराशा
एमपीसी न्यूज – परगावी जाण्यासाठी नागरिकांना राज्य सरकारने शुक्रवारी पास देण्याची घोषणा केली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील परगावी आणि दुसर्या राज्यात जाण्यासाठी इच्छूक असलेल्या नागरिकांनी पास घेण्यासाठी आज (शनिवारी) आकुर्डीतील अप्पर पिंपरी चिंचवड तहसीलदार कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. मात्र, तहसील कार्यालयातून पास देण्यात येत नसल्याने नागरिकांची निराशा झाली. देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. देशात 24 […]
शहरातील दोन्ही आमदारांनी केला सरकारचा निषेध
राज्यपालांवर होणारी असंवैधानिक शेरेबाजी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिली जाणारी एन्काऊंटरची धमकी, माध्यमांची गळचेपी, सोशल मीडिया कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात येणारे खोटे गुन्हे आणि पोलिसांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्याचा भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांना निवेदन देऊन निषेध केला आहे. तसेच या सर्व घटनांमध्ये दोषी असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी देखील या दोघांनी केली आहे. यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही निवेदन मेल करण्यात करण्यात आले आहे.
सनदी लेखापाल, कंपनी सचिव अभ्यासक्रमाच्या परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये
परीक्षेची अधिक माहिती आयसीएसआयच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
लॉकडाऊनमध्ये वकिलांसाठी ऑनलाइन व्याख्यानमाला
पुणे : महत्त्वाच्या कायद्यांमध्ये झालेले बदल, सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निकाल व त्याचे परिणाम आणि प्रॅक्टिस करताना येणाऱ्या विविध अडचणींचे निरसन करण्यासाठी वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळावे यासाठी जन आदालत संस्थेतर्फे ऑनलाइन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)