Wednesday, 23 August 2017

State to fund 18 JNNURM projects across 14 cities

Neelkanth Poman, chief information and technology officer for PCMC, said, "We have received only the first instalment of central and state governments' funds for Tathawade and phase I of 24x7 water supply projects, and for the drainage scheme for the ...

Pimpri school won't let 'weak' students sit for Class X boards

SNBP insists that teachers have been told to pay extra attention to students. PIC: DATTATRAYA ADHALGE. Not wanting to mar its 100 per cent pass record, SNBP International School asked over 20 students to fill out forms and give the test externally; ...

‘तोंडी तलाक’च्या निर्णयामुळे महिलांची वाटचाल सुकर’

पुणे - तोंडी तलाक हा घटनाबाह्य ठरविणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने लाखो मुस्लिम महिलांचा विजय झाला असून, त्यांना आता न्याय मिळणार आहे. खरंतर हा निर्णय यापूर्वीच होणे अपेक्षित होते, पण असो. मुस्लिम महिलांच्या हक्कांची जाणीव याद्वारे अधोरेखित झाली आहे. या निर्णयामुळे सर्व समावेशकता आणि सक्षमीकरण या दिशेने मुस्लिम महिलांच्या वाटचालीचा मार्ग सुकर झाला आहे, अशी समाधानकारक भावना विविध स्तरातून व्यक्त होत आहे.

भोसरीत जिल्हास्तर शालेय कुस्ती स्पर्धा सुरू

पिंपरी– पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तर शालेय कुस्ती स्पर्धेला मंगळवारी (दि.22) भोसरीतील महेशदादा स्पोर्टस्‌ फाऊंडेशन येथे सुरुवात झाली. महापौर नितीन काळजे व भोसरी तालीम संघाचे वस्ताद किसनराव लांडगे यांच्या हस्ते या स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळी क्रीडा समिती सभापती लक्षमण सस्ते, ई प्रभाग अध्यक्षा भीमाताई फुगे, ह प्रभाग अध्यक्ष अमर कांबळे, नगरसेवक संतोष लोंढे, नितीन लांडगे, सागर गवळी, सोनाली गव्हाणे आदी उपस्थित होते. भोसरी तालीम संघाचे वस्ताद कालीदास लांडगे, बाळसाहेब लांडगे, हिरामण लांडगे, पितांबर शिंदे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. स्पर्धेचे संयोजन पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघटनेचे उपाध्यक्ष पोपटराव फुगे, सचिव धोंडीबा लांडगे, संतोष माचुत्रे, मनोज दगडे, विजय कुटे, सचिन खांदवे, प्रशांत उबाळे यांनी केले. अनिल मगर यांनी प्रस्ताविक केले. विश्‍वास गेंगजे यांनी सूत्रसंचालन केले. क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे यांनी आभार मानले.

सुमारे 50 हजार ग्राहक अंधारात!

पिंपरी –  मान्सून पूर्व देखभाल दुरुस्ती केल्याचा दावा करणाऱ्या महावितरणचे नियोजन कसे तकलादू आहे, याचा अनुभव शाहूनगर, कुदळवाडी परिसरातील सुमारे 50 हजार वीजग्राहकांना आला. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापारेषणच्या अभियंत्यांना टेल्को सब स्टेशनमध्ये धाव घ्यावी लागली. शेवटी महावितरणची केबल नादुरुस्त झाल्याचे समोर आले. अद्यापही वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही.

गणेशोत्सवासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठा सजल्या, गौरीच्या दागिन्यांना वाढली मागणी

पिंपरी : विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी लागणाºया विविध प्रकारच्या सजावटीच्या आकर्षक साहित्याने पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. लाडक्या गणपती ...

पिंपरीत बोगस वकिलांचा वाढलाय वावर, परप्रांतीय व्यक्तींच्या सहभागाचा संशय

पिंपरी : आॅल इंडिया बार कौन्सिलकडे नोंदणी नाही़ वकिली व्यवसायाची सनद न मिळविता, राजरोसपणे न्यायालयात परिसरातील बोगस वकिली करणारे वकील संघटनेलाही शिरजोर झाले आहेत. वकिली व्यवसाय हा प्रतिष्ठेचा व्यवसाय आहे़ मात्र त्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचेल अशी वर्तणूक ...

4 corporators may lose membership

Speaking to TOI on Tuesday, Pravin Ashtikar, assistant commissioner and chief of election department of PCMC, said, "The BJP has still not submitted the caste validity certificate or a written order of stay from the high court that the elected ...

भाजपच्या दोन नगरसेविकांना दिलासा

पिंपरी - भाजपच्या नगरसेविका कमल घोलप आणि मनीषा प्रमोद पवार यांनी जातवैधता प्रमाणपत्र महापालिका निवडणूक विभागाकडे मंगळवारीदेखील (ता. 22) सादर केले नाही. मात्र, त्यांनी उच्च न्यायालयातून स्थगिती आदेश आणला असल्याचे सहायक आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांना मंगळवारी दूरध्वनीवर कळविले. त्यामुळे त्यांना दिलासा मिळू शकतो. 

शहरबात पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादीच्या 'खाऊगल्ली'त भाजपचाही 'डल्ला'

पिंपरी पालिकाजिंकून द्या, तुम्हाला मंत्रिपद मिळेल, असा शब्द शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप तसेच आमदार महेश लांडगे यांना देण्यात आला होता. प्रत्यक्षात, त्यांच्या हाताला अद्यापही काही लागलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ...

उत्सवाला 'चाकरमानी चल्ले गावाक'...

त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून गौरी-गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. प्रवाशांची वाढती ही संख्या पाहून एसटीच्या पुणे विभागातर्फे दर वर्षी जादा गाड्यांचे नियोजन केले जाते. स्वारगेट, पिंपरी ...