पिंपरी – सपर्यावरण संवर्धन समिती आणि महापालिका उद्यान विभागाच्या पुढाकाराने (दि.9) दुर्गा टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात महापालिका शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या प्राथमिक पदवीधर शिक्षक संघटनेच्या 78 शिक्षकांनी त्यांच्या कुटुंबीयांसोबत सहभाग नोंदविला.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 15 July 2017
‘जीएसटी’चा परिणाम क्रीडा साहित्य महाग
पिंपरी - केंद्र सरकारकडून चालू महिन्यापासून १२ आणि २८ टक्के इतका जीएसटी कर लागू होण्याची अपेक्षा असल्याने काही अपवाद वगळता निरनिराळ्या प्रकारच्या क्रीडा साहित्यांचे भाव वाढण्याची भीती वर्तविली जात आहे. त्याचा विपरीत परिणाम क्रीडा क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे.
अखेर स्मशानभूमीसाठी मिळाली जागा
माण ग्रामपंचायत आणि एमआयडीसीने दिली सहा गुंठे जागा
हिंजवडी - स्मशानभूमीअभावी भर रस्त्यात मृतदेहावर अंत्यविधी करण्याची वेळ माण येथील गवारेवाडी ग्रामस्थांवर आली होती. आठ दिवसांपूर्वी परमेश्वर बाळासाहेब गवारे (वय ३२) याच्यावर राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यानातील तिसऱ्या टप्प्यातील मेगा पाँलीस सोसायटीजवळील मुख्य रस्त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. आयटीसारख्या भागात भर रस्त्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आल्याचे विदारक चित्र पुढे आणल्यानंतर माण ग्रामपंचायत व एमआयडीसी प्रशासनाला अखेर जाग आली व गवारवाडी येथील स्मशानभूमीसाठी आरक्षित केलेली सहा गुंठे हक्काची जागा पोलिस बंदोबस्तात माण ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात आली. लवकरच येथे स्मशानभूमीच्या कामाला सुरवात करण्यात येईल, असे आश्वासन मुळशीचे उपसभापती पांडुरंग ओझरकर व माणचे उपसरपंच संदीप साठे यांनी दिले.
कार्यक्रमांची सुरक्षितता धोक्यात!
पुणे - 'वस्तू व सेवा कर’ (जीएसटी) लागू झाल्यामुळे करमणूक कर रद्द करण्यात आला. परिणामी जिल्हा प्रशासनाकडील करमणूक कर विभाग पूर्णतः बंद झाला आहे; परंतु सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या विविध करमणूक कार्यक्रमांसाठी कोणत्या विभागाकडून परवानगी घ्यावी, याची कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे कार्यक्रमांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या कार्यक्रमांची जबाबदारी कोणाची, शुल्क वसुली कोण करणार, एखादी मानवनिर्मित आपत्ती ओढवली, तर जबाबदारी कोण घेणार याबाबत स्पष्टता राहिलेली नाही.
पुणे, पिंपरीत चोरट्यांचा उच्छाद
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. दोन दिवसांत दहा पेक्षा जास्त घरफोड्या झाल्या असून त्यामध्ये चाळीस लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल चोरीला गेला आहे. शहरात गेल्या सहा महिन्यांत ...
हॉकर्स झोन कायदा जनजागृतीसाठी देशव्यापी यात्रेचे आयोजन
पिंपरी – हॉकर्स झोन कायद्यावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली असून, हा कायदा देशभर लागू करण्यात आला आहे. मात्र, या निर्णयाची अनेक राज्यांना माहिती नसल्याने या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. या कायद्याविषयी जनजागृती करण्यासाठी कन्याकुमारी ते जम्मू-काश्मिर अशी देशव्यापी याषा काढण्याचा निर्णय हॉकर्स फेडरेशनच्या राष्ट्रीय कार्यशाळेत घेण्यात आला.
डॉ. आंबेडकर यांचे नाव निगडीतील कमानीला देण्याचा ठराव
पिंपरी – निगडी येथील वाहतूक नगरीच्या कमानीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, असा ठराव रिपाइंच्या उद्योग सेलच्या बैठकीत करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष अमित मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली निगडीत बैठक झाली. आयुक्त श्रावण हर्डिकर यांना अंमलबजावणी करण्यासाठी ठरावाची प्रत निवेदनासोबत देऊन मागणी केली. यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे मेश्राम यांनी सांगितले.
Subscribe to:
Posts (Atom)