Saturday, 16 February 2019

रमाई आवास योजनेत 1 हजार 407 घरकुलांना मंजुरी

पुणे – जिल्ह्यात रमाई आवास योजने (ग्रामीण) अंतर्गत मातंग समाजासह अनुसूचित जाती आणि नवबौद्ध संवर्गासाठी यंदाच्या वर्षात 1 हजार 407 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे या कुटुंबांना हक्काचे घर मिळण्यास मदत झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे कुटुंब पात्र आहेत आणि त्यांनी अजूनही अर्ज केला नाही, अशा कुटुंबांनी तालुक्‍यातील गटविकास अधिकाऱ्यांमार्फत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास विभागाकडून करण्यात आले आहे.

राज्य परीक्षा परिषदेकडून शिष्यवृत्ती परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने येत्या 24 फेब्रुवारीला घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. परीक्षेसाठी व्यवस्थित नियोजन करण्याच्या सक्त सूचना राज्यातील शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांना परीक्षा परिषदेकडून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे देण्यात आल्या आहेत.

महापालिका आणि शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून सार्वजनिक शिवजन्मोत्सव होणार साजरा

पिंपरी (दि. १५ फेब्रु.) :-  पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि शिवजयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने अखिल पिंपरी-चिंचवड शहर सार्वजनिक शिवजन्मोत्सव रवीवार (दि. १७ ते १९ फेब्रुवारी)  यादरम्यान सोहळ्याचे आयोजन केले आहे.

इंटरसिटी एक्सप्रेस दीड महिन्यासाठी रद्द

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात दौंड आणि कुर्डुवाडीदरम्यान घेण्यात येणाऱ्या ‘ब्लॉक’मुळे पुणे - सोलापूर - पुणे इंटरसिटी एक्सप्रेस (१२१६९) १६ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीसाठी रद्द करण्यात आली आहे. इंटरसिटी एक्सप्रेस तबब्ल दीड महिना धावणार नसल्याने रेल्वे प्रवाशांचे हाल होणार आहे.

मतदार नोंदणीसाठीपुन्हा एकदा संधी

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीत नाव नसलेल्या नागरिकांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. त्यानुसार जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून दोन आणि तीन मार्च रोजी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारयादीत नाव नसलेल्या नागरिकांसाठी मोहीम घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ही मोहीम घेतली जाणार असल्याचे उपमुख्य निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी सांगितले.

पिंपरी- चिंचवडमधीलनियोजित कार्यक्रम रद्द

जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा येथे दहशतवाद्यांनी गुरुवारी (दि. १४) केलेल्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात आयोजित केलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

पिंपरीत भाजप युवा मोर्चाच्या वतीने पाकिस्तानचा झेंडा जाळला

पुलवामा येथे जवानांच्या वाहनावर झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्याचा पिंपरी-चिंचवड भाजप युवा मोर्चाच्या वतीने आज (शुक्रवारी) निषेध करण्यात आला. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध नोंदविला. तसेच शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

कर्मचारी महासंघाच्या वतीने शहिद जवानांना श्रध्दांजली

पिंपरी चिंचवड महानगरपालिका व कर्मचारी महासंघाच्या वतीने पुलवामा येथे केंद्रीय सुरक्षादलाच्या ताप-यावर दहशतवादयांनी केलेल्या हल्लयात शहिद झालेल्या जवानांना महापौर राहुल जाधव व पक्षनेते एकनाथ पवार यांच्या उपस्थित झालेल्या सभेत श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

वायसीएम रूग्णालयाच्या महाविद्यालयास 7 नव्या अभ्यासक्रमांना मान्यता : रूग्णांना चांगली सेवा मिळणार

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयातील पदव्युत्तर वैद्यकीय संस्थेच्या (महाविद्यालय) विविध नव्या 7 अभ्यासक्रमांना भारतीय आर्युर्विज्ञान परिषदेची शुक्रवारी (दि.15) मान्यता मिळाली आहे. त्यामुळे येत्या एप्रिल 2019 पासून अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे रूग्णालयामध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी 24 जागा भरण्यात येणार आहेत, असे इन्स्टिट्युटचे अधिष्ठाता डॉ. पद्माकर पंडित यांनी सांगितले.

पुण्यात शहिदांच्या श्रद्धांजली सभेत पाकचा जयघोष

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले. या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. शहीद जवानांना देशभरात श्रद्धांजली वाहिली जात आहे. पुण्यात आयोजित केलेल्या श्रद्धांजली सभेत एका माथेफिरू तरुणाने पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कुमार उपेंद्र सिंह असे या तरुणाचे नाव असून तो ज्युनिअर तिकिट तपासणीस आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

ठेकेदारांची बिले 25 मार्चपर्यंत लेखा विभागाकडे पाठवा; आयुक्तांचा आदेश

एमपीसी न्यूज – चालू आर्थिक वर्षामध्ये कोणत्याही ठेकेदार किंवा पुरवठाधारकांची बीले प्रलंबित राहू नये, यासाठी सर्व प्रकारची बिले 25 मार्चपर्यंत लेखा विभागाकडे पाठवावी लागणार आहेत. याबाबत काही तक्रारी आल्यास संबंधित विभागप्रमुख जबाबदार राहणार आहे. याबाबतचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे. 

महापालिकेचा नवीन दवाखाना सुरु

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 20 मधील कासारवाडी कर संकलन विभागीय कार्यालयाच्या तळमजल्यावरील नवीन दवाखान्याचे महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते आज (गुरुवारी) उद्‌घाटन करण्यात आले.

महापालिकेतर्फे परिवर्तन लोगो आणि टॅगलाइन स्पर्धा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराची जीवनशैली उंचविण्यासाठी आणि वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी महापालिकेने शहर परिवर्तन प्रकल्प सुरू केला आहे. पहिल्यांदाच असा प्रकल्प हाती घेतला असून त्याअंतर्गत शहर परिवर्तनामध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी लोगो आणि टॅगलाइन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ‘पिंपरी-चिंचवड शहर परिवर्तन’ यासाठी एक साजेल असा लोगो आणि टॅगलाइन देखील आवश्यक आहे. 

महापालिकेच्या उद्यान, पर्यटनस्थळी माहितेचे फलक लावा; महापौरांची सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यानामध्ये, पर्यटनस्थळी माहितीचे फलक लावणण्याची सूचना महापौर राहुल जाधव यांनी प्रशासनाला केली आहे. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात विविध ठिकाणी उद्याने विकसित केली आहेत. महापालिकेची 175 उद्याने आहेत. त्यापैकी 41 उद्यानाची देखभाल महापालिका करते. तर, 112 उद्यानाच्या देखभालीसाठी खासगी संस्थांची नेमणूक केली आहे.

‘वायसीएमएच’च्या वैद्यकीय संस्थेच्या सात अभ्यासक्रमाला मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील पदव्युत्तर वैद्यकीय संस्थेच्या सात अभ्यासक्रमाला आज (शुक्रवारी) मान्यता मिळाली आहे. भारतीय आर्युर्विज्ञान परिषदेने अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता दिली. त्यामुळे वायसीएममध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी 24 जागा भरण्यात येणार आहेत. 

महापालिकेच्या गलथान कारभारमुळे बोपखेलवासियांची पहाट पाण्यात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या गलथान कारभारामुळे बोपखेल येथील रामनगरवासियांची पहाट आज (शुक्रवारी) पाण्यात गेली. जलवाहिनी जोडल्यानंतर दुसरे टोक गोणीचा बोळा कोंबून बुजविण्यात आले होते. त्यामुळे पहाटे नागरिक झोपेत असताना पाणी थेट घरात शिरले. त्यामुळे बोपखेलवासियांची पहाट पाण्यात गेली. बोपखेल येथील रामनगर भागात नवीन जलवाहिनी जोडण्याचे काम गुरुवारी (दि.14) करण्यात आले. 

चिंचवडमध्ये अतिक्रमणविरोधी कारवाई

पिंपरी : वाल्हेकरवाडी, चिंचवडगावातील चापेकर चौकासह परिसरात वर्षांनुवर्षे असलेली अतिक्रमणे काढण्याची मोठी कारवाई पिंपरी पालिकेने गुरूवारी सुरू केली. नागरिकांचा कडवा विरोध असतानाही पालिकेने मोठय़ा पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली.